ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.
नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.
एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.
पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.
तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?
Are advertisers coming for
Are advertisers coming for your dreams?
Scientists warn of efforts to insert commercials into dreams
https://www.science.org/content/article/are-advertisers-coming-your-dreams
आयला, मी लिहिले की character ढीला!
मलाही गेल्या काही दिवसांत
मलाही गेल्या काही दिवसांत माझ्या फोनचा मायक्रोफोन काही apps वापरतायत असं लक्षात आलं. मला थोडा मायग्रेनचा त्रास सुरू झालाय पण मी त्याबद्दल काहीही गूगल केलं नाही किंवा whatsapp वर कुणाला काही लिहिलेलं नाही. घरात आणि बाहेर बोलले मात्र आहे. मला instagram वर मोठ्या प्रमाणात मायग्रेनवरच्या रोलऑन टाईप औषधाची जाहिरात दिसतेय गेले काही दिवस. आता मी सगळ्या apps ची मायक्रोफोन वापरण्याची परमिशन ask every time अशी केली आहे. इतके दिवस only while using the app अशी होती.
सहज गुणगुणलेली गाणी यूट्यूब
सहज गुणगुणलेली गाणी यूट्यूब उघडल्यावर सर्च बारच्या सजेशन्स मधे अगदी वर असतात.
मी सतत गरजेच्या नसलेल्या
मी सतत गरजेच्या नसलेल्या सगळ्या अॅप्सचा मोबाईल डेटा अॅक्सेस पण बंद केला. क्रोम वापरणे व त्याचा डेटा अॅक्सेस बंद केला, फक्त सफारी वापरते. सगळ्यांचे मायक्रोफोन्स बंद आहेत. कोणाला लोकेशन अॅक्सेस देत नाही. तरी माझ्या मोबाईलला मला काय सर्च करायचेय ते कळते. म्हणजे माबोवर खईके पान बनारसवालाबद्दल लिहिलेले पान वाचुन दुसर्या टॅबमध्ये डि टाईप केला की सगळ्यात वर डॉन दिसायला लागते.
आणि तरी रोज सफारी आज १०० तरी ट्रॅकर्सना मी थांबवले ही फुशारकी मारतो हे वेगळेच.
मी
मी
डक डक go सर्च इंजिन, फायरफॉक्स ब्राउझर, uBlock Origin , प्रायव्हसी बॅजर वापरतो.
uBlock Origin बद्दल इथे वाचा
https://cybernews.com/best-ad-blockers/ublock-origin-review/#capabilities
तसेच मोबाईल, कायप्पाचा वापरत नाही, पण इलाज नसल्यामुळे इमेल आणि नेट वापरावे लागते,
चानल सब्स्क्राइब करत नाही.
तुम्ही लोकेशन दिले नाहीत तरी तुमच्या IP वरून लोकेशन ची कल्पना येते,
पहा Where I am
https://www.iplocation.net/where-am-i
अजून एक करा.
अजून एक करा.
प्रत्येक दुकानदार तुमचा मोबाईल नंबर विचारात असतो, तेव्हा मी मनात येईल तो नंबर धाडकन देता, ज्या कोणाचा नंबर असेल तो बघून घेईल. कारण लोकांना मी मोबाईल वापरत नाही हे सांगून पटत नाही. मग घे लेका.
तसेच तुमचा आधार क्रमांकही उगाच कोणालाही देऊ नका,
प्रत्येक दुकानदार तुमचा
प्रत्येक दुकानदार तुमचा मोबाईल नंबर विचारात असतो, तेव्हा मी मनात येईल तो नंबर धाडकन देता, ज्या कोणाचा नंबर असेल तो बघून घेईल.....
हे चुकीचे आहे. त्यापेक्षा सॉरी, मला मोबाईल नंबर शेअर करायचा नाही असे सांगा.
मी Star Bazar मध्ये असेच करतो. नियमानुसार कोणताही दुकानदार ग्राहकांना मोबाईल नंबर देण्यासाठी आग्रह करू शकत नाही. पैसे देतो आहे ना, उधारीवर माल नेत नाही ना, मग without number bill बनव, पूर्ण payment घे आणि मला मोकळं कर, काहीही झाले तरी मोबाईल numbar देणार नाही.
मी तर mall मध्ये वगैरे असणारे lucky draw वाले यांना तर मुळीच numbar देत नाही, ते कसली माहिती सांगायला जवळ आले तर त्यांना शांतपणे सांगतो, मी मोबाईल नंबर शेअर करणार नाही, हे जर तुला चालणार असेल तर माहिती सांग बाबा!
मला मोबाईल नंबर शेअर करायचा
मला मोबाईल नंबर शेअर करायचा नाही असे सांगा.>> +१
मीपण कुठेही नंबर देत नाही. एक लकी ड्रॉ वाली मागेच लागली होती. मी नाही म्हणजे नाही असंच सांगितलं. मला कुठल्याही स्कीम्स नको, ऑफर्स नकोत, ड्रॉ नकोत... काहीही नको. मला जे हवंय ते मी घेतलंय, अजून जे हवं असेल ते मी विकत घेईन. थॅंक्यू! असं सांगून तिथून निघाले.
माझा प्रॉब्लेम असा आहे की मी
माझा प्रॉब्लेम असा आहे की मी मोबाईल वापरत नाही. असे सांगितले की आजूबाजूचे सर्व लोक विचित्र नजरेने बघतात. ते नको वाटते.
आजूबाजूचे सर्व लोक विचित्र
आजूबाजूचे सर्व लोक विचित्र नजरेने बघतात. ते नको वाटते.
>>>>
मला तर या नजरा खूप आवडतात..
जगावेगळे पण काही वाईट नाही करत तेव्हा आपल्याकडे रोखल्या जाणाऱ्या नजरा असे काही करायची अजून प्रेरणा देतात.
पण मोबाईल नाही सोडू शकत.
तुम्ही खरेच वापरत नसाल तर ग्रेट आहात. हे ऐकल्यावर माझी नजर कौतुकाची असती
तुम्ही खरेच वापरत नसाल तर
तुम्ही खरेच वापरत नसाल तर ग्रेट आहात>>> "खरच" हेच ते. एडीट करून तेव्हढे "खरच" काढून टाका.
खूप त्रास होतो. पण आतापर्यंत तरी निर्धार टिकून आहे.
मोबाईल बसलेला माणूस ह्या नावाची एक कथा लिहिणार आहे,
त्या खरेच मध्ये कौतुक आहे..
त्या खरेच मध्ये कौतुक आहे..
आणि तुम्ही सुद्धा त्याकडे तसेच बघायला शिका हेच तर सांगत आहे
<<काहीही नको. मला जे हवंय ते
<<काहीही नको. मला जे हवंय ते मी घेतलंय, अजून जे हवं असेल ते मी विकत घेईन. थॅंक्यू! >> मस्त. मी पण अशाच आशयाचे बोलतो.
तुमचा विश्वास नाही हे मला
तुमचा विश्वास नाही हे मला कळतंय. जाऊ द्या.
मी माझ्या PC जाहिरातींसाठी ब्लॉकर. बरयाच साईट प्लीज ब्लॉकर काढा म्हणून रिक्वेस्ट करतात. गार्डिअन वगैरे मदत करा, सब्स्क्राइब करा म्हणून आग्रह धरतात . त्यांचेही बरोबर आहे म्हणा.
आता पहा. भारतातल्या साईट्स कुकीज आपल्यावर लादतात. पण मी VPN वापरून युरोप मधल्या साईट बघतो तेव्हा आ पण कुकीज रिजेक्ट करू शकतो. यू ट्यूब इथे बघितलं तर ते सर्रास कुकीज लावतात. तेच जेव्हा मी VPN वापरून समजा जपान मधून बघत असेन तर प्रायव्हसी वर एक लेक्चर देऊन कुकीज नाकारायचा हक्क देतात.
तेव्हा आपण जेव्हा दुकानदाराला टेचात सांगतो की मोबाईल नंबर देणार नाही तेव्हा गुगल माय्क्रोसोफ्त फेस बुक सगळ्यांकडे आपला
डेटा असतो हे ध्यानात घ्या.
जरा घाईत आहे. चुकांबद्दल क्षमा असावी.
तेव्हा आपण जेव्हा दुकानदाराला
तेव्हा आपण जेव्हा दुकानदाराला टेचात सांगतो की मोबाईल नंबर देणार नाही तेव्हा गुगल माय्क्रोसोफ्त फेस बुक सगळ्यांकडे आपला डेटा असतो हे ध्यानात घ्या...
Google, Microsoft, Facebook यांच्याकडे आपला data असतो, हे मान्य. पण सद्यस्थितीत त्यावाचून पर्यायही नाही.
दुकानदाराकडे मात्र नंबर गेला तर मार्केटिंग कॉल / मेसेज सुरु होतात, जे जास्त त्रासदायक असतात. शिवाय normal call / normal sms असतील तर त्यावर DND चा बडगा उगारून ते बंद पाडता येतात, किमानपक्षी आपल्याला त्रास देणाऱ्यावर कारवाई झाली हे कळले तरी एक समाधान मिळते. पण हेच जर का WhatsApp वर आले तर दुर्दैवाने WhatsApp अजूनही DND च्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करवता येत नाही. WhatsApp ला report केल्यावर WA त्याचे काय लोणचे घालते ते आजपर्यंत मला समजलेले नाही! (आपण दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई झाली, हे ऐकायला / वाचायला बरे वाटते!!!)
न्या विषयावर मी जास्त काही
न्या विषयावर मी जास्त काही लिहिणार नाही. ज्याने त्याने आपण काय करायचे हे स्वतः ठरवावे. हे उत्तम,
काल परवा पुष्पा पागधरे या
काल परवा पुष्पा पागधरे या गायिकेची मुलाखत पाहिली. व्हिडीओ आहे. त्यात त्या मोहम्मद रफी बरोबर गायचा पहिला अनुभव सांगत होत्या.
लगेचच ते गाणं टाईमलाईनवर आलं.
चांगलं आहे की. शोधायला नको
चांगलं आहे की. शोधायला नको गाणं.
मला इथे कोणी नंबर विचारीत नाही. भारतात विचारला तर कॅनडाचा आहे. सांगू का? असं काकुळतीच्या स्वरात म्हणल्यावर नको म्हणतात. मग नाही सांगत.
हल्ली माझ्या ब्लॉक्ड फोन
हल्ली माझ्या ब्लॉक्ड फोन नंबरची संख्या काँटक्ट लिस्टमध्ये असलेल्या नंबरांपेक्षा जास्त झालीय. काही लोक तर १००-१५० मोबाइल नंबर घेऊन बसलेले आहेत. अगदी ओळीने मी ब्लॉक केलेत.
मी पहिल्या जॉबला होतो तेव्हा
मी पहिल्या जॉबला होतो तेव्हा अश्या फोन नंबरला तानिया सोनिया अँजेलिना अश्या नावांनी सेव्ह करायचो. कधी तो वाजला आणि कोणी पाहिले तर त्याला वाटायचे वाह याला एका आयटम मुलीचा फोन आला आहे
आपली शॉपिंग लिस्ट पार्टनरच्या
आपली शॉपिंग लिस्ट पार्टनरच्या फोन जवळ जाऊन वाचली तर पार्टनरला नोटिफिकेशन चा भडिमार होऊन शॉपिंग मनासारखं होईल का?
चांगलं आहे की. शोधायला नको
चांगलं आहे की. शोधायला नको गाणं. >>
मी आता वाशी स्टेशनला भूक
मी आता वाशी स्टेशनला भूक लागली म्हणून बर्गर घेतला. बिल बनवताना त्यांनी नंबर मागितला मी नेहमीप्रमाणे विचार न करता दिला. मी तिथे असताना अजून चार जणांनी हेच केले. कोणीही नंबर देणार नाही असे म्हटले नाही.
ट्रेन मध्ये बसून बर्गर खाऊन झाल्यावर मोबाईल हातात घेतला तर त्यांचे व्हाट्सअप वर दोन वेगळ्या क्रमांकावरून दोन मेसेज आले होते.
पहिला मेसेज जिथून आला त्यांचे नाव होते – पेटपूजा
Dear Customer,
Thank you for your recent order at Supushp Enterprises - Vashi Rl! Your invoice is now available.
Amount : Rs.124
Date : 23/08/2025 15:05
View Invoice : इथे एक लिंक होती.
Loved your experience? Or something to improve? Tap to tell us!
दुसरा मेसेज जिथून आला त्यांचे नाव होते – जम्बोकिंग
JK Burgers
Dear customer,
Thank you for your order.
Welcome to JK Burgers Rewards Program
You've earned 124 JK Points
You're only 226 JK Point away from unlocking a fabulous reward!
Do share your feedback to help us serve you better!
See you soon!
Download our app now : https://bit.ly/JKAppdownload
-------------------
यात काय नुकसान होऊ शकते?
केस स्टडी म्हणून कोणी मला सांगेल का?
नुकसान म्हणजे न वाचता लिंक वर
नुकसान म्हणजे न वाचता लिंक वर क्लिक करायची सवय लागणे, त्या लिंन्क तुमच्या डेटा चा अॅक्सेस मागतील, तो न वाचता देणं, मग त्या अॅप चे बॉट तुमच्या फायनान्स वर नजर ठेवतील. जर का लेजिट अॅप्स असतील तर कमीत कमी लेजिट लोन च्या जाहिराती पाठवतील पण लेजिट नसतील तर टू गुड टू बी ट्रू असल्या लोन च्या लिंन्क पाठवतील. जसं कि एकही डॉक्युमेंट सबमिट न करता ५ लाखाचे लोन. ते जर का चुकून घेतलं आणि काही हफ्ते चुकले तर वर्षभरात मुद्दलाच्या दुप्प्ट व्याज होऊन वसूलीचे फोन तुमच्या सहीत तुमच्या कॉन्टक्ट लिस्ट मधील सर्वांना जातात. तुम्ही तुमच्या डेटा चा वर म्हटल्या प्रमाणे न वाचता सर्व अॅक्सेस दिलेला असतो. क्वचित प्रसंगी वसूली गुंड घरी येऊ शकतात.
यात जरादेखील अतीशयोक्ती नाही. अगदीच काही नाही झाले तर लोन घ्या, घर घ्या, गाडी घ्या असे सकाळी ६ वाजल्यापासून फोन येत राहू शकतात.
नाही मी ते मेसेज सुद्धा कधी
नाही मी ते मेसेज सुद्धा कधी वाचत नाही आणि कुठल्या लिंक वर सुद्धा क्लिक करत नाही. मला ती आवड किंवा उत्सुकताच नाही. लोन, क्रेडिट कार्ड, कुठलीही स्कीम, ऑफर यांचे काहीही फोन मेसेज मी पहिल्याच शब्दाला नॉट इंटरेस्टेड म्हणून तोडून टाकतो.
मी आजवर कुठले नंबर ब्लॉक केले नाहीत. ट्रू कॉलर आयडीवर स्पॅम नंबर समजतात. मी कॉल येऊ देतो. तेवढीच सेट केलेली रिंगटोन वाजते. छान वाटते. अन्यथा मला बायको आणि मुलगी सोडून कोणाचे कॉल येत नाहीत.
लोन घ्या, घर घ्या, गाडी घ्या
लोन घ्या, घर घ्या, गाडी घ्या असे सकाळी ६ वाजल्यापासून फोन येत राहू शकतात
>>>>
हा अनुभव नाही आणि हे पटले सुद्धा नाही.
सकाळी सहा वाजता कोणाची झोपमोड केली तर तो समोरच्याचे का ऐकून घेईल? हे तर कस्टमरला नाराज करून तो घालवण्यासारखे झाले..
यात काय नुकसान होऊ शकते?>>>
यात काय नुकसान होऊ शकते?>>> सोप्या शब्दात सांगायचं तर नको असताना ॲडव्हर्टाईझ पहायला मिळतील. अधिक उकल करुन सांगायचं तर तुमचे निवड स्वातंत्र्य प्रभावित करतील कारण आता तुमच्याकडे लॅप्स होण्या सारखे पॉईंट्स आहेत आणि अधिक पॉईंट्स मिळवल्यानंतर मिळणाऱ्या सरप्राईजचा एक्साईटमेंट वाढवणारा ॲड्रेनलीन शॉट खुणावतोय. अधिक जर वॉट्सॲप या जंबो किंग सोबत लोकेशन डेटा शेअर करत असेल तर तुम्ही कोणत्याही जंबो किंगच्या जवळपास गेल्यावर त्यांची नोटीफिकेशन्स हमखास तुमची भुक ट्रिगर करायचा प्रयत्न करणार जे कदाचित तुम्हाला नको असताना खरेदी करण्यासाठी टेम्प्ट करणार आणि ही जाहिरातीची तंत्रे जिवन विमा पॉलीसी सारखीच काम करतात, सगळ्यांनी च पॉलीसज क्लेम केल्या असत्या तर विमा कंपन्या डब्यात गेल्या असत्या...त्या edge case data ( जे तूम्ही स्वतः बद्दल नमूद केलयं) ला गृहीत न धरता high confidence data वर आधारित असतात ज्या बऱ्यापैकी फायदा मिळवून देतात म्हणूनच वारंवार दृष्टीस पडतात....The goal of advertisers is to increase sale by manipulating your thoughts & cravings not pursuing a 100% penetrating & successful strategy.
फाविद ओके..
फाविद ओके..
>>हा अनुभव नाही आणि हे पटले
>>हा अनुभव नाही आणि हे पटले सुद्धा नाही.
अगदी ६ नाही पण ७:३० वाजल्यापासून सुरू होतात. अनुभव आहे मला. आणि हे रेकॉर्डेड मेसेज असतात. शनिवार रविवारी पण आले आहेत. आले कि अगदी दिवसाला ६-७ वेळा यायचे. हल्ली DND अॅप वर लगेच रिपोर्ट करतो. तेव्हा जरा प्रमाण कमी आहे पण तरी ही आठवडयाला ४-५ तरी येतात.
ट्रू कॉलर डिलीट केल्यावर बंद
ट्रू कॉलर डिलीट केल्यावर बंद होतात बरेच कॉल्स.
Pages