Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44
लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जवस अळशी धागा वेमांनी हे पान
जवस अळशी धागा वेमांनी हे पान पहायची परवानगी नाहीत टाकला आहे. कायनात चाहती है चर्चा हो. तुम्ही लगेच पाणी फेरू नका.
मेधा मला तिच चर्चा आठवली होती
मेधा मला तिच चर्चा आठवली होती. आता त्यात पाणी टाकलेच तर मग काय बुळबुळीत चर्चेचा बोळा तयार होईल तो बघायला नकोच..
अळशी भाजावी की नाही यावरही एक
अळशी भाजावी की नाही यावरही एक चर्चा झालेली आठवते. भाजली तर टॉक्सिक होते असं एका ग्रूपचं म्हणणं होतं असं आठवतंय.
मी भाजणार्या ग्रूपमध्ये.
मलासुद्धा ती चर्चा आठवतेय
मलासुद्धा ती चर्चा आठवतेय स्वाती . मी एकदा दोनदा जराशीच भाजून चटणी केली होती. पण फारशी आवडली नाही कोणालाच.
अमितव - https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes या गृपमध्ये सामील व्हायला लागेल
जवस आणि आळशी एकच..
जवस आणि आळशी एकच..
सिंडरेला
सिंडरेला
अळशी-जवस आणि फरसबी-श्रावण घेवडा या कालातीत चर्चा आहेत माबोवरच्या.
मेधा, मी पा आणि आ मध्ये आहे
मेधा, मी पा आणि आ मध्ये आहे तरीही तो बाफ उघडत नाही.
मागे कागलला लोकल खुरासणी
मागे कागलला लोकल खुरासणी उर्फ कारळे मिळाले. ते चांगले भाजुन चटणी केली ती खुप कडू झाली. टाकुन द्यावी लागली. मग कोणी म्हणाले चाण्गले भाजायचे नाही तर भाकरी केलेल्या गरम तव्यावर टाकुन गॅस बंद करायचा आणि तेवढ्याच उष्णतेवर जितके भाजतील तितके भाजायचे. वाया गेलेल्या लसुण व इतर जिन्नसांचे दु:ख इतके जबरी होते की परत त्याची अनुभुती घ्यायची हिम्मत केली नाही. अजुनही फ्रिजमध्ये
ते कारळे पडलेत.
गवार, घेवडा असल्या भाज्या
गवार, घेवडा असल्या भाज्या त्याचा कुट घालून मस्त लागतात.>>>>>>कुड्याची फुले, शेंगांची भाजी पण तिळकुटात छान लागते
जवस उर्फ आळशी लसणीच्या तिखटात
जवस उर्फ आळशी लसणीच्या तिखटात थोडी भाजून घालते, किंवा भाजलेली मिळते आमच्याकडे ती घालते कधीतरी, नेहेमी नाही. चिरंजीव लसणीचं तिखट खातात, त्याच्या पोटात आळशी जावी म्हणून कधी मधी करते.
बरेचदा आम्ही मीठ लावून भाजलेलीच आळशी घेऊन येतो, ती अशीच खातो. महाग असली तरी सोय बघते मी, घरी भाजायला घेतली तर तडातडा उडत रहाते.
<<<अळशी भाजावी की नाही यावरही
<<<अळशी भाजावी की नाही यावरही एक चर्चा झालेली आठवते. भाजली तर टॉक्सिक होते असं एका ग्रूपचं म्हणणं होतं असं आठवतंय.>>>
टॉक्सिक म्हणण्यापेक्षा निकामी होते असे म्हणणे योग्य राहील. जवस तेलामध्ये असलेले ओमेगा ३ प्रकारचे मेदाम्ल alpha linolenic acid (ALA) हे रासायनिक दृष्ट्या अस्थिर असते (तुलनेत) विशेषत: उच्च तापमानाला. त्यामुळे जवस भाजुन चटणी केली तर त्यातुन ओमेगा ३ मिळणार नाही. आता त्या ऐवजी जे oxidized product तयार होइल ते toxic असेल की नाही ह्याची कल्पना नाही.
ओहह, मग भाजलेली घेतो त्याचा
ओहह, मग भाजलेली घेतो त्याचा काहीच उपयोग नाही.
साधना, ती चटणी मदतनीस ताई द्यायच्या ती छान लागायची पण एकंदरीत न भाजलेली आळशी किंवा कारळे घालून केलेलं लसणीचं तिखट मला फारसे आवडत नाही. आपलं नेहेमीचे बरे किंवा आई कांदा घालून करायची तेही आवडायचं, मी करत नाही.
ज्वारीची भाकरी, कारळ्याची
ज्वारीची भाकरी, कारळ्याची चटणी त्यावर शेंगदाणा तेल आणि फोडलेला कांदा हे आवडते खाद्य त्यामुळे कारळे बरेच दिवस शोधत होतो. एकदा एका दुकानात कारळे दिसले तेव्हा आनंद झाला परंतु त्यात काही इतर बिया, पदार्थ दिसत होते तेव्हा दुकानदाराला विचारले. तो म्हणाला this is bird feed, not for human consumption मग ठेवून दिले.
>>>>>>>>> this is bird feed,
>>>>>>>>> this is bird feed, not for human consumption मग ठेवून दिले.
हाहाहा
त्यावरुन आठवलं आमच्या भागात एक २००-३०० चिमण्या दिसतात आणि त्यांना दाणापाणीही कोणी कोणी घालतं. काल मी ब्रेडच्या कडा कापल्या होत्या त्या चिऊंना टाकून आले. जर माझं घर असतं, बॅकयार्ड किंवा फ्रंटयार्ड असतं तर एक बर्ड फीडर १००% लावला असता.
अमुलचा खवा आणून गुलाबजाम
अमुलचा खवा आणून गुलाबजाम करायला घेतले पण ते तुपात हसत आहेत. साधारण १०० ग्राम खव्याला २ टीस्पून मैदा आणि १ टेबलस्पून बारीक रवा घालून पाहिले. तरीही उपयोग नाही. नेमका किती रवा घ्यावा?
इथे खूप साऱ्या ओरिजिनल पाकृ आहेत गुलाबजामच्या. पण मला घातलेला घोळ फिक्स करायचा आहे.
कढईत तळायच्या ऐवजी आप्पे
कढईत तळायच्या ऐवजी आप्पे पात्राच्या इंडिव्हिज्युअल वाटीत तेल घालून ते हलवून तळले तर?
त्याने सगळं तेल ते बारीक तुकडे मय होते आणि ते काढून टाकता न आल्याने खूप वेळ ते बारीक तुकडे तरंगर रहातात आणि जळतात इ.इ. टाळता येईल. + मैदा/ रवा प्रमाण ट्राउ अॅंड एरर करायचं असेल तर सँपल साईझ कमी झाल्याने जास्त प्रयोग कमी त्रासात करता येतील.
मला वाटत. चमच्याने गोल फिरवत राहिलं तर तळले ही चांगले जातील. कधी केलेलं नाही पण प्रयोग करायला सोपं आणि कमी त्रासाचं वाटलं.
मैदा अजून चमचा भर घालून
मैदा अजून चमचा भर घालून चांगले मारून तिंबून काढ. गोळा करताना गुळगुळीत दिसावेत, तडे नकोत. हसू बंद! रव्याने टेक्शर बिघडेल. तळटीप - मी स्वतः चितळेच्या रेडिमिक्सचे करते आणि तुला टिप्स देतेय. ममोंची किंवा अजून कुण्या एक्स्पर्टची वाट बघू, तोवर हसू दे त्यांना किंवा आकाचा पिक्चर दाखव.
गुळगुळीत दिसावेत म्हटल्यावर
गुळगुळीत दिसावेत म्हटल्यावर मला अब्राह्मण्यम आयड्या आली. एग वॉश दिला तर?
मग त्या गुलाबांना ऑमलेटच्या
मग त्या गुलाबांना ऑमलेटच्या पाकळ्या फुलून ऑमलेटजाम होईल. इथे सुधारण्याच्या टिप्स देणं "अध्याहृत" आहे.
डोनट आहे ना त्याला.
अस्मिता मी पण आता वेळेला
अस्मिता मी पण आता वेळेला चितळेबंधूंना आपलंसं केलं पण आहे तो घोळ फ्रीजमधे ठेवलाय. उद्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त परत करेन.
अप्पेपात्राची आयड्या बेस्ट वाटते आहे.
गुजांना एग वॉश? मला श्रावणी शुक्रवारच्या नैवेद्याला करायचे होते, घरात दंगल घडवायची नाहीये.
(No subject)
गुजा ना एग वॉश, आणि घरात दंगल
गुजा ना एग वॉश, आणि घरात दंगल...
माझा ह्याला पास , काही सांगू शकत नाही. कारण अनेको वर्षापूर्वी ( अंदाजे पंचवीस वर्षे तरी झाली असतील)ठाण्याच्या खंडेलवाल कडचा खवा खाल्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते , तेव्हापासून मी विकतचा खवा आणणं स्टॉप केलं आहे. त्यामुळे गुजा ही नेहमीच चितळे प्री मिक्सचेच.
१०० ग्रॅ. खव्याला २ टेबलस्पून
१०० ग्रॅ. खव्याला २ टेबलस्पून तरी लागेल मैदा. तू टीस्पून च्या प्रमाणात घेतला असशील तर कमी पडला. मी मोस्टली आधी एक बारकासा गोळा तळून बघते, म्हणजे लागल्यास अॅडजस्ट करता येतो मैदा.
असे गुजा हसायला लागले तर सरळ
असे गुजा हसायला लागले तर सरळ त्यात premix add करायचं, जेवढ्यास तेवढं, चव पण सुरेख आणि premix ची चव न येता, खव्याच्या गुजा ची चव येते.
सर्वांचे आभार. परत गुजा
सर्वांचे आभार. परत गुजा बनवायचा कंटाळा आला म्हणून त्या पिठात मी अंदाजे अजून २ टीस्पून मैदा, २ टीस्पून दही, २ टीस्पून साखर, साधारण केक बॅटरची कन्सिस्टन्सी येईल एवढे दूध, ३ चिमुट बेकींग पावडर, ३ चिमुट बेकींग सोडा घालून गुजा केक केला. केक गरम असताना त्याला टूथपिकने भोकं पाडून आधीच्या गुजाचा उरलेला पाक ओतला.
प्रकार साधारण मॉईस्ट मावा केकसारखा लागतो आहे. नॉट बॅड.
तात्पर्यः गुजा होत नसतील तर केक खा.
(No subject)
गुजा होत नसतील तर केक खा.>>
गुजा होत नसतील तर केक खा.>>
बघ! यात एग वॉश चाललंच असतं की नाही!
इनोव्हेटिव्ह. सुरेख दिसतोय.
इनोव्हेटिव्ह. सुरेख दिसतोय.
एग वॉश चाललंच असतं की नाही >>
एग वॉश चाललंच असतं की नाही >> हो हो…
श्रावणीशुक्रवारच्या
श्रावणीशुक्रवारच्या नैवेद्याला केक दाखवला का? दिवे घ्या .. मजा करते
छानच लागत असणार हा मावा केक
Pages