खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो.. फार यम झालं होतं.. चवीला जरासं तिखट मेथी चकली सारखं .. चिंचेच्या चटणी सोबत खायला मजा आली असती पण काळं मीठ, जीरा पावडर, मिरची पावडर टाकलेल्या दह्यासोबतही चांगलं लागलं

मेथी-बाजरी वॅाफल - >>>

व्वा, मस्त फ्यूजन झालं कि हे म्हाळसाक्का.
कृपया पाकृ द्या.
म्हणजे मेथी - कॉर्न वापरून कॉन्फ्यूजन करता येईल. Happy

रेसिपि-
१ कप बाजरीचे पीठ,
२ चमचे थालीपीठ भाजणी (optional)
पाऊण कप चिरलेली मेथी, थोडीशी कोथिंबीर
१ चमचा आलं मिरचीची पेस्ट
पाव कप पाण्यात अर्धा कप दही घालून बनवलेले बटरमिल्क
१ चमचा तेल, मीठ, काळं मीठ, जीरा पावडर १ चमचा, हळद १ चमचा, ओवा
१ चमचा तीळ
बॅटर बनवण्यासाठी गरजेपुरतं गरम पाणी.
हे सगळं मिक्स करून अगदी शेवटी १/२ चमचा खायचा सोडा ॲड करायचा.. वॅाफल पॅन गरम झाला पॅनला तेल लाऊन तीळ भुरभूरायचे व बॅटर ओतायचे. २ एक मिनिटात पौष्टिक वाफा येऊ लागतात.. पॅन उघडून चेक करायचं.. खरपूस भाजले की काढायचे व दह्यासोबत खायचे. अरे हो, दह्यात १ चमचा जीरा पावडर, लाल मिरची पावडर, काळे मीठ टाकून छान फेटून घ्यायचे.. चिंचेची चटणी असेल तर ती पण वरून ओता..

ह्याचा स्वतंत्र पाकृ धागा येऊ द्या
नाहीतर मला काढावा लागेल
खाऊगल्ली तल्या रेसिप्या नावाने

खूपच भारी, म्हाळसा. मला सांगा.... हे क्रिस्पी होतात का...? आणि पातळ करायचे की जाड थर द्यायचा? म्हणजे बॅटर कितपत पातळ ठेवायचे? इनो टाकल्यास कसे?

खूपच भारी, म्हाळसा. मला सांगा.... हे क्रिस्पी होतात का...? आणि पातळ करायचे की जाड थर द्यायचा? म्हणजे बॅटर कितपत पातळ ठेवायचे? इनो टाकल्यास कसे?
Submitted by आंबट गोड on 6 March, 2021 - 02:08
>>>
छान क्रिस्पी होतात..धिरड्यासारखं किंवा भजीसाठी लागणाऱया बॅटरसारखं बनवायचं.. इनो नका टाकू..बेकिंग सोडाच टाकून बनवा

बाप्रे ! बरेच दिवस खाऊगल्लीत फिरकले नाही तर ८७ नवीन पोस्ट्स !
आणि इकडे आलं की वजन वाढतं. करू तो क्या करू ??

सगळ्याच पोस्टी भारी आहेत. तोंपासु !

आहा!

Me_rucha डोशे चटणी भाजी मस्त च.
मला पण सगळ्या मध्ये कोथिम्बीर लागतेच.

मला अशी वरून पेरलेली कोथिंबीर आवडत नाही, पण वड्या अन त्या न तळता वड्यांची केलेली भाजी खूप आवडते.
,आज अशीच भाजी केली होती मम्मीने

IMG_20210307_180828.jpg

वाह काय मस्त एकेक पदार्थ आलेत.. पण ती सुक्या बोंबीलाची चटणी माझी जगात फेव्हरेट.. बोंबील अगदीच उग्र असतील तर थोडासा बटाटा टाकावा अन्यथा उगाच त्याची भेसळ करू नये.

Pages