शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित ढवळे अंग
चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, होते दंग..

जे सगळ्यात सोपं होतं त्यालाच एवढा वेळ आणि कलूज लागले.

बूमर
इमदीआर मसाले
एअर इंडिया

एअर इंडिया
सनफीस्ट
अंबुजा सिमेंट
डन्झो
तो रंगवणारा मुलगा पूर्वी एशियन पेंट्सच्या जाहिरातीत असायचा का? रंगवून झालं की चौकटीला टेकून उभा रहायचा.

बूमर (तो सुपरमॅन सारखा माणूस ज्याचं पोस्टर भिंतीवर लटकवलंय तो)
बबुल च्युइंग गम (शेजारचं पोस्टर)
सनड्रॉप तेल
एम डि एच मसाले (फोटो )

टायगर बिस्कीट (दारातून आत येतय)
बाल्कनीतून दिसणारा सूर्य (कुठल्यातरी कोल्ड्रिंकचा आहे माझा / मँगोला. नाव नाही आठवत. आकाशातून स्ट्रॉ घालून प्यायचा आणि ओठावरून जीभ फिरवायचा.
एकूण किती आहेत.

ते एमडिएच च्या शेजारच़ं झाड पण लोगो आहे - वुडलँड शूज

>>>> नाही नाही. मानवनं वर लिहिलेलं उत्तर बरोबर आहे - डाबर आहे MDH च्या उजवीकडे.

ल्कनीतून दिसणारा सूर्य (कुठल्यातरी कोल्ड्रिंकचा आहे माझा / मँगोला. नाव नाही आठवत. आकाशातून स्ट्रॉ घालून प्यायचा आणि ओठावरून जीभ फिरवायचा. >> तोच सनड्रॉप तेलाचा ना? मी त्याला बघूनच सनड्रॉप तेल लिहिलं.

रसनाचं सरबत पण सर्व करतायत का? तर रसना.

जाहिराती जुन्या काळातल्या असल्या तरी टिव्हि मात्र लेटेस्ट आहे की. पण कॅसेटसही आहेत.

हवं तर बजाज फॅन देखिल घ्या.

तोच सनड्रॉप तेलाचा ना? मी त्याला बघूनच सनड्रॉप तेल लिहिलं. >>>>> सनड्रॉप तेलाचा नाही आठवत.... कोल्ड्रिन्क पिणारा पक्का आठवतोय पण नाममुद्रा नाही आठवत.

Pages