लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही मामी, एक आई आणि छोटी मुलगी, बांबूचे घर, अंगण असं आहे. त्या मुलीला पटकन काहीतरी पदार्थ करून भरवते मग आपण खाते असं बघितल्याचे आठवते, मे बी सरमिसळ होत असेल.

त्या अंगणात उभं राहून पदार्थ करते, मुलगी खुर्चीवर बसून गप्पा मारते.

हल्ली सुटली सवय, मामी तू ओळख करून दिल्यावर लीझिकी, साधना यांनी ओळख करून दिल्यावर डीयांशी बघत होते तेव्हाच अनेक त्या प्रकारचे व्हिडीओ सजेस्ट करायचं youtube त्यावेळी बरेच वेगवेगळे बघितले गेलेत. आता gap पडली परत.

एक बहुतेक फिलिपीनो कुटुंब आहे. आई बाबा व 2 मुले. त्यांची गाडी कुठल्या शतकातील आहे देव जाणे. एकदा त्यांनी चौकोनी जाळे लावून खेकडे पकडले होते.

नाही मामी, एक आई आणि छोटी मुलगी, बांबूचे घर, अंगण असं आहे.

लीकडे पण बांबूचा नळ आहे. ही आई व मुलीची जोडी वेगळी आहे. ती पण छान आहे.

लॉंगमेईमेई ही आई मुलगी जोडी.

अजून एक कंट्रीसाईड लाईफ टीव्ही चॅनेल आहे.ती मुलगी कंबोडियन आहे.

अजून एक कंट्रीसाईड लाईफ टीव्ही चॅनेल आहे.ती मुलगी कंबोडियन आहे. - हे लिहिलंय मी मागच्या पानावर, साधना. पोलिन लाईफस्टाईल.

धन्यवाद सर्वांना. आमच्या कडे काही काही विडियो रिपीट मोड वर पाहिले जात आहेत. मीही लगेच संधी साधून असं केलं पाहिजे वगैरे उपदेश करत आहे Wink

गेल्या 2 दिवसात 7-8अ विडीओ बघितल्या. त्यातल्या त्यात Handicraft प्लेलिस्ट पुर्ण बघितली. हि चिनी बाई आणखी काय काय करु शकते हा प्रश्न पडला..
शेती, विणकाम, भरतकाम(?), पेटींग्स ,त्यात तिन स्वतः वेगवेगळ्या शेड्सचे तयार केलेले चारकोल बघुन हेवा वाटला.

रच्याकने तिने सोया सॉसची रेसिपी दाखवलीये. त्यातले बुरशी लागलेले सोयाबिन बघुन डोळे दिपले. Wink आजवर एकदाही मी चायनिज ट्राय केल नाही. याच दुःख आता वाटणार नाही! Proud

त्यातले बुरशी लागलेले सोयाबिन बघुन डोळे दिपले. आजवर एकदाही मी चायनिज ट्राय केल नाही. याच दुःख आता वाटणार नाही!>>>>>

तिने दाखवलेली औठेंटिक रेसिपी आहे ज्यात बुरशीयुक्त सोयाबीन असणे आवश्यक आहे.

जी सौसेस कमर्शियली बनवतात त्यात सोयाबीन केमिकल वापरून कुजवतात. नैसर्गिक बुरशी येणे व कुजवणे यात खूप फरक आहे. आपण कुजवलेल्या सोयाबीनचे सौस खाऊन तब्येत खराब करून घेतो. त्यामुळे चायनीज खाल्ले नाही याचा आनंद वाटायला हवा. Happy Happy

अजून एक कंट्रीसाईड लाईफ टीव्ही चॅनेल आहे.ती मुलगी कंबोडियन आहे. - हे लिहिलंय मी मागच्या पानावर, साधना. पोलिन लाईफस्टाईल.>>>>

Ok.

ह्या नावाची दोन वेगवेगळी चॅनेल्स आहेत. पोलिन ही काही वेगळी लाईफस्टाईल आहे का? मी कंट्रीसाईडचा 1 विडिओ बघितला, कसावाच्या कंदाच्या केळीच्या पानात गुंडाळून केलेल्या गोड पातोळ्या Happy

सगळ्या व्हिडिओतील कित्येक रेसिपीतील साम्ये बघून गम्मत वाटते. भाज्या तर सगळ्या ओळखीच्या दिसतात.... मी तर झाडेही ओळखायचा प्रयत्न करत असते. फक्त हम्मा आपल्या नाहीत Happy Happy

देतलिझिकी टीम बद्दल पुढे:

ती जे अन्न बनवते त्या रेसिपी बद्दल रिसर्च करून त्या रेसीपी स्टेप बाय स्टेप तयार ठेवणारी टीम.
अ‍ॅक्चुअल शेफ जे ही ट्राय करून चेक करून तिला प्रोसेस देतात शूट करायला व क्रम सांगतात हे बनव ते बनव असे सजव ते लोक्स
फूड स्टायलिस्ट व डिझायनरस. त्या रेसीपीचे शॉट्स बघितले तर अतिशय आर्टिस्टिक पद्धतीने असतात आपल्याला अगदी मोहुन टाकतात तर त्या तसे सजवणारे लोक.
वापरलेली भांडी पातेली डिझाइन करणारे, व मग ते बनवणारे लोक. व मग ते फोटो घेउन ऑनलाइन शॉप मध्ये टाकणा रे, ऑर्डर प्रोसेस करणारे व डिलिव्हरी तुम्हाला घरी आणून देणारे थर्ड पार्टी सप्लायर्सचे लोक

महत्वाचे म्हणजे युट्युब ची पेरेंट कंपनी गूगल ला चीन मध्ये प्रवेश नाही तरीही सरकारने हिला तिथे व्हिडीओ टाकू दिले आहेत मग ते अपलोड
कुठुन होत असतील? बहुतेक हाँग काँग किवा जो सेट प असेल तो मॅनेज करणा री आयटी सपोर्ट टीम

हे लिहायचे कारण ही पण माणसे आहेत जी बॅक रूम मध्ये राबून एक उत्कृष्ट व्हिजुअल बर्फी आपल्याला देतात. त्यातले किती आता आजारी पडले असतील वगिअरे कळायला मार्गच नाही. त्यांच्या मेहनतीची जाणीव असावी.

ट्विटर वर च चायनीज सिटिझन जर्नालिस्ट चे हाल बघितले तर फरक कळेल. एक माणूस वूहा न मधून हॉस्पिटल वगैरे मधून शूट करून अपलोड करत होता तर त्याला पकडून चौदा दिवस सक्तीने क्वारंटाइ न मध्येच ठेवले गेले आहे. त्याला शोधावे असे आईने अपील केले आहे.
पण सध्या बेपत्ता!!! ट्विटर वर त्याचा रडका व त्रस्त चेहरा दिसतो मागे हॉस्पिटल ची अवस्था दिसते गाड्या भरलेल्या बॉडी बॅग्स आहेत खूप
अव घड परिस्थिती आहे.

अमा,
विचार करण्याजोगी पोस्ट आहे.
आपण व्हिडीओ बघू आणि आवडवू शकतोच.
फक्त हे सर्व जेन्यूईन असेल अशी आशा न ठेवता.

लॉंगमेईमेई ही आई मुलगी जोडी. >>> ही पण छान आहे पण मी म्हणतेय ती हि पण नाहीये.

Sorry हीच आहे, पण मुलगी मोठी वाटतेय आता जरा, आतमध्ये पण करते आता रेसिपीज. मी बघितले होते त्यातला व्हिडीओ पोस्ट करते असा होता. बाहेर करायची रेसिपीज आणि मुलगी जरा लहान होती तेव्हाचे बघितलेले .

https://www.youtube.com/watch?v=vx28oM0ljmU

Thank u मामी, परत हिला बघता आलं.

https://www.youtube.com/watch?v=rUrRTU82Jus >>> हा तामिळनाडूमधला. ह्याची पण कोणीतरी ओळख मागे करून दिलेली इथेच. पायसम आणि शेवयाची खीर, मस्त दिसतेय. पण पायसम मध्ये पापड का घातले, केळ्याचे काप ok पण पापड. मला आधी वाटलं दोन गोड गोड म्हणून सोबत पापड तळले असतील.

हा तामिळनाडूमधला. ह्याची पण कोणीतरी ओळख मागे करून दिलेली इथेच. >> मीच दिली होती.

लॉंगमेईमेई ही आई मुलगी जोडी. >>> ही पण छान आहे पण मी म्हणतेय ती हि पण नाहीये.

Sorry हीच आहे, पण मुलगी मोठी वाटतेय आता जरा, आतमध्ये पण करते आता रेसिपीज. मी बघितले होते त्यातला व्हिडीओ पोस्ट करते असा होता. बाहेर करायची रेसिपीज आणि मुलगी जरा लहान होती तेव्हाचे बघितलेले .
https://www.youtube.com/watch?v=vx28oM0ljmU
Thank u मामी, परत हिला बघता आलं. >> हा व्हिडिओ धन्य आहे. ती नक्की काय करते कळतच नाही. ऑरेंज ज्युसम्ध्ये अंडी घालून फेटली की नुसतीच अंडी फेटून रिकाम्या संत्र्यात घातली देव जाणे. साखर पण नाही वापरली. कसली मिनिमॅलिस्टिक आहे ही.

https://www.youtube.com/watch?v=Hi4n2_dF-po >>> ही आपली गावाकडची वाट. ह्यातल्या काही काही रेसिपीज बघते कधी कधी. फार natural वाटतात, गावरान एक चव किंवा हे व्हिडीओज.

हा माणूस शेवटी म्हणतो की तुम्हाला आवडलं तरच like करा. मस्त आहे वरचे तोंडीलावणे.

साखर पण नाही वापरली. कसली मिनिमॅलिस्टिक आहे ही. >>> अंडी गोड असतील Lol , थोडं संत्र पण घालायला हवं होतं, ज्यूस घालायला हवा होता.

मीच दिली होती. >>> हो हो आठवलं, तूच ती तूच ती.

गावाकडची वाट मला वाटत थोडस अजुन इम्प्रुव्ह करता यायला पाहिजे. गावरान चव मध्ये स्वच्छता,वगैरे अगदी छान मेंन्टेन केली आहे.
अर्थात थोडा सम्रुद्धीचा भाग आहे. कोल्हापुर कडचा भाग पाणि, माती,भाज्या वगैरे बाबतीत पंढरपुर भागापेक्षा बराच जास्त नशिबवान आहे.

आणि मी बहुदा बायस्ड पण असेन. Happy
हे सगळे यु ट्युब वरचे व्हिडिओ बघुन यावेळी गार्डनिंग सुरु करताना (नविन घरामुळ नविन सुरुवात होती.) बरच डॉक्युमेंटेशन करावस वाटल. पण कित्ती कष्टाच काम आहे अस वाटल. खरच उत्साही आणि कष्टाळु लोक आहेत ही सगळी. काम करण आणि त्याचबरोबर ते डॉक्युमेंट करण खुप कठीण काम आहे एकंदरीत.

गार्ड्निंगचे व्हिडिओ भारतातले आणि इथले अमेरिकेतले दोन्ही जबरी आहेत बरेच चॅनेलचे.

https://www.youtube.com/watch?v=Ec_PfB6jKfA

हुरडा पार्टी, स्पेशल डीश चॅनेल. हे एक सापडलं पण ह्यात ती रेसिपीज घरात किचनमधे करते. आलु पराठा बघितला आणि त्यांचं घर दाखवलं तो एक व्हिडीओ बघितला. आता शेतातली हुरडा पार्टी बघतेय.

https://www.youtube.com/watch?v=cLUgX7hu7gg ही अजून एक हुरडा पार्टी.

अन्जू ते तामिळनाडूमधले व्हिडिओ पाहिले. हो पायसममध्ये पापडाचं प्रयोजन कळलं नाही.
सांबार एपिसोडमध्ये बटाट्यापासून जवळपास सर्व भाज्या ढकलल्यात. ठराविकच घालतात ना खरं?. Uhoh

https://www.youtube.com/watch?v=N78qUjxnrAE >>> हे एक चॅनेल सापडलं, सुशिला पदार्थ आणि शेतात आमटी, झुणका, भाकर असा बेत केलाय त्या मुलीने. तिच्या बटांना मधे मधे हात लावते, जशा सिरीयल्समधे मुली स्वयंपाक करताना केसाला हात लावतात तसं. ते जरा आवडलं नाही. बाकी सर्व छान केलं तिने.

ठराविकच घालतात ना खरं? >>> हो ना. अर्थात तमिळनाडूमधे कोणी राहीलं असेल ते नीट सांगु शकतील.

त्या गावरान एक खरी चव वाल्या काकूंची साडे बारा एकर शेती आहे जी व्हिडिओत दिसते ती. बागायती साडे बारा एकर आणि कोल्हापुरात ☺️

Pages