शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी देतोय.
पावसाची गाणी आणि गायक

खाली दिलेल्या अक्षरांतून ५ मराठी गायक ओळखा (नाव व आडनाव).
नंतर त्या प्रत्येकाने गायलेल्या गाण्याचे पहिले अक्षर दिलेय. त्यावरून ते गाणे गायकानुसार ओळखा.

ख ळ रा रु दा र

प्नी हृ ता द्र ल ण

न ड इं रा र डे

दो अ षी ग शे बां

चं जे गा श श ड

के स्व र क ळे गी
***************************************
आता त्यांच्या पावसाच्या गाण्याचे पहिले अक्षर
क, अ, कि, ग , सु

अरूण इंगळे ( गडद जांभळं भरलं आभाळ)
चंद्रशेखर गाडगीळ
राजेश दातार

सगळे बरोबर.
आता पाउस-गाणी

खरंय.
जरा पावसाचा मूड आला म्हणून घाईत करून टाकले.

अजून आठवे ती रात पावसाळी .... चंद्रशेखर गाडगीळ
किती तरी दिवसांनी आज थांबला पाऊस - राजेश दातार

धी तू रिमझिम झरणारी बरसात
मुंबई पुणे मुंबई
ऋषीकेश रानडे

सुख पावसापरी यावे, आयुष्य अन् हे भिजावे (घन आज बरसे )
तुला पाहिले
स्वप्नील बांदोडकर

धन्यवाद साद

एकाचे अकरा !
खाली काही अक्षरे मिसळून दिलेली आहेत. त्यातून तुम्हाला अकरा शब्द तयार करायचे आहेत. त्यापैकी एक मूळ शब्द असून बाकीचे दहा त्याचेच शब्दकोशातील अर्थ आहेत.

ओळखायच्या शब्दांची अक्षर संख्या अशी आहे :

* दोन अक्षरी ३ शब्द.
* तीन अक्षरी ६
* पाच अक्षरी २.

शब्द तयार करताना कुठल्याही ओळीतील अक्षरे एकत्र घेऊ शकता. पण एक अक्षर एकदाच.
त्यात मूळ शब्द देखील दिलेला आहे. सर्व अकरा शब्द ओळखल्यानंतर मूळ शब्दही सांगा
अपेक्षितपेक्षा वेगळे शब्द सांगितल्यास प्रलंबित ठेवू. शेवटी निकाल.

कअर रूष्टीव मसद फले

सृकड पंपमा णूमावि भ्रप्रभु

कसट णाबोया द्याळस याच

माया

भ्रम
माणूस

मू़ळ शब्दासाठी अक्षरांचा पुनर्वापर करायचा आहे? तो किती अक्षरी आहे?

माणूस. चूक
भ्रम बरोबर
मूळ शब्द शेवटी सांगतो
तरच उत्सुकता टिकेल !

माकड/बोकड
सकस
अणू ,2 अक्षरी सर्व झाले ना!

मान्य झालेली उत्तरे ---
* दोन अक्षरी ३ शब्द. ( माया, दया , भ्रम )
* तीन अक्षरी ६ ( कपट, अविद्या , करुणा, )
* पाच अक्षरी २. (सृष्टीप्रपंच, ??)

एक अक्षर फक्त एकदाच
सगळी वापरा
Submitted by कुमार१ on 5 August, 2020 - 11:58 >>>>>> हो तेच केले
फसवणूक
भुरळ
समाले

बो स ड उरले....अर्थपूर्ण शब्द? / बोडस / सबोड / बोसड यापैकी काय?

Submitted by कारवी on 5 August, 2020 - 12:23

आता तुम्हाला ही यायला हवे.
समा.... योग्य दिशा.

Pages