लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.
गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.
लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.
ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.
तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.
जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!
तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.
तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.
शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!
*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/
धन्यवाद मामी , अन्जूताई आणि
धन्यवाद मामी , अन्जूताई आणि चंद्रा
. देवाचे आभार मानते की अमेरिकेत खूप सोयी असल्याने बरेच फिरता येते. पण आपली ईशान्येकडील राज्ये आणि हिमालय , उत्तराखंड एकूणच भारतासाठी " सागरा प्राण तळमळला " होते.
या धागा आवडता .
काय म्हणू , काय सांगू ते कळत
काय म्हणू , काय सांगू ते कळत नाहीय. आदिश्री आणि अंजू , a big hug to each of you.>>>माझीसुध्दा काहीशी अशीच अवस्था झाली वाचून , मीरा चा पण प्रतिसाद आवडला.
ती श्रीलंकन मुलगी चांगली आहे
ती श्रीलंकन मुलगी चांगली आहे पण सेट वर वावरल्यासारखे वाटते. दोन एपिसोड मध्ये तरी तस वाटल. का माहित नाही.
भाऊ मला आवडला. करतो कि काम तो. नारळ वगैरे घेवून आला.
ती श्रीलंकन मुलगी चांगली आहे
ती श्रीलंकन मुलगी चांगली आहे पण सेट वर वावरल्यासारखे वाटते. >> बरोबर. तिचा वावर काहीसा कृत्रिम किंवा ऑकवर्ड वाटतो.
देवाचे आभार मानते की अमेरिकेत
देवाचे आभार मानते की अमेरिकेत खूप सोयी असल्याने बरेच फिरता येते. >>> सोयींचा प्रश्न नाही. मुलगा फिजिकली ok आहे पण त्याला आवडत नाही कुठे जायला यायला, फक्त प्रवास आवडतो कुठल्याही वाहनाने पण तो संपल्यावर स्वत:चं घर हवं. तो अस्वस्थ होतो दुसरीकडे त्यामुळे आम्ही जात नाही, त्याला नाराज करून आम्ही enjoy करू शकणार नाही. त्याला गर्दी, माणसे, अनोळखी जागा आवडत नाही त्यामुळे तो कोऑपरेट करत नाही. एनीवे फार अवांतर झालं.
अन्जू, आदिश्री ... अ बिग हग!
अन्जू, आदिश्री ... अ बिग हग!
लिझिकीचे विडिओज हल्ली fast
लिझिकीचे विडिओज हल्ली fast forward मधे का दाखवतात?
आधीचेच छान होते..शांत, प्रसन्न वाटतं ते बघताना.
@अन्जूताई जगावेगळेच
@अन्जूताई जगावेगळेच प्रोब्लेम्स आपले..
तुलाही हग्ज. आमचा वेळ आणि शक्ती power Wheelchair accessible आहे का बघण्यात जाते. भारतभेट = Everest चढाई इतके challenging .!!

धन्यवाद मामी आणि सर्वजण खरचं. मायबोलीचा खूप आधार आणि विरंगुळा आहे.
तुमच्या या आणि त्या धाग्याचा उपयोग होतो आहे. आभार.
लिझीकी चे बरेच व्हिडिओ बघितले
लिझीकी चे बरेच व्हिडिओ बघितले. (फूल टू आत घुसून, इतकं कि नंतर माझ्या किचनमध्ये वावरताना मलाच लिझीकी फिल येतो
)
मामी पण तू लिहीलेलं भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून केलेलं नाही सापडलं
हि लिझीकी कुठच्या क्षणी काय करेल सांगताच येत नाही, आणि जे करेल ते सुरेखच
धनुडी, https://www.youtube
धनुडी, https://www.youtube.com/watch?v=lCIxvZAc-tE या व्हिडिओत आहे. ५.४० च्या पुढे.
ही अजून एक चिनी मुलगी. हुनान
ही अजून एक चिनी मुलगी. हुनान प्रांतातली हुनान गर्ल्स
ही पण inspired आहे

या चिनी मुलींच्या निमित्ते चीनमधली राज्ये तरी कळली.
डियांशी युनानमधली आहे. हा भाग खाली आहे, म्हणजे हिमालयाच्या जवळ. इथे बाराही महिने वसंत ऋतूसारखे वातावरण असते असे डियांशी म्हणाली होती.
ली झिकी शिच्युअनमधली आहे. हा प्रांत युनानचा शेजारी. आणि ही नवी मुलगी हुनानमधली. दोघींपासून जरा लाम्ब.
धनुडी, https://www.youtube
धनुडी, https://www.youtube.com/watch?v=lCIxvZAc-tE या व्हिडिओत आहे. ५.४० च्या पुढे.>>>>> धन्यवाद मामी, नेमका हाच व्हिडिओ मी थोडाच बघितला होता असं वाटतंय. , तू छान ओळख करून दिली आहेस. बाकीचे पण व्हिडिओ बघतेय, धन्यवाद साधना.
भाऊ मला आवडला. करतो कि काम तो
भाऊ मला आवडला. करतो कि काम तो. नारळ वगैरे घेवून आला. >>> हो आज बघितलं त्यात नारळ सोलून घेऊन आला.
इडिअप्पम दाखवलं त्यात ती फार बारीक करते, आपल्याकडे जरा जाड असतात ना. ती ज्यावर घालते ते त्या शेवया आणि शिजवत ठेवते, ती बांबूची जाळी मला आवडली.
पूर्णा नावाच्या एकीचा व्हिडीओ बघितला, तो फार आवडला नाही. कसले कसले पाले गोळा करून तिने ड्रिंक केलं जे बोनसाठी चांगलं असं वाचलं त्यात. डाळीचे वडे केले मासे घालून, आपल्या डाळवड्यांची आठवण आली.
मामी पण तू लिहीलेलं
मामी पण तू लिहीलेलं भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून केलेलं नाही सापडलं>>>
भोपळा घालून केलेला पाव आहे तो. तो वाफावलाय. फुगल्यावर दोऱ्यांमुळे भोपळ्याचा लूक आलाय.
हो हो पाव आहे तो.
हो हो पाव आहे तो.
आपण ज्याला पाव म्हणतो त्याला
आपण ज्याला पाव म्हणतो त्याला चिनी पण पाव म्हणतात, फक्त आपण भाजून पाव करतो व ते वाफवून. त्यांच्या पावात बहुतेकदा काहीतरी भरलेले असते (स्टफिंग). चवीला छान लागतात त्यांचे पाव.
भोपळा घालून केलेला पाव आहे तो
भोपळा घालून केलेला पाव आहे तो. तो वाफावलाय. फुगल्यावर दोऱ्यांमुळे भोपळ्याचा लूक आलाय.>>>>>> हो ते व्हिडिओ बघितल्यावर कळलं, मुळात असं सुचतं कसं ना?
हो न..
हो न..
भोपळ्याची कापे तळून मग ती गुळात मिक्स केली. आपण उपासाला रताळी करतो तशी. आपण रताळी उकडून घेतो इतकेच. भोपळ्याचा विडिओ खरेच छान आहे.
फक्त तिच्या आजूबाजूला इतके भोपळेच भोपळे बघून एकतर ती किंवा भोपळा मालक भोपळे विकायचा व्यवसाय करत असणार असे वाटले आणि चीनमध्ये निसर्ग भरभरून असताना वटवाघळे खायची गरज नाही असेही वाटले.
आशा भोसलेने स्वतःचे यु ट्यूब
आशा भोसलेने स्वतःचे यु ट्यूब चॅनेल सुरू केले. तिचा 70 वर्षांचा प्रवास मांडणार आहे चॅनेलवर. मी तर फॉलो केले लगेच.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=3gYw-ZEKPBs
हा अजून एक. शून्यातून सुरुवात म्हणजे बार्बेक्यू करायचा तर दगड फोडून त्याचा स्लॅब बनवून त्यावर.
वॉव साधना थँक्स. मी पण फॉलो
वॉव साधना थँक्स. मी पण फॉलो केलं लगेच.
नदीचा खोबरेल तेलाचा व्हिडीओ
नदीचा खोबरेल तेलाचा व्हिडीओ आहे त्यात भाऊ खूप मदत करतोय. उखळ बघून कोकण आठवलं. आता कोकणात पण मिक्सर वापरतात सर्रास. खाद्यतेलाबरोबर तिने हेअरऑईलपण केलं, वेगवेगळ्या वनस्पती घालून, ब्राह्मी पाने होती त्यात आणि अजून बरंच काही, नावं वाचता नाही येत पटकन, फार थोडा वेळ असतात, मला जास्वंदीची फुलं पण घालेल असं वाटलेलं.
सासरी चुलत दिरांची गिरणी आहे त्यावर एक दिवस तेलाचा घाणा असतो आणि तसं केलेलं खोबरेल तेल थोडं गावाहून मिळालेलं आम्हाला. त्याची क्वचित आमटी वगैरे केली जरा जास्त मसाला, भाज्या वगैरे घालून, कधीतरी ok पण एरवी सवय नसल्याने नेहेमी खाऊ नाही शकणार . गावाला फणसाचे गरे तळायला खोबरेल तेल वापरतात.
लीझिकीचा, तिने निगुतीने
लीझिकीचा, तिने निगुतीने भोपळ्याचे विविध प्रकार केलेला व्हिडीओ बघितला. कौतुक वाटलं तिचं पण फार काही tempting नाही वाटला कारण मला भोपळा आवडत नाही फार. फक्त भरीत आवडीने खाते मी आणि गवार भोपळा भाजी चालते.
तिने पिठात भोपळ्याचा गर घातल्यावर, आता घारगे करते की काय वाटलं पण तिने त्याला दोऱ्याने भोपळा आकार देऊन उकडले. तिचा तो केन कुकर मला जाम आवडतो.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=VrAhBO1sKn0
हा कोकणातला व्हिडीओ, देवगड हापूस आंबा काढण्याचा. त्या वर वर चढून आंबे काढणाऱ्या काकांना सलाम.
मस्तच आहे विडीओ , खरचं किती
मस्तच आहे विडीओ , खरचं किती चिवट आणि काटक आहेत काका. धन्यवाद अन्जूताई !
आदिश्री माझं सासर पण देवगड
आदिश्री माझं सासर पण देवगड तालुक्यात आहे आणि आमच्याकडे पण असे मदतनीस आहेत आंबे काढणारे, पण प्रत्यक्ष मी कधी बघितलं नाही, फोटो बघितले आहे. त्यातला एक मी मागे गणेशोत्सव आमची माती आमची माणसे हा विषय होता तेव्हा पोस्ट केलाय. गावचे आंबे भरतानाचा पण केलाय आणि काढतानाचापण.
आंबे पण कसले गुटगुटीत आहेत
आंबे पण कसले गुटगुटीत आहेत
हो देवगड हापूस आमचा पण मस्त
हो देवगड हापूस आमचा पण मस्त आहे, आम्ही पण केमिकल विरहीत करतो, सेंद्रिय खत घालून (मोठे दीर करतात) . माहेरी रत्नागिरी हापूस, एकच कलम आहे पण तोही मस्त आहे. यंदा मात्र कोरोनामुळे घरचा आंबा इथे येणं शक्य नव्हतं .
>>नदीचा खोबरेल तेलाचा व्हिडीओ
>>नदीचा खोबरेल तेलाचा व्हिडीओ आहे
हो मी पण पाहिला तो भाग. काय खटपट! तिने जे तेल केलं तयार ते पिवळ्या रंगाचे झाले. तिच्या प्रोसेसला काय म्हणतात काय माहित. कारण ऑर्गॅनिक, कोल्ड प्रेस्ड खोबरेल मिळतं ते शुभ्र, ट्रान्सपरंट असतं ना.
हो मी पण पाहिला तो भाग>>>> हो
हो मी पण पाहिला तो भाग>>>> हो मीही.छान होता.
आजी आ॑णि भाऊ स्थानिक पेहरावात असतात.
Pages