महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
शरदचंद्र पवारांचे खळबळजनक
शरदचंद्र पवारांचे खळबळजनक विधान- रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते.
नवीन Submitted by सचिन पगारे on 15 January, 2020 - 16:15 >>
खळबळजनक !
आता काही दिवसांनी "जाणता राजा ही उपाधी मला रामदास स्वामींनी दिली" असही ते म्हणतील...
पवारांच्या विधानाला इतिहासकार
पवारांच्या विधानाला इतिहासकार इंद्रजित सावंत यांनीही दुजोरा दिलाय.
बालिश बहु बायकात बडबडला तसे
बालिश बहु बायकात बडबडला तसे बालिश बहु मिडीयासमोर बडबडला. आता कोण ते बघा. पूर्वी रॉकॉ आणी बाकी काँग्रेस वाले तसेच लालु वगैरेंवर कुठल्याही थराला जाऊन टीका करणारे हे स्वयंघोषीत किंग मेकर आता शरद पवार हे किती महान आहेत याची क्षणाक्षणाला प्रचिती देतायत. काल परवापर्यंत मुत्र्या तोंडाचा अजीत पवार अशी ज्याच्यावर टिका केली त्यालाच सर्वात जास्त कार्यक्षम मंत्री म्हणून उपाधी देण्याची वेळ आली या महाभागावर. नियती सूड घेते म्हणतात तो असा.
तोच सेम सूड भाजपाचाही घेतलाय
तोच सेम सूड भाजपाचाही घेतलाय की नियतीने! फडण२० ने काय वेगळं केलं होतं?
फडण२० च्या राज्यात दोन्ही बाजूचं कोणीही काहीही न घाबरता बोलू शकत होतं आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका मोदी सरकारविरुध्द फेसबुक पेज चालवू शकत होत्या (नोकरी न गमावता) इतकाच काय तो फरक.
घेतलाच असेल की. पण एक बरे
घेतलाच असेल की. पण एक बरे झाले की सत्ता गेली. निदान आपण काय चूका केल्या हे जरी पक्ष नेतृत्व व पक्षातील ( कोणत्याही ) माणसांना कळले तर सुधरायचा चान्स असतो. ज्याने तो ओळखला तोच टिकतो.
>>> शरदचंद्र पवारांचे खळबळजनक
>>> शरदचंद्र पवारांचे खळबळजनक विधान- रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. >>>
यांना विचारतंय कोण?
>>> पवारांच्या विधानाला
>>> पवारांच्या विधानाला इतिहासकार इंद्रजित सावंत यांनीही दुजोरा दिलाय. >>>
आंतरराष्ट्रीय ख्यातनाम इतिहासकार पुरूषोत्तम खेडेकर, जितेंद्र आव्हाड, श्रीमंत कोकाटे यांनी ही दुजोरा दिलाय.
किती छोट्या छोट्या गोष्टी
किती छोट्या छोट्या गोष्टी हल्ली वादाच्या झाल्यात!
मुंगीला ही गुरु मानणाऱ्या नाथ संप्रदाय आणि संत भूमीत आपण जन्मलो. ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या वयापेक्षा लहान असणाऱ्या स्त्रीचा (कल्याणच्या सुभेदाराची सून) माता म्हणून सन्मान केला तर रामदासांना गुरु मानून सन्मान केला नसेल का? रामदासांनी सांगितलेल्या चार हिताच्या गोष्टी नक्कीच त्यांनी ऐकुन घेतल्या असतील. कुणाला गुरु मानणे यात अपमान काय आहे? आयुष्यात शिक्षण देणारेच गुरु असतात अस नाही तर मोलाचे सल्ले देणारे, कठीण प्रसंगी मार्ग दाखवणारे सुद्धा गुरूच असतात. आई, वडील मित्रा, पत्नी, पती, मुलं, शेजारी कुणाच्याही रुपात गुरु भेटतो. गुरूचरित्र हेच सांगत.
आंतरराष्ट्रीय ख्यातनाम
आंतरराष्ट्रीय ख्यातनाम इतिहासकार पुरूषोत्तम खेडेकर, जितेंद्र आव्हाड, श्रीमंत कोकाटे यांनी ही दुजोरा दिलाय.>>>>>
रामदास स्वामी यांनी मनाचे
रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक आणि दासबोध लिहिला एवढे कार्यच इतके महान आहे कि शिवरायांनी त्यांना गुरु मानले असेल यात नवल काय?
बाकी आव्हाड, कोकाटे, खेडेकर आणि शरद पवार हे काय बडबडले यामुळे त्यांचे चार चेले चमचे सोडले तर महारष्ट्राला शष्प फरक पडत नाही.
एक संस्कृत श्लोक आहे.
कावळे सकाळी सकाळ काव काव का करतात?
अंधार समजून सूर्य आपल्याला खाऊन टाकेल अशी भीती त्यांना वाटत असते.
त्यामुळे ते ओरडून सांगत असतात कि आम्ही
कावळे आहोत कावळे आहोतवयं काक: काक:
तशी स्थिती या आव्हाड, कोकाटे, खेडेकर यांची आहे.
नवीन Submitted by सुबोध खरे
नवीन Submitted by सुबोध खरे on 15 January, 2020 - 19:23
--
+१००
आंतरराष्ट्रीय ख्यातनाम
आंतरराष्ट्रीय ख्यातनाम इतिहासकार पुरूषोत्तम खेडेकर, जितेंद्र आव्हाड, श्रीमंत कोकाटे यांनी ही दुजोरा दिलाय)))))))) परंतु इतिहासकार चंद्रकांत पाटील व माधव भंडारी यांच्यानुसार पवारांचे विधान चुकीचे आहे
सकाळी आठला कावळे ओरडतात
सकाळी आठला कावळे ओरडतात
आणि रात्री आठला 'किंगफिशर' ओरडते काय ?
तुमचे आठ वाजले काय?
तुमचे आठ वाजले काय?
मग आता "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले"
>>> परंतु इतिहासकार चंद्रकांत
>>> परंतु इतिहासकार चंद्रकांत पाटील व माधव भंडारी यांच्यानुसार पवारांचे विधान चुकीचे आहे >>>
जे एैतिहासिक सत्य महाराष्ट्रातील काही जातीयवादी वगळता सर्व जनतेला माहिती आहे, तेच चंद्रकांत पाटील व माधव भंडारी सांगत आहेत.
रंतु इतिहासकार चंद्रकांत
रंतु इतिहासकार चंद्रकांत पाटील व माधव भंडारी यांच्यानुसार पवारांचे विधान चुकीचे आहे Happy
Submitted by सचिन पगारे on 15 January, 2020 - 19:48
<<
चंद्रकांत पाटील व माधव भंडारी यांनी काय चुकिचे सांगत्तले? समर्थ रामदास स्वामींना, शिवाजी महाराज गुरुस्थानी मानत हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. आता पवारांसारखा जातीयवादी नेता काहीतरी बरळला तर त्या बरळण्यावर त्यांचे चमचे सोडून इतर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
समर्थ रामदास स्वामींना शिवाजी
समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजानी गुरुस्थानी मानले नाही म्हणून रामदासस्वामींची महत्ता कमी होत नाही
किंवा
शिवरायांनी त्यांना गुरुस्थानी मानले म्हणून शिवरायांची उंची कमी होत नाही.
त्यांची उंची आपापल्या गुणांमुळे होती
या कावळ्यांची तशी स्थिती नाही.
गुणैही उत्तमतां याति नहि उच्चासने संस्थितै हि
प्रासाद शिखरे स्थितो पि च काक: किं गरुडायते
गुणांमुळे माणूस उत्तुंग होतो. केवळ उच्चासनावर बसून नाही.
प्रासादाच्या शिखरावर बसल्याने कावळा गरुड होत नाही.
सर्वात विनोदी गोष्ट म्हणजे
सर्वात विनोदी गोष्ट म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षी पवारांना "रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे" गुरु नव्हते हा खळबळजनक (
) साक्षात्कार झाला ! म्हणजे गेली ४० वर्षे जो काही इतिहास "कॉन्ग्रेसच्या" काळात शिकवला गेला तो इतिहास स्वतः कॉन्ग्रेस व तिची सबसिडरी आता नाकारतेय !
म्हातारं झाल्यावर ब्रिगेडची पिवळी पुस्तकं वाचली तर आणखी काय होणार? आम्ही एन्जॉय करतोय, आणखी विनोदी गोष्टी येउद्या...
सुबोधजी,
सुबोधजी,
आपण जे शिवरायांबद्दल लिहलेय त्याच्याशी सहमत.
(No subject)
पवार हे मोदींचे गुरू आहेत
रामदास स्वामी महाराजांचे गुरू
रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते असा इतिहास शिकवला ?
कोणी ?कुठे?
तरी प्रगती आहे.
महाराजांचा इतिहास आम्हांला शाळेत शिकवलाच नाही पासून रामदास स्वामी गुरू होते ही प्रगतीच.
असंच शिकत रहा.
पवार साहेब काहीतरी मुद्दाम
पवार साहेब काहीतरी मुद्दाम स्टेटमेंट करतात. भाजपवाले कशाला प्रतिक्रिया देतात?वाईड बॉल म्हणून सोडून द्या की.
वाकड्या मुखातून चांगल्या
वाकड्या मुखातून चांगल्या गोष्टी कशा बाहेर पडतील?
>>> रामदास स्वामी महाराजांचे
>>> रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते असा इतिहास शिकवला ?
कोणी ?कुठे? >>>
हा घडलेला इतिहास आम्हाला ४ थी पासून इतिहासाच्या सरकारी पुस्तकातून शिकवला गेला. तेव्हा आणि नंतरही बरीच वर्षे कॉंग्रेसचं सरकार होते व त्यात काही वर्षे पवार मुख्यमंत्री होते.
भरत , bc ने टाकलेला वरचा फोटो
भरत , bc ने टाकलेला वरचा फोटो पहा. त्यात उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.
संताप व्यक्त करायला शब्द
संताप व्यक्त करायला शब्द नाहीतः
https://www.loksatta.com/mumbai-news/nawab-maliks-brother-kaptan-malik-b...
आव्हाड, राऊत " मिळतील तिथे
आव्हाड, राऊत " मिळतील तिथे ठोकून काढू' : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
योग, हा व्हिडियो पहा.
योग, हा व्हिडियो पहा. सुंदर सुंदर शब्द सापडतील.
हो, म्हणूनच नवाब मलिक यांच्या
हो, म्हणूनच नवाब मलिक यांच्या भावाचे कृत्य समर्थनीय ठरते. त्या भाजपा वाल्याने गाय मारली ना, मग आम्ही पण वासरु मारु. पण निषेध मात्र करणार नाही. अखलाख गेला म्हणून टाहो फोडु पण क्षुल्लक चूक झाली म्हणून लहान पोराला जबरदस्तीने पेट्रोल पाजुन मारणार्यांना अज्जीबात काही बोलणार नाही.
समर्थन कुठे केलंय? उगाच
समर्थन कुठे केलंय? उगाच काहीही.
चौथीची इतिहासाची ही दोन पुस्तके मिळाली. त्यात रामदास स्वामी महाराजांचे गुरु होते असे कुठे म्हटले आहे दाखवणार का?
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/401010009.pdf
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/401000542.pdf
Pages