महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
असं कसं असं कसं
असं कसं असं कसं
कॉंग्रेसचा कावळा पण गोरा असतो.
नवीन घोषणा-- शिवभोजन थाळी
नवीन घोषणा-- शिवभोजन थाळी वरिष्ठ नागरिकांना फुकट देण्यात येईल. त्याला आधार कार्डाची गरज पडणार नाही
चौकशी केल्यावर सूत्रांनी असे सांगितले की ही बातमी सत्य आहे. ८५ वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना शिव भोजनथाळी विनामूल्य देण्यात येईल.
फक्त एकच अट आहे. वरिष्ठ नागरिकांनी आपल्या आई आणि वडील या दोघांना सोबत आणणे आवश्यक आहे. ))=((
आधारकार्ड लागणार वैगरे अफवा
आधारकार्ड लागणार वैगरे अफवा आहेत.
15 लाखाला काय लागणार ?
15 लाखाला काय लागणार ?
भाजपाचा मिस कॉल ?
शिव भोजन थाळी हीच अफवा आहे
शिव भोजन थाळी हीच अफवा आहे
10 रुपयात थाळी म्हणून मोक्याच्या जागा अडवत आणि नंतर त्या भय्या लोकांना विकून आपल्या तुंबड्या भरतील
1 रुपयात झुणका भाकर चं जसं झालं तसंच
सुबोधजी
सुबोधजी
१० रुपयात थाळी हे तुम्हाला योग्य वाटते?
१० रुपयात थाळी कशी देणार?
१० रुपयात थाळी कशी देणार?
ती तयार करायला शिधा,गॅस,मनुष्यबळ, जागा, वीज, पाणी इ बऱ्याच गोष्टी लागतात.
उगाच सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करणे आणि त्या प्रत्यक्षात आणणॅ यात फरक नाही का?
तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन तरी द्यायला लागेल कि नाही?
हे काय गुरुद्वारा मध्ये चालणारे लंगर आहे का? जेथे लोकांच्या सेवेवर आणि त्यांनी दिलेल्या अफाट देणग्यांवर कारभार एकाच ठिकाणी चालू असतो. प्रत्येक कोपर्या कोपऱ्यात नाही.
सरकारला एवढेच करायचे होते तर सरकारी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना १० रूपयात थाळी द्यायला सुरुवात करा. तेवढे जमले तर पुढे.
उगाच उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घ्यायचा
आणि मग परदेशातून लोक आणून इथे
आणि मग परदेशातून लोक आणून इथे वसवणे , हा कशाचा मुका ? जीराफ की टी रेक्स ?
आम्हाला टी रेक्स काँग्रेसने शिकवले नाही , स्पिलबर्गने शिकवले
आणि मग परदेशातून लोक आणून इथे
आणि मग परदेशातून लोक आणून इथे वसवणे , हा कशाचा मुका ? जीराफ की टी रेक्स ?
आम्हाला टी रेक्स काँग्रेसने शिकवले नाही , स्पिलबर्गने शिकवले
Submitted by BLACKCAT on 22 January, 2020 - 20:07
<<
मित्रा,
तुझे अगाध ज्ञान पाहाता, तुला साष्टांग नमस्कार घालायला हवा.
तरिही तुझ्या माहितीसाठी सांगतो. डिसेंबर २०१४ च्या आधीपासून, ज्या विदेशी (मुसलमान वगळता) नागरिकांनी भारतात शरण घेतले आहे, नागरिकता फक्त त्यानांच देण्यात येणार आहे.
आणि मुसलमानाने अदनान सामीगत
आणि मुसलमानाने अदनान सामीगत अर्ज केला तर ?
१० रुपयात थाळी कशी देणार?}}}}
१० रुपयात थाळी कशी देणार?}}}}} मागे पाच रुपये थाळीची पण चर्चा होती.
अम्मा कॅंटिन चालतंय की किती
अम्मा कॅंटिन चालतंय की किती वर्षं.
१० रुपयात थाळी कशी देणार?
१० रुपयात थाळी कशी देणार?
अनुमोदन.
फडणवीस 5 रुपयात देणार होते , तीच घेऊन 10 रु मध्ये द्यायची.
तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन तरी द्यायला लागेल कि नाही?
अनुमोदन.
डिटेन्शन केम्पच्या स्टाफलाही लागेल.
उद्धव ठाकरे पूर्वी तमाम हिंदू
उद्धव ठाकरे पूर्वी तमाम हिंदू बंधू भगिनी अन मातानो असे म्हणायचे म्हणे
आता फक्त तमाम बंधू भगिनींनो म्हणतात
असा व्हिडीओ पाहिला
आधार कार्ड सरकारनेच दिले आहे
आधार कार्ड सरकारनेच दिले आहे व ते दाखवायला सांगताहेत, >>>
कसं आहे ना वॉर्डबोय,
डॉकटर लोक प्रिस्क्रीपशन देतात, पण पुढच्या वेळी तपासताना मागच्या वेळी दिलेलं प्रिस्क्रिपशन कुठे आहे ते दाखवा असं म्हणतात...
आता यापेक्षा सोपं उदाहरण मी देऊ शकत नाही...
पण प्रिस्क्रिप्शन नाही
पण प्रिस्क्रिप्शन नाही दाखवले तर हा आमचा पेशंट नाही, असे म्हणत नाहीत.
आमचे पेशंट बुक ट्रेन मध्ये हरवतात , झोपडी तुटली , त्यात गेले म्हून सांगतात, आम्ही नावावरून पुन्हा एक्सेल सर्च करून नवीन बुक बनवून देतो
( आमचे प्रिस्क्रिप्शन एक छापील बुक असते, त्याला ग्रीन बुक म्हणतात)
वॉर्डबोय पण बुक बनवून देतात?
वॉर्डबोय पण बुक बनवून देतात? कमाल आहे...
मग कोण बनवतात ?
मग कोण बनवतात ?
मुख्यमंत्री ज्या खुर्चीवर
मुख्यमंत्री ज्या खुर्चीवर बसले आहेत ती खुर्ची पेशव्याची हे लक्षात ठेवावे---- उदयसिंग पेशवे

आता हे काय नविन
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/city/mangaluru/techie-surrenders-in-...
मंगलोरात बॉम्ब प्रकरणात संघ सेवक आदित्य राव सापडला.
http://www.jantakareporter.com/india/depression-theory-coined-after-terr...
फडणवीस पाच रुपयांची थाळी घेऊन
फडणवीस पाच रुपयांची थाळी घेऊन आले असते तर खरेण्णा त्या निर्णयास पाठिंबा द्यावयास केवढी मेहनत करावी लागली असती नै? बिच्चारे.
ते सगळं सोडा.. महा च्या
ते सगळं सोडा.. महा च्या राजकारणात आजवरील सर्वात अभूतपूर्व वळण आता आले आहे.
सेने ने राहुल गांधी यांना आयोध्येला येण्याचे (ऊध्द ठाकरे यांचेबरोबर) निमंत्रण दिले आहे!, तेही सार्वजनिक रीत्या. आता बोला.
आता काय करणार राहुल आणि काँ? या तिघाडी सरकारचा प्रत्येक दिवस नविन मनोरंजन घेऊन येतो..
कधी अशोक चव्हाण , कधी संजय राऊत, कधी बाबा चव्हाण, कधी आव्हाड, कधी नवाब मलिक...
त्यात आजकाल प्रत्येक विषयावर जातीयवादी धार सोडण्याची पुतण्यापेक्षा काकां ना जस्त खुमखुमी आहे...
राज्यात शेतकर्याचा सातबारा अजून कोरा होईना पण छोटे नवाब मुंबई च्या नाईट लाइफ बद्दल अधिक आस्था बाळगून आहेत..
पण ही आयोध्या आमंत्रणाची बातमी म्हणजे आजवरची सर्वात भन्नाट गुगली आहे.. खेळा वा खेळू नका, सगळ्य्या यष्ट्या ऊध्वस्त!
शहा व मोदी हळूच गालात हसत असतील. मला वाटते तिघाडी सरकार पाडण्या साठी भाजपा व कं ला अजीबात काहीही प्रयत्न करावे लागणार नाहीत.
(आता ही गुगली सेनेच्या फेमस पोपटाने टाकली असेल तर या पोपटाचे काय करायचे हे मालकाला ठरवावे लागेल... आम्हाला मात्र मजा येत आहे.)
रच्याकने: मी काय म्हणतो, पुण्यात नाईट लाईफ नाही पण दु १ ते ४ नॉर्मल लाईफ सुरू ठेवायचे कधी मनावर घेईल हे सरकार?
पाच रुपयात थाळी देण्याची
पाच रुपयात थाळी देण्याची योजना सुद्धा तितकीच भंपक आहे जितकी 10 रुपयात देण्याची.
फालतू गोष्टींचे समर्थन करण्याची मला गरज नाही.
पण खुर्ची उध्दव ठाकरेंची
पण खुर्ची उध्दव ठाकरेंची नाहीच पेशव्यांची आहे असे बोलतोय हा कुणी नवा पेशवा.
अयोध्या वगैरे जस्ट धूळफेक आहे
अयोध्या वगैरे जस्ट धूळफेक आहे. ५ वर्षात राज्य भिकेला लावतील आणि पोराला अमेरिकेत सेटल करवतील .
आजच काँग्रेसच्या पोपटा चं
आजच काँग्रेसच्या पोपटा चं वक्तव्य आलंय की सगळे काँग्रेसी राम मंदिरात जातीलच. कारण काँग्रेसलाही अयोध्येत राममंदिर हवं होतं. त्यासाठी म्हणे राजीव गांधींनी प्रयत्न केलेले, पण जागेचा निकाल लागत नव्हता !
सिब्बल राम मंदिरात कधी जातो ते पहायचं आहे.
राम मंदिरचे दरवाजे राजीव
राम मंदिरचे दरवाजे राजीव गांधींनी उघडले ना?
आज्जीला पुरीच्या मंदिरातून हाककले होते की ती हिंदू नाही म्हणून , आता इथेही रजिस्टर आहे का?
राम मंदिरचे दरवाजे राजीव
राम मंदिरचे दरवाजे राजीव गांधींनी उघडले ना?
हो ना
राहुल गांधी आता जानवं घालून राम मंदिराचे पुजारी पण होणार.
आणि असदुद्दीन ओवेसी मंदिराच्या आवारात भगवी छाटी घालून देणग्या गोळा करायला पावती पुस्तक घेऊन बसणार.
त्यांना उद्धव ठाकरे देणगी देऊन पावती घेणार आहेत.
आणि हे सगळं सेक्युलर राष्ट्रासाठी आहे .
अजून किती अच्छे दिन हवे आहेत?
तुमचीही प्रगती झाली,
तुमचीही प्रगती झाली,
आज्जीला हिंदू नाही म्हणून घालवले अन ह्याला देवळात घेतले
हो ना
हो ना
मोदी आल्यापासून घर वापसी सुरु झालं आणि ओवेसी आणि फादर पोप सारख्याना उचक्या आणि जळजळ सुरु झाली.
म्हणून मग पुरस्कार वापसी आणि असहिष्णुता नाटकं सुरु झाली.
मुळात पहिली घर वापसी श्री शिवाजी महाराजांनी केली होती एवढे या राष्ट्रवादी किंवा शिवसैनिकांनी लक्षात ठेवले तर बरे.
पण ते गेलेत सोनिया मैनोच्या पदरात काँग्रेसच्या दारात सत्तेचा आवस मागायला
Pages