दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर्कच चालवायचे तर ही तलाश मधली राणी पण असू शकतेय शोकविव्हल
जरा उपर से कॅमेरा घुमाव ना
हिंट पाहिजे बरं का
आम्ही कश्या नात्यागोत्यातल्या हिंट देतो.

असे अँगल लावणे कॉमन असते तर "गळा किती गोड आहे ना ?" असंं विचारलं गेलं असतं.
सर्दी झालेली चालणार नाही असं दिग्दर्शकाने बजावलं असतं.
आणि
"पिकनिकलाआ हरवलेली आपली सतरंजी " असं जोरात ओरडावंसं वाटलं असतं.

टांगायचा झोपाळा >>> Lol
असू पण शकेल !!
राखी गुलजार, नीतू सिंग , रविना टंडन या मोठ्या रिंगा घालणा-या. यातल्या राखी आणि नीतू सिंगचा चेहरा गोल आहे.
करीश्मा कपूर पण बरेचदा घालते. साडी झरीना वहाब टाईप आहे. तिच्या चेह-याची ठेवण वाटतेय. पण ती अशा रिंगा घालत नसावी.
किती विचार करून झाला.
७०,८०, ९० च्या दशकातल्या न गाजलेल्यांपैकी कुणी असेल तर मग अवघड आहे.

ती हॅमॉक वर का रडतेय?इतर बायांसारखी नीट बेडवर पालथी पडून का रडत नाहीये?
सोचो दया सोचो.क्लुज लागणार.

राझी मध्ये आलिया भट ने पण अशा रिंगा घातल्या होत्या.

श्रद्धा,सिमंतिनी कुठे गेल्या?या लवकर आणि तुमच्या दिव्य दृष्टीने सांगा ही रिंगावाली कोण?

ये जुल्फ कैसी है, जंजिर जैसी है - पिया का घर.
पण नाकपुड्यांवरून नका ओळखायला लावू गाणे. Lol

https://youtu.be/ekKboaSX8tE 2:32 ला पहा जया भादुरीच्या नाकपुड्या.

वेळ लागला इतर गाण्यांपेक्षा शोधायला. पण तिची साडीची, ब्लाउज कपड्यांची स्टाईल पाहून टिपिकल मध्यमवर्गीय घरातली हिरोईन असणार हे गृहीत धरून 70'स, 80'स मधले तसे सिनेमे शोधले. चितचोर, घरोन्दा, रजनीगंधा, छोटी सी बात वगैरे. त्यात एक नंबर 'पिया का घर'चा. Proud

कसं ओळखलं हा प्रश्न पडत होताच. Proud
चितचोर, रजनीगंधा मधे जटिंबरीना वहाब आहे.

मला या नाकपुड्या अजिबात जया भादुरी बच्चन च्या वाटल्या नाहीत हां <<<<<< मलासुद्धा.. मला विद्या शिंव्हाच्या असतील, असं वाटत होतं. Proud

पण विद्या शिन्हा ची कॉलर बोन्स नि गळा असा नै दिसत<<<< काय अभ्यास, काय अभ्यास!!!! _/\_ मला तर मधूनच नफिसा अली, सोनी राजदान, संजना कपूर यांचा गळा असेल का, असेही वाटून गेले होते.

Pages