माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कढीचा पेपर इतका का अवघड चाललाय सगळ्यांना?
Happy
कढी भाताचे जेवण हे सर्वात सोप्पे समजले जाते ना?

त्यानिमित्ताने, कढी करण्याचे विविध प्रकार समजले.

>>> खीर करताना शेवया गरम करुन वरुन दुध घातले तर माझे ते फाटते.
शेवया परतल्यावर (मी अगदी थोड्या तुपावर परतते) त्यात आधी त्या जेमतेम बुडतील इतकं उकळतं गरम पाणी घालायचं - त्यात त्या फुलतात. मग दुधात घालायच्या.
शिर्‍यासाठी परतलेल्या रव्यातही आधी उकळतं पाणी घातलं की रवा मस्त फुलतो. मग हवं असलं तर दूध.

मग दुधात घालायच्या म्हणजे दुध त्या शिजत असलेल्या शेवयात घालायचे नाही ना?? शेवया दुधात घालायच्या??

ह्या पाण्यात फुलवलेल्या कोरडसर गोड शेवया पण बहारदार लागतात. आमच्या ऑफिसातला एकजण ईदला शीरकुर्मा व कोरड्या गोड शेवया आणायचा… आहाहा अशा असायच्या दोन्ही.

केकू,
तो पाणी वाढवून पातळ करायचा मोह का आवरत नाही तुम्हाला, त्यात अजून खळखळ उकळायचे होते. Lol मी वातावरणातील आर्द्रता म्हणत होते, त्याने दही आंबटही होते व कढीही 'फुट-प्रोन' होते असा अनुभव आहे. वर पर्णिकांनी जे 'इमल्जन' म्हटलं आहे ते पाणी वाढविल्याने कमी पडते आहे. त्या बेसनामुळे ताक आणि पाण्यामधे बॅरिअर तयार होउन कढी फुटत नाही. तुमचं बॅरिअर/ वंगण काय ते कमी पडून उष्णता वाढली की केमिकल रिॲक्शन होते आणि कढी फुटते. आल्याच्या तुकड्याची चव उतरायला हवी असेल तर थोड्या तूप+जिरे कढीपत्ता+ कोथिंबीर आणि आलं परतवून त्यात थोडे पाणी घालून ते उकळून घ्या मग हे ताक, बेसन त्यात ओता. हळूहळू हलवत मध्यम आचेवर एक उकळी काढा आणि साखर, मीठ घालून बंद करा. विजयी भव..! Happy

>>> मग दुधात घालायच्या म्हणजे दुध त्या शिजत असलेल्या शेवयात घालायचे नाही ना?? शेवया दुधात घालायच्या??
मी दोन्ही प्रकारे केलं आहे. दूध फाटत नाही.

पण इथे हेही नमूद करायला हवं की इथे अमेरिकेत मिळणारं बहुतेक दूध अल्ट्रा होमोजनाइज्ड असतं आणि एकूणच फाडायला कठीण असतं.

नेहमी मी कढी उकळल्यावर थोडे बेसन लावतो . >>> अरे मग प्रॉब्लेम इथेच आहे की! ताक उकळून फाटल्यावर मग बेसन घालून काय फायदा Happy

नेहमी मी कढी उकळल्यावर थोडे बेसन लावतो>>>>

हाय रे कर्मा…

पिठ पेरुन करायच्या भाजीचा प्रोग्रम कढीवर चालवुन चालत नाही. Happy

इथलं दूध फाटता फाटत नाही त्यामुळे आपल्या टिप्स काही उपयोगाच्या नाहीत. आपणच ऑरगॅनिक आणून न फाडता करून दाखवावे लागेल. मी याकरिता उकळते पाणी घालून शिजवून घेते शेवया, कारण त्या दुधातील सगळे पाणी वरचेवर शोषून घेत कोरड्या होत जातात. उकळत्या पाण्यात आधी पूर्ण शिजवलेल्या असल्या की त्या असं पाण्यासाठी थोडं कमी हपापल्यासारखं करतात.

साधना Lol

मी मोस्टली दर आठवड्याला कढी करते, पीठ ताकाला आधीच लावते, ताकातली भाजी करतानाही सेम. पीठ कधी तांदुळाचंही लावते. बरेचदा बेसनच लावलं जातं. मला कढी जाडसर आवडत नाही म्हणून थोडंच लावते. लवंग, मिरपूड, ओवा हे extra घटकही घालते कढीत.

असे उकळत्या पाण्यात शिजवलेले पाहिल्याचे आठवतेय. दुधाची बचत करायला हा मार्ग अनुसरलाय असे समजुन मनोमन शिव्याही घातलेल्या आठवतेय Happy

साधना Lol
मी नंतर आटवलेले दूध ओतते, हे फक्त कोरडे होऊ नये यासाठी करते.

आता दुसरा फाटा फोडू का? ऑरगॅनिक आणि होमोजनाइज्ड ह्या म्युच्यअली एक्सक्लुझिव्ह टर्म्स आहेत. त्यात काही कोरिलेशन नाही. Proud

दुधं फाडा, फाटे फोडा! काय हिंसक जमाव आहे! Proud

कोरिलेशन नाही हे बरोबर. Happy
मी शोधाशोध केली आहे नॉनहोमोजनाइज्ड दुधासाठी. रेअर फाइंड आणि मिळालंच तर कुठल्यातरी दूरच्या दुकानातल्या हायेस्ट रूम ऑफ द टॉलेस्ट टॉवरमधला कॉस्टलिएस्ट आयटम असतो. Proud

म्हणजे एक्सपायरी जवळ आलेला असणार... Proud

पण होमोजिनाईज्ड मध्ये वाईट काय आहे? म्हणजे ते न केलेलं कशाला शोधलं? साय धरत नाही/ धरावी म्हणून का?

हो - ‘घरचं लोणी’ हवं वाटलं म्हणून.
आता केरी गोल्ड घरचंच आहे असं ठरवलंय. Proud

>>> म्हणजे एक्सपायरी जवळ आलेला असणार
म्हणजे फाडायला सोपं! Lol

अरे बेसन घालायच्या आधीच उकळी आणली तर बेसन घालायच्या आधीच ताक फुटायाला पाहिजे ना?
ते कसं फुटलं नाही यावर रिसर्च करायला पाहिजे आता.

शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी जे पाश्चराईजेशन आणि होमोजिनायझेशन केलेलं असतं त्यानं दूध वार्निश सारखं अन- फाटेबल होते. असं मला वरवरच्या माहिती वरून वाटतं पण गप्पा मारायला एवढी पुरते. आणि तुझ्या 'पोपटाच्या डाव्या डोळ्यात राक्षसाचे प्राण' टाईप अटी बघून गाय अंगणात बांधणं सोपं वाटतं आहे मला स्वाती. Proud

ते कसं फुटलं नाही यावर रिसर्च करायला पाहिजे आता.
>>> Lol मला असेल तर - मी नुसतं फोडणीचं पाणी उकळते आधी मग ताक+ बेसन घालते.

टाईम लाईन सबमिट करा केकू.
उकळी आलेल्या क्षणी ताक फुटत नसेल, ती उकळी जास्त काळ टिकली तर फुटत असेल. तो काळ बेसन किती वेगात पसरलं, त्यात गुठळ्या होत्या का? इमल्शन तयार हो़ण्याचा वेग पातेल्याची खोली/ भांड्याचा परीघ यावर अवलंबून असेल.
पुण्यात डेक्कनला एक गुज्जू अमलिमिटेड थाळी उपहारगृहात कढी छान मिळायची. पंचवटी गौरवची ही वाईट नसायची. ते किती लांब आहे केकू?

>>> गाय अंगणात बांधणं सोपं
मी पाहिली आहेत तीही स्वप्नं! Proud
त्या खटाटोपापेक्षा भारतवारीत काय ते लोणी खाऊन घ्यावं असं ठरवलं जाग आल्यावर. Proud

हे होमोनाईज्ड वगैरे काय मला माहित नाही. गेली पाच वर्षे गाई/म्हशीच्या आचळातुन विना प्रोसेस थेट किटलीतुन घरात असेच दुध वापरलेले आहे. गायीचे दुध असेल तर न तापवता दिवसभर राहिले तरी फाटत नाही पण म्हशीचे दुध असे राहिले तर फाटते हा अनुभव. हे असे का हे नेटवर शोधले तेव्हा म्हशीचे दुध अ‍ॅसिडिक असते म्हणुन जास्त वेळ न तापवता राहिले तर फाटते. गायीचे दुध अ‍ॅसिडिक नसते त्यामुळे तितके लवकर फाटणार नाही असे स्पष्टीकरण आढळले.

आपल्याला फाडायचं आहे, जोडायचं नाही. >>> Lol

इथं अख्ख्या जगाला जोडायची गरज असताना तुम्ही कुठं अजून फाडताय? गपा की जरा...

आणखी वाहावायच्या आत आवरा! Proud

केकु बहुधा कढी करताना टॉडलर मोड मधे जातायत..कढी पातळ हवी,खळाखळा उकळायला हवी, बेसन मी नतर लावणार पण तिने फुटता कामा नये.

बाई, मलई बर्फीच्या वेळी गाय बांधायची स्वप्नं बघितली होती का?
Proud Light 1
(घ्या अजून एक (ऐतिहासिक) फाटा)

आता माझ्याकडून कधीच कढी फुटली नाही तर माकाचु विचारायची वेळ आलीये या सगळ्या पोस्टी वाचून Lol

Pages