लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा एक टेरेस गार्डन का किचन गार्डनचा आहे व्हिडीओ. छान वाटतं बघून. मामी चालतील ना हे व्हिडीओज तुझ्या धाग्यावर पोस्ट केले तर.

https://www.youtube.com/watch?v=--2HKZdZXC8

लिझिकीला फॉलो करतात ते:
कापसाच्या दुलईचा व्हिडिओ पाहिलात का ? स्वतःच्या हाताने दुलई विणुन ती आजीला द्यायची हेच मुळात इतक सुरेख आहे पण त्या पुढे जाऊन स्वतःच्या हाताने कापुस पेरुन , त्या कापसापासून दुलई करून ती आजीला देण !! अमेझिंग आहे हा व्हिडिओ.

मी पण वीकेंड्स ना किंवा कधी कधी बिंज वॉच करते. लि जिकी ला फक्त लेफ्ट प्रोफाइल आहे का असेच वाट्ते. मला हा खूप एक्क्षॉटिक
कुकरी शो वाट्तो. पण सुरेख आहे. तिचे कपडे , भांडी पातेली, पदार्थ सर्व बेस्ट क्वालिटी. ते सर्व बघून बघून एकदम फॅमिलिअर झाले आहे.

संगीत पण बेस्ट असते. एक डिस्ट्रबिंग पॉइंट म्हणजे कायम पपीजच दिसतात. शेतावरचे कुत्रे असतील तर जनरली एक दोनच कुत्रे वाढून मोठे होउन म्हाता रे होत राहिले पाहिजेत. पण हा काही रिअ‍ॅ लिटी शो नाही. किंवा डॉक्युमेंटरी नाही. प्रॉडक्षन आहे.

तिने एक न्यु इअर मील दाखवली होती ती फार बेस्ट होती. लव्हली सीरीज.

इथे वाचून लिझिकी मी पण बघायला लागले.डोळ्याला शांत वाटते.कधीकधी ती अगदी पांढरे शुभ्र कपडे घालून शेतात मेहनतीची कामं किंवा स्वयंपाकात रंगीत मसाल्याची कामं करत असते तेव्हा मजा वाटते.अजिबात कपडे खराब होत नाहीत.असते एकेकाला कला.
तिचा आईस्क्रीम वाला एपिसोड डोळ्याला एकदमच गारवा आहे.

There is a team of 30-40 production people working behind the camera. It is all designed to visually seduce and calm people. And give an image of life in rural China. In reality they eat bats and snakes kept in unhygienic conditions and get infection.

अमा, तुमच्या म्हणण्यात थोडे तथ्य आहे. चीनमध्ये यु ट्यूबवर बंदी असूनही देशाबाहेर यु ट्यूबवर चिनी मुलींचे गुडी गुडी विडिओ प्रसारित करण्यामागे प्रचाराचा भाग आहेच. पण मुलींनी नाव स्वकष्टाने कमावले आहे. ली व डियांशी दोघीनीही सुरवातीचा कष्टप्रद प्रवास सांगितलेला आहे.

चीनमध्ये काहीही खाल्ले जाते. म्हणजेच ते बीफ किंवा पोर्क खात नाहीच, कायमचे वटवाघलांच्या मागेच असतात असे थोडेच आहे...

दोघींच्याही सगळ्या व्हिडिओत मांसाहार असतोच. त्यांची तीच संस्कृती आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला पुरून उरतील इतके प्राणी नसावेत, म्हणून माणूस सोडून इतर जे काही मिळेल ते खाल्ले जाते.

कापसाच्या दुलईचा व्हिडिओ पाहिलात का ? स्वतःच्या हाताने दुलई विणुन ती आजीला द्यायची हेच मुळात इतक सुरेख आहे पण त्या पुढे जाऊन स्वतःच्या हाताने कापुस पेरुन , त्या कापसापासून दुलई करून ती आजीला देण>>>

खूप छान आहे तो विडिओ.

पण ती दुलई विणायलाच 2 महिने लागले असणार. जे व्हिडिओत येत नाही. असो. आपल्याला डोळ्यांना गारवा म्हणून पाहायला काय जाते। Happy Happy

There is a team of 30-40 production people working behind the camera. It is all designed to visually seduce and calm people. And give an image of life in rural China. In reality they eat bats and snakes kept in unhygienic conditions and get infection.>>>
कुठे आहे ही माहिती अमा ? ३०-४० प्रोडक्शन पीपल ? जे वाचलेल त्यावरून एक माणुस तिने हायर केलाय हेल्प साठी अस वाचलेल.

पण ती दुलई विणायलाच 2 महिने लागले असणार. जे व्हिडिओत येत नाही. असो. आपल्याला डोळ्यांना गारवा म्हणून पाहायला काय जाते। Happy Happy>>> खरं आहे अगदी साधना. तिचा तो एम्ब्रॉइडारीचा व्हिडिओ पण बघ. खुप दिवस लागलेत बनवायला आणि तिने ते दाखविले पण आहे. पन फार सुरेख आहे तिच काम .

पाहिला तो दुलईचा व्हिडिओ आज. असाच मक्याचाही आहे अथपासून इतिपर्यंत. सोयाबीनचाही आहे. प्रत्येक व्हिडिओत तिचे कष्ट दिसतातच, पण ते डोळ्यांना क्लेशदायक न होता उलट तिच्या नीटसपणाबद्दल आदर (आणि हेवा!!) वाटतो. डोळ्यांना गारवा वाटतो हे खरं.

कुठे आहे ही माहिती अमा ? ३०-४० प्रोडक्शन पीपल ? जे वाचलेल त्यावरून एक माणुस तिने हायर केलाय हेल्प साठी अस वाचलेल.>>>

ली आधी एकटीच करायची. आता तिचा स्टाफ आहे तीन चार जणांचा.

तिचे विडिओ खूप सफाईदार असतात. लायटिंग, फोटोग्राफी, एडिटिंग खूप दर्जेदार असते. यु ट्यूबवर अमुक एक वर्गणीदार झाले की कंपनीकडून डॉलरमध्ये पेमेंट सुरू होते. हे उत्पन्न आहेच. ली तिचा माल विकतेही. त्यामुळे चांगला स्टाफ बाळगणे तिला परवडत असणार.

लीच्या मानाने डियांशीचे विडिओ साधे आहेत.

लीचे विडिओ चित्रपट पाहतोय हा आभास देतात. त्या चित्रपटात सगळे स्वप्नवत घडत असते.

डियांशीचे विडिओ आपण तिच्यासोबत गावात, घरात फिरतोय, घरात इतरजण पण वावरताहेत हा आभास देतात. (मला तरी). तिच्या कुटुंबासोबतचे तिचे वागणे बोलणे खूप छान वाटते बघायला.

३०-४० प्रोडक्शन पीपल>> हे चायनीज सरकारी प्रॉडक्षन आहे त्यामुळे, माहिती जस्ट उपलब्ध नाही गूगल करून पण सामान्यज्ञानानुसार सांगते.
१) लिझिकी पर्सनल स्टाफ मेक प व क्लोथिन्ग. तिचा लुक केस मॅनेज करणा रे लोक्स, कपडे डिझाइन कर णारी टीम व ते शिवून इस्त्री करून धुवून रेडी ठेवणारे लोक. हेच आजीचे व इतरांचे पण कपडे डिझाइन व मॅ नेज करत असावेत.

२) साउण्ड डिझाइन वाले लोक. रेकॉर्डिस्ट व डिझायनर, संगितकार व वाद्येवाजवणारे, किंवा टेप बनवून ठेव णारे.
३) प्रॉडक्षन डिझायनर्स व असिस्टंट. ती जिथे कापते वगैरे तिथे भिंतीशेजारी फ्लावरपाट मध्ये फुले असतात ते ठरवणारे, ठेव णारे.
ते घर व बाग शेत सुरेख दिसताहे ना ते बघ णारे लोक. अ‍ॅक्चुअल शेती व फुल झाडॅ फळ झाडे वाढवणारे लोक.

४) प्राणी मॅनेज करणारे, घोडा कुत्रे शेळ्या मांजरे किडॅ पाखरे अगदी जस्ट सो असावेत म्हणून मेहनत घेणारे
५) शूटिन्ग व संकलन करणा रे लोक. कॅमेरा मेन, व टेक सपोर्ट
६) डिजिअल मॅनेज मेंट टीम इन्स्टा व इतर अकाउंट चालवणा रे. विकि पेज अपडेट कर णा रे,
७) किचन बघणारे, भांडी पातेली सुर्‍या फायर मॅनेज कर णारे.
८) पब्लिसिटी टीम इमेज बिलिडिंग टीम.
इतके चांगले प्रॉडक्षन करायला हे हवेत. फरक म्हणून गावरान एक खरी चव व्हिडीओ बघा. टेक्निकली किती साधे विडीओ आहेत ते.

In an interview, Li Ziqi opens up about her life, craft and early struggles as a one-woman band. Photo: GoldthreadIn an interview, Li Ziqi opens up about her life, craft and early struggles as a one-woman band. Photo: Goldthread
In an interview, Li Ziqi opens up about her life, craft and early struggles as a one-woman band. Photo: Goldthread
On screen, Li Ziqi’s life seems to defy the rules of reality.
The Chinese internet celebrity is famous for her videos in which she performs the work of a farmer with the grace of a fairy. Her fans on social media platforms, both in China and internationally, including YouTube and Weibo, number more than 58 million.
In one video, she picks flowers on horseback in a red cape, evoking the image of Red Riding Hood. In another, she builds a bamboo furniture set using traditional Chinese techniques.
While the videos have a cinematic quality to them, it’s her deep knowledge of food, nature, and Chinese culture that impresses viewers. She appears to make everything from scratch, going as far as hatching baby ducklings and raising them just to make a sauce from egg yolk.
Li rarely speaks in her videos, and when she does, it’s in the local dialect of her home province, Sichuan.
Li Ziqi’s videos have a cinematic quality to them. Photo: Li Ziqi
Li Ziqi’s videos have a cinematic quality to them. Photo: Li Ziqi
She also seldom gives interviews. But in our exclusive interview with her, she opens up to us about her life, craft and early struggles as a one-woman band.
“In today’s society, many people feel stressed,” Li says. “So when they watch my videos at the end of a busy day, I want them to relax and experience something nice, to take away some of their anxiety and stress.”
POST MAGAZINE NEWSLETTER
Get updates direct to your inbox
your email
SUBSCRIBE
By registering, you agree to our T&C and Privacy Policy
Li grew up with her grandparents in a rural part of Sichuan province in southwestern China. She says she moved in with them after her stepmother mistreated her.
When she was 14, she went to the city in search of work, but she decided to return to the countryside in 2012 to take care of her grandmother.

Four years later, she began filming her life there.
“When I worked in the city, it was about survival,” Li says. “Now when I work in the countryside, I feel like I’m truly living.”
Li’s videos depict her and her grandmother as they go about their daily lives in their modest home. She is often seen preparing elaborate meals for her grandmother using basic ingredients and traditional techniques.
“I simply want people in the city to know where their food comes from,” Li says. “A teacher friend once told me about some students who thought rice grew on trees. So I want kids in the city to know where their food comes from.”
Li Ziqi harvests ears of corn in a video, in which she whips up a spread of corn dishes. Photo: Li Ziqi
Li Ziqi harvests ears of corn in a video, in which she whips up a spread of corn dishes. Photo: Li Ziqi
Li is part of a growing field of online video makers in China. The market is competitive, worth an estimated US$6.5 billion and with a potential audience of hundreds of millions.
Video channels depicting rural life are a dime a dozen. One only needs to scroll through TikTok and Kuaishou, a Chinese video app, to find clips of people catching fish with their bare hands, farmers fashioning clothes from burlap sacks and campers going full MacGyver in the wild.
But while many of these videos are fast-paced and cut with quick edits, Li’s videos have an ethereal, cinematic quality to them.
“I think this is just how things happened,” she says. “At first, when I did everything myself, I’d set up a tripod, film and then press stop. That’s why all my shots are on a tripod and don’t move, and that’s why my videos are still filmed this way.”
In her videos, Li often prepares elaborate meals for her grandmother using basic ingredients and traditional techniques. Photo: Li Ziqi
In her videos, Li often prepares elaborate meals for her grandmother using basic ingredients and traditional techniques. Photo: Li Ziqi
Her detractors question the one-woman-band premise, but Li brushes it off as sour grapes. Two years ago, she uploaded a behind-the-scenes video showing how she used to operate on her own.
Nowadays, she has help from a videographer and assistant, but she still directs all her videos. During our interview, which Li’s crew filmed, she did not hesitate to give precise instructions on which angle to shoot from and where to stand.
She even suggested pouring tea for me while I said hello to her on camera (that shot ended up on the cutting floor because it felt too staged).
“I’ve always been the director of my videos,” Li says, “from what to film and how to film to how each shot is framed. Often, my videographer only knows what he’s filming on the day of the shoot.”
Video channels in China depicting rural life are a dime a dozen, but unlike Li Ziqi's, many of these videos are fast-paced and cut with quick edits. Photo: Li Ziqi
Video channels in China depicting rural life are a dime a dozen, but unlike Li Ziqi's, many of these videos are fast-paced and cut with quick edits. Photo: Li Ziqi
The poise that Li displays in her well-polished videos belies a playfulness and spontaneity that only comes out when the camera is off.
While we were hanging out on a bridge, Li tried to pluck a lotus flower that was growing an arm’s length away.
When she couldn’t reach it, she got down on all fours before completely falling on her stomach, laughing and joking in Sichuanese as she desperately tried to touch the flower.
And while Li never utters more than a few words in her videos, off camera, she can be loquacious.
While we were waiting to set up for the shoot, she went on for a good five to 10 minutes on the subject of bamboo.
Once the cameras were ready, she composed herself again.
Viewers often ask if her ethereal, cinematic videos are real. Photo: Li Ziqi
Viewers often ask if her ethereal, cinematic videos are real. Photo: Li Ziqi
Viewers often ask whether her videos are real. Indeed, her final pieces are heavily edited — even our interview footage came retouched with heavy filters — but after spending time with her, I believe the question might be moot.
While Li’s videos allow her audience to indulge in a fantasy world, many of the techniques she portrays are grounded in real-world knowledge and come from a genuine desire for the pastoral ideal. The only thing she has sculpted is her on-screen persona.
“I’m just filming my life,” she says. “Or rather, I’m just filming the life that I want.”

ह्यात वाइट काहीच नाही मस्त व्हिडीओ आहेत मला आवडतात. रादर मला तिच्या वेबसाइट वरून कपडे भांडी घ्यायची आहेत. एखाद्या परीसारखीच वाट्ते किंवा चायना मध्ये किचन गॉडेस म्हणतत तशी आहे.

गावरान एक चव चे खरोखर छान आहेत. अजून एकजण विदर्भाच्या गावातून टाकतो तेही छान आहेत. अगदी मातीतले, natural वाटतात. कोकणातली लोकं का करत नाहीत काय माहिती, एकेक गोष्ट एवढी natural चित्रदर्शी होईल की बास रे बास.

चायनीज का कुठले काही व्हिडीओज झोपडीवजा घर आणि त्यांची पाण्याची सिस्टीम, शेतातून आणणे ते करणे, हे बघितले होते. ते खरोखर व्हिडीओसाठी केलेले असतील तर काही म्हणायचं नाही मला कारण मग ते कृत्रिम वाटणार पण खरे असतील तर तेही मातीतले वाटतात.

लीझीकीचे काही आवडले मला, दुलईचा बघितला नाही.

खाण्याचे चायनीज हल्ली फार बघत नाही, मला ते मांस कापताना वगैरे नाही बघवत.

मला ते मांस कापताना वगैरे नाही बघवत.>> अगदी अगदी बीफ व इतर मास असेल काहीतरी विचित्र फिश असेल तर मी नाही बघत. पण आइसक्रीम /बेरीज चे सलाड, न्यु इअर फीस्ट एकदम बेस्ट. ती ते ओव्हन बिल्ड करते, झोपाळा बांधते ते पण बेस्ट. फुलांच्या रेसीपी, व काही काही कपडे पण फार सुरेख असतात तिचे. एकदा तिने खूप मेहनतीने एक लँब रेसीपी बनवली. मग शहरात आले व मित्राबरोबर काम करत होती व नंतर त्याने तीच रेसीपी पाकिटातून काढून गरम करून जेवायला घेतली. तेव्हा ती कॅमरा कडे बघोन हसते. फार गोड ते. चायना तले खरे जीवन इतके धकाधकीचे आहे. व काही श्रिमंत लोक वगळता फारच स्ट्रगल गरिबी आहे खायची भ्रांत आहे. त्यात असे गोड व्हिडीओ बघून जरा जिवाला शांती मिळते. फॅक्ट्रीतून कामे करायला गेलेले लोक लिटरली घरी म्हातारे व बारकी पोरे दैवावर सोडून जातात. अवघ ड आहे परिस्थिती.
हे तिथल्या अपेक्षित बायकोचे पण चित्रण असावे.

मग शहरात आले व मित्राबरोबर काम करत होती व नंतर त्याने तीच रेसीपी पाकिटातून काढून गरम करून जेवायला घेतली>>

तो मित्र असेलही पण तिने सांगितले होते की तो स्टाफपैकी आहे. तो विडिओ तिने तिच्या प्रॉडक्ट प्रोमोशनसाठी टाकला होता.

मी हल्ली डियांशीचे जास्त बघते. मांस कापतानाचे पाहून इतके अंगावर येत नाही (माझ्या तरी) कारण रक्त वगैरे नसते. उलट ती कसे एकसारखे कापते त्याचे खूप आकर्षण वाटते.

डियांशीच्या युनान प्रांतात बाराही महिने वसंत असतो असे ती म्हणाली होती. ती मांस किंवा भाज्या महिनाभर द्रवात घालून मुरवत किंवा आंबवत ठेवते, मांस टांगून सुकायला ठेवते वगैरे बघून वाटते की इथे असे काही केले तर सगळे दुसऱ्या दिवशी उचलून फेकून द्यावे लागेल. तिने सोयाबीनचे टोफू केले व त्यावर बुरशी जमा होईल अशा दृष्टीने ते काळजीपूर्वक ठेवले. नंतर बुरशीयुक्त टोफू स्टरफ्राय करून गट्टम केले... आपल्याकडे कल्पनाही करवत नाही .

उसाचा रस काढतानाचे, वेगवेगळी लोणची करतानाचे पण तिकडचे व्हिडीओज बघितलेले मागे, कोणाचे होते आठवत नाही आता.

हा बाफ वर आल्यामुळे नवऱ्याने कोकणातले छोटे छोटे काही व्हिडीओज काढलेले शोधून बघितले, जुने आहेत तसे, फार चांगला मोबाईल नव्हता तेव्हा पण मजा आली बघताना.

लीचे विडिओ चित्रपट पाहतोय हा आभास देतात. त्या चित्रपटात सगळे स्वप्नवत घडत असते.

डियांशीचे विडिओ आपण तिच्यासोबत गावात, घरात फिरतोय, घरात इतरजण पण वावरताहेत हा आभास देतात. (मला तरी).>>>>>>> अगदी अगदी!

मी काही पोलिन लाईफस्टाईलचे व्हिडिओ पण पाहिले. ते ही छान आहेत. ही मुलगी कंबोडियात राहते.

Polin Lifestyle : https://www.youtube.com/channel/UC4gDBTG2BMuiwJp_Fe2i_2w

या मुलीचे व्हिडिओही साधे असतात तसे. मी जे व्हिडिओ पाहिले त्यात ती सर्व काही अंगणातच शिजवते. तिच्याकडे गाई देखिल आहेत (असं एका व्हिडिओत पाहिल्याचं आठवतंय). पण तिच्या लेटेस्ट व्हिडिओत तिच्या अंगणात पूर्ण पाणी दिसतंय. ताई मुख्य रस्त्यावरून बाजारहाट करून सायकलवरून आल्या. मग सर्व सामान घेऊन सायकलसकट बोटीत बसल्या आणि घराच्या वेशीपर्यंत आल्या. मग एका तात्पुरती सोय म्हणून बांधलेल्या बांबूवरून चालत व्हरांड्यात गेल्या. बोटवाल्यानं सायकलही आणून दिली तशीच. घरं जरा उंचीवरच बांधलेली आहेत हे हा व्हिडिओ पाहून लक्षात आलंय. बरं इतकं करून झाल्यावर मासे पकडायला ताई पाण्यात उतरूनच गेल्या. चांगलं कंबरेपर्यंत पाणी आहे की.

तिने सोयाबीनचे टोफू केले व त्यावर बुरशी जमा होईल अशा दृष्टीने ते काळजीपूर्वक ठेवले. नंतर बुरशीयुक्त टोफू स्टरफ्राय करून गट्टम केले... आपल्याकडे कल्पनाही करवत नाही . >> बापरे. खरंच. बुरशी आली की टाकून द्यायचे हेच आपल्याला माहित. बुरशी आलेली चीजं देखिल मी खाऊ शकत नाही.

कंबोडिया बेस्ट जागा आहे पण. चायना पेक्षा साधे व गरीब लोक. सरकारी मुस्कटदाबी नाही. तिथे खरंच घर व मग मागे तळे. अंकोर च्या तिथे मागे एक भला मोठा जलाशय आहे तिथे असली घरे आहेत.

लि झिकी मध्ये पण ते मिशीवाले तोफू आहे. एकदम बर्फी काढलय सारखे एक महिन्याने काढून खाल्ले. हे मी गरम वरण भात खाता खाता बघितले.

मी मागे बघितले होते ते, पाणी बांबूमधून येतं, दगडाचे सिंक अंगणात. पाणी उघड बंद करायची तोटी असं छान होतं. कोकणात दोण असते त्या type सिंक. आता आठवत नाही कोणाचे ते. तेव्हा एकामागोमाग एक वेगवेगळे खूप बघितलेले.

Pages