दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा परम सुपर कॉम्प्युटर आहे
पण सीमंतिनीही कमी नाही.
तो आती नही स्ट्रेच वाला बाबा पण मी कमी क्लू दिल्याने वाचला बिचारा अर्धा एक तास Happy नाहीतर मी घराण्याचे क्लू दिले असते तर 3 मिनिटात निपटला असता.(मला तुम्ही नका म्हणू.कधीमधी बरगंडी हेअर कलर करत असले तरी मनसे हम अभि नवतरुणीही हय )

श्रद्धा परम सुपर कॉम्प्युटर आहे
पण सीमंतिनीही कमी नाही. ++1
हान मला तर मी मूवी जरी 3 4 वेळा बघितली असेल तरी गाण्यातील दृशे नाही आठवत. गाणे पाठ असते खर ते हेच गाणे कळतच नाही Sad

बायांनो, पुढचे कोडे द्या. Btw अनु, आजा मेरी जान चा हा पब्लिसिटी स्टंट माहीत होता. तो लिहिल्यावर गाणे ओळखणे कठीण नाही.

अतिचक्रम लिरिक्स असलेले हे एक हॉरर गीत.
हिरो बद्दल फार माहीत नाही पण बहुधा शेव्हिंग क्रीम च्या जाहिरातीत असायचा
नायिकेचा नवरा आणि मुलगी चित्रपट सृष्टीत आहे.
IMG_20201206_005932.jpg

मला लाल साडीतील आई वरून श्रीदेवीचे चली चली (चालबाज) आणि हेमामालिनीचे भूतराजा आठवले. पण दोन्हीतले हिरो फ्येमस हायती... दुसरा क्ल्यू द्या...

नाही नाही.हे दोन्ही नाहीत
गाण्यातील पात्र विनोदी कलाकार आहे.
यातील एक प्रसिद्ध नायक सध्या जगात नाही
दुसरा नायक नुकताच आपण गे आहोत असे कबूल केलाय
यातला एक घाबरवणारा सीन खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे.

तिसरा हिरो हा रूढ अर्थाने हिरो नसून विनोदी कलाकार आहे.
गाण्यातला पुरुष आवाज या विनोदी कलाकाराने स्वतःच गायलाय.
एक हिरो कोणत्यातरी सौंदर्य स्पर्धेत जिंकलाय.तो नेहमी गुळगुळीत चेहऱ्याचा दिसतो.
दुसरा हिरो खूप प्रसिद्ध ऐकायला छान गाण्यात पण होता.
नायिकेचे एका प्रसिद्ध अभिनेत्याशी दुसरे लग्न.ती या गाण्यात आहे पण ही बाई ती नव्हे.

अरे ते नायिकेच्या खुनाची बातमी प्रकरण मनीषा कोईरालाच्या क्रिमिनल सिनेमाच्या बाबतीत झालेलं ना? किशनकुमार कुठे आला त्यात? की असं अजून एकदा झालं होतं? की प्रोड्युसर वगैरे होता तो?

ते आधी काही वर्षं शिल्पा शिरोडकर बद्दल किशन कुमार ने केलं होतं
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ची गोळी घालून हत्या वगैरे बातमी आणि खाली अगदी मायक्रो मायक्रो अक्षरात तळाला 'आगामी चित्रपटाची जाहिरात' असं होतं.
बाय द वे उत्तर बरोबर आहे Happy

गोव्याचा समुद्र किनारा नाही. मुंबईचा आहे.

Pages