महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
मुंबई : पुराव्यांची खातरजमा
मुंबई : पुराव्यांची खातरजमा केल्यानंतरच कोरेगाव भीमा प्रकरणात डाव्यांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं शिवसेनेचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावर संशय उपस्थित करणाऱ्या शरद पवार यांना दीपक केसरकरांनी धक्का दिला आहे. सबळ पुराव्यांची खातरजमा केल्यानंतरच कोरेगाव भीमा प्रकरणात डाव्यांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात पोलिसांना हाताशी धरून भाजप सरकारनं जाणूनबुजून डाव्यांना टार्गेट केल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहन, त्यांनी एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी केलीय. मात्र भाजप सरकारच्या काळात दाखल झालेले गुन्हे योग्य असल्याचं म्हणत केसरकरांनी पवारांचा आरोप खोडून काढलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
https://marathi.abplive.com/news/deepak-kesarkar-on-koregaon-bhima-shara...
मतांसाठी शरद पवार किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
काकाची सूरक्षा हटवली म्हणं.
काकाची सूरक्षा हटवली म्हणं.
मतांसाठी शरद पवार किती
मतांसाठी शरद पवार किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
Submitted by सुबोध खरे on 25 January, 2020 - 09:27
२७ वर्षांपूर्वी बाँबस्फोटांची संख्या एकने वाढवणार्याकडून अजून काय अपेक्षा करायची?
सरकारला दणका दिलाय पवार
सरकारला दणका दिलाय पवार साहेबानी ते व्हीवळणारच होते.. पण महाराष्ट्रात पवार साहेबांच्या चाहत्या पैलवानांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलियचे ठरवली आहे..
अशीच जर एखाद्या भाजपच्या लाडक्या नेत्याची सुरक्षा काढली तर एकही भक्त जाणार नाही. तळलेला पापड, तुपाची धार सोडलेला केशरी भात, कोशंबीर खाउन भरल्यापोटी निषेध करतील.
https://www.esakal.com/pune/we-will-protect-sharad-pawar-says-maharashtr...
खरच यासम हाच नेता महाराष्ट्राचा चाणक्य.
पवार साहेबांनी भिमा कोरेगाव
पवार साहेबांनी भिमा कोरेगाव चौकशीचा विषय काढताच विजेच्या चपळाईने हे प्रकरण राज्यसरकारला पुर्वकल्पना न देता NIA कडे देणे हे पुरेसे बोलके आहे.
२७ वर्षांपूर्वी बाँबस्फोटांची
२७ वर्षांपूर्वी बाँबस्फोटांची संख्या एकने वाढवणार्याकडून अजून काय अपेक्षा करायची?))))))) हे सेम टु सेम महाभारतातील नरो वा कुंजरोवा टाईपचे उदाहरण आहे.
ह्याची कबुली पवारांनी तेव्हाच दिली होती व हे का जरुरी होते हे ही सांगितले होते. आता 'नावडतीचे मिठही अळणी' त्याला कोण काय करणार.
भक्त ही टर्म सध्या पाँप्युलर आहे त्यावरुन एक सांगतो.
मोदी मागे पायर्या चढताना पडले होते. तर यावरुन दोन भिन्न द्रुष्टिकोन कसे असतील ते पाहुया.
( टिव्हिवर मोदी पायर्या चढताना पडल्याची घटना पाहुन)
सर्वसामान्य मनुष्य--अरेरे, सांभाळुन चालायला हवे होते. गुडघ्याला मार लागला असेल.
भक्त-- (गालात हसुन) साहेब, उगाच पडणार नाहीत त्यामागेही काहीतरी कारण असेल.
पगारे पातळी सोडून काय पण बरळू
पगारे पातळी सोडून काय पण बरळू नकोस. दुसऱ्या ना भक्त म्हणताना तू पवारचा चाटू ( मोठा चमचा) आहेस हे पण अधोरेखित होते.
अहो राजदिप ते भक्तांसाठी आहे
अहो राजदिप ते भक्तांसाठी आहे तुम्ही का व्हिवळता?..
तुम्ही एक धर्मनिरपेक्ष द्रुष्टीचे अतुलनिय व्यक्तित्व आहात.
माझ्या बाबतीत म्हणाल तर मी जे देशहिताचे त्यांचा बाजुचा.
देशातील सर्व समाज हे एकोप्याने रहावेत, देशाच्या बहुरंगी, धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा गेला की की- बोर्ड वर टंकावे लागते त्यात कुणाला राग, वाईट, तळतळाट होत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे..
तुम्ही शरद पवार समर्थक ( चाटू
तुम्ही शरद पवार समर्थक ( चाटू) आहात हे मान्य करा की.
राजदीपजी,
राजदीपजी,
चाटु कोण असते हे मला माहीत नाही तुम्हाला अनुभव असेल तर ते काय असते व कशाप्रकारे करतात हे शेअर करावे.तुमचे अनुभव वाचायला आवडतील.
पवार साहेबांची भुमिका आज योग्य वाटतेय तर त्यांचे समर्थन करु उद्या त्यांची भुमिका अयोग्य वाटली तर टिका करु.
माझ्याकडे व्यक्तिला विरोध नसतो विचारसरणीला असतो.
यालाच आमच्या भाषेत चाटुगिरी
यालाच आमच्या भाषेत चाटुगिरी म्हणतात ना भो.
यालाच आमच्या भाषेत चाटुगिरी
यालाच आमच्या भाषेत चाटुगिरी म्हणतात ना भो.)))))
मग तुमची भाषा चुकीची आहे.
तुमचा सल्ल्यावरचा धागा वाचला संतुलित विचार आहेत. पण
जगासांगे सर्वज्ञान..... ही म्हण तुम्हाला सुट होईल असे वाटते.
लवकर बरे व्हा ह्या मनापासुन शुभेछा..
चाटुला काकांची सिक्युरिटी
चाटुला काकांची सिक्युरिटी काढलेली जाम झोंबलेल दिसतंय. आता जागेवरून न हलणाऱ्या माणसाची सिक्युरिटी सतत गोंडा घोळवत राहणाऱ्या त्याच्या चमच्यांसाठी काय कठीण गोष्ट आहे ? त्यांनी ती जरूर पुरवावी...
बाकी नकली चाणक्याने एक मोठी घोडचूक करून ठेवली. त्याने अर्बन नक्षलना आधीच क्लीन चिट देऊन टाकली. राजकारणात कधी काय बोलायचं ते कळत नसलं की अस होत. असो, एस आय टी मार्फत नकली चाणक्याने त्याच्या देशद्रोही सवंगड्याना जेलबाहेर काढू नये म्हणूनच सरकारने तपास एन आय ए कडे दिला. अर्थात, चाटू लोकांचा तिळपापड होऊन भक्त भक्त ऐसे त्यांचे ध्यान लागणे स्वाभाविक आहे, पण त्याला इलाज नाही.
शरद पवार हा मनुष्य फोडा व
शरद पवार हा मनुष्य फोडा व झोडा इंग्रज नितीमध्ये प्रवीण आहे. अल्पसंख्याक, मागासवर्गीय लोकांचा तारणहार असल्याचं भासवून त्यांना मेंढरांसारखं लांडग्याची भीती घालून आपल्या कळपात ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. मराठा समाजाला न्याय देऊ शकला नाही की त्यांची बाजू कधी घेतली नाही. तेलगी प्रकरणात नाव आलं होतं. भुजबळ सारख्या जेल भोगलेल्या माणसाला मंत्री केलं यातंच सगळं समजून येतं. तुम्ही स्वत: उघड्या डोळ्यांनी विचार करत असाल तर शरद पवार या माणसाची तूम्ही तळी उचलून धरली नसती.
देशाला बकाल करणार्या काॅग्रेस
देशाला बकाल करणार्या काॅग्रेस पक्षाची तयहयात तळी उचलणार्यांकडून कसली अपेक्षा ठेवणार म्हणा.
राजदीप तुमचा मुद्दा बरोबर आहे
राजदीप तुमचा मुद्दा बरोबर आहे पण निरीक्षण चुकलेय.पवार हे सर्वजन नेते आहेत त्यांनी अमक्या साठी हे केलय तमक्यासाठी ते केल नाही हे म्हणणे चुकीचे आहे.पंप्र ही त्यांना गुरु म्हणतात तुम्ही पंप्रना खोट ठरवताय का?
आणी घोटाळ्यांच म्हणाल तर सभेत अडाणी लोकांपुढे आरोप करणे वेगळे ते गुन्हेगार असतील तर मोदी सरकार कारवाई का करत नाही?
मी- माझांना उत्तर देण्यात अर्थ नाही ते शिव्या घालत घालतच टंकत असतात. स्वताभोवती गोलगोल फिरण्यासारख्या त्यांच्या पोस्ट असतात.
देशाला बकाल करणार्या काॅग्रेस
देशाला बकाल करणार्या काॅग्रेस पक्षाची तयहयात तळी उचलणार्यांकडून कसली अपेक्षा ठेवणार म्हणा.)))))) जिंदादील काँग्रेसच्या राज्यात तुमची काय बकाल अवस्था झाली ते वाचणे आवडेल. कारण माणुस स्वानुभवावरुन बर्याच गोष्टी लिहतो।
पंतप्रधान हे गुरुची विद्या
पंतप्रधान हे गुरुची विद्या गुरुवर उलटवणारे आहेत हे समजून असा. गुरुला वाटलं गेलाबाजार पंप्र नाही पण राष्ट्रपती तरी होता येतं का, यासाठी मोदींना बोलावून घेतले होते पण मोदींनी शरद पवार राष्ट्रपती होताच खंजीर खुपसतील म्हणून गुरुपद देऊन टाकले. पंतप्रधानांचे गुरू!! खरंच किती मोठी पदवी.
भुजबळ तुरुंगात कधी गेलते ?
भुजबळ तुरुंगात कधी गेलते ?
पंप्र हे राजकारणात हुशार आहेत
पंप्र हे राजकारणात हुशार आहेत. तुम्ही बोलता तसाही त्यांचा हेतु असेल.. पण पवारांनी बोलावणे व त्यांनी येणे ही मोठी गोष्ट आहे.पवारांचे महत्व ते जाणुन आहेत..पवारांना कुठली गोष्ट खटकली त्यांचा खंजीर रेडीच असतो. पण चुक झाली की ते माघारही घेतात. मनमिळावु व्यक्तित्व आहे ईगोइस्ट नाही.
खरच यासम हाच.
भुजबळ तुरुंगात कधी गेलते ?
भुजबळ तुरुंगात कधी गेलते ?
नवीन Submitted by BLACKCAT on 25 January, 2020 - 14:42 >>>
त्यांना स्वतःला काय काय रोग झालेत हे त्यांनी स्वतः ओळखण्या आधी काही दिवस ते जेलात गेलते...
मग घेत चला त्यांचे चरणतीर्थ!
खरच यासम हाच.
Submitted by सचिन पगारे on 25 January, 2020 - 04:19
>>>मग घेत चला त्यांचे चरणतीर्थ! की रोज घेऊनच इकडं येता!
पण ते मंत्री झालेले तेंव्हा
पण ते मंत्री झालेले तेंव्हा तर ते क्लीन चिटेड होते ना ?
मग घेत चला त्यांचे चरणतीर्थ!
मग घेत चला त्यांचे चरणतीर्थ! की रोज घेऊनच इकडं येता!))))) देव, चमत्कार, तिर्थ, चरणतिर्थ या दुबळ्या लोकांच्या मनःशातीसाठीच्या गोष्टी आहेत असे माझे वै. मत आहे.
विचार, आचार, माणुसकी या विचारांचे तिर्थ पिणार्या व्यक्तिला याची गरज लागत नसते.
महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणात
महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणात राज्य शासनाचे ८४० कोटींचे नुकसान झाले. त्यास भुजबळ हेच जबाबदार आहेत, असे आरोपपत्रात नमूद आहे. २९१ कोटींच्या मालमत्तेचा आतापर्यंत संचालनालयाला शोध घेता आला आहे. २००७ ते २०१० या काळात १२३ कोटी रुपये सुरेश जाजोदिया, चंद्रशेखर सारडा, प्रवीण जैन आणि संजीव जैन यांच्यामार्फत विविध कंपन्यांत गुंतवून त्या मोबदल्यात समभाग घेतल्याचेही दाखविण्यात आले असले तरी हे बनावट व्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परवेझ कन्स्ट्रक्शन या कंपनीला ७० कोटी रुपये १९ कंपन्यांकडून मिळाले आहेत तर आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीला १८ कंपन्यांकडून ५१ कोटी मिळाले आहेत. या नोंदीही बनावट असल्याचा आरोप आहे. उपलब्ध कागदपत्रावरून काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेत छगन व समीर भुजबळ यांनी प्रमुख भूमिका बजावल्याचा आरोप आहे. या पुरवणी आरोपपत्राची (काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद क्र. ३/१८) प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.
काय आहे आरोपपत्रात?
छगन भुजबळ – रोखीने मोठय़ा प्रमाणात लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्यांच्या व कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या कंपन्यांमार्फत काळा पैसा पांढरा केला. गुन्ह्य़ातील रकमेशी त्यांचा थेट संबंध असून बेकायदा व भ्रष्ट मार्गाचा त्यासाठी अवलंब केला. या पैशाचा वापर करून स्वत:च्या तसेच कुटुंबियांच्या नावे मालमत्ता खरेदी केली.
समीर भुजबळ – भुजबळ कुटुंबियांच्या अनेक कंपन्यांचे नियंत्रण त्यांच्याकडे होते. लाचेच्या मार्गातून मिळालेली रोकड बनावट नोंदी दाखवून विविध कंपन्यांमार्फत फिरवली. रोखीच्या स्वरूपात आलेली रक्कम बनावट कंपन्यांद्वारे बेकायदेशीररीत्या उच्च किमतीच्या समभागांच्या स्वरूपात पुन्हा आपल्या कंपन्यांत आणली. याशिवाय रोख रकमेच्या मोबदल्यात धनादेशही मोठय़ा प्रमाणावर स्वीकारले. >>> गुगल सर्च वर लोकसत्तामध्ये आलेली बातमी.
जिंदादील काँग्रेसच्या राज्यात
जिंदादील काँग्रेसच्या राज्यात तुमची काय बकाल अवस्था झाली ते वाचणे आवडेल. कारण माणुस स्वानुभवावरुन बर्याच गोष्टी लिहतो।>>>>
मी देशाची म्हणालो, माझी नाही.
पदोपदी दिसणारी आर्थिक विषमता, लायसन्स राज राबवून धनाढ्यांना अजून धनाढ्य बनवणारी व्यवस्था, चेलेचपाट्यांची आणि त्यांच्या सातपिढ्यांची कष्टकरी नागरिकांचे आर्थिक शोषण करून सोय करून देणारी व्यवस्था. जात-धर्म यावरून समाजात नेहमीच दुही पसरवून स्वतःचे शासन करू पहाणारी यंत्रणा, गरीबांचे आर्थिक शोषण करून गुंडांमार्फंत त्यांच्यावर वचक ठेवणारी आणि त्या गुंडांचे आर्थिक हित आणि सामाजिक पत वाढवणारी यंत्रणा राबवणारा काॅग्रेस पक्ष मी पाहिला आहे.
काँग्रेसने गरीबी हटाव नारा
काँग्रेसने गरीबी हटाव नारा दिला.....आज मायबोलीवर कोण गरीब राहीले असतील तर त्यांचे अनुभव वाचायला आवडतील.
काँग्रेसने गरीबी हटाव नारा
काँग्रेसने गरीबी हटाव नारा दिला.....आज मायबोलीवर कोण गरीब राहीले असतील तर त्यांचे अनुभव वाचायला आवडतील.
नवीन Submitted by सचिन पगारे on 25 January, 2020 - 18:22
>><<
"राष्ट्रीय विदुषक" व त्याचे भाट "कॉंग्रेस का हाथ, गरिबो के साथ" असे दिवसातून पंधरा वेळा बोंबलत असतात, त्यांना जाऊन त्यांचे अनुभव विचारा ?
तोंड दाबुन बुक्क्यांचा मार .
तोंड दाबुन बुक्क्यांचा मार .
--
https://www.facebook.com/groups/195605761138010/permalink/47944404608751...
काँग्रेसने गरीबी हटाव नारा
काँग्रेसने गरीबी हटाव नारा दिला.....आज मायबोलीवर कोण गरीब राहीले असतील तर त्यांचे अनुभव वाचायला आवडतील.>>>> नारा दिला पण उपाय काय केले. गरीबी हटवता हटवता गरीबांचे शोषण करून चेलेचपाट्यांची सोय केली. म्हणून तर तुमचे युवराज म्हणतात गरीबी असं काही नाही, ती एक मानसिक अवस्था आहे.
राहता राहिला प्रश्न माबोवरील गरीबांचा तर एव्हढंच म्हणेन लवकर बरे व्हा. कारण गरीबी काय असते ते तुमच्या युवराजाप्रमाणे चेल्यांना सुध्दा माहित नाही हे दिसतंय.
Pages