शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टप्परवेअर --- बटर गर्लच्या समोर डबे आहेत
सिंटेक्स --- टाकी आहे बाजूच्या इमारतीवर
टीडीके टेप्स / कॅसेट्स

बऱ्याच नाममुद्रांची उजळणी झाली.
छान.
सर्वांचा शोध संपला की सांगा. मी नवे देऊ शकतो.
अर्थात नव्या मंडळींपैकी कोणाला द्यायचे असल्यास त्यांना प्राधान्य.

टप्परवेअर ट्रेडनेम झाले, डबे डिझाईन वैशिष्ट्यामुळे ओळखता येतील. visual mnemonic as brand identity
असे मला वाटते.....
डेनिम होईल --- बॅनर लावणार्‍यांच्या पँटी
अ‍ॅपल होईल --- ओनिडा राक्षसाचे कपडे --- स्टीव्ह जॉब्स सारखे दिसतायत
डेकोरेशनला ३-३च फुगे आहेत, तेपण असणार काहीतरी

टीपॉयवर पुस्तक आहे विजेच्या चिन्हाचे, खाली पण काहीबाही दिसतेय.....

माझे झाले कुमार सर.... फार झूम इन होत नाहीये लॅपटॉपवर.... काही दिसले / सुचले तर मी वरच्या प्रतिसादात वाढवेन.
तुम्ही द्या हवे तर पुढचे कोडे.

चित्ररंजन छान झाले. आता बसा भाषेत डोके खुपसून .... Bw
नवा खेळ : शब्दशोधातून खाद्यपदार्थ

खेळ दोन टप्प्यात आहे.
पहिला टप्पा: ७ सूत्रे दिलेली असून यावरून सात योग्य शब्द ओळखायचे आहेत. अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या आणि त्यातील तिसरे अक्षर कंसात दिले आहे. + १, ३, ५ व ७ ला शेवटचे पण दिलंय.

दुसरा टप्पा : आता एक ते सात शब्द क्रमाने बघा. या प्रत्येकातून एकच विशिष्ट अक्षर निवडायचे आहे. अशी सात अक्षरे अनुक्रमाने मांडल्यावर एक खाद्यपदार्थ तयार होईल. हा झाल्यावरच खेळ पूर्ण समजला जाईल.
त्यामुळे पहिल्या टप्प्यात तुमच्याकडून पर्यायी शब्द आल्यास ते नाकारले जातील.
.................
१. व्यवहारातील पैसे ( ५ अक्षरी, तिसरे क, शेवटचे ल )
२. सहजसाध्य (७, त)
३. विरक्त (५, ड, त )
४. राजनिवास (६, का)
५. धारदार (५, ज, नी)
६. प्रवासी (५, त)
७. त्रास (५, मा, की ).

..............................
१ ते ७ ची उत्तरे : ओळीने त्यातील एकेक अक्षर घेऊन ७ अक्षरी खाद्यपदार्थ कोणता ?

आधी शब्द शोधायला लागा.
ते पूर्ण झाल्यावरच पदार्थाकडे जाऊ .
तयार झालेल्या प्रत्येक शब्दातले विशिष्ट अक्षर तुम्हालाच ठरवावे लागेल.

१. व्यवहारातील पैसे ( ५ अक्षरी, तिसरे क )

>>> काहीतरी कवडी ? म्हणजे पैसाकवडी, नाणीकवडी टाईप?

बरोबर. Bw
काही वेळाने लागल्यास भर घालतो

१. व्यवहारातील पैसे ( ५ अक्षरी, तिसरे क )>>>> धनकवडी? पण अरबी उगम आहे मग नाही चालणार्.हे कोडे मागच्यासारखेच दिसतेय.

शब्दरत्नाकर लागणार तर मदत पण भरपूर लागणार. ज्यांचे अरबी / पर्शियन मूळ असेल ते लिहा ना म्हणजे अक्षरे जुळवता येतील. यावेळेला अंताक्षरी शब्द पण नाहीत. पेपर कठीण काढलाय.

४ घ्या ना आधी .
थोडाफार मराठी चित्रपटात येऊन गेलेला शब्द आहे.

फूटी कवडी >>> नाही.
मंजूताई >>> नाही.
१ ला शेवटी बघू.

....'पुढे मिळणारी रक्कम ' हा शब्दशः अर्थ.

हो

दलामालकी >>> ++++ (शब्द बेक्कार वाटला तरी पेपरांच्या कोड्यांत १५ दिवसाला एकदा असतो हो. )

आले, विराट..... छा न
...आता जादा मदत बन्द !

फूटी कवडी >>> नाही.>> तो विनोद होता हो !
पेपर अवघड असला की काही वेळा पेपरात चित्रं वगैरे काढतात तसं Proud

वावे,
हा हा !
मग, रविवार विशेष पेपर आहे.
निदान २४ तासांची निश्चिंती नको का !

Pages