माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बऱ्याच दिवसांनी (वर्षांनी) काल बटाटेवडे केले. वडे तेलात घातल्यावर तळाशी जाऊन चिकटत होते आणि थोड्या वेळाने सोडवायचा प्रयत्न केल्यावर फुटत होते Sad दोन तीन वड्यांचं असं झाल्यावर सरळ गॅस बंद केला, सगळं तेल गाळून नवीन कढईत तापवायला ठेवलं. तेल कमी तापल्यामुळे असं झालं असावं या अंदाजाने यावेळी तेल जास्त तापवलं. तरी परत सेम प्रॉब्लेम. मग ते तेल बाजूला ठेवून नवीन तेल घेऊन तापवलं. बेसनाचं batter अजून जरा घट्ट केलं. तरी तोच प्रकार. Sad
शेवटी तसेच उरलेले सगळे वडे तळले.
माकाचु?

खूप वर्षे बटाटेवडे केले नाहीस म्हणून ते रुसून तळाशी जाऊन बसले .. Happy Happy Happy
मोठ्या पसरट कढईत भरपूर तेल हवं व तापलेलंहीअसावं

बेसन जास्ती बारीक दळलेलं असेल. त्याने चिकट होते बॅटर.
त्यामुळे, तेलात सोडल्या सोडल्या शिजायची जी प्रक्रिया चालू व्हायला हवी ती न होता, वडे जड होऊन तळाशी जात असावेत

सारण सैल झालं होतं का? कधीकधी बटाटे उकडल्यावर वॅक्सी होतात, आणि मसाले घातल्यावर मिश्रण सैल - आणि जड - होतं.

ओह्ह! हे माझं पण झालेलं आहे. तेल तापलं नसेल करुन तापवुन केलेले आहेत.
पण आता विचार करता वडे बुडतात वि. तरंगतात यात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि व्हिस्कॉसिटी आणि त्यावर उष्णतेचा परिणाम होतो का असा विचार करतोय. कनोला ऑईल थंड असताना वि. गरम केल्यावर त्याची व्हिस्कॉसिटी कायच्या काय कमी होते. म्हणजे तेल नक्कीच प्रसरण पावत असणार. प्रसरण पावलं की त्याची डेंसिटी ही कमी होत असणार. आता वड्याची डेंसिटी तेलाच्या डेंसिटीपेक्षा कमी असेल तरच तो तरंगेल बरोबर ना?
सरफेस एरियात काही व्हेरिएशन केले तर?

<<आता वड्याची डेंसिटी तेलाच्या डेंसिटीपेक्षा कमी असेल तरच तो तरंगेल बरोबर ना?>> तसे असेल तर गार तेलात वडा सोडल्यावर तरंगायला हवा ना? नाही तरंगत.

काय चुकलं हे सांगु शकत नाही पण ऑइल डेन्सीटीमुळे नाही.
उंटावर बसुन एवढे सुचतेय:
बटाटे /सारण जास्त ओलसर अथवा डेन्स नाही ना? असेल तर टेक्स्चर न बिघडवता त्यातला ओलसरपणा कसा कमी करावा माहित नाही. पण बेसनाच्या आवरणाला गरम तेलात टाकल्यावर वाफ धरून, फुगून सारणासकट वर यायला भारी पडत असेल. सारण ओलसर नाही पण डेन्स असेल तर मोकळं करून आकार तेवढाच पण कमी वजन असं काही करता येईल का?

-----
उप्स, वर स्वातींनी हेच आणि नेमके कशाने ते होऊ शकते हे पण दोन वाक्यात लिहिलंय.

ओह्ह! राईट! मग सारणात थोडा सोडा घातला तर आणि गरम तेल असेल तर ते सारण आणि त्यामुळे सगळाच वडा लवकर फुगुन वर तरंगेल ना?

मी tempeh आणले आहे पहिल्यांदाच. कुणी खात असेल तर कसे खावे/ रेसिपी सुचवा
रंगरूपावरून जपानी नात्तोचीच आठवण आली पण होपफुली तसे नसावे! Happy

>>> असेल तर टेक्स्चर न बिघडवता त्यातला ओलसरपणा कसा कमी करावा
कदाचित चमचाभर कॉर्नफ्लोअर किंवा तांदुळाची पिठी?

बटाटे शक्यतो आधी (जमल्यास आदल्या दिवशीही) उकडून फ्रीजमध्ये ठेवलेले बरे पडतात वड्या/पराठ्यांसाठी.

मी वडे, पराठे वगैरेच मिश्रण सैल झाले तर मावेत झाकण न लावता गरम करते, आद्रता वाफेवाटे कमी होऊन योग्य कोरडेपणा येतो.

अमितव सारणात सोडा घातला तर गरम झाल्यावर फस फस गॅस सोडुन वडा तुटणार नाही ना?

<<कदाचित चमचाभर कॉर्नफ्लोअर किंवा तांदुळाची पिठी?>> जे काही चव बिघडवणार नाही आणि त्यातलं पाणी शोषुन जरा फुगतं असेल ते चालुन जावे असे वाटते, म्हणजे एकंदरीत सारण कमी दाट होईल.

<<मी वडे, पराठे वगैरेच मिश्रण सैल झाले तर मावेत झाकण न लावता गरम करते, आद्रता वाफेवाटे कमी होऊन योग्य कोरडेपणा येतो>> मग हा बेस्ट ऑप्शन झाला की.

आठ तास होऊन गेले, वावेंनी केव्हांच काहीतरी करून बटाटेवडे करून फस्त केले असतील एव्हाना. पण लगेच येऊन सापडलेला उपाय सांगितला तर तर मजाच जाईल या धाग्याची. कुणीही लिहिणार इथे. Proud

Lol
मी पूर्वी फॉलो करायचो त्या कॄती नुसार सारणात बेसन + तांदुळाचे पीठ + सोडा + हळद, ओवा/ मीठ घातलेले आठवते. सोडा - पाणी आणि अ‍ॅसिड मध्ये अ‍ॅक्टिव्हेट होतो. यात अ‍ॅडिड नक्की काय बघितलं पाहिजे पण इतका जास्त अ‍ॅक्टिव्हेट होत नाही किंवा अगदी चिमुटभर घातल्याने फसफसण्याचा इफेक्ट पसरला जाऊन तरंगणे होऊन तुटणे होत नाही.
सोडा हलकं व्हायला घालतात ऐकलेलं पण ते हलकं होणे म्हणजे तेलापेक्षा हलके होणे हे आत्ता जाणवलं. Happy

हो! Lol ते फक्त दिवाळीच्या तेल पिणार्‍या किंवा न पिणार्‍या चकल्यांना लागू होतं लक्षात होतं. ते वड्यांना लागू होईल लक्षातच नाही आलं. Lol

>>> वावेंनी केव्हांच काहीतरी करून बटाटेवडे करून फस्त केले असतील एव्हाना.
असतील नाही, करून मगच प्रश्न विचारला आहे तिने. Proud

<<किंवा अगदी चिमुटभर घातल्याने फसफसण्याचा इफेक्ट पसरला जाऊन तरंगणे होऊन तुटणे होत नाही.>> ओके. ऍसिड नसेल तरी गरम झाल्यावर गॅस रिलीज होईल.

मोरोबा बरोबर. पण वावे बंगळुरू असतात, त्यामुळे एका बाजुला चेन्नईला ओहोटी त्याच वेळेस तिकडे मंगळुरूला भरती परिस्थिती असु शकते.

Lol
भरती ओहोटी बद्दल सोकुलच्या लेखात वाचलं आहे पण मला काही त्याचं शास्त्र कळालंच नाही.

माझेही बटाटेवडे बुडतात बरेचदा, मग मी आवरण थोडे तळून स्ट्रॉंग झाले की झाऱ्याने पिकलेले फळ देठापासून वेगळे होते तसं खुटूक करून काढते. Happy

अरे!!! हिला दिवाळीच्या चकल्यांच्या डब्याच्या खाली कधी तेल जमा होते आणि कधी नाही, चकल्या कधी तेल पितात तो फॉरवर्ड पाठवा बरं! नाही सापडला तर.. हरकत नाही. दिल्ली.. आपलं दिवाळी अभी दुर नैये! Proud येईलच नव्या धारेचा!
सोकुल या चक्रमपणात सामिल असेल तर मला खूप आनंद होईल. ती आवडत नसण्याला आणखी एक ठोस कारण मिळेल Wink

Lol असं तर मग मला भुतावरही विश्वास ठेवावा लागेल. भरती ओहोटी वाचून मला असंच झालं.

ती आता कुकींंग चॅनल वर दिसतेय, कोणीतरी सत्यजित म्हणून आहे त्याच्यासोबत. त्यांचे दडपे पोहे पाहिले परवा.

मजा आली सगळे उपाय आणि अंदाज वाचून! Proud
वडे रुसून तळाशी जाऊन बसले असणं शक्य आहे. Lol
भरती-ओहोटीची वेळ बघायचीही राहिली!
मी आप्पेपात्राचाही एक प्रयोग केला. तोही फसला.

जसे झाले तसे, वडे करून खाऊन संपलेच अर्थात.

सारण आवश्यकतेपेक्षा अगदी थोडंसं सैल झालेलं असू शकतं. वडे वळताना तरी असं काही जाणवलं नाही. पण अर्थात, बऱ्याच दिवसांनी केले. Happy
बेसन जरा खरखरीत होतं मात्र. त्यामुळे झालं असेल का?
तेल भरपूर होतं आणि कढईही पसरट आहे.

मलाही पूर्वी असं झाल्याचं आठवतंय, पण सुरुवातीला एकदा-दोनदा चिकटून मग पुढचे व्यवस्थित झाले असावेत. एवढं दारुण अपयश पहिल्यांदाच आलं!

Lol लक्ष्यार्थाने काढून झालं थोडंफार. पण आज इथले प्रतिसाद वाचून भरपाई झाली.
शब्दशः कसं काढतात ते माहिती असायला हवं होतं. बरंच तेल वाया गेलं!

झाऱ्याने पिकलेले फळ देठापासून वेगळे होते तसं खुटूक करून काढते. >>>

|| पिष्ठुंजय मंत्र ||
ओम झारांजय यजामहे लोखंडं पुष्टीवर्धनम
बटाटेवडैव बंधनान धातूपात्रं मुक्षीय चिकटगुंड्यात् ||

ती आवडत नसण्याला आणखी एक ठोस कारण मिळेल >>>> कारण कशाला पाहिजे ती किंवा अजून कोणी न आवडायला?

माधव >>> Lol मी २ मिनिट सिरिअसली वाचलं ना

वावे >>>
झाले युवतीमना दारुण रण तळण फसले
बटाटवड्या संसारी मी अमर ऐसे केले

वा वे, तू बटाटेवड्यासाठी वेगळा धागा काढ.
इथले मौलिक सल्ले, मंत्र, स्तोत्र इ इ डॉक्युमेंट करायलाच पाहिजेत

माझा आवडता बाफ जागा झाला :).

सगळ्यात मनोरंजक उपाययोजनेचा पुरस्कार गोरोबांना भरती ओहोटीच्या वेळापत्रकासाठी जाहीर करते.

मंजु ताई आणि स्वातीं (दोन्ही स्वाती) शी सहमत. माझ्या मते वडे तळाला चिकटण्याची ९०% शक्यता खालील तीन कारणांमुळे आहे.

(१) ओलसर सारण: ज्यामुळे वाफेचा दाब जास्त प्रमाणात कव्हर वर येऊन कव्हर तेलाच्या उष्णतेमुळे कडक होण्याआधी च वाफेच्या दाबामुळे फुटुन वड्याचा आकार आणि पर्यायाने तरंगण्याची क्षमता बदलली.
(२) कव्हर मधील बेसन आणि पाण्याचे गुणोत्तर: खुप पातळ पीठ असेल तर पातळ कव्हर तयार होते जे आतील सारणाचे वजन पेलू शकणार नाही तसेच अतिशय घट्ट पीठ असेल तर कव्हर आवश्यकतेपेक्षा जास्त वजनाचे होऊन वडा बुडु शकतो. कन्सिसटंसी साधारण अशी हवी की पिठातुन चमचा बुडवून बाहेर काढला तर त्याच्या मागील बाजूला एकसारखा थर असायला हवा (कोटिंग कन्सिसटंसी).

(३) कढईतील तेलाचे प्रमाण आणि तापमान: खुप कमी तेल (छोटी कढई) असेल तर तसेच कढईतील तेलाचे तापमान खुप कमी किंवा खुप जास्त असेल तर वड्यांना तेलात पोहायला समस्या येते. वडे मोकळे पोहु शकतील इतपत तेल त्यांच्या अवतीभवती हवे आणि त्याचे तपमान मध्यम हवे. आपण टेस्टिंग साठी एखादा छोटा पिठाचा थेंब टाकल्यास तो २/३ सेकंदात वर यायला हवा. तेवढे तपमान पातळ पीठाचे (लिक्वीड) कडक कव्हर (सॉलीड) मध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक आहे, जे ओलसर सारणाच्या वाफेचा दाब सहन करु शकेल.

Pages