महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि मग पेशव्याचे पोर मुसलमान का झाले

आणि अब्दालीचा अवतार संपल्यावर काश्मिरी मुसलमान हिंदू होणार होते त्यांना कुणी अडवले होते ? पंडितांनी ?

तो इतिहास झाला औरंगजेबाच्या काळातील.

इतिहासातून बाहेर वर्तमानात या.

आणि डोळे उघडा

म्हणजे जळजळ चिडचिड आणि वैफल्य येणार नाही

आणि अब्दालीचा अवतार संपल्यावर काश्मिरी मुसलमान हिंदू होणार होते त्यांना कुणी अडवले होते ? पंडितांनी ?

नवीन Submitted by BLACKCAT on 23 January, 2020 - 09:39 >>

एकदा माणूस इस्लाम सारख्या भोगवादी विचारसरणीला आत्मसात करून बसला की त्यातून बाहेर पडणे खूप मुश्किल असते., कारण त्याचा मोह त्याला अडवतो.

तरीही बऱ्याच लोकांची घरवापसी नक्कीच झाली असेल, पण तुलनात्मक रित्या ती घटना शांततेत झाली असल्याने तिचा गवगवा किंवा इतिहासात नोंद झाल्या नसाव्यात.

आणि अब्दालीचा अवतार संपल्यावर काश्मिरी मुसलमान हिंदू होणार होते त्यांना कुणी अडवले होते ? पंडितांनी ?
नवीन Submitted by BLACKCAT on 23 January, 2020 - 09:39
>> बीसी प्लीज या विषयावर नवा धागा काढ ना भो. नवीन माहिती आहे. समजून घ्यायला आवडेल. फक्त सत्य लिही म्हणजे झाले. भरत सारखं फेकू नको.

अयोध्या वगैरे जस्ट धूळफेक आहे. ५ वर्षात राज्य भिकेला लावतील आणि पोराला अमेरिकेत सेटल करवतील .))))))) पोराला अमेरिकेत सेटल करतील की बिसिसीआयचा सेक्रेटरी करतील हे येणार्या काळात समजेलच मात्र उध्दव ठकरेंनी सत्ततास्थापनेसाठी जे पाउल उचलले त्याबद्दल महाराष्ट्रातील जनता त्यांची ऋणी राहील.

ठराविक एखादा टक्के जन्ता ऋणी राहील कारण भाजप त्यांच्या फुकटखाऊपणाला आळा घालीन अशी भिंती त्या जन्तेला वाटते.

@ राजदीप सहमत..

शिवसेनेच्या सन्जु ला जसा तो स्वःत म्हणजे महाराष्ट्र वाटतो, तसंच पगारेंना ते स्वःत म्हणजे जनता वाटते !

मुंबईत आज गजबजाट आहे. बाळ ठाकरेंच्या जयंतिनिमित्त शिवसेनेचा वचनपुर्ती सोहळा तर मनसेचे अधिवेशन हे केंद्रबिंदु आहेत. महाराजांची राजमुद्रा ही झेंड्यावर घेउन त्याचा कलर बदलुन राज ठाकरेंनी दुसरी इनिंग सुरु केली आहे त्यांना शुभेच्छा. राजसाहेबांनी नवयुवकांना आपल्या पक्षाकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे.
पवारसाहेबांकडे संभाजी ब्रिगेड सारखी विचारवंताची संघटना आहे। त्यांना बळ दिल्यास राकाँच्या अजुन वाढीस ते सहाय्यभुत ठरु शकते.

मविआच्या संस्थापकांपैकी महाराष्ट्र योध्दा संजय राउत साहेब यांचे विधान. उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार.

मविआच्या संस्थापकांपैकी महाराष्ट्र योध्दा संजय राउत साहेब यांचे विधान. उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार.

नवीन Submitted by सचिन पगारे on 23 January, 2020 - 16:52 >>

ही कालची शिळी बातमी आहे... नवीन काहीतरी लिहा.

ही कालची शिळी बातमी आहे... नवीन काहीतरी लिहा.))))))) तुमच्यासाठी अयोध्या प्रकरण ही शिळी बातमी असेल महाराष्ट्रातील राष्ट्रवादी शिवसैनिंकांसाठी नाही.

संभाजी ब्रिगेड सारखी विचारवंताची संघटना

चांगला विनोद आहे

अजून येऊ द्या

सुबोधजी, यात विनोद कसला? फक्त नागपुरातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शहरात आणी गावांत विचारवंतांच्या संघटना आहेत. संभाजी ब्रिगेड ही अत्यंत हुशार आणी अभ्यासु लोकांची संघटना आहे.

संभाजी ब्रिगेड ही अत्यंत हुशार आणी अभ्यासु लोकांची संघटना आहे.

म्हणजे ते नक्की काय करतात?

संभाजी ब्रिगेड ही अत्यंत हुशार आणी अभ्यासु लोकांची संघटना आहे.

म्हणजे ते नक्की काय करतात?))))))).संघासारखी बौध्दिक घेतात, इतिहासातील बाबी लोकांना सोप्या करुन सांगतात.

त्यांची कुठे शाखा आहे का?)))) शाखेबाबत कल्पना नाही पण इतिहासावरील मांडणी अभ्यासु असते.बरीच पुस्तके ही प्रकाशीत करतात.

राज ठाकरेंनी पक्षाच्या दुसर्या इंनिगला जोरदार सुरूवात केली आहे.हिंदुत्वाकडे त्यांची पाउले पडु लागली आहेत.शिवसेनेने भाजपला 'राणीचा बाग' दाखवल्याने भाजप एकटी पडलीय. भाजपला साथ देउन पक्षवाढ करण्याची राज ठाकरेंकडे चांगली संधी आली आहे.

महा च्या शेतकर्‍यांच्या 'ज्वलंत' प्रश्णांचं काय झालं?
अचानक सर्व राडा, निदर्शने थांबली आहेत. मराठा मोर्चा पण गप्प. सहकारी बँका वि. बातम्या बंद. १०० दिवसातच महाविचित्र आघाडी चा करिश्मा?

गंमत म्हणजे २०१५ एप्रिल मध्ये ईथल्या एका विनोदी महाशयांनी ३ लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्येला ५४ वर्ष सत्तेत असलेले काँ सरकार कसे जबाब्दार नाही हे लिहीताना काय भन्नांट युक्तीवाद केलाय बघा. हे पप्पू च्या देखिल वरताण झाले:
देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाची तुलना हि गरीब देश म्हणून व्हायची देश हा अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. देशाल प्रगतीच्या दिशेने न्यायचे होते अशिक्षितता, गरिबी, देशाला मिळालेले स्पेशल गिफ्ट जातीभेद, धर्मांधपणा, स्त्रीला शुद्र समजणे थोडक्यात सांगायला गेलो तर चार पाने भरतील इतक्या अडचणी देशाला होत्या. देश स्वतंत्र झाला फाळणी झाली, दंगली झाल्या, महात्म्याचा निर्दयतेने खून झाला, संस्थानांना वठणीवर आणणारे वल्लभभाई पटेल निर्वतले.देश हा दारिद्र्यात खितपत पडला होता ब्रिटिशांनी भारताची लुट केली होती त्यात धार्मिक दंगली ह्या मानवतेला काळिमा फासत होत्या. देशातील अर्धी जनता तर अर्धपोटी राहत होती अशी त्या काळची बिकट परिस्तिथी होती.
शेती हा व्यवसाय मुख्यत पावसावर अवलंबून असतो निसर्गाची अवकृपा झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु त्यांच्यासाठी तेव्हाचे सरकार तत्परतेने इच्छा असूनही काहीहि करू शकत नव्हते कारण सारा देशच गरीब होता. आभाळच फाटले होते तिथे ठिगळ कुठून कुठून लावणार . शेतीत देश स्वयंपूर्ण व्हावा, उद्योगधंद्यात स्वयंपूर्ण व्हावा म्हणून पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या.इतके सारे होत असताना देशाला शेजारील राष्ट्रांशी युद्धाचाही सामना करावा लागला. देशातील गरिबी, धार्मिकपणा, अंतर्गत समस्या, हलाखीची परिस्तिथी हे हि थोडे म्हणून कि काय परकीय आक्रमणे ह्या अशा अत्यंत विपरीत बिकट काळातही आपल्या नेत्यांनी हा देश तुटू दिला नाही एकसंघ राखला. प्रगतीच्या दिशेने हळुवार परंतु ठामपणे वाटचाल केली.
Rofl

>>कारण सारा देशच गरीब होता. आभाळच फाटले होते तिथे ठिगळ कुठून कुठून लावणार .
हे सर्वात भारी आहे. कारण हे महाशय व त्यांचे तीनपाट पाठीराखे २०१४ पूर्वी भारताचा प्रगती आलेख व विकास दर हा २०१९ पेक्षा खूप जास्त होता अशी मखलाशी करत फिरतात. आताच्या भारतात सर्वात जास्त गरिबी व बेकारी आहे अशा अहवालांच्या लींका वाटत फिरतात. Proud

आता हेच महाशय ईथे निव्वळ शरद पवार नावाची पुंगी वाजवत बसतात... शेतकरी गेले xxx
या महाशयांनी २०१५ मध्ये देशाला वळण देणारे ३ राष्ट्रीत नेते यादीत राहुल, केजरी, नितीश, लालू अशा अनेकांना स्थान दिले... पण पवार मधला प देखिल नाही. Proud
आता दर दिवस शरदाचे चांदणे पडत आहे...! Proud
तस्मात या महाशयांची विश्वासार्हता शून्य आहे. तेव्हा यांच्या सर्वच पोस्टीं फारतर दोन घडीचे मनोरंजन म्हणून बघावे (जमल्यास!) त्यापेक्षाअधिक काही नाही.

गत सरकारने काँ, राकाँ,शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टँप केले असा आरोप .मविआ सरकार कडुन चौकशी सुरु.

भिमा कोरेगाव हे गत सरकारचे षडयंत्र- पवार साहेब.
चौकशी होणार.

महाराष्ट्रराज्य सरकारने कोरेगाव-भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा तपास NIA कडे दिला.

चंमतग

अच्छा मुळाशी जायचं ठरवलं का? मग अर्बन नक्षालाना उगाच डांबून ठेवलंय अशा आशयाची कॉमेंट वरिष्ठ स्युडो न्यायाधीश शरद पवार यांनी आधीच का केलं होती? ते तर आधीच मुळाशी गेलेले दिसताहेत.

बाकी हे अर्बन नक्षल आणि आताच्या सरकारचे नक्की संबंध काय आहेत की त्यांच्यासाठी म वि आ चा व तिच्या चेल्यांचा जीव तीळ तीळ तुटतो?

'मला तुम्ही 500 कोटी रुपये द्या...मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन दाखवतो. ज्या दिवशी मतं विकत घेण्याची क्षमता माझ्याकडे येईल त्या दिवशी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल,' असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
>>>हे खरं आहे का. म्हणजे पैशांपासून वंचित आहेत का हे. पाचशे कोटी यांचे बांधव सहज जमवून देतील की.

Pages