माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

आणि कढी फोडल्याच्या गुन्ह्याबद्दल केकुंना आणि फुटलेल्या कढीची चिरफाड केल्याबद्दल बाकीच्यांना काय सजा द्यावी? Proud

कढी फोडायला >>>> Lol
‘अस्फुट कढी’ >>> Lol
काहीही चाललंय आता Rofl

^^आता माझ्याकडून कधीच कढी फुटली नाही तर माकाचु विचारायची वेळ आलीये या सगळ्या पोस्टी वाचून Lol

Submitted by प्रज्ञा९^^
माझे पण same pinch झाले.
की मी पुरेसा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून स्वयंपाक करत नाही की काय ?

के कु, तुम्ही PCMC मधे राहत असाल तर माझ्या घरी जेवायला या, मी न फुटणारी कढी करते, पण हा विषय आवरा......

अरे आवरा
हे वाचताना फोनवर लागलेलं कभी कभी मेरे दिलमे...मला कढी कढी मेरे दिलमे ऐकू येतय....

आज काय योगायोग न फुटलेली कढी च होती जेवणात.

सगळ्यांचे आभार. माझं काय चुकलं ते मला समजलं. आता पुन्हा माकाचु असे विचारणार नाही. हे विचारले हेच चुकले.

अरे अरे! केकूंना काय झाले? कढी फाटली आणि आता पापड पण मोडला का ? Happy
बाफ माकाचुचाच आहे त्यामुळे एक से एक अचाट घोटाळे अन अचाट प्रतिसाद ही येतात. पण बघा, खरं उत्तरही मिळालं ना .

तस काही नाही हो.
के कु, तुम्ही PCMC मधे राहत असाल तर माझ्या घरी जेवायला या, मी न फुटणारी कढी करते>>> आभार पण नका उगाच परिक्षा घेऊ नका. माझ्या १५ फुटाच्या स्फिअर मध्ये कोणी कढीकरत असेल तर ती फुटणार अशी खात्री आहे.
एक आहे ना The Water saw her Master and Blushed. तद्वत Kadhi saw Keku and futali.
अशी एक स्टोरी लिहायला हरकत नाही.
आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा अलकाला इंग्रजी पिक्चर मॅटीनिला यायचे. त्यांची जाहिरात
"फुटा फुटाला हशा आणि टाळ्या."
अशी असे. त्याची आठवण झाली.

केकू Lol
शिंपी कितीही एक्सपर्ट असला तरी तो फाटलेली कढी नाही शिवु शकत. त्यासाठी फाटु न देण्यास शिकवणारे माकाचुतज्ज्ञच हवेत.
येत जा माकाचुवर.

माझी कढी आणि खीर दोन्हीही कधीही फाटलं नाहीये. फोमो आलाय मला आता. पण अल्ट्रा होमोजनाइज्ड दुधचं काय त्यापासून बनवलेलं दही पण फाडायला अवघड असतय असे मानुन मी माझे २८ शब्द संपविते.
BTW अस्मिता, पाणी उकळून घ्यायची टिप आवडली आहे. केकू दिवा घ्या प्लिज.

केकू आता कढी अशी करून बघा.. रूम टेंपरेचर च्या ताकात बेसन कालवून घ्यायच गुठळ्या मोडायच्या .. त्यात आलं मिरची वाटून मीठ साखर घालून एकसारख करायच..पंधरा वीस मिनीटात चव अगदी एकसंध येते .. मग छोट्या कढल्यात फोडणी करायला घेतली की ताकात भांड बारीक गॅसवर सीम बारीक करून ठेवायच. फोडणी झाली की ती किंचीत निवली की मग कढीच्या मिश्रणात घालायची अन मग ऊकळी येते आहे अस दिसल की सतत ढवळत रहायचंय..
म्हणजे ऊकळी परेंत टेंपरेचर आलं पाहिजे पण ऊकळी फुटली नाही पाहिजे.
एकदा अशी करा अन ईथे सांगा

म्हणजे ऊकळी परेंत टेंपरेचर आलं पाहिजे पण ऊकळी फुटली नाही पाहिजे.>>> मुली, पदरात निखारे घेऊन चालायचे. पदर तर जळला नाही पाहीजे, निखारे तर विझले नाही पाहीजेत!
अहो मी अगदी अशींच केली होती पण पाणी वाढवले आणि कढी सेमी फुटली.

कढीचर्चेत 'आयुष्याचंही असंच असतं' टाईप काकाफॉचं पोटेन्शियल दडलं आहे हे कोणाच्या लक्षात आलंय का?
संसाराच्या कढीत पत्नी ही ताकाप्रमाणे असते, पती बेसन असतो, वगैरे वगैरे
घ्या कोणीतरी मनावर

Pages