महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Mumbai Metro: Uddhav Thackeray Appointed Committee Recommends Not Shifting Aarey Colony Car Shed Site, Reports
Big Popat of Liberal

नवीन Submitted by Filmy on 30 January, 2020 - 17:36 >>

मर्द नेहेमी सामना करतात... असो तो डी जे नी तू, पळवाटा शोधत बसा...

रवी शिंदे, भिवंडी, 31 जानेवारी : भिवंडी तालुक्यातील भुईशेत येथील शेतकऱ्याच्या अंगणातून बैल चोरुन तो बोलेरो जीपमधून घेऊन जाणाऱ्या कसाईंच्या त्रिकुटाला जमावाने पकडून बेदम चोप दिला. या मारहाणीत जखमी झालेल्या एका कसाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भिवंडी - पारोळ रोडवरील खडकी ब्रिजवर गुरुवारी मध्यरात्री घडली आहे.

नफीस कुरेशी ( 28, रा.कसाईवाडा ) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या कसाईचे नाव आहे. त्याने साथीदार आकिब जावेद आलम अंसारी ( 20, रा. गुलजार नगर ) आणि अमीर शकील खान ( 23, रा.ईदगाह रोड ) आदींच्या साथीने भुईशेत येथील शेतकरी प्रकाश नवश्या डोंबरे यांच्या अंगणात बांधून ठेवलेला बैल बोलेरो जीपमध्ये भरून तो चोरून नेण्याचा प्रयत्न केला.

हे धक्कादायक आहे. कुणीही उठतो महाराष्ट्राचे तुकडे करायची भाषा करतो...

Submitted by सचिन पगारे on 31 January, 2020 - 22:53 >>
पगारे, बातमी दिसत नाय...

बादवे वरच्या पत्रकाबद्धाल तुझं काय मत आहे? बोलती बंद झाली की काय म्हणून विषय बदलायचा प्रयत्न करतोस?

असे पत्रक का निघाले असावे हे विचार करण्यायोग्य बाब आहे..तुम्हाला हे पत्रक पटले का?

नवीन Submitted by सचिन पगारे on 1 February, 2020 - 23:17 >>

ते मला पटले असा मूर्खपणाचा विचार तुझ्या मनात का आला बर? मी जातीयवादाच्या नावाने भाजपाला शिव्या घालणाऱ्या लोकांसाठी ते पत्रक शेयर केलेय, जमलं तर त्याबरोबर लिहिलेला माझा प्रतिसाद वाच....

पगारे, भरत,काळाबोका वगैरे मंडळी फक्त त्यांच्या सोयीचं बोलतात.‌ सत्य पचवायची ताकद त्यांना नाहीय. शेवटी संस्कारांचा प्रश्न आहे. जसे संस्कार तसे विचार!!

मी- माझा तुम्ही असे पत्रक शेअर करायला नको होते मायबोलीवर... तुम्ही त्या पक्षाचे समर्थक असाल तर तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. असे पत्रक शेअर करणे चुकीचे आहे.

पहिली गोष्ट " ते पत्रक वाटणाऱ्या त्या टुकार पक्षाचा मी समर्थक नाही"

आता एवढं स्पष्ट लिहिल्यावर मला त्या पक्षाचा समर्थक समजणाऱ्यांच्या गुढग्यात थोडा प्रकाश पडेल अशी आशा करतो.

राज्यात अशा पत्रकांच्या माध्यमातून कशा प्रकारे जातीयवाद पसरवला जातो हे दाखवण्यात काय चूक आहे? की जातीयवादी लोक एक्सपोज होतील अशी भीती आहे? अशी हजारो पत्रके छापून वाटली गेली असतील आणि ती गोष्ट इग्नोर करावी असे पगारेंच मत दिसतंय.

बाकी ज्या प्रकारे पगारेंच्या प्रतिक्रिया त्या पत्रकाबाबत येत आहेत त्यावरून पगारेच त्या पत्रक वाटणाऱ्या पक्षाचे समर्थक आहेत अशी मला शंका येतेय.

जातीयवादी इथे एक्स्पोज होउन काय फायदा?
हे पत्रक तुम्हाला मिळाले तुम्ही काय अँक्शन घेतली?
मला तर तुम्ही ह्या पत्रकाचे समर्थक वाटता कारण तुम्ही त्याला प्रसिध्दी देताय.हार्ड काँपी एखादा वाचेल तुम्ही तर शेकडो लोकांसाठी हे प्रसिध्द केलेत.
आणी माझे म्हणाल तर असे काही पत्रक प्रसिध्द झालेय हे मला तुम्ही ते प्रसिध्द केल्यावर समजले.

कशाला ताकाला जाऊन भांडं लपावताय पगारे.. सांगून टाका ते पत्रक इथे टाकल्यामुळे तुम्हाला मिरच्या झोंबल्या...

तुमचंच उफराट लॉजिक वापरायचं तर, महाराष्ट्राचे तुकडे कोणीतरी करायला बघतोय अशी बातमी तुम्हीच टाकली होती नाही का? त्यांना फुकटची प्रसिद्धी द्यायला तुमचं समर्थन आहे की काय मग त्यांना?

आणखी जातीयवादी पत्रक मिळाली तर डकवत राहीन... बाकी माबोकर सुज्ञ आहेत, त्यांची काळजी नसावी.

याच धाग्याच्या पान नंबर अठ्ठावीस वर सहावा प्रतिसाद पाहा..त्यात मी ते जातीयवादी पत्रक डकवलय

कशाला ताकाला जाऊन भांडं लपावताय पगारे.. सांगून टाका ते पत्रक इथे टाकल्यामुळे तुम्हाला मिरच्या झोंबल्या...))))))) तुमचे पत्रक तुम्ही तुमच्यापर्यतच ठेवायचे होते असे मला वाटते..तुमचा अजेंडा मला भलताच वाटतोय. व्रुत्तपत्रात आलेली बातमी वेगळी ती जग वाचते. पण कुठल्यातरी कोपर्यात, कुणीतरी छापलेले पत्रक मायबोलीवर आणणे हे चुकीचे आहे.
तुम्ही ह्या पत्रकाबाबत काही कायदेशीर कारवाई केलीत का?

तुमचे पत्रक तुम्ही तुमच्यापर्यतच ठेवायचे होते असे मला वाटते..तुमचा अजेंडा मला भलताच वाटतोय. व्रुत्तपत्रात आलेली बातमी वेगळी ती जग वाचते. पण कुठल्यातरी कोपर्यात, कुणीतरी छापलेले पत्रक मायबोलीवर आणणे हे चुकीचे आहे.
तुम्ही ह्या पत्रकाबाबत काही कायदेशीर कारवाई केलीत का?

Submitted by सचिन पगारे on 2 February, 2020 - 13:22

>>

चांगला प्रश्न आहे. ते पत्रक काढणारे टुकार लोक बाहेर राहावेत व त्यांनी आणखी जातीयवादी फुत्कार सोडून स्वतः ला एक्सपोज करून घ्यावे अशी माझी मर्जी आहे.

बाकी तुम्हाला त्या पत्रातला मजकूर स्फोटक वाटतं असेल तर तुमच्या नकली चाणक्याच्या कानावर घालून त्या लोकांना अटक करवून घ्या. नाहीतरी सध्या सत्ता नकली चाणक्याच्या पक्षाचीच आहे ना?

एक उदाहरण देतो.

म्हणजे मि- माझांना एखादा खुनी माहीत आहे याबाबत ते योग्य ठिकाणी तक्रार करण्याएवजी सोशल मिडियावर माहिती देतात. कायदेशीर तक्रार न देता त्याने अजुन खुन करुन एक्सपोज व्हावे अशी ईच्छा बाळगतात.
मी- माझा, लवकर बरे व्हा व तक्रार करा. मायबोलीवर चार दोन प्रतिसाद येतील त्यावर काही नाही होणार.

एखादा माणुस असे पत्रक हातात येउनही गप्प कसा राहु शकतो हे माझ्या आकलनाबाहेरचे आहे. मला तर तुम्ही ह्या पत्रकाचे समर्थक वाटताय.

बाकी तुम्हाला त्या पत्रातला मजकूर स्फोटक वाटतं असेल तर तुमच्या नकली चाणक्याच्या कानावर घालून त्या लोकांना अटक करवून घ्या. नाहीतरी सध्या सत्ता नकली चाणक्याच्या पक्षाचीच आहे ना?)))))) याचा अर्थ तुम्हाला मजकुर स्फोटक वाटत नाही आहे?

पगारे, यार तुमच्या वाटण्याला कोण विचारतो? बाकी त्या पत्रक लिहिणाऱ्या टुकार लोकांची खून्यांशी तुलना केल्याबद्दल धन्यवाद...

तुमचा भयानक बाळबोध पणा असाच फुलत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना...

मी- माझा , माझ्या वाटण्यात तथ्य आहे. तुम्ही पत्रकवाले व खुनी तुलनेवर खुश झालात याबद्दल आभार मानलेत पण आपल्या इथे असेही लोक आहेत ज्यांना एखादा खुनी आवडतो.

तुमच्या वाटण्यात तथ्य आहे असे तुम्हाला "वाटते". मी आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्या वाटण्याला विचारतो कोण?

बादवे, ते पत्रक मी मुख्यत्वे अजिंक्य राव पाटील यांच्यासाठी डकवले.

"माबोवर तुकडे तुकडे गॅंग आहे का " या धाग्यावर त्यांनी राणा भीमदेवी थाटात जातीयवादी लोकांना ठेचण्याची वल्गना केली.होती. त्याला मूर्त स्वरूप यावे म्हणून ठेचायचे फुटाणे दाखवायचे थोडे प्रयत्न मी माझ्या बाजूने केले....

पर तीर तो कही और जाकर लगा.... और जख्मोंसे भळाभळा बाळबोधपणा टपक रहा है..

विषय गंभिर आहे.मी पत्रकाच्या विरुध्द बोलतोय तरी तुम्ही तीर वैगरे घेउन बसलात. तुम्ही कायदेशीर कारवाई करायला हवी होती. वातावरण गढुळ होत चाललेय देशातले पुढे कशी परिस्थिती येईल हे कुणीच सांगु शकत नाही.तुम्ही पत्रकाच्या वेळेसच हातपाय गाळलेत.

पगारे, आपल्या देशात फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन नावाची एक सुविधा जातीयवादी लोकांसाठी आहे.. वर महाराष्ट्रात अर्बन नक्षलांच समर्थन करणाऱ्या चानक्यांच राज्य आहे.

ते पत्रक मी चमच्यांनी व गूलामांनी वाचावे यासाठीच टाकलंय.
आता तुला एव्हढीच काळजी नी घाई लागून राहिलीय तर तू जा नी तक्रार कर की ..

नेहेमी तुला दुसऱ्याने माहिती पुरवावी, तुला घाई लागलीय म्हणून दुसऱ्यांनी कारवाई करावी वगैरे कुबड्या मागतानाच दिसतोय तू.. इथे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतच्या बळावर काहीतरी करून दाखव, जा

मग कधी जातोस "तू" ते पत्रक काढणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी करायला? इथे तक्रारीची कॉपी अपलोड कर, मग बघू

Pages