खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गुळ शेंगदाणा वडी चिकि पेक्षा वेगळी दिसतेय. शेंगदाण्याचा कूट आणि गूळ, वरून थोडे पूर्ण/अर्धे शेंगदाणे असं काही का?

अरे वा इतक्या सगळ्यांना आवडल्याचे पाहून सुखद धक्काच बसला म्हणायचा की Happy
रेसिपी म्हणाल तर काही विशेष नाही.
आधी शेंगदाणे मंद गॅस वर खरपूस भाजून घेतले आणि त्याची सालपट काढून घेतली.
आणि नंतर मिक्सर वर ओबड धोबड वाटून घेतली.
फार बारीक नाही वाटली मधून मधून थोडे शेंगदाणे छान लागतात.
नंतर जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ घेतला मी. गूळ पावडर घेतली तुम्ही चिक्कीचा घेतला असेल तर मऊ करून घ्यावा लागेल आणि एका कढईत थोडं थोडं तूप घालत गूळ परतला आणि मग गूळ लिक्विड होईल इतपत पाणी घातलं. फार पाणी ओतायचं नाही. मग त्या गुळाला बुडबुडे यायला लागले आणि रंग छान सोनेरी झाला की तो दाण्याचा कुट त्यात टाकायचा àआणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
ताटाला किंवा परतीला तुपाचा हात लावायचा आणि ते मिश्रण पसरवून घ्यायचं.
मिश्रण थंड झालं की वड्या पाडायच्या.
शेंगदाणे खरपूस भाजून मिक्सर वर नीट काढणे आणि गूळ नीट शिजवणे हे ह्यातले की पॉईंट्स आहेत. बाकी आपोआप जुळून येईल.:)

बाहेरची चिक्की तोडायला फार काठीण आणि चिवट जाते. अगदी खाताना दात पडेल की काय इतपत कठीण जाते.
ह्या पद्धतीच्या वड्या अगदी तोंडात घातल्या घातल्या विरघळतात.
त्यामुळे ज्यांना जेष्ठ नागरिक किंवा ज्यांना दाताचे प्रॉब्लेम्स आहेत त्याही ह्या वड्या आरामात खाऊ शकतील.
टीप : मी मायबोलीवर आतापर्यंत एकदाही एकही खाद्यपादार्थाची रेसिपी लिहिली नाही (बऱ्याच रेसिपी माहिती असूनही )त्याला कारण म्हणजे इकडे विनाकारण नकारात्मक प्रतिक्रिया देऊन नाउमेद करणाऱ्या आयडिंची कमी नाही. माझ्या रेसिपी इतरांनाच्या किंवा अजून कुणाच्या दृष्टीने परिपूर्ण नसेल पण मला योग्य वाटेल ह्या पद्धतीनी मी केलीय. ज्यांच्याकडे खूप वेळ किंवा एनर्जी आहे त्यांना ह्यात ढीगभर चुका काढून वितांडवाद घालायचे असतील तर घालत बसा.
ज्यांनी ज्यांनी आवडल्याचे कळवले त्यांना धन्यवाद.

रूचा, छान आहे की रेसिपी.. सोपी पण आहे करून बघेन मी..मुलांना सारखं काही ना काही हवं असतं तोंडात टाकायला.

अमुपरी,
तु एकदा ओट्स डोसा केला होता कसा केला होता सांगशील का?
मी आज केला ओटस, थोडा रवा,बेसन जराच, कांदा, गाजर मीठ पाणी घालून दहा मिनिटे भिजवून डोसा बनवला पण तो तव्याला चिकटून तुटला फुटला सगळा.

me_rucha मस्त दिसत आहे शेंगदाण्या ची चिक्की.
मला ही अशीच चीक्की आवडते. पण घरी कधी केली नाही.
आता बघेन या कृती ने..

Mrunali मी oats डोसा नाही उत्तपा केला होता. बेसन नव्हते मी घातले बाकी सगळे सेम. थोडे दही घालते.

अमुपरी हो म्हणजे मी पण उत्तपाच ट्राय केला..ओके पुन्हा एकदा करून पाहीन..चव छान लागते।

ओके पुन्हा ट्राई कर . मी रवा कान्दा टोमेटो दही oats इतके घालते. 10 मीन पेक्षा जास्त वेळ भिजवुन बघ मी अर्धा तास तर ठेवते. दही न घालता पण होतात चांगले पण दही ने मस्त चव येते.
मी oats ची अधि मिक्सरला powder करुन आणी आखे oats वापरुन दोन्ही पध्तिने पहिले चांगले होतात.

Rucha, शेंगदाणे क्रश चिक्की आहे ही तर, माझी फेव्हरेट. लोणावळा वरून नेहमी मागविते. एकदम मऊसूत , तोंडात विरघळणारी☺️

फुटाण्याची चटणी ब्रेड टोस्ट
20210304_202131_0.jpg

आज प्रकटदिना निमित्ताने केलेला प्रसाद
20210305_203621.jpg

Pages