दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1950 च्या आधीचा सिनेमा. मानवनि ह्या बाईचे गाणे दिले आहे ह्याच धाग्यावर, ते गाणे फारच प्रसिद्ध आहे.

हिरवा सूट सलमानचा एक था टायगर मध्ये होता ... हे सैयारा मै सैयारा आहे का? निदान सलमान आहे का?? नि सूट हिरवाच ना? का रंग गंडला??

हे ही बरोबर.
शिवाय यात तो अंगठा पण आलाय.

हो हो! त्याबद्दल तुला णमस्कार करायचा राहुण गेला होता. _/\_ Proud सुटावरून सलमान खान गाठणे सोपे नव्हे! तेही तो शर्ट काढण्यासाठी जास्त प्रसिद्ध असताना.

हे भारी आहे हां
सुटावरून सलमान
मी आपली यश राज फिल्म मधला अमिताभ शोधत बसले होते त्या सुटात.

ऋत्विक एकदा हिरव्या सूटात (की जर्किन मधे) पाहिलेला अजून लक्षात आहे. म्हणून तिकडे वेळ गेला.
रणवीर पण आहे या रंगात.

सुटावरून सलमान >> Biggrin
अमिताभ चे कफ्स नेहमी जास्त दिसतात. कोटाचे कापड कमी पडते बहुतेक Wink

बीस साल बाद करेक्ट आहे!!
मी गाणे शोधण्याच्या नादात दिल दिया गल्ला अणि मिठी मिठी चासनी बगितले Happy >> Lol अगदी! कोडं सुटलं नाही तरी वेळ छान जातो.

बरोबर गं सियोना
ती डिंपल एकदम डेंजर भूत असते.मिथुन ला भूत बनवायचं आणि तो भयंकर जुना खिळा त्याच्या पायात ठोकून धनुर्वात द्यायचा असा दुहेरी प्लॅन असतो.
अवांतर: त्यात पाहिले तिचा हात जसा 2 मजले लांबतो तशी व पू काळेंची हेमा म्हणून एक गोष्ट आहे.आणि चांदोबात पण एक गोष्ट आहे.

Pages