बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किशोरीने जेव्हा वैशालीचा शिव्या देण्याविषयी मुद्दा काढल्यावर, वैशालीने एकदम पलटी मारून म्हटले, तुम्हाला नाही बोलले , दुसर्‍याचं का बोलता...
महाधुर्त आहे वैशाली. केळ्या आणि वैशालीची जुंपलवली असती तर मैत्री किती बोगस आहे हे दिसलेच असते.

हो खरं म्हणजे काल किशोरी बरोबर बोलली वैशाली ल कि तुझ्या चुका कधी अंडर्लाइन नाही होत, म्हणजे तु चुकाच करत नाहीस असं नाही. पण वैशाली महा धूर्त आहे, तीने सगळं संभाषणच फिरवलं, तुम्हाला तरी कळंतय का तुम्ही काय बोलताय ते .... वगैरे.

एकापेक्षा एक बोअर होत चाललेत एपिसोड्स
काहीतरी करा बीबॉ..आणा एखादी मस्त एन्ट्री.
हॉटेल चा एक पण टास्क पाहिलाच नाही. वीकेंडचा वार पण पळवत पाहिला.
आणि सोमवार पासुन परत पहायला सुरु केलं पण काहीच घडत नाहिये. असच होत राहिलं तर एपीसोड बघण बंद करुन फक्त इथे येउन वाचलं तरी चालुन जाईल काम Happy
बाकी पराग चं नाव अजुन निघतय घरात , ममां पण काढतात वीकेंड च्या वार मधे. Happy
पराग गेल्यामुळे खरच सगळं सपक, मुळमुळीत झालय असं दिसतय. कोणी काड्या टाकणारा नाहिच.
बाकी सुरेखा असल्या नसल्या तरी फार काही फरक पडला नाही. केळ्या जाउन रडला त्यांच्या बेड जवळ एवढच बाकी कोणी नाव पण नाही काढलं.
किशोरी ने जावं आता. तिला मुद्दे मांडता येत नाहीत हा तिचा सगळ्यात मोठा अडसर आहे. काल पण वैशाली ला ती ठासुन सांगु शकली असती की तू केलेले किडे कोणाला दिसत नाहीत. किशोरी कडे मस्त चान्स होता लोकांसमोर वैशाली चं खरं रुप आणुन ठेवायचा. तिच्या जागी नेहा किंवा वीणा असती तर कदाचित काही घडलं असतं.
असो. बिबॉ, Time to gear up now. ..आणा आता कोणीतरी भारीपैकी.

कालच्या कॅप्टनसी टास्क मध्ये सगळे एक्मेकाचे गुणगानच करताना आढळले , थोड्याफार फरकाने. नाइलाजाने का होईना हे करावं लागलं , फक्त किशोरि आणि वैशालीने एक्मेकांच्या चुकांचा उल्लेख केला, शीव आणि हिना मध्ये पण शीव हिनाला म्हाणाला कि जे पटत नाही त्या बद्दल च मी तुला बोलतो, बाकी तू चांगली आहेस, तीला हे शिव चं बोलंणं ऐकून रडायला येणार होतं ,
खरंच प्रेमात आहे बहुतेक ती .

असो. बिबॉ, Time to gear up now. ..आणा आता कोणीतरी भारीपैकी.
खर आहे,आणि यात जर आता वीणाला काढल,तर मग भांडणही संपतील,तसि शिव हीनाचा रोमान्स पाहायला मिळेल,पण मला नाही वापत,त्याने टीआरपी मिळेल
आजच्या भागातही भांंडणच आहेत ,वीणा किशोरी,हीनाचा पण खटका उडाला आहे कोणाबरोबर तरी.वूटवर आहे.
पण बिबॉस को मान गये,यावेळी कँप्टन्सी टास्क चक्क इंडिव्यूजअल ठेवला आहे.
यात एक गंमत करू शकतात बिबॉस
वीणाला सिक्रेट रुम मध्ये पाठवल पाहिजे.
म्हणजे खरा शिव कळेल आणि वैशालीचाही खरा चेहरा समोर येईल.

बिग्ग बॉस ने शो इंटरेस्टिंग करयला काहितरी करायला पाहिजे. फारच बोरिंग झाले आहे . आणी तोच तोच पणा जाणवत आहे. 46दिवस झाले आहेत फक्त आता ही हालत अजुन 54दिवस काय दाखवणार. Wink

शिव हीनाचा रोमान्स पाहायला मिळेल, >>> शिव हिना अजिबात नको, बिग नो. किती मोठी आक्का वाटते त्याच्यापेक्षा.

स्क्रिप्टेड असेल तर वीणा सिक्रेट रुममधे जाईल, त्यासाठीच हिनाला त्याग करायला लावला असेल Lol

पण शिव हीना जोडी काही माझ्या पचनी पडणार नाही, मी काही बघणार नाही, वेळ सत्कारणी लावेन त्यापेक्षा.

शिव जिंकण्यास लायक आहे, कसे फासे टाकले हीनावर. परत क्लियर केलं, चुकलं तुझं की मी सांगणार.

काल शिव आणि हिना बोलत होते तेव्हा विणा किति येरझार्‍या घालत होती,शेवटी दरवाज्याला चिकटली होती , खुप बेचैनी वाटत होती तिच्या चेहेर्‍यावर, आणि उत्सुकता पण .

काल शिव आणि हिना बोलत होते तेव्हा विणा किति येरझार्‍या घालत होती>> अन तो जेव्हा बाहेर होता तेव्हा ती म्हणाली हि किती क्युट दिसतोय न शिव... माझ्या नजरेतुन बघ म्हणे... Happy

तेव्हा ती म्हणाली हि किती क्युट दिसतोय न शिव... माझ्या नजरेतुन बघ म्हणे... >>> हो फार गोड वाटलं ते आणि शिव खरंच क्युट दिसत होता.

पण मला आवड्ते दोघांची जोडी. शिव विणा,
आणि शिव तिला विनी म्हणतो ते ऐकायला पण आवडतं. >>> हो. त्यांचीच जोडी छान दिसते, वीणा पण गोड हसते बरेचदा पण अति दाखवू नये असं वाटतं मला.

शिव हीना जोडी अजिबात शोभणार नाही. ती खरोखर आक्काबाई वाटते त्याच्यापुढे.

शीव आणि वीणा कडे तंतोतंत शेडसकट सेम सेम कपडे कसे काय आहेत ?! एवढा योगायोग असेल ?! काळा पांढरा मी समजू शकते ..पण तो फिकट निळा , त्यादिवशीचा ऑरेंज आणि अजून एक कोणतातरी ..
आक्काबाई>> Lol

कपडे बाहेरून पुरवले जातात , दर आठवड्याला .>> अच्छा ! तरीच म्हंटल एवढे कपडे मावतात तरी कसे त्या कॉट च्या पोटात .. मला वाटायचं फक्त स्पॉन्सर केलेले /वीकएंड ला घालायचे कपडे तेवढे येतात बाहेरून..

या विकेंडला मात्र वीणाला चांगलंच झापायला हवंय म मांनी उद्धटपणाबद्दल. तिला जरा जमिनीवर आणायची गरज आहे. नवीन प्रोमोत किशोरीताईचं आणि तिचं वाजलंय चांगलंच.

या विकेंडला मात्र वीणाला चांगलंच झापायला हवंय म मांनी उद्धटपणाबद्दल. तिला जरा जमिनीवर आणायची गरज आहे.>> >> हो लवकरात आणायला पाहिजे . स्पष्टवक्तेच्या नावाखाली काहीही चालू आहे तिचे.पण ती ममा नाही काही दाद देत नाही .

{मला अस का वाटतय की विणा आणि शिवने इमोशनल ड्रामा केल्यामुळे रुपाली हरली टास्कमध्ये?}
कारण तुम्ही नीट किंवा अजिबातच पाहिलं नाही. >>>>>>>>> हम्म. हो मी अधूनमधन पाहत होते परवा.

काल शिव आणि हिना बोलत होते तेव्हा विणा किति येरझार्‍या घालत होती>> अन तो जेव्हा बाहेर होता तेव्हा ती म्हणाली हि किती क्युट दिसतोय न शिव... माझ्या नजरेतुन बघ म्हणे. >>>>>>>>> Lol

पण मला आवड्ते दोघांची जोडी. शिव विणा,
आणि शिव तिला विनी म्हणतो ते ऐकायला पण आवडतं. >>> हो. त्यांचीच जोडी छान दिसते, वीणा पण गोड हसते बरेचदा पण अति दाखवू नये असं वाटतं मला. >>>>>>>>> +++++++++१११११११११

शिव कन्सिटण्टली चान्गला गेम खेळतोय. काल चान्गला खेळला टास्क त्याने.

कपडे बाहेरून पुरवले जातात , दर आठवड्याला . >>>>>>>> मग नेहाला का नाही देत हे चान्गले कपडे? Uhoh

हिना मागच्या दोन दिवसापासून बरी वाटत होती. आज हिला काय झाल मध्येच? नॉमिनेशनमध्ये आल्यावर सगळयान्ना वेड लागत वाटत.

यू ट्युबवर आणि काही बिबॉ इंन्स्टा अकाऊंटवर परागशिवानी ,ऋतुजा वाईल्ड कार्ड म्हणून येण्याच्या बातम्या आहेत,बोलणी चालू आहेत सॉर्ट ऑफ ,पण मला अफवाच वाटत आहेत.

कपडे बाहेरून पुरवले जातात , दर आठवड्याला . >>>> बाहेरुन म्हणजे कन्टेस्टन्ट्स अरेन्ज करतात आपापले कपडे. घरून/ डिझायनर्स/ स्पॉन्सर्स कडून येतात दर आठवड्याला. चॅनल नाही प्रोव्हाइड करत कपडे. गेल्या वर्षी मेघाची ७ लाखाची खरेदी आणि स्मिताचे स्पॉन्सर्ड आउटफिट्स गाजले होते. शिव -वीणाला ( त्यांच्या स्पॉन्सर्स ना ) चॅनल ने टिप दिली असू शकते कलर कोडेड कपड्यांबद्दल पण अ‍ॅक्चुअल कपडे पुरवतील असे नाही वाटत.
नेहाचा कपड्यांचा चॉइस आणि एकूण ड्रेसिंग सेन्सच हॉरिबल आहे.

>>वीणा-शिव, केळ्या-वैशाली, मॅडी-नेहा अशा पेअर हव्या होत्या, मग समजल असतं कोण किती त्याग करणारे मित्रं आहेत !<<. +१

असा एक टास्क आहे/होता, हिंदी बिबॉमधे. या सिझनमधे जोड्या अजुन मुरायची वाट बघत असतील... Happy

वीणा-शिव, केळ्या-वैशाली, मॅडी-नेहा अशा पेअर हव्या होत्या, मग समजल असतं कोण किती त्याग करणारे मित्रं आहेत !< अगदी अगदी

माधव नेहाला ह्या आठवड्यात किती सुधारतेस ते बघू असं म्हणाला तेव्हा नेहानी त्याला ऐकवायला हवं होतं की तू काय स्वतःला सर्वगुणसंपन्न समजतोस काय? पण नेहा सध्या बॅकफूटवर जाऊन खेळत आहे. नेहा त्याला मित्र समजते पण तिला त्याच्या कडूनही केळ्याएवढाच धोका आहे असं मला वाटतं.

शिव - हीना संवाद तर जोकच वाटंत होता. ती तिला घर पाहिजे याशिवाय काहीच डिफेन्स देत नव्हती. तिला बिबॉ नी इम्यूनिटी देऊन त्याग करायला सांगितला असावा. अदरवाइज ती त्यागमूर्ती मटेरियल नाहीये. कोणीच नाहीये.

केळ्याच्या कॅप्टनसीचा बार फुसका निघालेला बघायला जाम आवडेल.

शिव हिना मधे काल जरी शिवला तिकिट मिळालं असल तरी पब्लिक मधे हिना पॉप्युलर झालीये त्यामुळे !
हिना वाटते तितकी डंब नाही, शिवला तिकिट देताना म्हंटली “शिव खूप इन्सिक्युअर झालाय म्हणून त्याला तिकिट देते“ Proud
हिनाने शिवला तिकिट देऊन त्याच्याकडे एक फेवर उधार ठेवला, पब्लिअक्मधे महान झाली, तिला माहितेय तशीही ती नाही जाणार, हायेस्ट वोट्स तिला होती ती नॉमिनेटेड असताना.

Pages