शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. हा शब्द 1970 -80या दशकातील मराठी साहित्यात असायचा. फार सुंदर शब्द आहे.
जेव्हा उकलेल, तेव्हा सर्वांना आवडेल.

प्रवासी माणसाचे एक वैशिष्ट्य नजरेसमोर आणायचे.

नवा खेळ : शब्दशोधातून खाद्यपदार्थ

खेळ दोन टप्प्यात आहे.
पहिला टप्पा: ७ सूत्रे दिलेली असून यावरून सात योग्य शब्द ओळखायचे आहेत. अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या आणि त्यातील तिसरे अक्षर कंसात दिले आहे. + १, ३, ५ व ७ ला शेवटचे पण दिलंय.

दुसरा टप्पा : आता एक ते सात शब्द क्रमाने बघा. या प्रत्येकातून एकच विशिष्ट अक्षर निवडायचे आहे. अशी सात अक्षरे अनुक्रमाने मांडल्यावर एक खाद्यपदार्थ तयार होईल. हा झाल्यावरच खेळ पूर्ण समजला जाईल.
त्यामुळे पहिल्या टप्प्यात तुमच्याकडून पर्यायी शब्द आल्यास ते नाकारले जातील.
.................
१. व्यवहारातील पैसे ( ५ अक्षरी, तिसरे क, शेवटचे ल ) - आपल्याला मिळणारी रक्कम असते, पण ती ‘आता’ आपल्या हातात नसते.
अरबी उगम - मुस्तकवाल
२. सहजसाध्य (७, त)
३. विरक्त (५, ड, त )
४. राजनिवास (६, का) - थोडाफार मराठी चित्रपटात येऊन गेलेला शब्द आहे.
५. धारदार (५, ज, नी)
६. प्रवासी (५, त) - हा शब्द 1970 -80या दशकातील मराठी साहित्यात असायचा. फार सुंदर शब्द आहे. प्रवासी माणसाचे एक वैशिष्ट्य नजरेसमोर आणायच - वसतकरू
७. त्रास (५, मा, की ). - दलामालकी

..............................
१ ते ७ ची उत्तरे : ओळीने त्यातील एकेक अक्षर घेऊन ७ अक्षरी खाद्यपदार्थ कोणता ?

२ आणि ६ हे अगदी आपल्या ‘जननी’तून अवतरले बर का .
त्याचा अरब वगैरेंशी काही संबंध नाही

६ ६. प्रवासी (५, त) - हा शब्द 1970 -80या दशकातील मराठी साहित्यात असायचा. फार सुंदर शब्द आहे. प्रवासी माणसाचे एक वैशिष्ट्य नजरेसमोर आणायचे.
वसतकरू

१ व्यवहारातील पैसे ( ५ अक्षरी, तिसरे क, शेवटचे ल ) - आपल्याला मिळणारी रक्कम असते, पण ती ‘आता’ आपल्या हातात नसते.
अरबी उगम - मुस्तकबील

मुस्तकबिल हा शब्द हिंदी चित्रपटांत ऐकलाय. त्याचा अर्थ येणारा काळ असा वाटत होता.

आधी receivable साठी अरबी शब्द शोधला. तो mustahiqu आहे म्हणून मु वरून शब्द शोधले.

मुस्तकवाल होता .
मुस्तकबील हाही बरोबर.
भरत हॅटट्रिक, अभिनंदन !

२. सहजसाध्य (७, त)
३. विरक्त (५, ड, त )
४. राजनिवास (६, का) - थोडाफार मराठी चित्रपटात येऊन गेलेला शब्द आहे.
५. धारदार (५, ज, नी)
................
२ व ३ एकदम ‘आपले’ शब्द.

आता पहिला शब्द मिळालाय तर शॉर्टकट घेत मी त्या पदार्थाबद्दल विचार करायचा म्हणतो.

त्याबद्दल काही क्लु? एकच शब्द आहे का?

अजून एक शब्द झाला की भरत यांनी विश्रांती घ्यावी – निदान आजच्यापुरती !
इतर भाषाप्रेमींनाही व्यायामाची संधी हवी. Bw

देवकी,
मुस्तकबील, मुस्तक्बील, मुस्तकबाल / वाल
पु. भावी, पुढें मिळणारी रक्कम; भविष्यकाळीं मिळणारी रक्कम;
(दाते शब्दकोश)

वाटसर / वाटसरू
-सारू or -सुरू or -सूर c (वाट & सारणें) A passenger upon the road, a wayfarer.
(मोल्सवर्थ शब्दकोश)

वसतकरू (वसणें & करू)

शॉर्टकट घेत मी त्या पदार्थाबद्दल विचार करायचा म्हणतो >>>> मी तो शॉर्टकट कोड्याच्या सुरूवातीलाच घेत होते. सात अक्षरी खाऊ शोधला की अजून अक्षरे मिळतील म्हणून. तो सुद्धा सोपासहज नसेल पण

बरोबर कारवी.
तो काय पावभाजी/ पिझ्झा थोडाच असणार !

मंडळी,
आता मी रजा घेतो. भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत बहुतेक तो खाद्यपदार्थ तयार झाला असेल. मग आपण सात जण तो सात अक्षरी पदार्थ वाटून खाऊ !

TCGN

२. एखादी गोष्ट जेव्हा सहजसाध्य असते तेव्हा आपण एक वाक्प्रचार अगदी सहज वापरतो.
त्यावरून हा शब्द शोधणे.

२. डाव्या हातचा मळ
किंवा
आयत्या पिठावर रेघोट्या हे वाक्प्रचार आहेत का ?

Pages