माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, माझेमन Happy
पर्णीका, मलाही एकंदरीत सारण जास्त ओलसर असणे हेच मुख्य कारण वाटतंय. आता इथेच आत्ताच विचारून ठेवते की सारण जास्त कोरडं झालं तरी वडे बिघडतात का? म्हणजे पुढच्या वेळी करताना लक्षात ठेवता येईल.

ते चमच्याच्या मागच्या बाजूला पिठाचा एकसारखा थर येणं हे AI नेही सांगितलं. ( घरातल्या AI वापरणाऱ्या मेंबरने मला सांगितलं) पिठाची कन्सिस्टन्सी माझ्या मते बरोबर होती. तेलही पुरेसं आणि पुरेसं तापलेलं होतं. आधी कदाचित कमी तापलेलं असू शकतं पण नंतरच्या प्रयत्नात नक्कीच जास्त तापवलं होतं.
पिठाचा थेंब टाकून बघितला होता. तो लगेच वर येत होता.
So सारणाचा ओलसरपणा is the culprit.

माधव , माझेमन Rofl
बटाटेवडे कधी केले तर कायम हे आठवेल.

माधव Lol

>>> आता इथेच आत्ताच विचारून ठेवते की सारण जास्त कोरडं झालं तरी वडे बिघडतात का?
ट्रिक क्वेश्चन आहे. उकडलेल्या बटाट्यांचं सारण होऊन होऊन किती कोरडं होणार? Proud

ओलसर झालं म्हणुन मावेत ठेवले आणि अंदाज चुकून जास्तच वेळ केले तर होईल कोरडं.
(असले उद्योग होतात माझ्याकडुन.)

पर्णिका छान माहिती. नंबर दोन माझ्याही मनात आले होते.
गाड्यांवर मिळणारे बेसन ह्यात लाखेचे पीठ मिसळलेले असते, त्यामुळे तसे पिवळेधमक वडे घरी होत नाहीत. शरीराला वाईट आहे ते. आमच्याकडे खाऊच द्यायचे नाही, त्यामुळे माझ्या लक्षात आहे.

काही बटाटे एकदम स्टार्ची असतात, येथे किती प्रकार मिळतात. त्यात कुकरमधे व मायक्रोत उकडलेले वेगवेगळे होतात. मायक्रो आतलं पाणी वापरून शिजवतं म्हणून जरा कोरडे होतात. पराठ्यांना बरे वाटते मला. कुकरमध्ये चिकट शिजतात आणि जास्त तेल पितात. माझं पुरण सुद्धा बरेचदा कोरडं होतं पण ओलसरपेक्षा कमी माकाचु आहे. त्याला रिपेअर करायला पर्याय आहेत.

आणखी एक सांगते, सारणाचे जेव्हा आपण चपटे वडे किंवा गोल गोळे वळतो तेव्हा ते हलक्या हाताने वळायचे. एकदम दाबून दाबून बेसन लाडू वळतो तसे नाही करायचे.

ते चिकट हात लवकरात लवकर गोळे करुन मोकळे करावे या विवंचनेत मी असतो. हलका हात का दाबुन यापेक्षा हाताला चिकटलेले त्या गोळ्यात कसं घालू .... हेच डोक्यात असतं. Proud

आणखी एक सल्ला देऊ का? हे तेलात सोडून वडे वगैरे करण्याऐवजी टू- बाईट साईझ, सुपारी इतके गोळे करुन आप्पे पात्रात सढळ हस्ते तेल घालून वडे चांगले होतात. चिकटणे, बुडणे, तरंगणे इ. ना रहेगा बास प्रकारे होणे शक्यच नसते. बटाटे स्टार्ची, कोरडे सारण ओलसर वगैरे काहीही झालं तरी बटाटे वडे ठीकच होतात, आणि त्याही पेक्षा एक वेळा एकदम १२ होत असल्याने झटकन होतात. तेल उरत नाही. चव थोडी कॉम्प्रोमाईज होते, पण इतकं सगळं बाकीचं होत असल्याने आणि पावात घातला, वर लसणीचे तिखट मिरची वगैरे घेतली की चालतं तेवढं.

आणखी एक सल्ला देऊ का? ब.वड्याचं सारण दोन ब्रेड स्लाइसेसच्या मध्ये भरून पनिनि / ग्रिल्ड सॅन्डविच केलेलंही मस्त लागतं.
वरून कुठल्याही आवडत्या चटण्या/सॉस!
स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा करायचा माझा 'go to' आयटम आहे तो!

हेच जरा तिखट करुन + बडिशेप घालून पफ पेस्ट्री शीट्स मध्ये बेक करुन पॅटिस ही भारी (चवीला आणि कॅलरीला) होतात.
एअरफ्रायर मध्ये ओघळणार्‍या बेसनाचे कसं करता? तेल ब्रश करता का?

आमितव माझ्याकडे नाही एअरफ्रायर. नागपूरला नातेवाईकांकडे केले तेव्हा पाहिले. खाली थोडे बेसन जमा होते. अर्धे एअरफ्राय झाल्यावर ब्रशने तेल लावतात. यात पण बॅटर कन्सिस्टंसी महत्वाची असेल, इतर काही खुबी असतील.

माझी आजी बटाटे कुस्करून वरून कमी तेलाची मिरची आले लसूण इत्यादीची फोडणी करत असे आणि लिंबू, साखर, मीठ असे घालत असे. अशक्य भारी सारण करत असे. बटाटे शिजवताना त्यात मीठ घालत असे आणि. आणि बेसन पीठात पंढरपुरी डाळ्याचे एक/ दोन टेबल स्पून पीठ.
ते दामले मास्तरांनी मागे दिले होते ओला नारळ वाले बटाटा वडे त्याचे सारण मात्र जरा सैल होते.

अवांतर:

पटेल कडे उलटा वडापाव मिळतो. बंद पावात ब. वडा आधीच भरलेला असतो. त्याला पारी होती का नाही की नुसतंच वड्याचं मिश्रण होतं ते पुढच्या वेळी बघेन Lol

>>उलटा वडापाव मिळतो>> माझ्या लहानपणी आम्ही हा प्रकार बरेचदा (वर्षातून ४-५ वेळा Happy ) खायचो, त्याला पाव पॅटिस म्हणायचो. लादी पाव मधे अर्धवट कापून त्यात बटाट्याची भाजी भरुन मग वड्यासाठीच्या पिठात तो पाव बुडवून तळत. गरम असतानाच सुरीने दोनदा उभे दोनदा आडवे कट देवून त्यावर चिंचेची चटणी, बारीक चिरलेला कांदा आणि हवे असल्यास थोडे तिखट भुरभुरवून.

हो हो! हा पदार्थ वाशी डेपोच्या मागे, सेक्टर ९-ए मध्ये मशीद आणि फादर अ‍ॅग्नेल इंजि, कॉलेज आहे त्याच्या कोपर्‍यावर मस्त मिळत असे.
आमच्या हॉस्टेलच्या मेसला ही दर बुधवारी ब्रेड पॅटिस असे. Happy

काल एक गंमतच झाली. मराठी मंडळाच्या ग्रुपवर कुणीतरी नविन देशी रेस्टॉरंटची जाहिरात टाकली. तासाभरावरचे रेस्टॉरंट पण उत्सुकता म्हणून साईटवरच मेनू बघितला तर त्यात एग, चिकन, वेज वगैरे प्रकारात कोतू पराठा हा नवाच पदार्थ दिसला. +१ म्हणाला नेहमी पेक्षा वेगळे काहीतरी आहे तर या विकेंडला जावू या. रात्री झोपताना सहज गुगल केले तर हा नवा प्रकार म्हणजे एक प्रकारची फोडणीची पोळीच निघाली. Proud

आता उलटा वडापाव म्हणतात तो प्रकार तीस पस्तीस वर्षे माहितेय, पाव वडा नावाने मिळायचा. निदान मुंबई आसपास तरी मिळायचा, लादीपाव मध्ये सारण. ब्रेड स्लाईस मध्ये सारण भरलं की ब्रेडपॅटिस म्हणायचे बरेच ठिकाणी.

दोन्ही घरी करून बघितलेले, पाव वडा पेक्षा ब्रेड पॅटिस जास्त केलं जायचं घरी.

सारण जड झाल्याने तेलात वडा वर येत नसेल तर: चार मखाणे घेऊन त्याभोवती कमी सारणात गोळा करायचा.

Pages