शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy सोपे केलेय का यावेळी ?

१०. फळ आलाप घेते तेव्हा दिशा बदला. (३).
फळ = आवळा
आलाप = आ
दिशा बदला = वळा

अवांतर -- तुम्हाला हव्यात त्या सांदण / धोंडस याच्या कृती आहेत माबोवर. वाचलेल्या आठवतात. सुलेखा / देवकी / जागू /मनीमोहोर यापैकी कोणीतरी असणार

६. अर्धे चुकले.

९. स्पष्टीकरणा शिवाय टिपण्णी नाही.
९. कुमार - बरोबर.
हवा पालट = वाह
तू
कशाला = का, काठी काढून : क

१०. बरोबर.
हो सोपे दिलेय, शब्द सुचायला हवेत आधी. सांदणची पाकृ शोधेन.

७. बरोबर.

७. प्रशंसा = वा
बगळा फिरून = कब
थंड = गार
वाकबगार = निष्णात

८. भारवाहक

भार = डोक्यावर तांब्या
वाहक चालणे

आयत्या उत्तरात फेरफार
६. कानात काज उलटवल्यास इथे कर भरतात. (५)
जकातनाका = इथे कर भरतात
कानात उलटवल्यास --- तनाका
काज उलटवल्यास --- जका
शब्द उलटवलेले = उजवीकडून डावीकडे लिहीले

६. जकातनाका बरोबर.
कानात काज <---- उलटे वाचा.

८. सागरमाथा -चूक. यात कोड्याचा अर्थ सांगणारे वाक्य भले मोठे आहे आणि शेवटल्या तीन शब्दांवरून सोडवायचे आहे.

५.बरोबर! याला आणि ८ ला खास गुण.

उर्वरीत कोडी:

३. खाऊ उलटा पाडा आणि दोन्ही बाजूंना लावा. (४)
४. अवजारामध्ये तल्लीन होऊ, होईल मनोरंजन. (४)
८. पाण्याने गच्च भरलेला तांब्या डोक्यावर घेऊन चालल्यास आपला देश उमगतो. (५)

८. नाही. शोधसूत्रात दिलेल्या प्रत्येक शब्दाचा उपयोग होतो, वाक्य पूर्ण करण्यास वापरलेला एखादा शब्द वगळता.
आतापर्यंत सुटलेली कोडी बघा, प्रत्येक शब्दाचा उपयोग झालाय.

४. अगदी बरोबर. यात होईल हा शब्द वाक्य पूर्ण करण्यास वापरलाय, ज्याचा कोडे सोडवण्यास उपयोग होत नाही.

बरोबर उत्तर आले की तुम्हालाच कळते उत्तर बरोबर आहे ते.
तसे झाले म्हणजे कोडे बरोबर रचले होते याचे समाधान मिळते.

नाही.
शेवटल्या तीन शब्दांवरुन उत्तर येते, उर्वरीत वाक्य कोड्याचा अर्थ सांगते.
तूर्तास अधिक टीप देत नाही, पुढे बघु.

अंदाजपंचे लिहीतेय --- भारताकळे असा काही शब्द आहे का डोक्यावरच्या पाण्याने गच्च भरलेला तांब्याला?
भारत आकळे अशी फोड होतेय पण शब्द माहीत नाही

नाही.

अजून एक क्लू.
उत्तर हे एका क्रियापदाचे वर्तमानकाळातील रूप आहे.

८. पाण्याने गच्च भरलेला तांब्या डोक्यावर घेऊन चालल्यास आपला देश उमगतो. (५)
हिंद कळतो = आपला देश उमगतो
पाण्याने गच्च भरलेला तांब्या डोक्यावर घेऊन चालल्यास (<---- हे कारण आहे) हिंदकळतो

बिंगो कारवी Happy

हे कोडे मनोगत मधल्या कोड्यावरून घेतले आहे.

८ छान + कारवी छान

मनोगत मधल्या कोड्यावरून
>>> ती सगळी सोडवून मला आता १३ वर्षे उलटलीत !

Pages