Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्हांला भलभलते भास व्हायला
तुम्हांला भलभलते भास व्हायला लागलेत. काळजी घ्या.
आजोबा आणि बाळ म्हटलं तर या आयडीची तक्रार नव्हती कारण त्याला तक्रार करायला तोंडचं नव्हतं.
काकू, वैनी म्हटलेलं दाखवून द्या.
थयथयाट दाखवून द्या
सुशांतने स्वतः जरी येऊन मी
सुशांतने स्वतः जरी येऊन मी आत्महत्या केली अस सांगितले तरीही या अर्णब नामक प्राण्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कठीण आहे ह्या माणसाचं .
नक्की कोणाचं खरं आणि कोणाचं
नक्की कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं हे समजू नये इतक्या वाईट थराला दोन्हीही गट गेलेत.
अर्णव गु स्वामी ला लोक
अर्णव गु स्वामी ला लोक महामूर्ख समजत आहेत .
भक्त सोडले तर कोणी त्याला गंभीर घेत नाही.
त्याला काय ओरडायचे आहे ordu ध्या.
जातीयवादी वार्तांकन करणाऱ्या
जातीयवादी वार्तांकन करणाऱ्या रवीश , राजदीप आणि बरखा ला फॉलो करणारे इथे बरेच जण आहेत !
त्या पत्रकारांचे वक्तव्य आणि व्हिडिओ देव आज्ञा सारखं सगळीकडे पसरविणारे गुलाम इथेच भरपूर सापडतील !
तस त्या सर्किट अर्णव चे विचार डोक्यावर घेणारा इथे एक तरी दाखवा !
तस त्या सर्किट अर्णव चे विचार
तस त्या सर्किट अर्णव चे विचार डोक्यावर घेणारा इथे एक तरी दाखवा !>>>>>++१११
मिडीया हिंदी असो वा मराठी, दोन्ही सारखेच. सामान्य जनता नेहेमी गोंधळातच रहाणार.
सुखी लोक आहेत.>>>
सुखी लोक आहेत.>>>
देवाची कृपा .. अजून काही नाही हो. तुमच्यासारखे विद्वान इथे मायबोलीवर जागता पहारा ठेवून आहेत म्हणून तर सगळे आलबेल आहे. मायबोलीच्या मालकांनाही माहीत नसेल त्यांची मायबोली किती महत्वाची झालिय ते.
भय्यिणी हा एकच शब्द काय घेऊन
भय्यिणी हा एकच शब्द काय घेऊन बसलात? ते इथल्या काही आयडींना आजोबा, काहींना बाळ, काहींना काकू, काहींना वैनी अशी नानाविध संबोधने वापरतात आणि त्यांच्या केवळ आडनावाचा (जे काही काळ पूर्वीपर्यंत त्यांच्या आयडीचाच हिस्सा होतं) उल्लेख केला तरी थयथयाट करतात.>>>
All men are equal but some are more equal. यावर खूप विश्वास आहे हो त्यांचा.
धाग्यावर शिर्षकाशी सुसंगत असे
धाग्यावर शिर्षकाशी सुसंगत असे काहीच राहिले नाही. आता मुद्दे संपले तसे लोक गुद्द्यांवर आले नाहीत म्हणजे मिळवले.

https://www.moneycontrol.com
CBI चौकशीचा निष्कर्ष आणि AIIMS चा रिपोर्ट मिळताजुळता?
https://indianexpress.com/article/india/sushant-rajput-case-cbi-probe-ma...
बाय द वे , त्या मुंबई
बाय द वे , त्या मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या फेक ट्विटर अकौंटस विरोधात कारवाई होणार वगैरे म्हणतायत, या सुशांतच्या रुदाल्यांपैकी (लिंग निरपेक्ष उल्लेख आहे हा, वय निरपेक्ष सुद्धा
) कोणाचे असतील का तसे अकाउंट?
अजून 40 पैसेच आहे रेट की वाढवला?
धाग्यावर शिर्षकाशी सुसंगत असे
धाग्यावर शिर्षकाशी सुसंगत असे काहीच राहिले नाही.>>>>>>
2ऱ्या 3ऱ्या पानापासूनच काही सुसंगत नाहीये शिर्षकाशी,
१८ जूनची पोस्ट
१८ जूनची पोस्ट
पण नंतर 11 जूनला तिच्या एंगेगमेंटची बातमी आली आणि 14 जूनला सुशांतने ही स्टेप घेतली. त्यावेळी अंकिताने इंस्टावर 'God removes people from your life because he heard conversations you didn't hear.' असा मेसेज टाकला होता. नंतर तिने तो डिलीट केला. सुशांतने आयुष्याच्या शेवटच्या काही तासात तो मेसेज वाचला असेल का? मुळात स्वतःचा साखरपुडा झालेला असताना असा cryptic मेसेज टाकायची काय गरज होती?
१३ ऑगस्टची पोस्ट - सुशांतसोबत 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेली आणि कुटूंबाव्यतिरिक्त त्याला सर्वाधिक ओळखणारी व्यक्ती म्हणजे अंकिता लोखंडे. तिने व्हिडियो बनवला आहे व त्यात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
त्याच्यासोबत 7 वर्षे असलेली, त्याच्यावर जीवापाड प्रेम केलेली मुलगी दुसऱ्या बाजूला आहे व तिला त्याचा मृत्यू संशयास्पद वाटतो आहे.
अर्णवचं नाव घेऊन इथे कोणी
अर्णवचं नाव घेऊन इथे कोणी लिहीत नसले तरी त्याने सोडलेल्या बातम्यांच्या आधारे लिहीतच होते. काही हुशार लोक डायरेक्ट अर्णवचं चॅनेल पाहण्यापेक्षा त्याचा कचरा रिसायकल करणारं यु ट्युब चॅनेल बघून इथे लिंका द्यायचे.
शिवाय पायल रोहटगी आणि कंगना राणावरचं म्हणणं श्रद्धेने ऐकणारे आहेतच.
Kangana Ranaut vouches to
Kangana Ranaut vouches to 'return Padma Shri' if she can't prove claims in Sushant's case
https://twitter.com/republic/status/1284146761078960129
करणार का अवॉर्ड वापसी?
https://www.ndtv.com/opinion
https://www.ndtv.com/opinion/the-real-whodunit-in-ssr-case-is-obvious-is...
AIIMS ने जरी आत्महत्या
AIIMS ने जरी आत्महत्या सांगितले आहे, तरी इतक्या shady गोष्टी आहेत या केस मध्ये.
https://youtu.be/Ox9pWe9qwgk
या फोरेन्सिक expert ने व्यवस्थित सांगितलं आहे कूपरच्या कारभाराबद्दल आणि त्यांनी दिलेल्या उत्तरांबद्द्ल.
AIIMS चे रिपोर्ट चुकीचे,मुंबई
AIIMS चे रिपोर्ट चुकीचे,मुंबई पोलिस चे रिपोर्ट चुकीचे,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चुकीचे.
आणि हे बकवास bjp चे चमचे फक्त बरोबर.
ज्यांना आता मशीद पाडल्या मुळे सत्ता मिळाली ते राष्ट्र द्रोही पक्षाचे चमचे फक्त बरोबर.
भरत भय्या,
भरत
पोस्ट शोधून टाकल्याबद्दल धन्यवाद. माझं ओपिनियन बदलत कसं गेलं ते दिसतंय. सुरुवातीला असंच वाटलं होतं की आत्महत्या आहे. इतर संशयास्पद गोष्टी नंतर समोर आल्या. अंकिताने स्वतः पुढे होऊन खुलासे केले.
माझ्या अजून पोस्ट अशाही आहेत ज्यात मला आठवतंय त्यानुसार मी खरं काय ते कधीच समोर येणार नाही, शेवटी काहीच निष्पन्न निघणार नाही अशा अर्थाचं लिहिलंय.
आणि आजही मला तसंच वाटतंय
'भय्यिणी' शब्द वाचून खूपच
'भय्यिणी' शब्द वाचून खूपच गम्मत वाटली. दुसऱ्याला जातीवाचक/धर्मवाचक/प्रांतवाचक वगैरे वगैरे वगैरे कुठलीही दूषणे देऊ नका, नावे ठेऊ नका, inclusiveness करा वगैरे शांतीपाठ देणारे महान लोक स्वतःही नेमके त्या इतरांसारखेच कसेकाय वागतात हा नेहमी पडणारा प्रश्न परत डोक्यात आला म्हणून....////
अजूनही असले प्रश्न पडतातच कसे? आदराने बोलायला माबो आयडी म्हणजे काय रीया आहे!
वर्त् मान पत्रे , मीडिया पागल
वर्त् मान पत्रे , मीडिया पागल झालेत
कोण्त्याहि बातमित दलित शब्द
साप काय जात पाहुन चावतो?
https://www.thenewsminute.com/article/10-year-old-kerala-dalit-girl-dies...
'भय्यिणी' शब्द वाचून खूपच
'भय्यिणी' शब्द वाचून खूपच गम्मत वाटली. दुसऱ्याला जातीवाचक/धर्मवाचक/प्रांतवाचक वगैरे वगैरे वगैरे कुठलीही दूषणे देऊ नका, नावे ठेऊ नका, inclusiveness करा वगैरे शांतीपाठ देणारे महान लोक स्वतःही नेमके त्या इतरांसारखेच कसेकाय वागतात हा नेहमी पडणारा प्रश्न परत डोक्यात आला म्हणून....////
>>>>>>>>>>>
स्वतःला "सर्" म्हणवून घेणाऱ्या तील हे एक बरं का ! कधी कधी प्रश्न पडतो त्यांना " सर " म्हणणारे झाडावर बसवून झाड गदा गदा हलवत असतील का ?
भाजप समर्थक आय डी ना विनाकारण टार्गेट करतील , तरी पण ते " सर " च आहेत !!!!
आणि अगदी तिरुमला ऑईल च्या सचिन सारखं सतत वागणं !
मला राजा म्हणा !!!!!
वटवृक्ष मॅडम, मला सर म्हणा
वटवृक्ष मॅडम, मला सर म्हणा असं मी कोणालाही सांगायला गेलो नाही. तुम्हांला त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना सांगा , याला सर म्हणू नका.
अंकिताने आपल्या एंगेजमेंटनंतरच्या उडवलेल्या पोस्टबद्दल खुलासा केला का? ती पोस्ट वाचून सुशांत डिप्रेस झाला असेल अशी एक थियरी होती. मग हवा का रुख बघून अंकिता त्याच्या मेंटल फिटने सचं सर्टिफिकेट वाटायला लागली. मग काही दिवसांनी त्या सर्टिफिकेटला कंडिशन्स अप्लाय - माझ्यासोबत होता तोपर्यंत असं आलं.
मराठी भय्यिणी हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे आणि मी त्यावर ठाम आहे. ते जन्माने आलेलं वैशिष्ट्य नसून कर्माने कमवलेलं कौतुक आहे. स्वतः मराठी असून महाराष्ट्राची बदनामी करणार्यांसाठी ही नवी टर्म इंटरनेटवर लोकप्रिय आहे.
बाकी भारतात प्रतिगामी उजव्या लोकांच्या गळ्यात गळा घालणारे अमेरिकेत त्याच प्रवृत्तींना विरोध करतात तेव्हा गंमत वाटते, विनोदी वाटतं आणि कीवही येते.
अंकिताचा साखरपुडाही झाला होता
अंकिताचा साखरपुडाही झाला होता तेव्हाच.
अनेक विसंगती नंतर समोर आल्या ज्यामुळे सुरुवातीला शंका न घेणारे लोक नंतर प्रश्न विचारू लागले.
बाकी भारतात प्रतिगामी उजव्या लोकांच्या गळ्यात गळा घालणारे अमेरिकेत त्याच प्रवृत्तींना विरोध करतात तेव्हा गंमत वाटते, विनोदी वाटतं आणि कीवही येते.//
याबद्दल अड्ड्यावर लिहिलं होतं आधी. अमेरिकेत genuine पुरोगामी लिबरल पर्याय उपलब्ध आहे.
भारतात नाही. समान नागरी कायद्याला विरोध करणारे, स्त्रियांबद्दल दुटप्पी भूमिका घेणारे, एका राजघराण्याच्या ब्लडलाईनचे गुलाम स्वतःला कितीही लिबरल आणि डेमोक्रॅटिक म्हणवुन घेत असले तरी ते तसे नाहीत.
भारतात जे उपलब्ध पर्याय आहेत त्यातला जो कमी डेंजर वाटतो त्याला सपोर्ट , इतकंच.
हो. चॉइस तुमचा आहे. नारायण
हो. चॉइस तुमचा आहे. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांपासून तुम्हाला (प्रातिनिधिक की वैयक्तिक) धोका वाटत होता. आता ते तुमच्या कमी डेंजर पक्षात गेलेत.
त्या पक्षाचा एक नेता बलात्काराच्या बाबतीत मुलींवर संस्काराची गरज अधोरेखित करतो. त्या पक्षाचे लोक वारंवार बलात्कार्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढतात. हे बलात्कार तुमच्या वर्गातल्या स्त्रियांवर झालेले नसल्याने ते महत्त्वाचे नसतील.
पक्षाच्या मातृसंघटनेचे स्त्रीविषयक विचार सर्वश्रुत आहेत.
याच लोकांनी हिंदू को ड बिलाला विरोध केला. सबरीमाला मंदिर प्रवेशाला स्पष्ट विरोध केला.
हिंदू स्त्रियांनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालणे हे त्यांना अपेक्षित आहे.
समान नागरी कायदा आणि ट्रिपल तलाक हे तुमच्यासा ठी अधिक जिव्हाळ्याचे. कारण यामुळे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह फरक पडणार आहे.
पण अमेरिकेत यतल्या कशाचीही झळ तुम्हाला लागणार नाही. त्यामुळे हिपोक्रिसी करायला भरपूर वाव आहे.
चालूच द्या. शुभेच्छा!
सबरीमाला मंदिर प्रवेशाला
सबरीमाला मंदिर प्रवेशाला स्पष्ट विरोध केला.>>>>>> सबरीमाला मंदिरासाठी जेव्हा प्रदर्शने केली गेली, तेव्हा त्यात एक मुस्लिम स्त्री होती. तिचे तिथे काय काम होते? हिंदु काफर असतात आणी बुत म्हणजे मुर्ती पूजक आहेत. इस्लाम मध्ये याला मान्यता नाही हे माहीत असुनही ही विदुषी तिथे काय पूजा करायला गेली होती ? यांना यांच्या धर्मात कोणते अधिकार आहेत त्यावर तिने समाजप्रबोधन केले असते तर फार बरे झाले असते.
मग मोदी हिंदू आहे त्याने
मग मोदी हिंदू आहे त्याने मुस्लिम बाईसाठी कायदा का केला ?
इंग्रज ख्रिशन होते , त्यांनी सती विरुद्ध कायदा का केला ?
जे उच वर्णीय आहेत , ते आरक्षण कायद्याच्या उठाठेवी , किती असावे , किती वर्षे असावे वगैरे का करतात ? तुमच्याही पुस्तकात लिहिले आहे , दलितांना शिवू नका , मग कशाला त्यांच्या आरक्षणात तुम्ही नाक खुपसते ? तुमचे नाक विटाळेल ना ?
डायबेटीसवाला स्वतः मिठाई खात नाही , पण मिठाईचे दुकान काढून इतरांना मिठाई देऊ शकतो
भाजपात घराणेशाही नाही , ही
भाजपात घराणेशाही नाही , ही अजून एक अंधश्रद्धा
https://www.loksatta.com/maharashtra-news/management-of-two-parties-from...
ज्यांचे आई बाप काँग्रेस वा इतर पक्षात होते , त्यांचीच पोरे भाजपाने पळवली आहेत
सोनिया , राहुल घराणेशाही चालवतात
आणि मनेका आणि वरुण काय करतात ?
मग मोदी हिंदू आहे त्याने
मग मोदी हिंदू आहे त्याने मुस्लिम बाईसाठी कायदा का केला>>> अय्या, कोर्टाने का बरे मान्य केला तो ? सांगायचे ना की त्यांचे ते बघुन घेतील.
तुमच्याही पुस्तकात लिहिले आहे , दलितांना शिवू नका , मग कशाला त्यांच्या आरक्षणात तुम्ही नाक खुपसते ? तुमचे नाक विटाळेल ना ?>>>>
जामोप्या, मी जातीने ब्राह्मण असले तरी लहानपणापासुन दलित ( हा शब्दच चूकीचा आहे, वर्षानुवर्षे काय तेच ते ) वस्तीत वाढलेय. माझे शिक्षक पण दलितच होते. ( आता रीटायर झालेत ) माझ्या घरी सर्व जातीतील लोकांचे येणे जाणे होते आणी आहे. माझ्या मुलीच्या जवळच्या दोघी मैत्रिणी मुस्लिम आहेत पण त्यांच्या घरचे खर्या अर्थाने सुशिक्षीत आहेत. कारण धर्माचा पगडा ही वेगळी बाब असते.
तुम्हाला कायदा करणे झोंबले. पण शबरीमला साठी स्त्रीयांना का प्रवेश नाही हे एकदा नीट वाचुन मग इकडे डिस्को किंवा झुंबा करा. वरवरचे वाचुन उर बडवु नका.
हो ना
हो ना
मग ती मुस्लिम स्त्रीही हिंदू स्त्रियांना मदत करायला जात असेल
तिलाही कायद्याने विचारले नाही , तू मुसलमान असून हिंदू देवळाच्या दारात आंदोलनाला का बसली म्हणून ? दारात हजारो हिंदू स्त्रियाही बसलेल्या आहेतच , त्यांना सांगा तिथे प्रवेश का नाही ते ,
त्यामुळे आपणही कुणास विचारू शकत नाही
कुणीही कुठल्याही जाती धर्माबद्दल कायदा करू शकतो व त्याबद्दल विचारू शकतो , तुम्हीही 3 तलाक बद्दल बोला , ख्रिश्चन चर्चने भ्रष्टयाचार केला तर तुम्हीही त्यावर बोला आणि आरक्षणावरही तुम्ही चर्चा करा , ज्या कायद्याने तुम्हास हे अधिकार दिले , त्याच कायद्याने तिलाही तो अधिकार दिला
Pages