अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एक ऐकीव किस्सा, कालावधी साधारणत: १९७० च्या दरम्यानचा :-
२०-२५ वर्षाचे आपले कथानायक नुकतेच शिक्षक म्हणुन एका दुर्गम भागात रुजु झाले होते. दिवसभर शाळेत शिकवायचे आणि संध्याकाळी ग्रामस्थांबरोबर निवांत गप्पा मारत बसायचे हा दिनक्रम. गप्पांमध्ये भुतेखेते, जादुटोणा हे विषय नेहमीचेच. चार बुकं शिकलेले शिक्षक ग्रामस्थांच्या किश्यांना हसण्यावारी न्यायचे. शाळेला सुट्या लागल्या की आपल्या मुळ गावी जायचे आणि सुट्या संपल्यावर नोकरीच्या ठिकाणी परतायचे हे त्यांचे ठरलेले असायचे. त्या काळी आजच्या सारखी प्रवासाची साधने नसल्याने तालुक्याच्या गावापर्यंत एसटीने प्रवास आणि नंतर पुढे सात-आठ मैलांची पायपीट. नशीब चांगलं असेल तर कोणाची बैलगाडी मिळायची किंवा एखादा सहप्रवासी भेटायचा. त्यामुळे घरुन लवकर निघुन दिवसाउजेडी बदलीच्या ठिकाणी पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. एकदा काही कारणास्तव त्यांना निघायला उशीर झाला आणि तालुक्याच्या गावाला पोहचेपर्यंत रात्र झाली. त्यांना प्रश्न पडला की आता बस स्टँडवरच मुक्काम करावा की चालत जावे. पण सकाळी शाळा असल्याने त्यांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. थोडाफार चंद्रप्रकाश होताच सोबतीला. सुनसान रस्त्यावर झपझप पावले टाकत ते रस्ता तुडवत निघाले. निम्म्याहुन अधिक रस्ता पार झाला होता. आता थोडेच अंतर उरले आहे असा मनोमन विचार करत असतानाच अचानक त्यांना रस्त्याच्या कडेला एक म्हातारी चंद्राच्या प्रकाशात धान्य वाळवत बसलेली दिसली. गंमत म्हणजे एक शेळी एका बाजुने धान्य खात होती. पण म्हातारीचे लक्षच नव्हते. जवळ गेल्यावर त्यांनी आजीबाईला हाक मारली आणि इतक्या रात्री इथे काय करते म्हणुन विचारले आणि शेळी धान्य खात असल्याचे सांगितले. तेव्हा आजीने एक खडा शेळीच्या दिशेने भिरकावला, खडा लागताच शेळी मरुन पडली. ते पाहुन हा काहीतरी भलताच प्रकार दिसतो हे लक्षात आल्यावर त्यांनी तिथुन काढता पाय घेतला. चार पावले पुढे केल्यावर मागे वळुन पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. हे पाहताच त्यांना थंडीतही घाम फुटला आणि भीतीने थरथरत गावाच्या दिशेने धाव ठोकली. कसेबसे ओरडतच गावात पोहचले. त्यांचा आवाज ऐकुन काही गावकरी बाहेर आले. त्यांनी शिक्षकांना धीर दिला. पण घडल्या प्रकाराने ते चार दिवस तापाने फणफणले. त्यानंतर कधीही रात्री त्या रस्त्याने जायची हिंमत त्यांनी केली नाही.

बापरे ! भयानक..
बऱ्याच दिवसांनी धाग्यावर चांगला किस्सा वाचायला मिळाला.

कोणी चिंचेच्या झाडावरच्या मुनमाकडाचा अनुभव घेतला आहे का ? मी नाही घेतलाय.. पण लहानपणी आमचा एक कोकणस्थ शेजार ह्या मुनमाकडाच्या नावाने घाबरवायचा.. आय ॲम शुअर इथे नक्कीच कोणी तरी धुरंधर असेल ज्याला मुनमाकड माहिती असावं

चंद्रावरचे माकड ->> Lol पृथ्विवरची भुतं संपली असतील तर आता चंद्रावर जायला हरकत नाही .. पण खरच मुनमाकड असा काही प्रकार असतो का?

बायंगी बद्दल माहित नाही, पण मी बॉय नावाचं भूत आणलं होतं एकदा घरी. काटकुळे हात पाय आणि मोठे डोळे. आमच्या आईने त्याला पण बॉयबाळा म्हणून बिघडवून टाकला. मला वाटलं कॉम्पिटिशन आली आपल्याला.. पण गेलं ते नंतर..

मूनमाकड म्हणजे ते भूत का जे दुपारी बाहेर पडलेल्या लोकांना झाडावर कैद करतं. ही भुतं शक्यतो आंबा चिंचेच्या झाडावरच राहतात. एकटा माणूस या झाडांखाली आला की त्याला झाडांवर भरपूर फळं लटकलेली दिसतात. फळं काढण्यासाठी माणूस वर चढला की हे भूत त्याला कैद करतं. तीन चार दिवस माणूस झाडावरच उपाशी राहतो. या दिवसात जर कोणी माणूस या झाडाजवळ आला तर त्याला झाडावर बसलेला माणूस दिसत नाही व त्याचा आवाजही ऐकू येत नाही, पण झाडावरच्या माणसाला झाडाजवळ आलेला माणूस दिसतो. नन्तर त्या माणसाला काही दुखापत न करता सोडून देतो.

पण मी बॉय नावाचं भूत आणलं होतं एकदा घरी. काटकुळे हात पाय आणि मोठे डोळे. आमच्या आईने त्याला पण बॉयबाळा म्हणून बिघडवून टाकला. मला वाटलं कॉम्पिटिशन आली आपल्याला.. पण गेलं ते नंतर.. >>>>>>> तुला घाबरुन गेल ते. तु काय भुतापेक्षा कमी आहेस का? बादवे, तु इथे या धाग्यावर कसा काय?

ही गोष्ट काही वर्षांपूर्वी मित्राच्या गावी घडली होती. मित्राचं गाव हायवे पासून खूप आतमध्ये होतं. मित्राच्या गावात एकाच लग्न होतं. ज्याचं लग्न होतं तो मुंबईत जॉब करत होता त्यामुळे मुंबईवरून त्याचे मित्र येणार होते. गावात जायला कच्चा रस्ता होता परंतु ते अंतर खूप होतं. अजून एक शॉर्टकट होता तो शेतातून जात होता. मित्रांना सांगितलं होतं की लवकर आलात तर शॉर्टकटने या पण रात्री उशीर झाला तर कच्च्या रस्त्यानेच या. मित्रांची एसटी रात्री 11 11.30 ला आली. हळद चुकायला नको म्हणून त्या तीन चार जणांनी शॉर्टकटने जायचं ठरवलं. त्या दिवशी नेमकी अमावस्या होती. शेताच्या रस्त्याने थोडं चालल्यावर त्यांना दूरवर लाईट्स दिसल्या आणि स्पीकरचा आवाज येऊ लागला. आता लवकरच गावात पोहचू या अपेक्षेने त्यांनी झपाझप पावलं उचलायला सुरवात केली पण भरपूर चालूनही गाव जवळ येत न्हवतं. बराच वेळ हा प्रकार चालला शेवटी त्यांनी धावायला सुरवात केली पण अंतर कमी होईना. शेवटी ते दमून शेतातच बसले. बसल्यावर त्यांच्यावर अमानवीय शक्तीने हल्ला चढवला. कोणाचे केस खेच, कोणाच्या कानाखाली मार, कोणाची बॅगच दूर भिरकावून दे असले भयानक प्रकार सुरू झाले. एव्हाना रात्र भरपूर झाली होती म्हणून काही गावकरी यांना शोधायला बाहेर पडले तर हे सगळे मित्र शेताच्या रस्त्यावर त्राण नसलेल्या अवस्थेत सापडले. गावकऱ्यांचा आधार घेऊन सगळे गावात जायला निघाले तेव्हा पाठीमागून भेसूर हसण्यासोबत आवाज आला 'सोडा त्यांना, सगळे माझी शिकार आहेत.' गावकऱ्यांनी सांगितलं कोणीही पाठीमागे बघू नका. गावकरी वेशिजवळ येईपर्यंत आवाज येतच होते. दुसऱ्यादिवशी कसंबसं लग्न आटपून दिवस उजेडीच सगळ्यानी मुंबईची गाडी पकडली.

तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सदस्य होता त्यामुळे मुद्दामच अमावस्येला लग्न ठेवलं होतं.

चकवा हा प्रकार वेगळा असतो. चकवा लागला की माणूस फिरून फिरून त्याच जागेवर येतो. चकवा माणसावर हल्ला करत नाही. तसेच चकवा लागला की माणसाला वेळेचं भान नाही राहत. चकवा लागलेल्या व्यक्तीला आपण काही मिनिटेच या जागेवर फिरतोय असं वाटतं पण प्रत्यक्षात ती व्यक्ती कित्येक तास ते कित्येक दिवस त्याच जागेवर फिरत असते. कोणत्याही मंत्राचा तंत्राचा चकव्यावर फरक पडत नाही. यापासून वाचायचं असेल तर खाली बसून रस्ता शोधायचा कारण चकव्याचा परिणाम हा कमरेपेक्षा उंचीवरच होतो.

चकवा हा वाचक चा anagram आहे. जे अमानवीय गोष्टींचे सिरियस वाचक असतात, मन लावून वाचतात असेच वाचक चकवा हेरत असतो आणि त्यांनाच चकवा लागतो.

जे अमानवीय गोष्टींचे सिरियस वाचक असतात, मन लावून वाचतात असेच वाचक चकवा हेरत असतो आणि त्यांनाच चकवा लागतो.>>> हो हे खरं आहे. तसेच जे लोक्स रोज रोज ऑफिसमध्ये जाऊन ctrl+c ctrl+v बटणं दाबत बसतात त्यांना पण चकवा लागलेला असतो. आयुष्याचे 30 35 वर्ष कधी संपतात कळतच नाही.

तसेच जे लोक्स रोज रोज ऑफिसमध्ये जाऊन ctrl+c ctrl+v बटणं दाबत बसतात त्यांना पण चकवा लागलेला असतो. आयुष्याचे 30 35 वर्ष कधी संपतात कळतच नाही

Lol

कमला, मी वाचलेयत आधी चे धागे पण.
मला वाटलं त्यांना गाव तर दिसतंय पण जाता येत नाहीए, सो चकव्याचा प्रकार असावा.

चकवा हा प्रकार वेगळा असतो.... यापासून वाचायचं असेल तर खाली बसून रस्ता शोधायचा कारण चकव्याचा परिणाम हा कमरेपेक्षा उंचीवरच होतो.
Submitted by बोकलत on 18 August, 2020 - 12:29

म्हणूनच त्या 'देऊळ बंद' चित्रपटात चकवा लागलेल्या (खाल्लेल्या) राघव शास्त्रीला तो म्हातारा चिलीम ओढणारा म्हातारा माणूस (@ ची hint देणारा) खाली बसायला सांगून रस्ता सांगतो का???

जे लोक्स रोज रोज ऑफिसमध्ये जाऊन ctrl+c ctrl+v बटणं दाबत बसतात त्यांना पण चकवा लागलेला असतो. आयुष्याचे 30 35 वर्ष कधी संपतात कळतच नाही >>> Lol Lol

ही थरारक गोष्ट माझ्या मामाच्या मुलासोबत घडली. या गोष्टीला साधारण सहा सात वर्षे झाले असतील. मामाचा मुलगा खूपच धीट होता. भूत बघायची त्याला फार ईच्छा होती. मित्राच्या घरी अभ्यास करायला जातो असं सांगून रात्री अपरात्री स्मशानात जाऊन बसायचा. असाच एका पौर्णिमेला तो रात्री घराबाहेर पडला. स्मशानात रात्रीचे अडीच तीन वाजले असतील. त्याला दुरून एक माणूस कंदील घेऊन येताना दिसला. तो माणूस त्याच्याच दिशेने येत होता. काही वेळाने तो माणूस त्याच्या जवळ आला. तो माणूस चाळीशीच्या आसपास होता आणि त्याने अंगावर घोंगडी घेतली होती. त्याने प्रेमाने मामाच्या मुलाला विचारले बाळा इकडे कसा काय? मामाच्या मुलाने न घाबरता उत्तर दिलं की तो भूत बघायला इकडे आलाय. हे ऐकताच त्या माणसाने त्याला वेताच्या काठीने सटासट चोपायला लागला. भूत घाबरवतं,अंगात येत हे तो ऐकून होता पण भूत वेताच्या काठीने चोप देतं हे त्याच्यासाठी नवीनच होतं. अचानक झालेल्या हल्ल्याने मामाचा मुलगा गांगरून गेला आणि जी वाट दिसेल तिने घराकडे पळायला लागला. तो माणूस त्याला मारत मारत घरापर्यंत आला. अंगणात सगळे वाट बघत होते. मामी लगबगीने त्या माणसाजवळ गेली आणि म्हणाली " अहो जाऊ द्या हो माफ करा त्याला, मी समजवेन त्याला. पुन्हा नाही असं करणार तो."

Pages