सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गळे मराठी लोक च काढत आहेत.

सुशांत च्या aatmhatye वर
कोणाला अमिताभ ची काळजी तर कोणाला शाहरुख ची.
ते विचारात पण नाहीत.
आपले मराठी कलाकार ठाम भूमिका घेत नाहीत.

गळे मराठी लोक च काढत आहेत.>>
कुणावर अन्याय होत असेल तर मराठी माणुस पटकन चिडतो. त्याला गळे काढणं नाही म्हणत.

<<<महाराष्ट्रात शेकडो मृत्यू कोरोना ने होत असताना केवळ अमिताभ आजारी पडला म्हणून काळजी आणि प्रार्थना करणारे याच प्रकारात मोडतात का?>>>एक ही मारा लेकीन सॉलिड मारा

South वाले रजनीकांत आणि त्यांचे कलाकार सोडून कोणाला भाव देत नाहीत.
उत्तरेच्या भय्ये केशरी लाल हाच सर्वात मोठा actor समजतात.
आणि आपण जे विचारात नाहीत त्यांच्या पाढी

अमिताभ आजारी पडल्यावर होमहवन करणार्यांना काळजी वाटत होती की प्रसिध्दी मिळवायची होती हा संशोधनाचा विषय आहे.
>>>>

नक्की करा आणि त्या धाग्यावर प्रसिद्ध करा.
मला एकूणच होम हवन पूजा अर्चना आरत्या महाप्रसाद धूप अंगारे गंडे दोरे काहीच पटत नाही.
मी नास्तिक आहे.
पण ईतरांच्या भावनांचा आदर करतो.
देवाची पूजा करून कोणाचाही करोना बरा होत नाही हे माझे मत असले तरी एखाद्याची श्र्द्धा त्याला यातून मानसिक बळ देत असेल तर आपण ते का हिरावून घ्यायला वाद घाला एवढा सिंपल विचार आहे.

एखाद्याची श्र्द्धा त्याला यातून मानसिक बळ देत असेल तर आपण ते का हिरावून घ्यायला वाद घाला एवढा सिंपल विचार आहे.>>
अशा प्रकाराने मानसिक बळ वाढते की नाही माहित नाही पण व्यक्तीपुजेला नक्कीच खतपाणी मिळते.
एकीकडे राजकारण्यांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे कलावंतांच्या भानगडींकडे कानाडोळा करायचा, हा दुटप्पीपणा झाला.

एकीकडे राजकारण्यांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे कलावंतांच्या भानगडींकडे कानाडोळा करायचा, हा दुटप्पीपणा झाला.
>>>>

१) सरसकट सर्व राजकारण्यांना शिव्या नाही घालत. घोटाळेबाजांना घालतो.

२) कलावंतांच्या कुठल्या भानगडीकडे काना डोळा केला? सलमानवर वेळोवेळी टिका केली आहे, संजय दत्तचा देशदोह कधी पोटात घातला नाही, वर या सुशांतच्या धाग्यात नेपोटीजमवरही ताशेरे ओढले आहेत.

बाकी सारे सोडा खुद्द शाहरूखचेही दुर्गुणांना दुर्गुण वा न आवडणार्‍या बाबींना त्या आवडत नाहीत हे म्हणायला कचरलो नाहीये.

एकदा या धाग्यावर या
भक्त आणि चाहते !
https://www.maayboli.com/node/66805

तुम्हालाच नाही तर प्रत्येक राजकीय भक्ताला हे खुले आव्हान देतोय की जसे मी ईथे शाहरूखचा प्रचंड मोठा चाहता असलो तरी त्याच्या न पटलेल्या गोष्टींनाही मांडायचे आणी स्विकारायचे धाडस आणि प्रामाणिकपणा दाखवला आहे तसे ईथे एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेणार्‍यांनी आपल्या नेत्यांबाबत ती धमक दाखवावी.

दोन वर्षे झालेत त्या धाग्याला.
मी दरवेळी आव्हान देतो
एकाचीही हिंमत होत नाही
ईतर धाग्यात माझ्याशी शेकडो पोस्ट वाद घालतील. पण ईथे दुखरी नस पकडले जाण्याच्या भितीने कोणी येत नाही Happy

ऋन्मेष,
तुझ्याशी वाद घालायला लोक येत नाहीत, ते तुझा मुद्दा बिनतोड असतो म्हणून नाही. तर लोकांकडे वेळ नसतो म्हणून.

डिसेंट टायपिंग स्पीड आणि रात्री बेरात्री कितीही वाजेपर्यंत जागायची कॅपॅसीटी या 2 गोष्टींवर तुझा id चालू आहे.
एकच मुद्दा कंटाळा येई पर्यंत परत परत उगाळत बसायला तुला परवडते, सामान्य जनांकडे तेव्हडे वेळ नसल्याने एकदा एका मुद्यावर मतप्रदर्शन झाले की पुढच्या मुद्द्यावर जातात.

असो.
तुला खरेच इतका वेळ असेल तर माबो वर लेखन सहायय म्हणून सर्व्हिस देऊ कर. (हवीतर सशुल्क दे)लोक WA वर ऑडिओ मेसेज टाकतील तुला, तू text फॉरमॅट मध्ये करून दे, थोडे फार फेरफार करायचे असतील ते त्यांचे ते करून घेतील,
कमीत कमी माबो वर चांगले काही वाचायला मिळेल.

नेता आणि अभिनेता ह्या मधील फरक समजत असेलच.
नेता देश,सरकार चालवतात त्यांना follow करायलाच लागत.
सरकार चे निर्णय आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतात.

या हत्येमागचं रहस्य वाढतच चाललंय. दिशा सलियानच्या फाईल वगैरे डिलीट झाल्या मुंबई पोलिसांकडून जस तिचं नाव यात यायला लागलं. बिहार पोलिसाला quarantine करायला सांगितलं त्याने तपास करू नये म्हणून. ती रेहा सहकुटुंब पळून गेली. SC बहुतेक हाच निकाल देणार की तपास मुंबई पोलिसांना करू द्या, तेवढाच त्यांना आराम. कोणत्याही परिस्थितीत सीबीआयकडे ही केस देणार नाही अस महाराष्ट्रातील नेत्याने सांगितलंय. पोस्टमार्टेम रीपोर्ट रात्रीतून केलाय, एवढं समोर आलं असून लोकं म्हणत असतील की काही गडबड नाहिये तर धन्य आहे.

All files related to Disha Salian case on record: Mumbai Police officials
https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/all-files-related-to-...

फाइल डिलीट झाल्याचं रिपब्लिक आणि टाइम्स नाऊ कडून सांगितलं जातंय. तेही मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण आल्यानंतर.

आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये म्हटलंय मृत्यू पू र्वी काही दिवस आणि काही तास आधीपर्यंत सुशान्त स्वतःचं नाव, त्याला झालेला आजार आणि दिशा सालियन यांबद्दल गुगल करत होता.

तसं असेल तर चांगलच आहे, जरा तपास पुढे सरकेल.
तो स्वतःच नाव गूगल करत होता हे वाचलं होतं, बाकीचं आत्ताच समजतंय. त्याचे मित्र म्हणवणारे लोकं पण स्टेटमेंट बदलत आहेत. खरं असेल तर बदलण्याची गरज नसावी, खोटं बोललं तर लक्षात ठेवावं लागतं. तसही आपल्या न्याय व्यवस्थेबाबत लोकांना माहिती आहेच. असो , सत्य काय ते सगळ्यांना कळून न्याय मिळावा. .

सिम्बा अगदी चपखल
भारी लिहलंय

पण त्यात त्याची अडचण होईल ना, लोकांना उपद्रव कसा करू शकेल मग? तोच त्याचा आनंद आहे

बिहारी पोलिस इथे आले त्यांच्या कडे
प्रवास करण्याची परवानगी होती का.
जिल्हा बंदी,राज्य बंदी लागू आहे.?
बिहारी पोलिस ना 15 दिवस विलगी कारण कशात का ठेवले नाही?
Corona test ka keli नाही.
ज्यांची चोकशी करणार त्यांना corona झाला तर बिहार पोलिस वर खुनाचा गुन्हा का दाखल करू नये?

Dr Subramanian Swamy - “MAFIA in Bollywood & Cricket” : https://www.youtube.com/watch?v=367f_jl1mAY

बरेच मुद्दे आणि माहिती आहे यात. स्वामी अगदी बिनधास्त नावं घेऊन बोलतात.

अमृताक्का कधी कमेंटबॉक्स वाचत नाही बहुतेक. लोकं एवढी खेचत्यात पण मामी काय ऐकत नाय Proud

सौ. मामी - मुंबई आता निष्पाप आणि स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी सुरक्षित नाही
कै. लोया - नागपुरच काय बाई ???

Proud

पोलिसांची खाती एकसिस ब्यांकेत ढकलली

हजारो रुपयांची तिकिटे पोलिसांना विकून आपली भसाडी गाणी ऐकवली

आणि आता फडणवीसमामी म्हणते , मुंबई पोलिसांवर विश्वास नाही म्हणे

सौ. मामी - मुंबई आता निष्पाप आणि स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी सुरक्षित नाही
कै. लोया - नागपुरच काय बाई ??? >>> जबर Lol

जिद्दु आयडी वापरणारी व्यक्ती उघडपणे भारतीय कोर्टाच्या निर्णयाला खोट म्हणुन कोर्टाचा अपमान करत आहे, अ‍ॅडमीन महोदय.

वापरणारी व्यक्ती.
व्यक्ती स्त्रीलिंगी शब्द आहे.

जिद्दु, इथेच लिहितो. तेवढेच सगळ्यांना कळेल किती भारतविरोधी विचारांचे आयडी आहेत इथे.

मानव, बदल केला. आता तेवढाच वेळ घेऊन कोर्टाचा अपमान करणा-या आयडीचा कमीत कमी निषेध तरी करा? की त्यापेक्षा व्याकरणातल्या चुका जास्त गंभीर आहेत?

नेता देश,सरकार चालवतात त्यांना follow करायलाच लागत.
>>>>
फॉलो करणे वेगळे आणि प्रत्येक बाबीत तळी उचलणे वेगळे
प्रत्येकाला ईथे आपला नेता गुणी आणि समोरच्याचा दुर्गुणी वाटतो. मी फक्त ईतकेच म्हणतोय की आपल्या आवडत्या राजकीय नेत्यांच्या चुका आणि दुर्गुण कबूल करायचे धारीष्ट्य कोणाकडे आहे का?

Pages