महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा करायचा होता मग.
१०५ आले,१०५ आले लोणचे घालायचे का त्यांचे सत्ता मिळवु शकले नाहीत.
जागतिक दर्जाचा नेता , आकडेवारीच्या खेळात माहिर शहा यांच्या प्रचारसभा होउनही फक्त १०५.
कर्नाटकातही क्लियरकट सत्ता नाही नाकातोंडात पाणी गेले होते कसाबसा किनारा गाठला.
झारखंडमध्ये तर एकदम थंड.
महाराष्ट्रशक्तिपुढे जि.प मध्ये भुईसपाट.

सचिन पगारे, यार बस कर की आता हा येड्चाप चाटुपणा, बाळबोध प्रतिसाद लिहिण्याची सुद्धा एक लिमिट असते. आधी ती करमणुक वाटायची, आता तुझ्या बाळबोध प्रतिक्रिया वाचुन शिसारी येतेय. १००% अपयश काय, महाराष्ट्रशक्ती काय, तिन्ही पक्षांचे मार्गदर्शक काय...

मुर्खांना मी सिरियसली घेत नाही.. काळजी नसावी. बाकी शिसारी आली असं मी लिहिलंय (राग नव्हे) , त्याचं आकलन मुर्खाला झालेलं दिसत नाही....

मुर्खांना मी सिरियसली घेत नाही.. काळजी नसावी. ))))) पण मी घेतो..राग, शिसारी सोडा देश विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर आहे.

>>> सचिन पगारे, यार बस कर की आता हा येड्चाप चाटुपणा, बाळबोध प्रतिसाद लिहिण्याची सुद्धा एक लिमिट असते. आधी ती करमणुक वाटायची, आता तुझ्या बाळबोध प्रतिक्रिया वाचुन शिसारी येतेय. १००% अपयश काय, महाराष्ट्रशक्ती काय, तिन्ही पक्षांचे मार्गदर्शक काय... >>>

पगारेंचा मूर्खपणा मी एंजॉय करतो. पप्पू आणि राजच्या सभेला बरेच लोक येतात. त्यांना वाटतं की आपले महनीय विचार ऐका़यला लोक आलेत. पण ते लोक फुकटची करमणूक करून घ्यायला येतात.

तसंच इथेही आहे.

भारत विश्वगुरु

मोदी भारतगुरु

पवार मोदीगुरु

तो बडा कौन ?

https://www.youtube.com/watch?v=XPny5hFx7W0

हो गई है पीर पर्वत सी पिघीलनी चाहिये
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिये

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नही
मेरी कोशिश है कि ये सुरत बदलनी चाहिये

भरत सारखे लोक पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असतात.<<<

मी-माझा,

मला तुम्हाला उद्देशून असे काही लिहिण्याचा अधिकार नाही, पण मनात एक विचार आला तेवढा मांडतो

भरत कधीही इतके वैयक्तिक झालेले मी पाहिलेले नाहीत. त्यांना थेट तुम्ही वर म्हणालात तसे कृपया ठरवू नका ही विनंती!

ते मुद्देसूद लिहितात व त्याचा मुद्देसूद प्रतिवाद तुम्ही सगळे करत असता आणि ते वाचनीय व रंजकही असते.

बाकी, आंतरजालावर एकमेकांवर शाब्दिक कुरघोड्या करून काही हाती लागत नाही हे मला शिकायला खूप वर्षे लागली. अजूनही ते मी पूर्णपणे शिकलो नसेन याचेही कदाचित काही पुरावे आगामी काळात मीच येथे पुरवेन. पण सध्या मला हा प्रतिसाद खटकला म्हणून तेवढे लिहिले. कृपया राग नसावा.

स्माईल.

काहीही अंगाला लावून न घेता, अतिशय संयत भाषेत आगी लावणारे धागे काढणाऱ्यांचे मनोरंजन मूल्य जबरदस्त असले तरी ते खरे घातक आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे आहे. काही वर्षांपूर्वी मी अशा व्यक्तीबद्दल सातत्याने हेच म्हणत होतो.

यात आगी लावण्याआगत काय आहे ?

तुमचे धागे , मोदींचे 1 वर्ष , नोटांबंदी , अतिरेकी खात्मा वगैरे आहेत की
त्यांचे फॉलो अप घ्या,

घर पेटवणे सोपे असते, चूल पेटवणे अवघड - असे कालच मा मु ठाकरेजि बोलले आहेत,

स्वतःच्या एकाही ह्या धाग्याचे फॉलो अप कुणी घेत नाही

जसे आपण हिंदी चित्रपटात पाहतो की नायक खलनायक मध्ये मारामारी सुरू असते त्यात नायक सपाटून मार खातो. आपल्याला वाटतं नायक खपला आता. पण हळूहळू तो उठतो, अचानक त्याच्या शरीरात जोश येतो आणि तो खलनायकचे तीन तेरा वाजवतो. तसेच राहुलजी मोदीजींचे तीन तेरा वाजवत आहेत.
(पगारे सरांची पुढची पोस्ट ही असू शकते. मी फक्त अंदाज लावलाय)

घर पेटवणे सोपे असते, चूल पेटवणे अवघड - असे कालच मा मु ठाकरेजि बोलले आहेत
नवीन Submitted by BLACKCAT on 10 January, 2020 - 13:10
<<

कोण बोलतेय ते पाहा.
ज्यांच्या पक्षाचे नावच "राडा" सेना आहे, ते आज दुसर्‍याला अक्कल शिकवत आहेत.

कर्नाटकात पोटनिवडणुकीत १५ पैकी जेमतेम १२ जागा जिंकल्या... तिथला शपथविधी झाला कि नाही? कुठे बातमी दिसलीच नाही.

Budget 2020: Niti Aayog shocker; Poverty, hunger and income inequality up in 22 to 25 States and UTs
Forget GDP growth rate for the moment. Niti Aayog's SDG Index 2019, released on December 27, 2019, says that more Indians have fallen into poverty, hunger and income inequality in the past two years. This is after a remarkable reduction in poverty between 2005-06 and 2015-16

https://www.businesstoday.in/union-budget-2020/news/budget-2020-niti-aay...

राडा सेना!

30 वर्षे युती होती की !!

गर्ल फ्रेंड सोडून गेली की ती किती वाईट होती ह्याचा साक्षात्कार होतो म्हणे

Proud

फडणवीस अन ठाकरे दोघेही नाचत होते , जिंकले की अयोध्येला जाणार , कोण गेले शेवटी ?

मला वाटतं पेड रिक्षा सध्या दिल्ली ला फिरते आहे... !
नवीन Submitted by योग on 10 January, 2020 - 17:32
--

अगदी,
"अवार्ड वापसी" ची नौंटकी फेल झाल्यावर पाकिस्तान प्रेमी, अर्बन नक्षली व तुकडे गॅंग यांनी पुर्वनियोजित पणे, दिल्ली विधानसभा निवडणुक समोर बघून, स्वत:च्या राजकिय हितासाठी देशात हिंसक आंदोलने करुन सर्व सामन्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. ह्या सर्व आंदोलनांना आर्थिक मदत पुरवण्यामागे पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी ISI असल्याची बातमी आहे.

>>> "अवार्ड वापसी" ची नौंटकी फेल झाल्यावर पाकिस्तान प्रेमी, अर्बन नक्षली व तुकडे गॅंग यांनी पुर्वनियोजित पणे, दिल्ली विधानसभा निवडणुक समोर बघून, स्वत:च्या राजकिय हितासाठी देशात हिंसक आंदोलने करुन सर्व सामन्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. >>>

२०१५ बिहार निवडणुक - पुरस्कार परती नौटंकी

२०१७ गुजरात निवडणुक - ३ वर्षांपूर्वी नैसर्गिक मृत्यु आलेल्या लोयांच्या मृत्युवर संशय व्यक्त करणे, जय शहांविरूद्ध खोटे आरोप करणे

२०२० दिल्ली निवडणुक - पाकिस्तानप्रेमींची हिंसक आंदोलने

<पाकिस्तान प्रेमी, अर्बन नक्षली व तुकडे गॅंग यांनी >

प्रत्येक प्रतिसादातलं विशेषणांचं लटांबर पाहून कोणाची तरी आठवण झाली.

>>इतक्या पोस्ट्स बघुन मला वाटलं अजून काही नविन वळण लागलं की काय....
Rofl
प्रयत्न जोरदार असतो पण रीक्षावाला नविन वळणावर जायला नकार देतो.. एकाच रस्त्यावर फेर्‍या घालून हॉर्न वाजवून लक्ष वेधून घेणे सुरू असते.

महाराष्ट्रातील महत्वाची घडामोड
अजित पवारांनी डाँ. आंबेडकरांच्या नियोजीत स्मारकाची उंची जी २५० फुट होती ती वाढवुन ३५० फुट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगितले.

शरदचंद्र पवारांचे खळबळजनक विधान- रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते.

Pages