अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शांती करणे हे मन:शांती साठी आवश्यक. दडपण कमी होते व्रत, वैकल्ये, उपासना, शांती वगैरे गोष्टी केल्या तर. बाकी होनी को कौन टाल सकता है भला.

ते तर आहेच. त्या नातेवाईकांनंतर पहिला म्रूत्यु एका चाळीस वर्षाच्या माणसाचा एकदा पुर्‍ण बरा झालेला कॅन्सर परत येउन ट्रीटमेंट चालु असताना हार्ट अ‍ॅटॅक झाला. त्याच्या वर्ष श्राद्धाच्या दोन दिवस आधी, त्या नातेवाईकांच्या चौदा वर्शाच्या नातवाचा म्रूत्यु झाला, पण तो मुलगा आधीच बरेच आजारी होता. त्यानंतर दहाच महिन्यात मात्र एका उमद्या माणसाने सगळे सुखासुखी चाललेले असताना फक्त तात्पुरत्या आजारातुन खुप त्रास होत असल्याने आत्महत्या केली. हे खुप धक्कादायक होते.

पेरु जी मला हा प्रकार प्रखर पितृदोषाचा दिसतो. मागील पिढीतील कुणी एखाद्याचं धन, मालमत्ता अनीतीने बळकावलं असेल तर तो दोषही कारणीभूत होतो. चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्रिपिंडी, नागबली, उदक शांती सारखे उपाय करायला हवेत, सोबत अन्नदानही करावं.

आजच हरीद्रा गणपतीबद्दल वाचत होते. हरीद्रा म्हणजे हळद. हळदीचा गणपती. या गणपतीचा व बगलामुखी मातेचा काहीतरी संबंध आहे, असे वाचनात आले. पैकी बगलामुखी देवीची उपासना वाम तसेच दक्षीण मार्गाने दोहोने होते म्हणे. वाम मार्गात स्तंभन, मारण, उच्चाटन वगैरे प्रयोग करताना या देवीची उपासना करतात. देवीचे रुपच भयंकर आहे. शत्रूची जीव्हा ओढुन , छेदत असताना , पीतवस्त्र नेसलेली/ल्यालेली ही देवी असते.

फोटो - विकीवरुन

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/70/Bagalamukhi_Matrika.jpg/800px-Bagalamukhi_Matrika.jpg

ठगांविषयी माहिती वाचनात आली. पूर्वी आकाशवाणी वर ठगाची जबानी हे पुस्तक वाचन ऐकलं होतंच. ठग हे मुसलमान असूनही भवानी देवीला भजत असत. ठगीची कला हिंदूंकडून शिकल्यामुळे भवानीची उपासनाही त्यांनी स्विकारली होती. बळी घेतलेल्या सावजाचा मृतदेह भवानी घेऊन जात असे, पण एकानं शंका घेऊन तो मृतदेहाजवळच थांबला तेव्हापासून मृतदेह गायब होणं बंद झाले. नंतर ठगांनाच पुरावा मागे न ठेवता मृतदेहांची विल्हेवाट लावावी लागत होती.

सांगितले तर ऐकणारही नाहीत. .....Submitted by पेरु +१२३
उगीच काही उपाय करत अंधश्रद्धा पसरवण्यापेक्षा हेच बरे. मृत्यु अकस्मात असो की नैसर्गिक, जो ज्या वेळी यायचा तेव्हाच येणार. शांती वगैरे कर्मकांड म्हणजे निव्वळ आत्मिक समाधान आणि खिश्यास अनाठाई भुर्दंड.

तेही आहेच अनंतनी. अजुन काही होउ नये तिथे म्हनुन प्रार्थना करत राहणार. आणखी काय करु शकतो या काळात म्हणा.

ही माझ्यासोबत घडलेली सत्यघटना आहे. जशीच्या तशी सांगत आहे. खात्री आहे तुमचा विश्वास बसेल.

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही.
माझी तेव्हा फिरती खूप असे. एकदा कामानिमित्त मी मुंबईला गेलो होतो, हॉटेल मध्ये उतरलो होतो. मुंबईत काम वाढल्याने शुक्रवार उजाडला होता. शुक्रवारी मुंबईतील काम संपायला संध्याकाळी उशी्र होणार होता. बडोदा आणि वापीला दोन कामे होती. ती दोन्ही एकाच दिवशी म्हणजे शनिवारी आटोपून, शनिवारी रात्री उशिराची ट्रेन पकडून मुंबईला येउन सकाळच्या विमानाने हैद्राबादला परतण्याचा माझा विचार होता. गेले कित्येक रविवार कामातच गेले होते आणि या रविवारी तरी सुट्टी मिळायला हवी होती.

वापी आणि बडोद्याची कामे वेळेवर आल्याने मला शुक्रवारीच तिकीट बूक करावे लागले. ट्रेन आणि विमान दोन्हीची मला प्रतीक्षा यादीतील तिकीटे मिळाली. रात्री ११ वाजता बोरिवली वरुन ट्रेन होती आणि वेळेवर तिकिट मिळेल या अपेक्षेने मी बोरीवली स्टेशनवर हजर होतो. पण गर्दी खूप होती, गाडी पूर्ण भरली होती, मला गाडीत जागा मिळाली नाही. माझे तिकीट रद्द करुन मी सांताक्रूझ विमानतळाकडे कूच केले आणि विमानतळावरील गोल्डन चॅरियट या रेस्टॉरंटमध्ये ते बंद होई पर्यंत एक बिअर सावकाश पीत मुक्काम ठोकला. सकाळी ०४:५० चे विमान होते. साधारण दोनच्या नंतर जेट एरवेजच्या काउंटरवर जाउन सीट मिळण्याच्य़ा शक्यतेची चौकशी केली. तेव्हा जेट एअरवेज आणि इंडियन एअरलाइन्स या दोनच कंपन्या बडोद्याला उड्डाण करत होत्या. माझी जेट एअरवेजची सिल्व्हर मेंबरशिप होती पण सीट मिळण्याच्या शक्यतेबद्दल ते काहीच सांगू शकत नव्हते एवढी गर्दी होती. बडोद्याची विमाने नेहमी पूर्ण भरली असत. विमान सुटण्याच्या अर्धातास आधी कुणी प्रवासी आले नाहीत तर प्रतीक्षा यादीतील लोकांना घेणार होते. सिल्व्हर मेंबरशीप मुळे मला प्राधान्य मिळणार होते.
जर विमानात जागा मिळाली नाही तर टॅक्सी करुन वापीला जायचे मी ठरवले. निदान वापीचे काम शनिवारी पूर्ण होइल, ते शनिवारी संपवण्याचा त्या कंपनीचा आग्रह होता.

मी विमानतळावर जाउन एका खुर्चीत बसलो. लगेच झोप लागली.

एका उद्घोषणे मुळे मला जाग आली. रात्रीचे तीन वाजले होते. नीट ऐकल्यावर लक्षात आले की जेट एअरवेजचे बडोद्याचे विमान रद्द झाले होते. म्हणजे आता माझी दोन्ही कामे शनिवारी उरकणार नव्हती. मी वेळ न दवडता बाहेर येउन वापीसाठी टॅक्सी ठरवली आणि लगेच निघालो. टॅक्सीतही मला लगेच झोप लागली. जाग आली ती हालचाल थांबल्याने. वसई मागे पडले होते आणि पुढे आजुबाजुला झाडी होती. टॅक्सीचे एक चाक पंक्चर झाले होते म्हणुन टॅक्सी थांबली होती. चाक बदलायला पंधरा मिनीटे लागणार होते.

मी उतरुन आळोखे पिळोखे दिले तेव्हा लक्षात आले की मला झाडीत जाणे भाग आहे, बिअरचा परिणाम. चारचा सुमार होता. सर्वत्र अंधार होता. रस्त्यावर वाहने येत जात होती. रस्ता वळणाचा होता. एका बाजुला नाला होता तिकडे जाणे शक्य नव्हते. दुसर्‍या बाजुला जाणे शक्य होते पण वळणामुळे वाहनांचा उजेड झाडांवर येत होता. त्यामुळे झाडीत जरा आतच जावे लागले.

परतताना मी मागे वळलो तेव्हा मला मागून बोलण्याचा आवाज आल्यासारखे वाटले. मी थबकलो आणि कानोसा घेतला. थोड्यावेळाने मला काही शब्द ऐकु आले. शेवटला शब्द कॉफी होता बहुतेक.
आतमध्ये नक्की कुणीतरी होते एकापेक्षा जास्त. मी आवाजाच्या दिशेने पुढे जाउन पहायचे ठरवले.
थोडेच पुढे गेल्यावर एक पुसट पायवाट दिसली आवाजाच्या दिशेने जाणारी. मी त्या पायवाटेने पुढे निघालो आणि तेवढ्यात मला लांब विजेरीचा उजेड दिसला. तो दोन तीन सेकंदात दिसेनासा झाला. आणि मग मला आवाज ऐकु आला एका मुलाचा “मम्मी मुझे सॅंडवीच चाहिए”, तो मोठ्याने ओरडला होता. तिथे आत कुठेतरी रेस्टॉरंट होते! एवढ्या झाडीत रेस्टॉरंट? कसे शक्य आहे? की पुढे जाउन दुसरा कुठला रस्ता होता आणि त्याच्या कडेला हे रेस्टॉरंट होते?

मला परत एकदा थोड्या दूरवर उजेड दिसला विजेरीचा आणि त्या उजेडात एका हातात धरलेला ट्रे आणि त्यात ते कप होते.... बहुतेक. आणि मग एका महिलेचा आवाज - “आप चाय लोगे या कॉफी?”.
नक्कीच तिथे रेस्टॉरंट होते! पुढे दुसरा रस्ता असावा आणि हे एखादे मोक्याचे रेस्टॉरंट असावे, एखादी बस थांबली असावी, त्यातिल उतारु तिथे गेले असावेत.

मला जरा भूक लागली होती. पंक्चर निघे पर्यंत एखादे सॅंडविच आणि चहा घेता येइल या विचाराने मी पुढे निघालो. पण पुढे ती पुसट पायवाट नाहीशी होत होती. मी आवाजाच्या दिशेने चंद्रप्रकाशात वाट शोधत निघालो. तेवढ्यात चंद्र ढगा आड गेला आणि चांगलाच अंधार झाला. पण ते आवाज आता जवळ वाटत होते. काही लोकांचे बोलण्याचे अस्पष्ट आवाज आणि अधुन मधून उजेड. तो पर्यंत मला कसल्याही धोक्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

चंद्र ढगाच्या बाहेर आला आणि तेवढ्यात माझ्या समोरील झाडी आणि जमीन चक्क तिरपी झाली. माझा तोल गेला. मी कसे बसे स्वत:ला सावरले. मला चक्कर येत होती की जमीन खरंच हलत होती? माझा तोल नीट सावरत नाही तोच परत एकदा झाडी तिरपी झाली. मी एका झाडाला धरुन आधार घेतला. तेवढ्यात झाडे हळुहळु सरळ झाली आणि अचानकच विरुद्ध बाजुने तिरपी झाली. मी कसाबसा पडता पडता वाचलो. मला चक्कर येत नव्हती, तर खरंच जमिनी सकट झाडे हलत होती!

हा कसला प्रकार होता? ही कुठल्या प्रकारची भुताटकी होती? काही कळेना. मी खूप घाबरलो.
मी परत फिरलो. तोल जात असल्याने नीट धावता येत नव्हते. मला आता लौेकरात लौकर परतायचे होते. पण जमीन कधी इकडे तर कधी तिकडे तिरपी होत असल्याने माझा तोल जात होता. तशाही परिस्थितीत त्या रेस्टॉरंट मधून थोडे थोडे आवाज येत होते आणि माझ्या लक्षात आले की आपण निम्मे अंतर परत आलोय तरी ते आवाज मात्र तेवढ्याच जवळून येत आहेत!

म्हणजे मी धडपडत जमेल तसे धावलो तरी आहे त्या जागीच आहे काय? हा चकवा तर नव्हे? रानात वनात चकवा लागतो ऐकले होते. त्याची मी टर उडवली होती. भुताटकीची टर उडवली होती. आणि आज ते चक्क माझ्यासोबत प्रत्यक्षात घडत होते. त्यातही इतका भयंकर चकवा की जमीन झाडे वाकडी तिकडी हलत होती!
बहुतेक मी केलेल्या चेष्टेमुळे मला मोठीच अद्दल घडत होती.

“अरे देवा वाचव आता!” मी माझ्या नकळत मोठ्याने बोलून गेलो, आणि राम राम म्हणु लागलो. मागून लोक हसण्याचा आवाज आला. ते लोक, की भूते की अजुन कुठले पिशाच्च म्हणावे त्यांना, मला हसत होते. मी माझे तोंंड बंद केले आणि यातून सुटका झाली तर होई्पर्यंत बंदच ठेवण्याचे ठरवले. जीवाच्या आकांताने मी परतीचा मार्ग कापू लागलो. आणि ते आवाजही माझ्या मागून येउ लागले.

तेवढ्यात मी अचानक खाली पडतोय असे वाटू लागले. मला किंचाळावेसे वाटले पण मी तोंड बंदच ठेवले. माझ्या सोबत आजूबाजूची झाडीही खाली येत होती, खालच्या जमीनीसकट! मी मटकन खाली बसलो. आणि मग धाडकन आदळल्या प्रमाणे मी झाडी आणि जमिनी सकट हादरलो. हा भयानकच प्रकार होता. माझी आता बोबडी वळायची बाकी होती तोच अचानक जमीन थरथरु लागली आणि भयानकच प्रचंड हादरे बसू लागले.

त्यातच चक्क आकाशवाणी सुरु झाली! माझी आता पुरती बोबडी वळली. नक्की कसली आकाशवाणी होत होती नीट ऐकु येत नव्हते.
जमीनीला एवढे प्रंचंड हादरे बसत होते की वाटत होती आता सगळी झाडे कोसळणार, जमीन दुभंगणार. तिथे एखादी झोपडी जरी असती तरी पूर्ण भुईसपाट झाली असती.

मी भूकंप अनुभवला होता पण हा तर महाभूकंपापेक्षा महाभूकंप होता. मी डोळे गच्च मिटले.
आता आकाशवाणी बंद झाली होती. मागचे आवाजही बंद झाले होते. पण जमीन हादरत होती, वाकडी तिकडी होत होती. आसमंतात फ्क्त जमीन हादरण्याचा आवाज घुमत होता. हा जीवघेणा भूकंप कितीतरी वेळ सुरुच होता. दोन मिनिट, दहा मिनिट? मला सांगणे शक्य नव्हते.

मग अचानक एक प्रचंड मोठ्ठा झटका बसला. आता सगळं कोसळणार, जमीन फाटणार असं मला वाटलं.
पण अचानक जादू झाल्याप्रमाणे थरथराट कमी होत गेला. थोड्याच वेळात पूर्ण थांबला. सगळीकडे शांतता पसरली. पण माझी अजून डोळे उघडायची हिंमत होत नव्हती. मी तसाच बसून राहीलो.

असाच काहीवेळ गेला आणि अचानक आजुबाजुला उजेड पडला असे वाटले. त्याने मी अजूनच घाबरलो आणि डोळे गच्च मिटून घेतले.
आता आजुबाजुने परत आवाज ऐकु येउ लागले. मी डोळे बंद करुनच उठण्याचा प्रयत्न केला. पण कोणीतरी मला कमरेला धरुन ओढत होते आणि मला उठता येत नव्हते. मागुन हसण्याचा आवाज आला. मी घाबरुन ’ए सोड मला, सोड मला’ असे ओरडून उठण्याचा प्रयत्न करु लागलो आणि हसणारे आवाज वाढले.

तेवढ्यात माझ्या अगदी जवळून एका महिलेचा आवाज आला "मे आय हेल्प यू सर?”.
मी म्हणालो "आय कान्ट गेट अप, समवन इज होल्डींग मी बाय माय वेस्ट!”
“सर, इट्स युअर सीट बेल्ट, प्लीज अनफासन इट.”... मी आता डोळे उघडे.
आपले हसू दाबत हवाई सुंदरीने विचारले "आर यू ऑलराईट सर?”.
“यस! आय जस्ट हॅड अ विअर्ड ड्रीम!" असे हसून म्हणत मी माझा सिट बेल्ट काढला.

मला बडोद्याचे विमान मिळाले होते, आणि त्यात हे भलते स्वप्न रंगले होते.
मी आळोखे पिळोखे देत उठलो, माझे बॅगेज घेतले आणि विमाना बाहेर पडण्यास चालू लागलो.

>>> पण आता बस्स. मी दमलोय. पैलतीर कधी दिसतोय याची आतुरतेने वाट पाहतोय.
हे काय बोकलत? कर्मा पासुन सुटका नाही. तुमचा जन्मच लिहिन्यासाठी झालाय. लिहीत राहा.

मागुन हसण्याचा आवाज आला. मी घाबरुन ’ए सोड मला, सोड मला’ असे ओरडून उठण्याचा प्रयत्न करु लागलो आणि हसणारे आवाज वाढले. >> तुमचे स्वप्न सुरु होते तेव्हा तुम्ही करत असलेल्या हालचाली, हावभाव पाहून सुंदरी आणि सहप्रवाशांची बरीच करमणूक झाली असेल. तुम्हाला ऐकू येत असलेले हसण्याचे आवाज त्यांचेच असतील.

विशिष्ट द्रव प्यायल्यावरसुध्दा मानव तरंगायला लागतो आणि अमानवीय हावभाव करतो व अमानवीय भाषेत बोलतो. पृथ्वीकरांनी सुध्दा ते द्रव प्राशन केले म्हणून हा थोर अमानवी अनुभव त्यांना आला.

खरं सांगायचं झालं तर मी आता दमलोय. घोस्ट हंटिंग करून कंटाळा आलाय. शरीर आणि मन थकल्यासारखे वाटत आहे. असं वाटतंय आपल्याला जे आयुष्यात पाहिजे होतं ते सगळं मिळालंय. माझ्या आयुष्यात फार मोठ्या अपेक्षा न्हवत्या. गाडी बांगला नोकर चाकर ही भौतिक सुखं मला कधीच नको हवी होती. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद सुखावून जात होता, पण आता बस्स. मी दमलोय. पैलतीर कधी दिसतोय याची आतुरतेने वाट पाहतोय. #Broken

Submitted by बोकलत on 9 August, 2020 - 09:21
>>>>>
बोकलत धीर धरा.. भूत येतील "बोकलत इथेच राहतात का.?" विचारत..

काय जमाना आलाय. जेव्हा बोकलत दोन्ही हातात पेन घेऊन एका वेळी दोन दोन स्टो-या लिहित होते तेव्हा जनता त्यांना 'जा बोकलत जा' म्हणत होती आणि ते
ऐकत नव्हते. आता लिखाण बंद केलं तर सगळे बोलावताहेत आणि बोकलतजी रुसुन
बसलेत.

हो हो बरोबर. प्रार्थना तो बनती है।
आज रात्री १२वाजता पिंपळाला फेऱ्या मारत गाऱ्हाणे घालू ―

हे १२ गावच्या १२ वेशीच्या १२ बावडीच्या १२ नाक्याच्या १२ गल्लीच्या १२ शहराच्या १२ बाफच्या १२ ग्रुपच्या आणि १२ ब्लॉगच्या देवा महाराजा....
कोणी काय बोकलतावर काय वाकडा निकडा केला असात तर तो बाहेरच्या बाहेर निघान जाऊ देत
त्याचा पासवर्ड हॅक होऊ देत आयडी उडु देत रे महाराजा ....
हे देवा महाराजा आज बोकलाताने जो काय मायबोलीवर दोन टायमाचा विरंगुला लोकाक दिला असा त्येका असाच कायम ठेव रे महाराजा...
..... ह्या बघा देवाक मी २ शेंडीचा नारळ देवून सगळ्यांच्या वतीने गाराणा घातलाय. चला सगल्यानी पिंपलास पाया पडा आता.

Pages