मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

केळ्यानी आज कहर केला. किती चालबाज माणूस आहे तो! आणि आतून भित्रा! सारखा रडतो, वाट्टेल त्या कारणाकरता! वीणानी त्याला एकटी खेळणार सांगीतलं तर हा रडतो? सिरीअसली? आज वीणानी त्याला मस्त इग्नोर मारला.

आलेले सगळे पाहुणे नेहाचे चांगले मित्र होते. आणि जाताना तिला सिनेमाचं कॉन्ट्रॅक्ट देऊन गेले ! शिवानी जळून खाक झाली असेल. Proud

गो नेहा! अशीच पुढे राहून ट्रॉफी घेऊन जा!

केळकर जामच रड्या आहे यार.
नेहाला नवीन सिनेमा मिळाला म्हणून तिला आनंदाने रडू आलं, समजू शकते, पण केळकर का रडला लगेच? कॅमेऱ्याच्या दिशेने पाहून पाहून अजून रडत होता...
तो Chings चा थालीपीठ आणि भरलं वांग टास्क कित्ती पकाऊ होता, काहीच कसं नाही यांच्याकडे दाखवायला ?? बोअर व्हायला लागलंय हल्ली फार BB..

तिसरा धागा Happy . केळ्याला तर रडायला काहीही कारण चालतय, आता त्यांच्या टास्क मधे ते जिंकले ना तर परत आतल्या खोलीत जाऊन हिना बरोबर रडतोय? का का का? आपण टास्क साठी जीवाची बाजी लावतो अँड ऑल. नंतर आरोह ला पकडलं, तर त्याने पण होरे बाबा तुझ्या मुळे तुझ्या मुळेच जिंकलो असं गायलं.

2-3 दिवस सलग नाही पाहिलं तर पुढे interest रहात नाही.. ज्यांना bb बघायचं व्यसन लागलय त्यांच्यासाठी सीक्रेट Wink Wink Wink
Reality show न वाटता सिरियल चं शूटिंग वाटत ते... हे नक्की माहित असतं की एपिसोड मध्ये कितीही काहीही मारामारी केली शिव्या घातल्या तरी दुसर्‍या दिवशी सगळे एकत्र नाचणार आहेत Rofl
त्यामुळे फार मनावर न घेतलेलंच बरं

आधी बिग बॉसने विचारलं की तो (अ के) रंगे हाथ पकडला गेला होता असं कोणाकोणाला वाटतंय, त्यावर आरोहने हात वर केला होता. याचा रेफरन्स असेल त्याला.
पण तो फारच रडारड करतोय हल्ली.

रुपाली भोसलेची बाहेर पडल्यानंतरची मुलाखत बघितली.... तिला नेहा, केळ्या आणि शिव टॉप३ वाटतायत आणि शिव जिंकावा असे ती म्हणाली

ऋतुजा धर्माधिकारीची पण मुलाखत बघितली..... तिला यावेळचे सगळेच स्पर्धक फेक बिहेव्ह करतायत (बिचुकले सोडून) असे वाटते असे सुरुवातीला म्हणाली पण नंतर सगळ्यांबद्दलच (केळ्या सोडून) चांगले बोलली

तिचे टॉप ५ आहेत किशोरी, शिव, नेहा, हीना आणि वीणा (बहुतेक)..... किशोरी ताई खुप डिग्निटी ठेवून खेळतात म्हणून त्या आवडतात असे ती म्हणाली, नेहा हुशार आहे... ती कधीकधी आवडते आणि कधीकधी आवडत नाही असे ती म्हणाली
केळ्या तिला फेक आणि चालबाझ वाटतो!

बाकी गेले तिन्ही एपिसोडस शांतपणे बसून बघितले नाहीत त्यामुळे नो विशेष टिप्पणी!

सिझन बेकार म्हणता म्हणता तिसरा धागा आला कि ! Uhoh
रुपाली भोसलेच्या मुलाखतीतला एकच उत्तर लक्षात राहिलं, तिला विचारला तू परागची बाजु का घेतली नाहीस, डिसलॉयल झालीस का ? जे झालं ते विसरून पुन्हा बोलशील का?
यावर तिने सांगितलं कि जे मला परागची बाजु का घेतली नाही असं म्हणतायेत त्यांना तिथे काय झालं माहित नाहीये, जे काही घडलं ते अनफॉर्चुनेट्ली सांगायची चॅनलची परवानगी नाही पण ते जर समजलं तर ज्यांनी परागची बाजु घेतलीये ते सॉरी म्हणतील.
चॅनल नक्की काय आणि का लपवतय , क्लिप दाखवु नका पण हे असे अंदाज बांधणार पब्लिक आणि जे झालं ते खरच इतकं भयानक असेल तर पराग इतका सपोर्ट अजिबात डिझर्व करत नाही.

आणि इतकं होऊन परागला घरातल्यांची माफी मागून घरात राहायची / परत यायची दोन वेळा संधी दिली गेली?
तो प्रकार घडल्यानंतर सुद्धा तो घरातच बसला होता. इतका भयंकर प्रकार होता, तर बाउन्सर्सनी येऊन त्याला त्याक्षणी घराबाहेर न्यायला हवं होतं.

रूपाली फेक, खोटारडी फक्त घरात असतानाच होती का? Wink की हा सगळा चॅनेल, बिग बॉसचा खेळ?

माझे patience संपले bigg boss बघायचे... आता फक्त इथल्या आणि fb वरच्या comments वाचते...माझं असंच आहे, बघायचं तर अगदी पूर्णच.. नाहीतर काहीच नाही... Actually bb पाहताना, त्यातले भांडणं पाहताना काही वाटत नाही पण नंतर जाम डोक दुखतं... मग वाटले या फालतू लोकांची भांडणं बघून आपल्याला त्रास का करून घ्यायचा? Entertainment तर अजिबात नाहिये.. म्हणून मागच्या week मध्ये बघितलंच नाही.. आणि इथल्या comments वाचून असं वाटतंय की बरंच झालं पाहिलं नाही.... Lol किती कृत्रिम झालाय bigg boss..

केळ्या रडण्याचा आव आणत होता कारण त्याने खेळ प्रामाणिकपणे खेळला नव्हता..त्यांनी हिरा लपवलाच नव्हता तो त्याचा
पॅण्टमध्ये होता जे नियम बाह्य होतं म्हणून तो पुष्करला तपासणी करायला देत नव्हता..केळ्याने शेवटी हे किशोरीला सांगितले पण तिने जेव्हा बिगबॉसने हात वर करायला सांगितला (केळ्याने चूक केली कि नाही) तेव्हा हात वर केला नव्हता..

पुष्करला सिझन ३ मध्ये बघायला आवडेल..मस्त आकलन आणि परिस्थिती ताब्यात ठेऊ शकतो (आवाज न वाढवता)

यावर तिने सांगितलं कि जे मला परागची बाजु का घेतली नाही असं म्हणतायेत त्यांना तिथे काय झालं माहित नाहीये, जे काही घडलं ते अनफॉर्चुनेट्ली सांगायची चॅनलची परवानगी नाही पण ते जर समजलं तर ज्यांनी परागची बाजु घेतलीये ते सॉरी म्हणतील.>> हे तिच मत झालं . प्रत्येक घटनेला दोन्ही बाजूची मत असतात. . भरत म्हणताहेत तस मग इतक सगळं होऊनही त्याला परत येणाची संधी का देत होते ? ताबडतोब त्याला घराबाहेर काढायला पाहिजे होत . बर या घटनेत बाकी इतर सदस्यांची पण चुकी होतीच . जरी पराग ने सुरवात केली (ते सुद्धा टास्क मध्ये वैशाली आणि नेहा कडून शारीरिक इजा पोचल्यामुळेच ) तरी इतर सदस्यांनी म्हणजे केळकर आणि वैशाली यांनी सुद्धा त्या नंतर त्याला मारहाण केली . त्याकरता बिगबॉस ने त्यांची नाव पण जाहीर पणे घेतली होतीच.

परागच्या आईची मुलाखत बघितली तेव्हा तिने हे कबुल केलंच आहे कि परागने नेहा वर हात उगारला हि त्याची मोठी चूक होतीच पण त्याने हात का उगारला ते कोणीच लक्षात घेतलं नाही . आणि त्यानंतर सुद्धा केळकर आणि वैशालीने परागला मारहाण केली असं परागने त्यांना सांगितलं असं आई म्हणाल्या आणि त्यामुळे इतर सदस्यांची सुद्धा नाव घेतली होतीच . चूक बऱ्याच सदस्यांची होती .नेहा आणि वैशालीने त्याला शारीरिक इजा करून त्या घटनेची सुरवात केली होती म्हणूनच ही गोष्ट लक्षात घेऊनच बिग बॉस ने त्याला संधी देण्याचा विचार केला असेल तस जर नसत तर त्याला डायरेकट हाकलवून दिल असत

अ,के. पुढल्या - फायनल राउंडनंतर रडला, जेव्हा त्यांनी फेअर खेळून डाव जिंकला होता. आधीच्या राउंडमध्ये त्यांचं सगळं चुकत गेलं आणि त्यांना हिरा लपवायला वेळ मिळाला नाही.

अ,के. पुढल्या - फायनल राउंडनंतर रडला, जेव्हा त्यांनी फेअर खेळून डाव जिंकला होता. >> तेव्हा किशोरीने हिरा कुंडीत लपवला होता...
वीणाने ती कुंडी नंतर बघितली होती पण तिला तेव्हा हिरा शोधता आला नाही..

बिगबॉसने प्रामाणिकपणे कार्य न केल्याबद्द्ल सर्व सदस्यांना समज दिली होती... हिनानंतर हा मुद्दा केळ्या आणि किशोरीबरोबर बोलत होती तेव्हा
केळ्या तिला त्यांची चूक माही हे समजवत होता आणि किशोरी त्याची री ओढ्त होती.

हीना ने तिची पेस्ट्री फ्रिज मध्ये नीट न शोधता उगीच आरडा ओरडा केला. ती त्या बाउल ला कप म्हणत होती. तिला वाटले शिवानि ने खाल्ले.

आधी बिग बॉसने विचारलं की तो (अ के) रंगे हाथ पकडला गेला होता असं कोणाकोणाला वाटतंय, त्यावर आरोहने हात वर केला होता. याचा रेफरन्स असेल त्याला.>>>>>>>>> अच्छा , पण किती सारखी स्वतःची बाजु सेफ करायची? रडलं की बरोबर असतं असं वाटतं का अ के ला?

बक्षिसाची रक्कम पुन्हा 25लाख झाली. ती bag शोधणे खुप सोपे होते. केळकर च्या ड्रोवर मध्येच होती.>>>>> मी म्हंट्लं नव्हतं का की लुटुपुटुची लढाई आहे, काही खरं नाही. काही बक्षिसाची रक्कम कमी वगैरे होत नसते.

हीना ने तिची पेस्ट्री फ्रिज मध्ये नीट न शोधता उगीच आरडा ओरडा केला. ती त्या बाउल ला कप म्हणत होती. तिला वाटले शिवानि ने खाल्ले.>>>>> हीना म्हण्जे उथळ पाण्याला खळखळाट आहे. उगीच आरडाओरडा . मधे आवडायला लागली होती, आता नाही.

हीना ने तिची पेस्ट्री फ्रिज मध्ये नीट न शोधता उगीच आरडा ओरडा केला. ती त्या बाउल ला कप म्हणत होती. तिला वाटले शिवानि ने खाल्ले.>>>>> हीना म्हण्जे उथळ पाण्याला खळखळाट आहे. उगीच आरडाओरडा . मधे आवडायला लागली होती, आता नाही.>>>>अगदी बरोबर

केळ्या तिला त्यांची चूक माही हे समजवत होता आणि किशोरी त्याची री ओढ्त होती.>>>>>>>>>>>>>> हो पराग असताना पण त्या असचं करायच्या . त्याच्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करायच्या . आणि मग मांजरेकरांचा ओरडा खायच्या.

सलमान येणार असता तर 15 दिवस आधी झाइरात केलीं असती, एकदा मेघा धाडे, एकदा मांज्या हे दोन मेंबर येतील

सलमान खान येणार आहे अशी चर्चा लास्ट सीज़न ला ही झाली होती. पण तो आला नाही. या सीज़न ला ही बातमी आहे . बघुया येतो का नाही ते ?

बिचुकले चा आरोह वर इतका राग का आहे.?काल आरोह त्यांची मिमीक्री करणार होता तर ते केळकर ला बोलले की तू कर . मला माझ्या पेक्षा खालच्या नी माझी मिमीक्री केलेली आवडणार नाही. त्यावर केळकर आणी शीव त्याना काहिच बोलले नाहित. एकटी शिवानि त्याना ओरडली असे नाही बोलयचे म्हणून.

खालचा म्हणजे नंतर आलेला या अर्थाने असेल >> नाही. त्या बावळट बिचकूले ने गुडघ्या खाली हात करत काहीतरी सांगितले केळ्याला.

बापरे धागा उघडताच इतके प्रतिसाद! Bw

केळया परवाच्या शेवटच्या राउण्डला छान खेळला होता. काल पहिल्या राउण्डला माती खाल्ली ह्याने. आणि सारखा सारखा रडतोय का हा? हा जायला हवा आता.

पहिल्या राउण्डचा स्पर्धकान्नी केलेला कचरा पाहून सन्जय नार्वेकरही त्यान्ना वैतागला, मला बिबॉमधून लवकरात लवकर बाहेर काढा म्हणाला. बरोबर बोलला तो.

आलेले सगळे पाहुणे नेहाचे चांगले मित्र होते. आणि जाताना तिला सिनेमाचं कॉन्ट्रॅक्ट देऊन गेले ! शिवानी जळून खाक झाली असेल. >>>>>>> तिने कशाला जळायला हव. तिलाही ऑलरेडी मिळालाय ना सिनेमा अन्कुश चौधरीबरोबर.

पुष्करने बिचकुलेची नक्कल छान केली. विणाला आऊ जमली नाही. अनिकेत नक्की विनित भोण्डेची नक्कल करत होता की दादा कोण्डकेची? Lol

पुष्करला सिझन ३ मध्ये बघायला आवडेल..मस्त आकलन आणि परिस्थिती ताब्यात ठेऊ शकतो (आवाज न वाढवता) >>>>>>>> हम्म. आणि तो एन्टरटेनिन्ग सुद्दा आहे.

प्रसाद ओक कधीही बिबॉ स्पर्धक होऊ शकत नाही. इतका इनएक्टिव, शान्त, थण्ड स्पर्धक बघितलेला नाही मी आजपर्यन्त. Proud अनइन्टरेस्टेड वाटला मला. मला तो आधी रागीट वाटत होता.

प्रोमोमध्ये सन्जय नार्वेकरला बॅग बेडखाली लपवताना दाखवलेल, मात्र एपिसोडमध्ये पुष्कर केळयाच्या ड्रॉवरमध्ये बॅग लपवताना दाखवला. Uhoh

हीना ने तिची पेस्ट्री फ्रिज मध्ये नीट न शोधता उगीच आरडा ओरडा केला. ती त्या बाउल ला कप म्हणत होती. तिला वाटले शिवानि ने खाल्ले. >>>>>>> नशीब शिवानी जास्त रिएक्ट झाली नाही ह्यावर. नाहीतर तिच्यातली भवानी जागी झाली असती. पण हिनाने केल ते चूकच होत.

हिना हल्ली बिचुकलेच्या इन्फ्ल्युएन्सखाली जातेय. शिवानी त्याच्याशी बोलत नाही तेच बरय. बाकी बिचकुलेच्या स्पर्धकान्वरच्या केलेल्या कविता बर्या होत्या.

नेहा हुशार आहे... ती कधीकधी आवडते आणि कधीकधी आवडत नाही >>>>>>> ++++++१११११११

दादा कोंडक्यांच्या सिनेमातले (बोट लावीन तिथे गुदगुल्या) मधले गाणे मिळाले. >>>>>>>>>> योगी तुम्ही पाठवलेली लिन्क अ आणि अ आहे.
Biggrin मला हे गाणे ह्या सिनेमात आहे हे माहित नव्हत. मी हे गाण इथे बघितल होतःhttps://www.youtube.com/watch?v=TaDBeocHcto ९.३५ व्या मिनिटाला आहे हे गाणे.

Pages