खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अमुपरी,
बुर्जी म्हणू शकता, पण यात कांदा, ओले खोबरे, कोथिंबीर खूप घालतात अन पाणी घालून शिजवतात. चव खूप वेगळी लागते बुर्जी पेक्षा.

आमच्याकडे बाळंतिणीला बाळंतविडा म्हणून दिवशी अन अंडा कोशिंबीर देतात बघायला येणारे सगळे लोक

ओके VB .. असे बनवून बघायला हवे .
मेधावी दिवशी म्हणजे रिकामे मोदक सारखे. Without सारण..
मोदकाला जी उकड वापरतो त्याचे असे कोन सारखे कप सारखे खोलगट आकाराचे बनवायचे आणि उकडायचे.. आणि एन्वेळी खाताना त्यात कोशिंबीर भरुन खातात.

लावण्या ☺️

माझेमन, रेसिपी नक्की टाकते, आठवड्यात किमान3तीन दिवस हाच मेन्यू असतो सध्या नाश्त्याला

ब्लॅककॅट : मी दोन छोट्या कैर्यांची उडदामेथी केली होती तेच प्रमाण देतेय.
१ टेबलस्पून उडीद डाळ (बिन सालाची), १ टीस्पून मेथी, २-३ सुक्या लाल मिरच्या भाजून घ्या.

थंड झाल्यावर साधारण १ कप ओल्या खोबर्याबरोबर हे वाटून घ्या. गरज लागल्यास वाटताना थोडेसे पाणी घाला.

कैर्यांचे तुकडे करून घ्या. थोड्या तेलावर हिंगाची फोडणी घालून त्यात कैर्या परता. अर्धा कप पाणी घालून कैरी शिजू द्या व साधारण ट्रान्सपरंट झाल्यावर वरचा मसाला आणि पाणी घालून (तुम्हाला कंसिस्टंसी हवी असेल तसं पाण्याचे प्रमाण ठेवा. )मसाला शिजवून घ्या. नंतर त्यात मीठ व कैरीच्या आंबटपणानुसार गुळ घालून एक उकळी येऊ द्या.
वरून हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.
मी जनरली तोंडीलावणं म्हणून खाते पण ट्रॅडीशनली ही भातावर पिठल्यासारखी पण खाल्ली जाते.
सकाळी करून संध्याकाळी खाल्लं तर चव अजून वाढते.

दिवशी म्हणजे बिन सारणाचा मोदक, त्यात मस्त अंडा कोशिंबीर किंवा चना डाळीची भरपूर ओले खोबरे घातलेली भाजी भरून खायची
>>>>>>>>
म्हणजे मोमोज हा प्रकार सुद्धा मुळचा आपलाच आहे Happy

PSX_20210223_225106.jpg
पाव भाजी
लेकच्या वाढदिवसाप्रत्यतर्थ

इकडे हैद्राबादमध्ये लुसलुशीत ताजे पाव दुर्मिळ असल्याने >> काय सांगता. आमच्या भागात (सैनिकपुरी) कुठल्याही दिशेने अर्धा किमी गेले की झकासपैकी बेकरीचे ताजे ताजे पाव मिळतात. करोनामुळे मी पाव / ब्रेड आणत नाही ही गोष्ट वेगळी. पण आता आणावे म्हणतोय.

काय सांगता. आमच्या भागात (सैनिकपुरी) कुठल्याही दिशेने अर्धा किमी गेले की झकासपैकी बेकरीचे ताजे ताजे पाव मिळतात. >>नवीन भागात -कोंडापूर भागात ठराविक ठिकाणीच चांगले पाव मिळतात. आणायला गेले तर संपले होते.
तुम्हाला ह्या भागात कुठे मिळतात ठाऊक असल्यास नक्की सांगा.

नितीका त्या भागाची काही माहिती आहे.
आज माहिती करून घेतली तरी सहा महिन्यात ते बदलेले असेल असा भाग आहे तो.

Pages