शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ वडापाव

खाऊ उलटा पाडा आणि दोन्ही बाजूंना लावा. (४)

उलटा पाडा - डापा , आणि = व. दोन्ही बाजूंना व +डापा+व हा खाद्यपदार्थ

हे मस्त.....
व व दोन्ही बाजूला कळले.... कुठला खाऊ उलटा पाडायचा ..... शब्द कुठला हे नव्हते सुचले

इंग्रजी cryptic crossword बघुन हे मराठीत करावे म्हणुन मी २०१० मध्ये ऑर्कुटच्या एका समूहावर गूढ शब्दकोडी सुरू केली. तेव्हा मला मनोगत बद्दल माहिती नव्हते. नंतर कळाले.

खूप कोडी केली होती पण नीट सेव्ह करून नाही ठेवली.

मानव, धमाल !
दिवसाला अडीच कोड्यांचा फडशा म्हणजे फार झाले राव !
उद्या आराम करूयात.
पुढच्या आठवड्यात एखादी जीआरइ घेणे आले .... Bw

दिवसाला अडीच कोड्यांचा फडशा म्हणजे फार झाले राव ! >>>> येऊद्या कुमार१'s word list Happy
साद यांची पण बर्‍यापैकी कठीण असतात. तुकडे मिळतात जुळणी जमत नाही
एक प्रगल्भ कोडे बाकी आहे.

मागील खगोलशास्त्राच्या खेळामध्ये’ दिशादेशन’ हा शब्द आला होता. त्याचा इंग्लिश शब्द polarization हा आहे.
यानिमित्ताने या इंग्लिश शब्दाचे दोन संदर्भात दोन वेगळे अर्थ पाहणे रोचक ठरेल :

1. (विचार मते तत्वे इ. चे ) धुव्रीकरण
2. (पदार्थविज्ञान) : दिशादेशन.

शब्दखेळ हे सुगरणीच्या स्वयंपाकासारखे असतात –
करणारी व्यक्ती २-३ तास राबते; खाणारी ४ तोंडे त्या जेवणाचा १५ मिनिटात फडशा पाडतात !
Bw

प्रयत्न केलाय. जरा सांभाळून घ्या Happy

मराठी गाण्यात आलेले शब्द दिले आहेत त्यावरून गाण्याची सुरुवात ओळखा.
शब्दांचा एक संच हा एका गाण्यात ओळीने येणाऱ्या ओळींचा शेवटचा शब्द आहे.
१. अंग, रंग, दंग
२. डोंगर, सागर, पैलतटावर
३. डोलले, बोलले, नाचले, थांबले
४. उजळले, छेडिले, वदले
५. सुयशा, निशा , दिशा

देवकी, नाही.हे उत्तर नाही
तुमच्या गाण्यात हे तीनही शब्द येतात पण
ते ओळीने येणाऱ्या ओळींचे शेवटचे शब्द नाहीत.

४. काल पाहिले मी स्वप्न गडे
नयनी मोहरली गं आशा
बाळ चिमुकले खुदकन हसले
मी ही हसले, हसली आशा

भाग्यवतीचे भाग्य उजळले
कुणीतरी गं मला छेडिले
आणि लाजले, हळूच वदले
रंग सावळा तो कृष्ण गडे

आज सुटी होती ना? मी आलेच नाही बघायला....संपली का सारी? ओके १ राहिले.
अग नाच राधे मध्ये अंग रंग आहे, दंग नाहीये
पहिले गाणे हे बहुदा सगळ्यांनी रस्त्यावर मोठ्या आवाजात ऐकलेले असते >>>> होळीचे आहे का? रंग + लाऊडस्पीकर

महाराष्ट्रात << रस्त्यावर मोठ्या आवाजात >>>>
मुंबईत लग्न साखरपुडा बारसे सत्यनारायण पूजा + गणपती / होंळी / दहीहंडी / नवरात्र / २ राष्ट्रीय सण / दत्तजयंती / हनुमान जयंती / साईबाबांच्या पालखीबरोबर चालत जाणे इत्यादि लाऊड स्पीकरोत्सव असतात.
बघते विचार करून. रंग अंग दंग म्हणून होळी विचारला

Pages