महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चिखल तुमच्या कमळाभोवतीचाच

अगदी बरोबर

चिखलच तो

पण त्यामुळे कमळाच्या सौंदर्यात काही कमी येत नाही.

मी तरी डिटेन्शन केम्पच्या विरोधात नाही

कायद्यानुसार 500-1000 कैदी असतील तर त्यामागे एक मेडिकल ऑफिसर नेमावा लागेल, म्हणजे 3 ड्युटीचे 3,
म्हणजे ह्या हिशोबात डोकटरना भरपूर जॉब भेटतिल

मोदींचे रोज गार निर्मितीचे यत्न पाहून डोळे पाणावले,

सैन्यातला नसलो तरी जेलचा डॉकटर तरी होईन की

म्हणजे ह्या हिशोबात डोकटरना भरपूर जॉब भेटतिल

मोदींचे रोज गार निर्मितीचे यत्न पाहून डोळे पाणावले,

सैन्यातला नसलो तरी जेलचा डॉकटर तरी होईन की}}}}}} } Rofl

कैद्यांवर लक्ष ठेवायला बरेच चौकीदार पण लागतील.

>>> म्हणजे ह्या हिशोबात डोकटरना भरपूर जॉब भेटतिल >>>

तुझ्यासारख्या वॉर्डबॉयला सुद्धा भरपूर मागणी असेल.

कोण देणार ? फॉर्म्युला फुकट आहे , तुम्ही कोणत्याही दुकानातून माल विकत घेउन बनवणार , मग रॉयल्टी कुणी कुणाला द्यायची ?

अगदीच द्यावे वाटले तर बाळूमामाच्या देवळात 11 रु ठेवून आंबील पिऊन यावे.

सैन्यातला नसलो तरी जेलचा डॉकटर तरी होईन की

तुम्ही आर्मीमध्ये भरती होणार होता त्याचे काय झाले?

जेलचा डॉक्टर होण्यापेक्षा ते जास्त चांगले आहे.

सध्याच्या नोकरीतून तुम्हाला नोटीस दिली आहे काय? ))-((

मी लहान होतो तेव्हा आमच्या गावात गुरांचा डॉक्टर यायचा. कोंबड्या, गुरांना इंजेक्शन देऊन जायचा. मला मोठा झाल्यावर आपण पण गुरांचा डॉक्टर व्हायला पाहिजे असं वाटायचं. कोणी विचारले की मोठा झाल्यावर काय बनशील तर मी बोलायचो डॉक्टर. गुरांचा हा शब्द युधिष्ठिरासारखा नरो वा कुंजरो वा स्टाईलमध्ये बोलायचो. ऐकणारे द्रोणाचार्यांसारखे ऐकून पाठ थोपटायचे.

गुरांचा अन लहान पोरांचा डॉकटर होणे अवघड असते, कारण ते काहीही बोलत नाहीत, त्यांच्या नुसत्या ओरडण्या अन रडण्यावरून निदान करावे लागते

>>> गुरांचा अन लहान पोरांचा डॉकटर होणे अवघड असते, >>>

त्याऐवजी वॉर्डबॉय होऊन टाईमपास करणं सोपं.

मुस्लिमांच्या आग्रहामुळे आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. नाहीतर भाजप पुन्हा पाच वर्षासाठी सत्तेत आलं असतं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.या वक्तव्याने एकाच खळबळ उडाली आहे.
>>> व्होट बँक टिकवण्यासाठी काहीही ??

अनिल गोटे तेलगी प्रकरणात होता आणि खडसेचे दाऊद बरोबर फोनवरून संपर्क होता हे ऐकून आहे. त्यांची विश्वासार्हता काय आहे?
<<
हे दोघेही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत. खाकी चड्डीतला गोटेचा फोटो फेमस अहे.

यावरून, भाजपाची विश्वासार्हता काय आहे? याचा विचार असले प्रश्न विचारण्यासाठी तोंड उघडताना करायला नको का?

मुस्लिमांच्या आग्रहामुळे आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. नाहीतर भाजप पुन्हा पाच वर्षासाठी सत्तेत आलं असतं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.या वक्तव्याने एकाच खळबळ उडाली आहे.)))))))))) यात खळबळजनक काय आहे?

>>> अनिल गोटे तेलगी प्रकरणात होता आणि खडसेचे दाऊद बरोबर फोनवरून संपर्क होता हे ऐकून आहे. त्यांची विश्वासार्हता काय आहे? >>>

आ रा रा S S S किती रे मूढ निघालास तू? ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवतोस. खडसेंवर आरोप करणाऱ्याला कोणताही पुरावा देता आला नाही. तेलगी प्रकरणात तुझे लाडके भुजबळ आणि आधुनिक चाणक्य सुद्धा होते ना?

डोक्यावर बसणारच

नवीन Submitted by BLACKCAT on 21 January, 2020 - 22:50 >>

एकमेकांच्या ? बाकी मुसलामनांच्यात सगळे पुरुषच असतील नाहीं का?

मुसलमान पुरुष अन ख्रिश्चन बाई
डोक्यावर बसणारच
नवीन Submitted by BLACKCAT on 21 January, 2020 - 12:20
>> जसे की तुझ्या डोक्यावर बसलेले आहेत.‌ इतरांच्या डोक्यावर बसल्याचे भास तूला होताहेत. उपचार करुन घे. धनगराचं औषध गुढग्यावर लाव हं, कारण तूझा मेंदू त्या ठिकाणी आहे.

शिवभोजनासाठी आधारकार्ड आणि फोटोची गरज, ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली
मुंबईत केईएम, नायर आणि कूपर हॉस्पिटलसह अन्य 15 ठिकाणी शिवभोजन थाळीची केंद्र सुरु करण्यात आली आहे. थाळी घेण्यासाठी त्यासाठी सरकारनं आधारकार्ड आणि फोटोची नियमावली तयार केली आहे.
https://marathi.abplive.com/news/maharashtra/aadhaar-card-and-photo-mana...
--

पेग्विन सेनेची १० रु.ची शिवभोजन थाळी खाण्याकरता आधार कार्ड व फोटो लागणार आहे. जर थाळी खायला कागदपत्रे जरुरी आहेत मग एन.आर.सी व एन.पी.आर साठी कागदपत्रे मागितली तर ह्या तुकडे गॅंग व टेररिस्ट लोकांना मिरची लागण्याचे काय कारण ? 'भिक नको पण कुत्रे आवर' अशी अवस्था आहे ह्या लाचार सेनेची !

Proud

आधार कार्ड सरकारनेच दिले आहे व ते दाखवायला सांगताहेत, आणि आधार दाखवलेत तर थाळी देताहेत

पण आधार कार्ड देणारे सरकार लोकांना पुन्हा ते कार्ड दाखवायला सांगते व वर हेही बोलते की हा नागरिकत्वाचा पुरावा नाही

Proud

आधार कार्ड सरकारनेच दिले आहे व ते दाखवायला सांगताहेत, आणि आधार दाखवलेत तर थाळी देताहेत
>><<

CAA व NRCला विरोध करणारी तुकडे व टेररिस्ट गॅग म्हणते "हमारे वालिद जो थे, अब्बा हमारे ! उन्होने एक बकरा पाला था. काजदात बकरा खा गया और बकरे को अब्बा. तो हम कागज कहां से दिखायेंगे" तसे एकाद्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याला उपाशी ठेवणार का हे सरकार ?

असं कसं असं कसं
कॉंग्रेसचा कावळा पण गोरा असतो.

Pages