दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरोइन जास्त फिल्म मध्ये काम केले नाही. हिरो बरेचदा साइड रोल करतो. टिव्ही वर पण काम करतो.सिनेमा ठिक आहे पण गाणी श्रवणीय. हिरोचे नातेवाईक सिनेसृष्टीत आहेत.

90s मधिल सिनेमा आहे. हिरो तसा जास्त नाचत नही

एक महत्वाचा क्लू - या हिरोला आमिर खानच्या सिनेमात जोरदार थप्पड मिळाली होती. (खर्या आयुष्यात नाही)

Amir khan slaps हा सर्च. त्यात amir khan slaps Twinkle Khanna हेच व्हिडिओ आले, मेलाचे.
मग सहज मेला मध्ये कोण कोण आहे पाहिले तर आयुब खान.
त्याच्या नावाने गाणे सर्च करून पाहिले, सहज मिळाले.
आयुब खान चा हा एकच चित्रपट पाहिलाय मी बहुतेक.

आमिर खानच्या दिल चाहता है मध्ये थप्पड सीन आहे. मेला सिनेमा मी पुर्ण पाहिला नाही त्यामुळे त्यात अयुब खान आहे हे माहित नव्हते.

डिस्को स्टेशन - हथकडी रिना रॉय

मी उशिरा आले

रिनाची साडी विथ लेगिंग ची फैशन आता किती नवी म्हणून मिरवली जाते.

एक बाई आहे, एक बुवा आहे, ती २५ पण तो ३५ आसपास आहे. ती उंच बाई आहे. तिने लाल-काळे काही घातलेले आहे. तो पंजाबी आहे पण स्मोकर नाही. गाणे जुडना वरून काही असावे. हे जंगल ओ मेरे सपनों के सौदागर, चोरी चोरी यू जब हो इ गाण्यात होते. बिग बजेट सिनेमा....

इतक्या तर्कातले काय बरोबर आहे?

हे काहीतरी तेरे नाम से सजदा करू वगैरे असणार.
असे जंगल ऐश बॉबी च्या पिक्चर मध्ये पण पाहिल्याचे आठवते.ज्यात ऐश ला अजून अभिनय येत नव्हता तो पिक्चर.

दंडवत!!!!!!!!!!! कसं ओळखलं?? माहिती होतं ??
वयं चुकली पण बरेच जवळ गेलो मी आणि सोनालीएसेल... Lol

90s सिनेमा माहित होते. सडक,दिवाना इ. सिनेमाची गाणी पाहिली. फक्त उटी ची गाणी पाहिली तेव्हा पूजा भट्ट चे हे गाणे दिसले.

आय नो, मी ते "ओ मेरे सपनो के सौदागर"च चार वेळा बघून घेतलं. पहिल्याच शॉट मध्ये ती 'आ' म्हणते आणि तो घोड्याला टाच मारून उलट्या दिशेने जातो तरी चिकाटीने चार वेळा पाहिले... Lol

Pages