दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारवी तया गाण्याचा रेफरन्स श्रद्धा ने क्लू चे उत्तर म्हणून दिलाय
हे आताचं त्यातलंच वेगळं गाणं (तरी काय उपयोग नाय बघा.3 मिनिटात उत्तर फुटतंय.)

कारवी तया गाण्याचा रेफरन्स श्रद्धा ने क्लू चे उत्तर म्हणून दिलाय >>>
ओके, मला वाटले ते उत्तर-गाणेच लिहीलेय

Submitted by सियोना on 5 December, 2020 - 17:35 >>>
विसरू नको श्रीरामा मला -- जानकी --- सीमा देव श्रीराम लागू

Screenshot_20201113-221701_YouTube_0.jpg
.
Screenshot_20201121-150652_YouTube.jpg

बिंगो! Happy

कारवी तया गाण्याचा रेफरन्स श्रद्धा ने क्लू चे उत्तर म्हणून दिलाय >>>> असं अनुच म्हणाल्या....
आता श्रद्धाच -- ओळखलं ना मी -- म्हणाल्या तर सुटलंय... पुढे जाऊ या
ढोलीतला माणूस

क्लू दे गं बाई
ढोलीतल्या माणसाचा गेटप आणि शर्ट सडक मधल्या संजय दत्त सारखा वाटला तरी सडक मध्ये स्वप्नात पण बर्फ नाही हे मला माहित आहे Happy

ह्या चित्रपटात 2हिरॉईन 1हिरो आहे. चित्रपट सस्पेन्स थ्रिलर आहे.

एका अभिनेत्रीला या चित्रपटासाठी फिल्म फेअर पण मिळाला होता.

त्या काळी स्टबल इतकी प्रसिद्ध नसल्याने आया याला बुरशी आलेला बटाटा म्हणायच्या.

याने पेपरमध्ये एका नायिकेच्या खुनाची बातमी छापून लोक घाबरल्यावर दुसऱ्या दिवशी 'माझ्या आगामी चित्रपटातील एक घटना' असे त्या बातमीला म्हणून सगळ्यांचा पोपट केला होता.त्याकाळी व्हॉटसॅप नसल्याने लोक छापीलपणे अफवा प्रसिद्ध व्हायच्या ट्रेंड ला परिचित नव्हते आणि कोणत्याही मीडिया मधील बातमीला काळ्या दगडावरची रेघ मानायचे.
IMG_20201205_225927_0.jpg

आता मला इतक्या लवकर उत्तर द्यायला विचारांची दिशा काय वापरली हेही पाहीजेय.माझ्या दृष्टीने इतकं कठीण कोडं दिलं त्याचंपण 5 मिनिटात उत्तर आलं.
एकतर माझं डोकं हॅक झालंय किंवा युट्युब हिस्टरी Happy

नाही हं, अवघड असतात अनु तुमची कोडी आणि त्यापेक्षा अवघड क्ल्यू. Lol मी लटकते ते स्ट्रेच करणारा हिरो (आती नही!!!!!!!!!!) इ. श्रद्धाला मात्र लाईफलाईन म्हणून ठेवायला हवे. ती पटापटा सोडवून टाकते. कुणी "फोन अ फ्रेंड" किंवा "तीन एक्स्पर्ट" लाईफलाईन केला तरच ये Wink Happy

Pages