महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शरद पवारांचे राजकारण आम्हीच संपवणार म्हणणारे दिल्लीत घरोघरी प्रचार पत्रके वाटत फिरत आहेत,

दिल्ली हरले की उद्या मग ते युनोमध्ये जातील

मी माझा,
जामियातली तरुण पोरे, शाहिनबागेतल्या स्त्रिया हे त्यांना जे योग्य वाटत नाही त्याविरुध्द सरकारशी सामना करतायत. आणी तुम्ही मात्र त्या पत्रकवाल्या लोकांना मायबोलीवर जशी जहाल भाषा वापरता त्या भाषेत जाउन खडसावुही शकत नाही.म्हणजे तुम्हाला ते पत्रक योग्य वाटलेय व तुमची त्यातील मजकुराला संमती आहे असाच अर्थ निघतो.

पगारे तुला काय वाटून घ्यायचंय ते वाटून घे भावा, मला शस्प फरक पडत नाही...हवं तर माझीही तक्रार बिनधास्त कर जा.. अडवलेय का कोणी?

त्या पत्रकाचा समर्थक कोण आणि विरोधक कोण हे मला सिद्ध करण्याची गरज नाही, तेव्हा माझ्यापुरता पत्रकाबाबतीतल्या तुझ्या लोचट फालतुगिरीला या पुढे पास...

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा रविवार करमणूक केल्याबद्दल माबोकरांच्या वतीने मी तुझे आभार मानतो...

धन्यविद मि माझा . पत्रकाचा विषय बंद

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा रविवार करमणूक केल्याबद्दल माबोकरांच्या वतीने मी तुझे आभार मानतो.]]]]]]]] मलाही तुमचे आभार मानावेसे वाटले असते माबोकरांच्या वतीने जर तुम्ही थोडे धैर्य दाखवुन काही अँक्शन घेतली असती.
असो.

तुकडे धागा का ठेचला म्हणे?
Submitted by BLACKCAT on 2 February, 2020 - 12:30
>> तूला का शॉक लागायलाय? संबंधित लोकांना भेटून चवकशी कर. कळ्ळ्यावर कळव.

महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष भाजपाला धक्का देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिका निवडणुकीतही भाजपाला एकटं पाडायचं यासाठीचा प्लान ठरल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. आज शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे पुढचे धोरण ठरल्याचे समजते आहे.

उद्या म्हणजेच मंगळवारी महाविकास आघाडीचा मेळावा नवी मुंबईत पार पडणार आहे. त्यावेळी नवी मुंबईच्या महापालिका निवडणुकीतही भाजपाला एकटं पाडून तिन्ही पक्षांनी एकत्र लढायचं अशी घोषणा होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी झाल्यास भाजपाची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

https://www.loksatta.com/mumbai-news/mahvikas-aaghadi-may-come-together-...

देशाचे तुकडे करण्याची विधाने करणार्‍या शरजील इमामचे समर्थन करण्यासाठी घोषणाबाजी केल्याच्या मुद्द्यावरून ‘एलजीबीटीक्यू’ची आझाद मैदानातील ‘प्राईड परेड’ सर्वत्र चर्चेत आहे. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) आणि ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ला (एनआरसी) विरोध करताना येथे देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. मात्र, देशविरोधी घोषणा देणार्‍यांच्या या आंदोलनाला परवानगी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘लीगल राईट ऑर्ब्झव्हेटरी’चे (एलआरओ) निमंत्रक विनय जोशी यांनी या आंदोलनाचे आयोजनकर्ते हरीश अय्यर आणि या आंदोलनाला परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या तक्रारीची दखलही घेतली असून राज्याच्या गृहखात्याच्या साहाय्यक सचिवांना याबाबत कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. मुख्य सचिवांच्या या आदेशांमुळे या आंदोलनाचे आयोजनकर्ते आणि या आंदोलनाला परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक माहिती साठी बघा
https://www.mahamtb.com/Encyc/2020/2/3/Supriya-Sule-gets-into-trouble-fo...

सरकारमध्ये सामिल असलेले अबू आझमी यांनीही शर्जिल इमामची पाठराखण केली आहे.

एलजीबीटीक्यू वाले इस्लामचं समर्थन करतात हा विनोदच आहे. शरियानुसार गे लोकांना मृत्यु आणि लेस्बियन बायकांना चाबकाचे फटके वगैरे शिक्षा इस्लामि देशात ऑलरेडी दिल्या जातात.

तो फौजीवर पिच्चर का शिरेल काडनार होता यवढं आठवतं तो रावल्याच खरा देशभक्त! दिया और बाती मधली संध्या तर हेलिकॉप्टरने अण्वस्र दूर समुद्रात टाकून देते.

*'सकाळ'* हा शरद पवार व बंधू यांच्या मालकीचा news paper आहे आणि हा माणुस ब्राम्हण द्वेष्टा आहे हे आपण सर्व जाणताच. आश्चर्याची गोष्ट म्हणजे maximum आपला समाजच हा पेपर वाचतो आणि यांचा पेपर चालतो कारण हा पेपर *नानासाहेब परुळेकरांनी* सुरु केला होता, ५१% शेअर्स विकत घेऊन सकाळ चे पवार मालक बनले. नानासाहेबांच्या मुलगी #मरेपर्यंत* पवार विरोधात न्यायालयात लढली, तरीही पवारांनी इस्टेट हडपली हे ही आपणास माहीत आहेच. *मध्यंतरी सकाळ मधील अनेक ब्राह्मण कर्मचारी यांच्या कडून काही ना काही करून राजीनामे घेतले हे ही आपणास माहीत व्हावे लागेल.*
>>> हे खरं आहे काय? Sad

प्रकाश आंबेडकरांच्या हेकेखोर वागण्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोडली......

दलित नेते आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया......

बातमी........

दलितांनी एकत्र येऊन आपली प्रगती करावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य पणाला लावले........

आज त्यांचे दोन वारसच आपापसात भांडणार असतील तर बाकी समाज कसा एकत्र येणार आणि आपला विकास करणार........?
>> फेसबुकवर वाचलं. खरं खोटं अजून माहिती नाही.

टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीने येत्या २०२४ साली ‘लोकसभा’ निवड सोबत लढली तर महाराष्ट्राचे लोकनेते शरदचंद्रजी पवार हे नक्कीच पंतप्रधान होतील असं मत व्यक्त केलं आहे, शरद पवारांचे नातू ,कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी.औरंगाबाद येथे सेवा गौरव समिती यांच्या मार्फत आयोजित एका कार्यक्रमात रोहित पवार बोलत होते.

त्याचबरोबर पवार पुढे असेही म्हणाले की ‘साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. लोकसभेच्या वेळी म्हणजेच २०२४ ला एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. महाराष्ट्रात सगळं राजकारण आता सोपं झालं कारण राज्यात ‘महाविकास आघाडी’ झाली आहे.

त्याचबरोबर पवार पुढे असेही म्हणाले की ‘साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. लोकसभेच्या वेळी म्हणजेच २०२४ ला एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. महाराष्ट्रात सगळं राजकारण आता सोपं झालं कारण राज्यात ‘महाविकास आघाडी’ झाली आहे.

हायला

इथे मणिशंकर अय्यर भाजपाला सत्तेवरून खाली खेचायला थेट पाकिस्तानची मदत मागतो याचा व्हिडीओ पण आहे पण तरीही त्यांना अटक झाली नाही

आणि येथे हे महाशय सरकार उलथवण्याचे कारस्थान वगैरे बोलत आहेत. कोणताही पुरावा वगैरे काहीही न देता.

मग अण्णा हजारे एवढे शरद पवारांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होते त्याबद्दल तर श्री शरद पवारांना विनाचौकशी तुरुंगात डांबायला हवं होतं

आणि काळं मांजर "बापरे भयानक आहे हे" म्हणून रडारड करतंय

ह ह पु वा

>>> बापरे भयानक आहे हे , क्लबर्गी , दाभोलकर , पानसरे ह्यांनाही धमक्या आल्या होत्या >>>

मोदींनी यांची सुरक्षा कमी केल्याने हे नाटक रचले असावे. सवंग लोकप्रियता मिळविणे व स्वत:चे महत्त्व वाढविणे हे सुद्धा उद्देश असावे.

Pages