लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.
गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.
लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.
ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.
तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.
जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!
तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.
तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.
शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!
*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/
अंजु, मस्त ग, कोकमे आगळात
अंजु, मस्त ग, कोकमे आगळात बुडवून करतात हे ऐकून होते , गावी थोडेफार बघितले होते पण पूर्ण प्रोसेस आज बघितली. बियांच्या आतल्या बियाचा गर पाण्यात उकडत ठेवतात, कोकम बटर आपोआप वर तरंगते. आपल्या नेहमीच्या तापमानाला ते गोठते. गावी मुठीयाल म्हणतात, व्हिडिओत पण तेच म्हटले. मुठीन्नी वळून बनवतात म्हणून बहुतेक मुठियाल म्हणत असावेत.
सुनील डिमेलोचे वसई विडिओ पण इंटरेस्टिंग आहेत.
शेतीमध्ये रस असलेल्या लोकांना
शेतीमध्ये रस असलेल्या लोकांना इंटरेस्टिंग वाटेल असे एक चॅनेल. लोहारकाम व इतर कामेही हा बाबा करतो.
मणिपूरची संस्कृती दाखवणारे हे
मणिपूरची संस्कृती दाखवणारे हे एक चॅनेल.
लिझिकीच्या विडिओजवर आपल्या सप्तभगिनी भागातील लोकांच्या नेहमी कमेंट्स असतात. जेवणाचे प्रकार सारखेच आहेत म्हणून.
रातांबे बघून उन्हाळ्याची
रातांबे बघून उन्हाळ्याची सुट्टी आठवली देवरूखला घालवलेली. रातांबे खाउन खाउन एक पिवळा राब बसायचा दातावर, आणि रातांब्याच्या गराचं ताजं सरबत काय लागतं ! स्लर्प.
रातांब्याच्या गराचं ताजं सरबत
रातांब्याच्या गराचं ताजं सरबत काय लागतं ! >>> वाह खरंच, काय आठवण काढलीस.
साधना, मस्त मस्त. बघते नीट नंतर.
त्या श्रीलंकन मुलीने केळं
त्या श्रीलंकन मुलीने केळं वेताच्या टोपल्यावर झारवून शिकरण केलं
आम्ही फोडी करून केलेलं पण बरं होतं हो.आता ती आत केळ्याचे चिकट मायक्रो अवशेष चिकटलेली टोपली धुणार कोण आहे तिच्यात?
आता ती आत केळ्याचे चिकट
आता ती आत केळ्याचे चिकट मायक्रो अवशेष चिकटलेली टोपली धुणार कोण आहे तिच्यात? >> ती नक्की नेहमी हातानं कुस्करत असणार. लिझिकीची कॉपी मारायला बळंच टोपल्या वगैरे वापरतेय. फोडी करून शिक्रणाला चव कशी येणार गं?
अनु, झारवून शब्द मस्त आहे. मी कधी वापरला नव्हता.
तिची भाज्या धूवायची जागाही
तिची भाज्या धूवायची जागाही , लिझिकीकडच्या सारखी आहे . पाईपातून येणार वाहत पाणी
हो ना. यापेक्षा तिनं श्रीलंकन
हो ना. यापेक्षा तिनं श्रीलंकन संस्कृती आणि राहणीमान दाखवायला हवं होतं. असं अर्धवट फ्युजन करून काय होणार? त्यातून तो रिकामटेकडा भाऊ का घेतलाय देव जाणे. दुसर्या देशातील लोकांना चुकीचा संदेश जाऊ शकतो की श्रीलंकेत पुरुष काही कामं करत नाहीत आणि बायकाच करतात.
तिने बेलफळे तोडून आणली आणि
तिने बेलफळे तोडून आणली आणि एका बेलफळाच्या गराने सूप सारवून ठेवले. जे जुने सूप फाटले होते तेही ती गर वापरून दुरुस्त करणार म्हणे. आमच्या गावी नवी सुपे शेणाने सारवून घेत असत. आता सर्रास ऑईलपेंट मारून घेतात.
त्या नदीचा एक व्हिडीओ बघितला,
त्या नदीचा एक व्हिडीओ बघितला, तिचा फ्रॉक आहे तसे फ्रॉक आई माझ्यासाठी लहानपणी शिवायची. मला फ्रील, फुग्याचे हात, परत खाली फ्रील असं जाम आवडायचं.
तिने आंबा करी का लोणचं आणि पुलावासारखा भात केला तो व्हिडीओ बघितला. त्यांची भाजी ठेवायची जागा मस्त आहे. भाज्या कसली सही चिरते. तो परीसर बघून परत कोकण आठवलं. तो भाऊ काय स्वतःच्या हाताने वाढून पण घेत नाही.
हो ना. यापेक्षा तिनं श्रीलंकन
हो ना. यापेक्षा तिनं श्रीलंकन संस्कृती आणि राहणीमान दाखवायला हवं होतं. असं अर्धवट फ्युजन करून काय होणार?>>>>+१.तिचा भाऊ असोले नारळ फोडताना लुंगी गुडघ्यापर्यंत वर घेऊन टिपिकल साऊथ इंडियन वाटतो.
एका भागात फ्रॉकचा गळा नेहमीपेक्षा वर होता ते पाहून बरं वाटले.एका भागात नारळ कातताना विचित्र वाटलेले.
हो की. श्रीलंकन मुलीने
हो की. श्रीलंकन मुलीने लिझीकीच्या व्हिडीओजमधून कही काही उचललं आहे. पण अॅटलिस्ट हिचे मसाले, कढिपत्ता, पाटा वरवंटा वगैरे बघून जरा आपलेपणा वाटतो आहे.
मला नदीच्या भवतालचा निसर्ग
मला नदीच्या भवतालचा निसर्ग आवडतो. गावची आठवण येते. तिचे पदार्थ आपले वाटतात. दिवसभर माहीS S म्हणून त्या लाडावलेल्या भावाला खायला घालत असते. तसे काम करतो तो अधून मधून. केळी सोलून दे वगैरे

दुसर्या देशातील लोकांना
दुसर्या देशातील लोकांना चुकीचा संदेश जाऊ शकतो की श्रीलंकेत पुरुष काही कामं करत नाहीत आणि बायकाच करतात.>>>
चुकीचा हे आपले अनुमान असेल, संदेश बरोबर असेल
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=6kKrgmDvD0w
गोष्ट कोकणातली.
ह्याचे पण व्हीडीओज बघते कधी कधी.
ती श्रीलंकन मुलगी, कोरफडीचे बरेच प्रकार करते त्यातलं मला फक्त कोरफड गर आणि पपनस सरबत बघायला आवडलं. बाकी लोणचं आणि भाजी वगैरे प्रकार नाही आवडले. आपल्याकडे करतात का कोरफडीचे पदार्थ. मी तरी नाही बघितले.
चुकीचा हे आपले अनुमान असेल,
चुकीचा हे आपले अनुमान असेल, संदेश बरोबर असेल Lol>>>> साधना
मलाही कोरफडीचे सरबत, लोणचे
मलाही कोरफडीचे सरबत, लोणचे बघून थोडे आश्चर्य वाटले.
माझे तर स्वप्न आहे ...सगळ्यात
माझे तर स्वप्न आहे ...सगळ्यात मोठा टिव्ही घेऊन प्रवास बघत बसायचा. सगळीकडे जाणे तर अशक्य आहे . मुलगी अपंग असल्याने स्वप्नंपण बघता येत नाहीत. >>> आदीश्री, मुलीबद्दल वाचून वाईट वाटलं. मी स्वतः अतिशय प्रवासवेडी आहे आणि आताच्या परिस्थितीत अनिश्चित काळासाठी घरात अडकले आहे, त्यामुळे तुझी तगमग जास्तच जाणवली. तुझं स्वप्न अंशतः पुर्ण होईल आणि ते ही वाट न बघता. तत्काळ.
नेटफ्लिक्सवर एक वेबसिरीज आहे ' Restaurants on the Edge'. वेगवेगळ्या देशातील एखाद्या ठिकाणचं रेस्टॉरंट जे चांगला बिझिनेस करत नाही आणि आता बंद पडायच्या मार्गावर आहे किंवा सिरीजच्या नावाप्रमाणे कड्याच्या टोकावर आहे, त्याचं पुनरुज्जीवन करण्याची प्रोसेस दाखवली आहे.
प्रत्येक एपिसोड म्हणजे नवीन देश आणि तिथलं एक रेस्टॉरंट. या reviving process मध्ये इतके सुंदर देश, शहरं, बेटं पहायला मिळतात. तिथला निसर्ग बघताना डोळे सुखावून जातात. डेकोरेशन साठी किंवा लोकल फूड अनुभवण्यासाठी टीम लोकल मार्केट, जंगलं, ऐतिहासिक जागा, नद्या, समुद्र, लोकल कलाकार, लोकल संस्कृतीला भेट देते. त्यामुळे आपल्याला नुसता निसर्ग पहायला मिळत नाही तर त्या देशाची/शहराची काही तरी नवनवीन माहिती मिळते. संस्कृतीशी, लोककथा, शेतकरी, शेफ्स, कलेशी ओळख होते. प्रवासात आपला हेच तर पहाण्याचा आणि मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे तुझा देशोदेशी व्हर्च्युअल प्रवास होण्याची 100% खात्री.
*याचा आता सध्याच सिझन 2 पण आला आहे.
धन्यवाद मीरा !
धन्यवाद मीरा
!
Restaurant on the edge बघणार, आवडेल असे वाटते आहे.
अरे नक्की पाहा ती. मी सीजन वन
अरे नक्की पाहा ती. मी सीजन वन चा पहिलाच भाग पाहीलाय आणि फारच आवडला आहे. सुरेख ४के पिक्चरायझेशन, सिनेमेटोग्राफ्री. मध्ये मध्ये जरा रटाळ वाटू शकेल पण चलता है.
चुकीचा हे आपले अनुमान असेल,
चुकीचा हे आपले अनुमान असेल, संदेश बरोबर असेल >>>
Restaurant on the edge बघणार,
Restaurant on the edge बघणार, आवडेल असे वाटते आहे. >> +१
आदिश्री, तसंच हे शो बघा. फार
आदिश्री, तसंच हे शो बघा. फार फार मस्त आहेत.
The World From Above - Full Shows : https://www.youtube.com/playlist?list=PLXD21_OtYuSuegKb4nom4Y-Zcg9x7ZdXQ
घरबसल्या भटकंती - https://www
घरबसल्या भटकंती - https://www.maayboli.com/node/74576
हा धागा काढला आहे. मीरा.. , तुझी ही माहिती तिथेही लिहीशील का कृपया?
शहरातून भटकंतीचे व्हिडीओज कधी
शहरातून भटकंतीचे व्हिडीओज कधी कधी नजरेस पडतात. मिळतील तसे नव्या धाग्यावर चिकटवेन.
>>> त्या श्रीलंकन मुलीने केळं
>>> त्या श्रीलंकन मुलीने केळं वेताच्या टोपल्यावर झारवून शिकरण केलं<<<
आजी वापरायची ती वेताची चाळण. गरे , आंबे, केळ्याची कापं करताना रस गाळायला , चाळण पाण्यात ठेवायची व जोरात आपटायची , सर्व अडकलेले कण बाहेर येतात आणि टाकायची छतावर सुकायला.
श्रीलंकन स्त्री बरेचसे आपल्या सारखेच पदार्थ करते असे वाटते.
मुलगी अपंग असल्याने स्वप्नंपण
मुलगी अपंग असल्याने स्वप्नंपण बघता येत नाहीत. >>> सेम पिंच. मला भटकंती, विविध गावं, विविध शहरं बघत खादाडी करायची फार हौस पण जाऊदे, नो रिग्रेट. त्यामुळे मला तसे prgms बघायला फार आवडतात. मुलगा लहान असताना त्याला घेऊन जे काही थोडं फिरलो ते अगदी मनात साठवून ठेवलंय, रमते मी त्या आठवणीत.
डिस्कव्हरीवर पूर्वी संध्याकाळी पाच वाजता एखादा देश आणि त्यातली काही शहरं दाखवायचे, नाव आठवत नाही पण मी फार एन्जॉय करायचे. तसे बरेच देश बघितले आणि प्रवासवर्णने बरीच वाचली.
तसे काम करतो तो अधून मधून.
तसे काम करतो तो अधून मधून. केळी सोलून दे वगैरे >>> अच्छा. दोन व्हिडीओ बघितलेत फक्त त्यात एकात तो कैरी पाट्यावर किंचित चेचवून तिखट मीठ घालून करत होता त्याला आचार लिहिलं शेजारी (त्याला ते लोणचे म्हणतात कि काय). आपण फोडी खातो तसा खात होता फक्त साले काढली त्याने, का काढली काय माहिती. मग तिने किंचित साखर घातली त्यावर. मग तिघांनी खाल्लं . भाऊ दिसायला हिरो आहे मात्र.
काय म्हणू , काय सांगू ते कळत
काय म्हणू , काय सांगू ते कळत नाहीय. आदिश्री आणि अंजू , a big hug to each of you.
Pages