Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44
लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अस्मिता
अस्मिता

दवा की जरूरत खाणार्यांना पडत नाही तोवर ठीकच चाललंय म्हणायचं.
हो, तोच आधार आहे. पाकिटातले
हो, तोच आधार आहे.
पाकिटातले पीठ टोपात टाकून सूचनांचे कव्हर ताबडतोब कचऱ्यात टाकून ( एरवी किचनमधे पसारा पडून असतो)असेल दोनशे ml नाही तर एक लिटर बघू , हाकानाका असा रजनीकांत अप्रोच.
इडली म्हणू नका, ढोकळा म्हणू नका, गुलाबजाम म्हणू नका. भेदभाव नाही.
कढी झाली आता ढोकळा..
कढी झाली आता ढोकळा..
आंबट शौकीन आहेत माबोकर
सूचनांचे कव्हर ताबडतोब कचऱ्यात टाकून>>>>>>>>> आणि मग काहीतरी आठवून परत बाहेर काढते मी
आ बा नु रेसिपी फॉलो करे ने
आ बा नु रेसिपी फॉलो करे ने सरस ख़मण आपोने! >
ह्या बाई पिठाचा हात साखरेत त्याच हाताने पुढ्चा पदार्थ. बापरे मी त्यांच्याकडे जेऊ शकणार नाही.
धन्यवाद ,खूपच वेगवेगळ्या
धन्यवाद ,खूपच वेगवेगळ्या घटकांचा ऊहापोह केलाय इथे. बऱ्याच जणांना ढोकळा जमत नाही हे वाचून माझी रुखरुख थोडी कमी झाली आहे. तसेच शास्त्रीय चर्चा वाचून मलाही थोडे अजून प्रयोग करायची खुमखुमी आली आहे.
~ Ready mix- सध्यातरी लक्ष ढोकळा अथपासून इतिपर्यंत करण्यावर आहे, नाहीच जमलं तर MTR चे पुन्हा वापरून बघेन एकदा , मैत्रीणी ने हल्लीच ढोकळा मिक्स चे निगेटिव्ह फीडबॅक दिलाय (माझे MTR चे गुलाब जमून मिक्स चे पण अतिशय वाईट अनुभव आहेत: २ दा इथे विकत घेतले व एकदा मुंबईतून आणलेले - पाकिटावरच सगळ्या सूचना तंतोतंत पाळून पण फसले हे अजूनही लक्षात आहे )चितळे मिक्स इथे मिळण दुरापास्त आहे, gits मला जमलं नाही हे नक्की आठवतंय, पण इथले अनुभव व मनी मोहोर आणि जुई फोटो यांच्या ढोकल्याचे झकास फोटो पाहून एकदा रेडी मेड करून बघेन
~ instructions, सगळी लेबल, manufacturer, importer, ingredients वाचण्याची सवय आहे , timer नेहेमी वापरते पण तरीही कुछ तो गडबड है!
~शहाबादी फरशी - उपमा मस्तच
~गुज्जू बेन ची रेसिपी बघितली, (प्रत्येक डब्यात ला जिन्नस वेगवेगळ्या चमच्याने काढून) करून बघितली. चवीला बरा होतो ढोकळा त्यांच्या पद्धतीने (पण माझं एकच रडगाणे - जाळी एक विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पडतच नाही)
~ frozen ढोकळा या देशात मिळत नाही, रेडी टू ईट मध्येही खूप कमी पदार्थ असतात
पुढील प्रयोगांसाठी टिपा लिहून ठेवल्यात, त्या खालीलप्रमाणे
१. तयार बेसन न वापरता चणाडाळ वापरण्याची सूचना आवडली, तर चणाडाळ भिजवून , पाणी घालून वाटून लगेच बेकिंग सोडा घालून वाफवून करणे, यासाठी भिजवून फुललेली चणाडाळ व बेकिंग सोडा यांचे प्रमाण ठरवणे थोडे कौशल्याच काम वाटतेय( तसेच हे मिश्रण आंबवून कसा काय ढोकळा होतो ते ही पुढच्या प्रयोगात बघेन)
2. मायक्रोवेव्ह पद्धत , कधीच केलं नाही, पाककृती लिहून ठेवतेय, जमण्यासारखी आहे, कमी कटकटीची वाटतेय त्यामुळे नक्की करेन, धन्यवाद.
3. बेकिंग पावडर ( बेकिंग सोडा ऐवजी) वापरणे
4. नवीन बेकिंग सोडा आणून ( किंवा आणल्यावर) ढोकळा करणे
5. Amazon वरच वाफवण्याचं भांड बरं आहे, स्टील च induction वर चालणार घेईन पण लगेच आणता नाही येणार ,तोवर आताच्या इडली स्टीमर मधून अजिबात वाफ निघू नये म्हणून जुगाड करणे
6. वर लिहिलंय तसा रेडी मेड मिश्रण चा ढोकळा बनवणे (पॅकेट वरील सर्व सूचनाच पालन करून )
७. बरा जाळीदार ढोकळा जमला तर मायबोली वर येऊन अपडेट देणे
८. इतकं ( किंवा थोडसं) करूनही नाही जमलं ( किंवा कंटाळा आला ) तर मुंबईला गेले की खाईन असं ठरवणे.
अतिशय लांबलचक पाल्हाळ लावल्याबद्दल क्षमस्व
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद
स्वाती
स्वाती

मी १० वेळा केलेली रेसिपी असेल तरी अकराव्यांदा परत रेसिपी वाचून करतो. काल रणवीर ब्रार ने सांगितला तसा तंतोतंत उपमा केला आणि एकदम मस्त झाला. त्याने मटार नाही घातले, त्यामुळे कोणाला आवडतं असले तरी बेहत्तर. मी हात पण लावत नाही आऊट ऑफ सिल्याबस गोष्टींना.
मी ही गिट्सचाच करते. पूर्वी
मी ही गिट्सचाच करते. पूर्वी झाल्यासारखा वाटायचा पण मध्ये पीठ ओलं रहायचं. आता तसं होत नाही. एकच गोष्ट वेगळै करते. ते म्हणजे एकदा पीठात पाणी घातलं की वेळकाढूपणा न करता कुकरला लावायचा आणि कुकरला लावण्यापूर्वी डबा दोन्ही हातांनी धरुन काऊंटरवर २,३ वेळा आपटायचा म्हणजे बबल्स रहाणार नाहीत.
<<<फक्त बेकिंग सोडा आणि
<<<फक्त बेकिंग सोडा आणि चवीलाही आंबटपणा नाही असा ढोकळा जाळीदार होईल का? बघेन करुन.>>>
हो जाळीदार होइल ना. कारण सोडा (आणि बेकिंग पावडर सुद्धा) मधील सोडियम बाय कार्बोनेट चे उच्च तपमानाला विघटन होऊन त्यातुन कार्बन डाय ऑक्साईड वायू निघतो. 2 NaHCO3 dissociating in to 2Na2Co3 + H2O + CO2. फक्त ही क्रिया व्हायला उच्च तापमानाची गरज असल्याने टाकल्या टाकल्या रुम टेंपरेचर वर काही होताना दिसणार नाही. इनो टाकल्यावर दिसतं तसं. आपल्या कडे भजी करताना कणभर खाण्याचा सोडा घालायला सांगतात भजी हलकी होण्यासाठी त्यापाठी पण हेच तत्त्व आहे. कित्येक केक्स/मफिन्स/कुकी आणि नानकटाई च्या च्या रेसिपी मध्ये ऍसिडिक काही नसतं. तरीही बेकिंग सोडल्याने केक ला जाळी पडते आणि कुकीज खुसखुशीत होतात. इथे त्यांना हवे आहे तसे स्पंजी/ मोठे छिद्र असलेले टेक्शचर मिळण्यासाठी बेसन, पाणी आणि सोडा ह्यांचे अचुक गुणोत्तर मिळण्यासाठी प्रयोग करावे लागतील.
इनो मध्ये तुम्हाला अपेक्षित आहे तसे ऍसिड बेस एकत्र करून दिलेले आहेत जे पाण्याच्या संपर्कात आल्यावर रुम टेंपरेचर ला कार्बन डाय ऑक्साईड रिलीज करतात. पण ते करत असताना ऍसिड (आणि बेसन दोघांचेही) क्षारांमध्ये रुपांतर होते आहे. त्याची चव बदलुन खारट/तुरट/कडु अशी काही तरी होइल. जी मुळात प्रमाण कमी असल्याने जाणवणार नाही. चव जाणवते आहे ती सिट्रिक ऍसिड ची आहे कारण त्याचे रासायनिक दृष्ट्या रुपांतर झाले नाही. तात्पर्य हे की सिट्रिक ऍसिड हे रेसिपी मध्ये चवीसाठी आहे ढोकळा जाळीदार होण्यासाठी त्याची आवश्यकता नाही.
<<<बरा जाळीदार ढोकळा जमला तर
<<<बरा जाळीदार ढोकळा जमला तर मायबोली वर येऊन अपडेट देणे>>>
मी तर म्हणेन जाळीदार नाही झाला तरीही अपडेट द्या आपण पुन्हा त्यांचे विश्लेषण करु. तुमचे ढोकळा मिशन ढोकळा आपण यशस्वी करुनच सोडु.
मी हात पण लावत नाही आऊट ऑफ
मी हात पण लावत नाही आऊट ऑफ सिल्याबस गोष्टींना.
>>>>
रण्वीर म्हणजे प्रश्नच नाही.
रण्वीर म्हणजे प्रश्नच नाही. पण कॅमेरा फोकस त्याच्यावरच जास्त राहिल्याने रेसिपी समजण्यासाठी ती परत
पाहावीडोळे मिटुन ऐकावी लागतेढोकळा न जमण्णार्यांमध्ये मी
ढोकळा न जमण्णार्यांमध्ये मी सुद्धा आहे. मी तर दुश्मन कॅटागरीत टाकलाय. म्हणजे बेसनाचा मलदाच होतो. कधीतरी एकदाच ढोकळ्याचे ग्रह चांगले होते लिंबूफूल व दही टाकून तेव्हा बरा झालेला. पण दुकानासारखा नाही झाला. बाबांनी(तेव्हा ते असताना) बराच वेळ हात नाही लावलेला आणि हि कसली गं वडी विचारलेलं?
माझे सगळे प्रयोग झालेत.
हळद व सोड्याने लाल केलेला ढोकळा
डाळ- तांदूळाचा मलदा झालेला
लिंबूफूल व सोडा...
आणि बाहेरचे भरपूर सोडा टाकलेले नकोच वाटतात..
आमच्या इथल्या फरसाणच्या
आमच्या इथल्या फरसाणच्या दुकानात वाटी दालना ढोकला मिळतो. तोही छान लागतो. पण इन्स्टंट ढोकळ्या एवढा हलका वाटत नाही.
याची कृती इडलीसारखी आहे. डाळ वाटल्यावर पीठ आंबवायचं आहे आणि इनो घालून ढोकळे वाफवायचे.
मी घरी केलेला ढोकळा.. बेसन,
थोड्या वेळाने येते..
थोड्या वेळाने येते..
हा इनो वापरून इतका छान नाही
हा इनो वापरून इतका छान नाही होत माझा, वरच्या फोटोतल्या सारखा. एव्हडी जाळी पडत नाही थोडक्यात रवा केक सारखा होतो ,काय चुकत असेल ?
पण श्रवु तुमच्या ढोकळ्याला अगदी बाहेरच्या ढोकळ्या सारखी जाळी पडलीय.मस्त .
सूचनांचे कव्हर ताबडतोब कचऱ्यात टाकून>>>>>>>>> आणि मग काहीतरी आठवून परत बाहेर काढते मी
>>>>मी पण 
मीही ढोकळाग्रस्त. कधीच धड
मीही ढोकळाग्रस्त. कधीच धड झाला नाही. वाशीच्या एपिएम्सीत गुज्जु निर्मात्याचे एक किलोचे पाकिट दुकानात दिसले. ते घेतले व डोकळा केला. अप्रतिम, अगदी बाजारसारखा. पण दोनदा वापरुन ते संपले
ढोकळाग्रस्त असल्याने सुचनांचे तंतोतंत पालन केले होते. पिठ भिजवल्यावर ते तासभर तरी ठेवा तसेच हे स्पष्ट लिहिले होते.
सूचनांचे कव्हर ताबडतोब
सूचनांचे कव्हर ताबडतोब कचऱ्यात टाकून>>>>>>>>> आणि मग काहीतरी आठवून परत बाहेर काढते मी >>> डीट्टो!
सुदैवाने मला आणि आमच्याकडे ढोकळा कुणाला विशेष आवडत नाही, कुणी आठवण काढत नाही. अन्यथा आम्हीपण ढोकळाग्रस्त झालो असतो.
ते कवर सर्वप्रथम कचर्यात मी
ते कवर सर्वप्रथम कचर्यात मी सुद्धा फेकून पच्तावले. मी उचलण्याच्या आतच त्यावर चहापूड टाकून दुसरं त्याचक्षणी मोकळं होतं असही झालय. मग ते कवर वाचूच शकत नाही.
ढोकळाग्रस्त हा शब्द अतीचशय
ढोकळाग्रस्त हा शब्द अतीचशय आवडला आहे, ढोकळया पेक्षा पण जास्त...
विषयांतर करतो:
विषयांतर करतो:
एक किलो जुने डोसा तांदुळ (इकडे डोसा तांदुळ या नावानेच मिळतात, आणि सहा महिन्यांपूर्वी आणले होते.) पाव किलो उडीद डाळ, पाव किलो ह.डाळ हे धुवुन डाळी उन्हात आणि तांदुळ सावलीत दोन दिवस पूर्ण वाळवून,
त्यात एक वाटी पोहे, एक चमचा मेथी घालुन आंबोळी पीठ दळून आणलं.
तवा बीडाचा आहे आणि चांगला सिझन्ड नेहमी वापरातला आहे. त्यावर डोसे, विकत घेतलेल्या पिठाच्या आंबोळी छान होतात.
पण पहिल्यांदाच आंबोळी पीठ दळून आणलं. रात्री भिजवून आंबवून, वेळेवर थोडं आंबट ताक घालून (जसे विकतच्या पिठाचे केले तसेच) आंबोळ्या केल्या आता पर्यँत तीनदा.
तर
१. तव्यावर आंबोळी घातल्यावर पळीने पीठ पसरवायला गेले की पळीला चिकटतेय बऱ्यापैकी. अगदीच पटकन जेवढे पसरेल तेवढे पसरवता येते मग थांबावे लागते. पण पीठ आपले आपणच चांगले पसरतेय तव्यावर घातल्या घातल्या. (कन्सिस्टन्सी थोडी गाढ करून पाहिली तरीही.)
२. तव्यावरून आंबोळी सुटत नाहीय. उलथण्याने सावकाश बाजी मारत जरा निगुतीनेच काढावी लागतेय, आणि मग निघेतय. चव विकतच्या पीठापेक्षा चांगली आहे, पण हाताने लवकर तुटतेय नेहमीच्या आंबोळी पेक्षा.
३. आज एक अंड पीठात फेटून घातले तर पळीने बऱ्यापैकी पसरवता येते आणि आंबोळी तव्यावरून छान सुटते अलगद.
एकंदरीत पिठात बाईंडिंग कमी झालेले दिसतेय.
तर माकाचु?
आणि आता दळून आणलेल्या पिठाचे बाईंडिंग वाढवता येईल का व कसे?
तव्यावरून आंबोळी सुटत नाहीय.
तव्यावरून आंबोळी सुटत नाहीय.
>>>
मानव सुरुवातीला आच मोठी ठेवून तवा चांगला तापवून आंबोळी घातल्यावर मग आच मध्यम करा. प्रत्येक आंबोळीला ही प्रोसेस रिपीट करा.
यानेही काम झाले नाही तर अजून अर्धा किलो तांदूळ पीठ करून मिक्स करा. कारण १:२ हे डाळ तांदळाचे प्रमाण जास्त वाटते आहे. १:३ प्रमाण घ्या. तसेच उडीद जास्त आणि हरभरा डाळ कमी हवी होती. पण असो.
मानव , ताक ना टाकता करून पहा.
मानव , ताक ना टाकता करून पहा. आंबोळी चे पीठ टाकताना बिडाचा तवा चांगला तापला पाहिजे, आणि मोठी आच असतानाच पीठ टाकायचे आणि पटकन पसरायचे . रात्रभर भिजवून पीठ चांगले फुगते का?
तवा कमी तापला असेल तर पीठ चिकटते . तुम्ही आंबोळ्या करताच त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल.
माझ्या मते व्हायला हवेत ह्या
माझ्या मते व्हायला हवेत ह्या पिठाचे ही... कारण नुसत्या बेसन किंवा उडदाचे ही डोसे होतात.
ताकाच प्रमाण कमी करून बघा कारण तुम्ही ते पीठ आंबवता ही आहातच. इन्स्टंट करत असाल तर ताक जास्त लागत थोड पण आंबवणार असाल तर ताक कमी करा. ताक जास्त झालं तर असा प्रॉब्लेम होतो तवा चांगला असला तरी हा स्वानुभव आहे.
तव्यावर पाणी शिंपडून ते पुसून मग घालून बघा आंबोळी . तवा मध्यम गरम ठेवा, घालताना गॅस कमी ठेवा म्हणजे पसरवायला सवड मिळेल.
पीठ एकदम बाssरीक दळून आणलंय
पीठ एकदम बाssरीक दळून आणलंय का?
थोडे रवाळ हवे का?
हरभरा डाळ पाव किलोच टाकयला हवी होती असे वाटते.
ढोकळेबाज लोकांना दंडवत
ढोकळेबाज लोकांना दंडवत

चितळे की gits चे रेडिमिक्स आणून एकदा त्याचा चिखल करून झाल्यावर परत अजिबात हात नाही घातला त्या विषयात
आंबोळीला , घावण्याला पीठ
आंबोळीला , घावण्याला पीठ जरासे सरसरीत लागते. बारीक रवा असतो ना तसे.
आईची ट्रीक सांगते, ओले खोबरे वाटून टाका. तवा मस्त तापवून मग आच कमी करा. मग पसरवा पीठ.
आईचे आंबोळी प्रमाण- ४ वाटी तांदूळ, २ वाटी उडीद, पाव वाटी चणा( हे धूवून सुकवून रवाळ ( बारीक रवा) चक्कीत दळायचे.
मग मूठभर पोहे व मेथ्या दाणे चमचा( हे नंतर वाटून टाकायचे).
धन्यवाद माझेमन, सामी, ममो,
धन्यवाद माझेमन, सामी, ममो, छल्ला.
तवा किती गरम, आच कमी जास्त वगैरे अगदी व्यवस्थित करतो य आणि कमी आचेवर सुद्धा घालुन पाहिलेत.
पीठ किंचितच जास्त रवाळ झाले असे वाटते ते चाळून घेऊनही करून पाहिले.
पीठ फुगतेय छान. ताक आंबट चव येण्यापुरतेच घातले थोडेसे चार आंबोळ्या होतील तेवढया पीठात पाव वाटी पेक्षा जरा कमीच असेल.
उडीद डाळ चांगलीच जुनी होती (वर्षभर तरी) त्याने होऊ शकते का असे?
तीन वेळा केले आणि तिन्ही वेळेला, प्रत्येक आंबोळीला अगदी वर सांगितलाय तसाच कंसिस्टंट प्रॉब्लेम आहे. आज चार आंबोळी पिठात, पहिल्या दोन आंबोळ्या अशाच झाल्या (जाळी नीट पडते) आणि उरलेल्या पिठात अंडं फेटून घातले आणि त्या छान सुटल्या तव्यावरून अलगद.
तुम्ही सगळ्यांनी सुचवलेले परत एकदा नीट करून पहातो.
डाळ तांदुळ १:२ प्रमाण झालेय, खरे ते पण तांदुळ पीठ घालुन कमी करून बघतो.
ओले खोबरे वाटून टाका. >> किती प्रमाणात घालावे हे झंपी?
जरासे घाला. जर ४ वाटी असेल तर
जरासे घाला. जर ४ वाटी असेल तर एक वाटी घाला. खोबरं खरखरीतपणासाठी आहे. तेव्हा खुप जाड हि नाही गंधासारखं नाही वाटायचं.
चविष्ट लागतात खोबर्याने. एकत्रच मिक्सी फिरवा आणि सांगा कश्या झाल्या ते इथे.
ताक आंबट हवे. नाहीतर गरम पाणी घालयचे आणि ठेवायचे पीठ ३-४ तास. मग करा. नाहितर खोबरं आहेच मदतीला.
मानवदा पीठ रात्री भिजवूंन
मानवदा पीठ रात्री भिजवूंन ठेवत असाल तर.. अजिबात ताक घालू नका.. मीठही नको.. मीठ सकाळी घाला..पोहे आणी चण्याची डाळ घातलेलं पीठ लवकर आंबते.. 6 तास खूप झाले.. पीठ इडलीच्या पिठासारखे घट्ट असू देत.. डोस्यासारखे पातळ नको. डोसा बन डोस्यासारखा जाड ठेवा.. फार पसरवू नका.. अलगद पसरवा ..गॅस एकदम बारीक ठेवायचा.. वेळ लागेल पण दोसे मस्त जाळीदार होतील.. एक डोसा काढून आत्मविश्वास आला कि दुसरा डोसा पॅनवर घातल्यावर ओनियॉन उत्तमपम चा मिश्रण घाला.. सुंदर होतील दोसे.. गन पावडर घातली डोस्यावर तर चटणीची हि गरज नाही... 100% डोसे मस्त होतील.. अजिबात पॅनला चिकटणार नाही..
Pages