दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट बरोबर, गाणं सांगा. मृणालि ह्यावर्षी नाही काहीच पण दरवर्षी असतो पूर्ण यात्रेचा माहोल. लहानपणी एक एक महिना चाले उत्सवाचे वातावरण. पाळणे, 3 दिवस ( चतुर्थी ते षष्ठी) रात्रभर सांस्कृतिक कार्यक्रम, षष्ठीला भात भाजीचा महाप्रसाद.. घरून 5/10 रु मिळत खर्च करायला 3 दिवसात. रात्रीचे कार्यक्रम हे खरंच हायलाईट असत, मेजवानी असे. देऊळमळ्याचं पटांगण, शेजारी पवना नदी, थंडीचे दिवस आणि समोर आवाज चंगला असताना गाणारे हृदयनाथ , एकदम नॉस्टॅल्जिक Happy

छान दिवस असतील ना लहानपणी चे.. Happy
मी आकुर्डीत होते तेव्हा पाहिले आहे ते उत्सवाचे वातावरण....येणंजाणं व्हायचे नेहमी चिंचवड मधे.

किंवा राखी गुलजार असेल ही. इतक्यातच पाहिलाय सिनेमा.
हम तुम किंवा हमारे तुम्हारे आणि असंच गाण आहे. किशोर कुमार चा आवाज. तेच आहे का ?

पास

सांगून टाका नाहीतर पुढचं कोडं द्या. एक वेळ जुने गाजलेले ओळखता येतात.
९० मधला अल्बम म्हणजे अवघड आहे ओळखणं. पुरानी जीन्स ऐकलंय.
रेमो ची काही गाणी माहीती आहेत. मेड इन इंडीया आणि तूने पायल है खनकाई..
यातलं आहे का ?

images.jpg

सोपं आहे. पण जुनं आहे. गाण्याचा ठेका त्या वेळच्या जितेंद्रच्या नृत्याला साजेसा.
पण गाण्यात नायक भलतंच काही करतोय.

Pages