Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच जर voting lines बंद
खरंच जर voting lines बंद असतील तर नेहा तोंडावर पडणार, कसली खुश होऊन खुन्नसमध्ये बडबडत होती, सर्व grp खुश होता.
दोन शक्यता मेघाला जसं दारापर्यंत नेलं तसं बहुतेक वीणाला करतील किंवा सिक्रेट रूममध्ये वीणाला बिचुकले बरोबर ठेवतील, त्याला आणणार असतील तर. किंवा परागला दोन्ही. येत्या शनिवारी पहिलं हिनाला सेफ करतील.
आज कुठलं गाणं लावलेलं>>मेरे
आज कुठलं गाणं लावलेलं>>मेरे सैयाजी से आज मैने ब्रेक अप कर लिया.. खास शिव वीणा स्पेशल
यांच्याकडे मराठी गाण्यांच
यांच्याकडे मराठी गाण्यांच collection नाही आहे का.. मराठी मध्ये बोलायला सांगता ना..मग गाणी का नाही लावत मराठी.. नाचण्यासाठी मराठी उडत्या चालीची गाणी नाहीच आहेत काय.. !!!???
अरेरे काय ते गाणं
अरेरे काय ते गाणं
Thank u तुरु. त्यांनी आधी गाणं अस लावलं मग ते होण्यासाठी शिवला आदेश दिले का की विणाला नॉमीनेट कर, मिन्स scripted असेल का.
scripted असेल का.>>असूही शकते
scripted असेल का.>>असूही शकते किंवा नसुही शकते,
जोड्या आधीच फायनल केल्या असतील,मग एकतर ते गाणे विणाला लागू होईल किंवा हीना ला असा 2इन1 विचार केला असेल
रच्याकने,तो हिना चा पाठ दाबी चा नक्की काय प्रकार झाला,मिसल्यामुळे नीट कळले नाही
हिना शिवला सांगते तो नकार
हिना शिवला सांगते तो नकार देतो तर तिला राग येतो. मग ती माधवला सांगते, तो करतो ते काम. शिव बहुतेक वैशालीला मदत करतो ह्याबाबत, हिनाला नाही त्यामुळे ती खूप बडबडते, माझा insult केला म्हणते, तो सांगतो, मी comfortable नाहीये तुला मदत करण्यात. कोणी नीट बघितलं असेल तर लिहा, मी येता जाता बघते बरेचदा, त्यावरून झालेलं आकलन.
एकंदरीत मला वाटलं हिनाने अति issue केला, शिवला नव्हतं करून द्यायचं तर जबरदस्ती का, कधीतरी स्वतः च्या मनाने वागला तर वागुदेकी त्याला.
मी कदाचित वरणभात कॅटॅगरीतली
Ok अंजू, धन्स
मी कदाचित वरणभात कॅटॅगरीतली आहे म्हणून असेल कदाचित,पण एकंदरीत हिनाचे कपडे आजिबात आवडत नाहीत,उलट काल झोपाळ्यावर t शर्ट व थ्री फोर्थ घालून बसली होती तेव्हा छान ग्रेसफुल वाटली मला ती,
आता कस फिल्मी स्टाईलने होईल
आता कस फिल्मी स्टाईलने होईल शनिवारी.
पहिले पराग,रूपाली,किशोरीला सेफ करतील,.मग ममां सांगतील की हिना आणि वीणा दोघी डेंजर झोन मध्ये आहेत,प्रत्येक वेळी कँमेरा शिवर.
मग हिना सेफ आहे अस सांगतील,कँमेरा शिववर.
मग शिवलाच सांगतील ,प्लेट घेउन ये,.शिवची तेव्हि रिअँक्शन.कळेल.
आणि मग सांगतील की वीणा ,तू सेफ आहेस कारण व्होटिंग लाईन्स बंद होत्या.
शिव खुश.
आता बिचुकलेना कदाचित हीनाला आणायला सांगतील,ते घरात,म्हणजे हीना पण खुश.
पण यापेक्षा मला केळकर अँड कंपनीची रिअँशन बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे.
मला ही मालिका आता आवडायला लागली आहे.कारण गेल्या वेळी तो खरच रिअँलिटी शोच होता ज्याची यावेळेस बिबॉसने 100दिवसांची मालिका केली.
हीना शिव ला सांगते की पाठ
हीना शिव ला सांगते की पाठ दाबून दे.. तो माधव ला सान्गतो.. माधव 1 बोटाने दाबतो... हीना शिव ला म्हणते तू माझा insult केलास..आधी एका मुलीची पाठ दाबून दिली(वैशाली ची दाबली असावी..ते नाही दाखवल) मग शिव म्हणाला की मी comfirtable नाही आहे...डायरेक्ट नाही कस म्हणणार म्हणुन माधव ला सांगितल.. ती मंद आग्लावी वैशाली मस्त बघत होती..आणि शिव ला म्हणते तू हे चुकिच केलस.. let her complete म्हणे. हीना बडबड करत होती... आता जर शिव ने नकार दिला तर त्यात हिचा एवढा कसला insult झाला.. एकतर तिने कपडे कसे घातले होते.. त्यात जरा इकडे तिकडे हात गेला तर परत मांन्ज्या त्याची शाळा घेतोय की इम्प्रोपेर way ने टच केलस.. काल तो हीना चा टॉप ?? कम ब्रा भयंकर रीविलींग होता.. टीवी वर कुटुंबासोबत ,मुलांच्या समोर खेडो पाडी घराघरात शो बघीतला जातो.. काही नियम नाही आहेत का कसे कपडे घालावे याचे..
हीना ला काय बिचुकल्या चा पाठदाबी चा एपिसोड कंटिन्यू करायचा आहे का.. चिपपणा
बिबॉ१ प्रमाणेच पुन्हा बीग-४ (
बिबॉ१ प्रमाणेच पुन्हा बीग-४ (?) ग्रुप तयार होत आहे. किंवा झाला आहे. मेघा-सई-पुष्करशी अजिबातच तुलना नाही, पण सध्या लक्षणं तर तशीच दिसतायंत. या चौघांतली किशोरी मात्र कधीही एलिमिनेट होऊ शकते.
एलिमिनेशन नसल्याने टीम नेहा चा किचन मधला त्रागा वाया जाणार असं दिसतंय.
कालच्या टास्क मधे हे चौघे नॉमिनेट होणारच हे जवळपास नक्की होतंच. नंतर हिना पण झाली. त्यावरची वीणाची अर्ग्युमेंट चूक की बरोबर ह्यात न पडता, तिने ती लावून धरल्याने शिव निरुत्तर झाला ! त्याने एक प्रयत्न केला सांगायचा की दोन दोन च्या जोड्या समोर आल्यावर त्यानुसारच निर्णय घ्यावा लागणार, पण त्याला तो नीटसा पटवता आला नाही, किंवा वीणाच्या दंग्यात तो झाकोळला गेला
सुपुंचा विणावरचा हल्ला आणि मग चिचुंद्री म्हणणं भारी होतं. या दरम्यान वीणा पटकन जाऊन स्मार्टली त्यांना सॉरी म्हणून आली.
एपिसोड संपताना काही सेकंदासाठीच खाली पट्टी दिसली की या आठवड्यात नॉमिनेशन नाही ! बिचुकले परत येणार याची ही नांदी असावी. किंवा येणार नसतील तर एकदम दोन-दोन जण का एलिमिनेट करा असंही लॉजिक असू शकेल
आणि पुणेकर बाईं ना का एवढं
आणि पुणेकर बाईं ना का एवढं झोंबल की कामं करत नाहित ते..कारण त्या नाही करत जास्त काम किंवा गेम मध्ये पण active participate करत नाहित..पण भांडण मस्त करतात..एकदम गावरान ठसका
बिचुकलेला परत आणणार असतिल तर
बिचुकलेला परत आणणार असतिल तर अवघड आहे. सुंठीवाचून खोकला गेला आहे तर जाउ दे ना. नाहीतर मांजरेकरांनी ती महिलांचा सन्मान वगैरे लेक्चरबाजी केली होती त्याला काय अर्थ उरला. बिचुकले होता तेव्हा त्याचे आणि त्या हीनाचे चाळे बघवत नव्हते.
बिचुकलेला आत आणणार असतील तर
बिचुकलेला आत आणणार असतील तर एका अर्थाने बरे आहे नाहीतर तो गृहस्थ आयुष्यभर सांगत बसला असता की त्याला बाहेर काढले नसते तर तोच जिंकला असता हा शो
त्याला आत आणतील, व्यवस्थित टीआरपी ओढतील आणि फिनालेच्या जस्ट आधी रितसर नारळ देतील!
एपिसोड संपताना काही
एपिसोड संपताना काही सेकंदासाठीच खाली पट्टी दिसली की या आठवड्यात नॉमिनेशन नाही ! >>> अच्छा, मला दिसलीच नाही ती, थँक यु.
बिचुकले नको परत यायला. आणणार त्याला. कोणीतरी लिहीलंय की सोमवारी येईल. आरती ओवाळा, पायघड्या घाला, चालुद्या bb. त्याला आणणार हे नक्कीच आहे कारण तो चेहेरा काळा केला नाही त्याचा मीन्स अंधार नाही त्यावर.
त्याला आत आणतील, व्यवस्थित
त्याला आत आणतील, व्यवस्थित टीआरपी ओढतील आणि फिनालेच्या जस्ट आधी रितसर नारळ देतील! >>> हम्म्म तसंच वाटतंय.
मी कदाचित वरणभात कॅटॅगरीतली आहे म्हणून असेल कदाचित,पण एकंदरीत हिनाचे कपडे आजिबात आवडत नाहीत,उलट काल झोपाळ्यावर t शर्ट व थ्री फोर्थ घालून बसली होती तेव्हा छान ग्रेसफुल वाटली मला ती, >>> मलाही कधी कधी नाही आवडत. कधी छान असतात. स्मिता खूप ग्रेसफुल वाटायची मात्र हिच्यापेक्षा. सर्व कपडे नीट carry करायची.
पण यापेक्षा मला केळकर अँड
पण यापेक्षा मला केळकर अँड कंपनीची रिअँशन बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. >>> हो केळकर, वैशाली आणि नेहा यांचा जास्तकरून. काल नेहाने खुश होऊन कित्ती बडबड केली, तिचा तर बघायचाच आहे.
कदाचित सिक्रेट रूममध्ये पाठवलं तर अजून एक आठवडा हे सर्व खुश असतील मग पचका.
हीना ने शिवला पाठ दाबायला
हीना ने शिवला पाठ दाबायला सांगितली होती कारण त्या आधी त्याने वैशालीची पाठ दाबून दिली होती. पण शिवने तिला काहीच उत्तर न देता डायरेक्ट माधवला सांगितले हिची म्हणजे हिनाची पाठ दाब म माधवने दाबली. हिना शिवला इन्सल्ट झाली असे म्हणाली कारण शिवने तिला हो किन्वा नाही असे काहिच उत्तर दिले नाही आणी माधवला सांगितले
शिव बोलला नाही कसे म्हणणारं शिव कधी कधी स्पष्टउत्तरे देत नाही .
या मध्ये मला हिना बरोबर वाटते. तिला शिव कडुन फक्त उत्तरचि अपेक्षा होती . नाही बोलला असता शिव तरी तिला चालले असते.
अच्छा असं झालं काय.
अच्छा असं झालं काय.
हीना इतके revealingकपडे का
हीना इतके revealingकपडे का घालते. शिवला तर मांजरेकर सर बोललेले बंडी तरी घालत जा बाबा . आणी बिचुकलेन च्या पँट खाली असण्यापासुन घरात प्रोब्लेम होता.तेंव्हा मांजरेकर सरांनी सांगितले होते की तुमच्या लो वेस्ट पँट आहेत पुढच्या वेळी नॉर्मल पँट मागवा. मग आता हिनाला काही सांगणार नाही का?
काल नेहाला वाटलं शिवने
काल नेहाला वाटलं शिवने आपल्याला हवा तसा निर्णय दिला. जबरी झटका दिला समोरच्या टीमला. मधेच छान नॉर्मल हसत होती, मधेच खुनशी. नंतर किचनमध्ये फुल टू बडबड काय बॉस, खेळलोय आपण. आता जेव्हा समजेल voting lines बंद होत्या तेव्हा तिच्यावर पहिला आणि नंतर अ के वर camera फिरवा. मला बघायचे आहेत यांचे चेहेरे.
याउलट kvrp टीमचे होईल. पूर्ण आठवडा चीडचीड, खुन्नस, राग आणि विकेंडला सिक्रेट रूममध्ये कोणाला नेलं नाही तर ही टीम एकदम happy आणि सातवे आसमानपर असेल.
काय खेळलेत बिग बॉस. किमान नेहाने तरी ओळखायला हवं होतं की हा turn येऊ शकतो. ती हुशार आहे तशी. सध्या सात जणांची टीम सातवे आसमानपर, विकेंडला उलट.
अगदी अगदी,तो अ के,आणि नेहा
अगदी अगदी,तो अ के,आणि नेहा,वैशाली खुपच डोक्यात जातात,जसा आस्ताद जायचा मागच्या वेळी,
पराग अतिशहाणा वाटत असला तरी अजून डोक्यात नाही जात
खरं सांगुका वैशालीच्या चेहे
खरं सांगुका वैशालीच्या चेहे-यावर बरेचदा बारा वाजलेले असतात, सॉरी यासाठी. पण ती हसून खेळून असते तेव्हा छान वाटते. हो वैशाली आणि शिवचापण चेहेरा बघायचा आहे मला. शिवचा सर्वात जास्त पचका होणार, त्याला पश्चाताप होईल सर्वच नेहाचं ऐकल्याचा.
शिव बिचारा फसला आज आयर्न
शिव बिचारा फसला आज आयर्न थ्रोनवर बसून

लिट्ल फिंगर माधव आणि व्हॅरीस नेहानी आपली खेळी बरोबर खेळली आणि शिव बर्न्ड देम ऑल
त्याच्यावर बायस्ड असण्याचा आरोप होणारच आहे पण ऑनेस्ट्ली मला परागपेक्षा केळकर, किशोरीपेक्षा सुरेखा, रुपालीपेक्षा वैशाली यांनी आपापली बाजु चांगली मांडली आणि डिझर्विंही वाटतात.
वीणा आणि हिनामधे आणि माधव-हिनामधे मात्र फसला पण फार मजा आली वीणाचा थोबडा बघताना!
शिवसाठी टाळ्या, आता पुन्हा जाऊन वीणाला फुलं देऊ नयेत म्हणजे झालं !
आज ज्या जोड्या आल्या त्यात एकाचीही हिंमत नव्हती म्हणायची कि मी दुसर्यापेक्षा जास्तं एंटरटेनिंग आहे, एन्टरटेन्मेन्ट फॅक्टर सिरीयसली घेतच नाही कोणी, मेघानी तिच्या एंट्रीलाच वन लायनर फेकला होता, बिगबॉस सिर्फ ३ चीजोसे चलता है, एन्टरटेन्म्नेट एन्टरटेन्म्नेट एन्टरटेन्म्नेट!
एन्टरटेन्म्नेट वरून आठवल, बिचुकले गेल्यानंतर हिनानी चांगला गेम खेळायला सुरवात केली आहे, डान्सही करते, ग्लॅमर आणलय !
शिव आज हिनाला मसाजला नाही म्हंट्ला ते बरोबरच होतं, एक तर उघड्या पाठीवर मसाज करायला ऑकवर्ड झाल असेल त्याला, त्यात ओळख १ आठवड्याची, एखादीने इम्प्रॉपर टच केला अशी तक्रार केली अस्स्ती तर केवढ्याला पडलं असेल त्याला.
माधव तर काहिच करत नाहिये शो
माधव तर काहिच करत नाहिये शो मध्ये त्याच्या पेक्षा तर सुरेखा ताई बर्या. सुरेखा ताईनी तर kvpr ग्रुप मध्ये शपथ घेतली होती ना आणी लगेच आता स्वत सेफ़ झाल्यावर त्याना नावे ठेवू लागल्या. त्यादिवशी तर पराग ला बोलत होत्या मला नेहा असलेल्या ग्रुप मध्ये जायच नाहिये.
नेहाशी पण भेंडीच्या भाजी वरून भांडत होत्या.
या आठवड्यात गंमत अशी की नेहा
या आठवड्यात गंमत अशी की नेहा आधीच सेफ असल्याने, आता हा सर्व डाव bb खेळले आहेत तर एंड ऑफ द विक नेहाला आपण सेफ होतो त्याचाही आनंद मिळणार नाहीये.
Actually खेल गये बिग बॉस.
वीणाला पण हरबऱ्याच्या झाडावरून खाली उतरवतील यावेळी.
आज नेहाचा बड्डे आहेना, तिला
आज नेहाचा बड्डे आहेना, तिला शुभेच्छा. काल वीणा मी लवकर झोपणार, बड्डे म्हणून म्हणाली ते मला अजिबात आवडलं नाही. इतकं कद्रू असू नये.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=6HsV6B84nLE
बाप्पा अ बि बद्दल सांगतायेत, आतमध्ये काय झालं.
आतच प्रोमो मध्ये पहिल आज
आतच प्रोमो मध्ये पहिल आज खुर्ची सम्राट सारखे task आहे. टीम कशा आहेत माहिती नाही. बहुतेक शिव रुपाली वीणा पराग किशोरी एका टीम मध्ये आहेत आणी केळकर नेहा हीना वैशाली माधव एका टीम मध्ये.
काय खेळलेत बिग बॉस. किमान
काय खेळलेत बिग बॉस. किमान नेहाने तरी ओळखायला हवं होतं की हा turn येऊ शकतो. ती हुशार आहे तशी. सध्या सात जणांची टीम सातवे आसमानपर, विकेंडला उलट. >>>>>>>>> अगदी अगदी. भाण्डान्ना सुरुवात झालीये घरात दोन ग्रुप पडलेत. एकमेकान्च्या उरावर बसलेत अक्षरशः ! प्रिकॅप तर कहरच आहे.
काल तो हीना चा टॉप ?? कम ब्रा भयंकर रीविलींग होता.. टीवी वर कुटुंबासोबत ,मुलांच्या समोर खेडो पाडी घराघरात शो बघीतला जातो.. काही नियम नाही आहेत का कसे कपडे घालावे याचे.. मलाही कधी कधी नाही आवडत. कधी छान असतात. स्मिता खूप ग्रेसफुल वाटायची मात्र हिच्यापेक्षा. सर्व कपडे नीट carry करायची. >>>>>>>>> +++++++++१११११११ कुणी पर्सनली कसे कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा/ जिचा/ तिचा प्रश्न आहे. पण मलाही तिचे कालचे कपडे आवडले नाहीत. चित्रपटात असे कपडे ठिक आहेत. पण प्रत्यक्षात टिव्हीवर सगळया हाउसमेटस समोर ते Uncomfortable वाटत. स्मिताचे कपडे ग्रेसफुल होते. बाकी हिना बिचकुले गेल्यानन्तर चान्गल खेळायला लागलीये.
शिवचा काल दोन्हिकडून ब्रेकअप झाला.
त्याने हिनाची पाठ दाबायला नकार दिला ते बरोबर केल.
त्यांनी आधी गाणं अस लावलं मग ते होण्यासाठी शिवला आदेश दिले का की विणाला नॉमीनेट कर, मिन्स scripted असेल का. >>>>>>>>>> असू शकत. शेवटच्या नॉमिनेशनला शिवने बाकी सगळयान्च सोडून हिनाचेच नाव घेण हे सुद्दा scripted वाटत. रुपाली आणि वैशाली काल त्यान्च्या टास्कच्या आधी एकमेकीन्शी हसत खेळत बोलत होत्या!
परागच्या डोक्यावर ती शिंगे बघून मला ओनिडाची जाहिरात आठवली>>> >>>>>>> सेम पिन्च
अ के परागबद्दल सान्गत होता की ' किचनमध्ये बायका जमलेल्या होत्या तेव्हा परागने लज्जास्पद गोष्ट केली, ती गोष्ट मी सर्वान्समोर सान्गू इच्छित नाही' नक्की काय केल परागने?
बाकी पराग छान बोलला काल.
शिवचा सर्वात जास्त पचका होणार, त्याला पश्चाताप होईल सर्वच नेहाचं ऐकल्याचा. >>>>>>>>>> हो ना. त्यात दोन ब्रेक अप्स झाल्याच दु:ख.
खुर्ची सम्राट टास्क, अब आयेगा मजा!
पण भांडण मस्त करतात..एकदम गावरान ठसका >>>>>>>> हे त्यान्नी सुरुवातीच्या weeks पासून करायला हव होत.
मला ही मालिका आता आवडायला लागली आहे.कारण गेल्या वेळी तो खरच रिअँलिटी शोच होता ज्याची यावेळेस बिबॉसने 100दिवसांची लमालिका केली. >>>>>>>>> मागच्या बिबॉच्या धाग्यावर कुणीतरी त्या सीझनवर बेस्ड अशी डेली सोप लिहिली होती. रेशम आऊन्ची लाडकी सून, मेघा नावडती सून, ऋतुजा थत्ते आणि हखा ची अनौरस मुलगी वै वै. ह्यावेळी अस काहीतरी वाचायला आवडेल. माझ्याही डोक्यात एका मालिकेची आयडिया आहे, पण आधी वाईल्ड कार्डस चा कोटा पूर्ण होउ दे घरात.
आज नेहाचा बड्डे आहेना, तिला
आज नेहाचा बड्डे आहेना, तिला शुभेच्छा. काल वीणा मी लवकर झोपणार, बड्डे म्हणून म्हणाली ते मला अजिबात आवडलं नाही. इतकं कद्रू असू नये>>>>+111
लास्ट सीज़न मध्ये कितिही मतभेद असलेतरिही वाढदिवस सगळे एकत्र येउन साजरे करायचे.
वैशाली आणी केळकर सारखे शिवचे ब्रैन वॉश करत असतात.
म्हणे स्व्तःसाठी आणी मग अपल्या लोकांसाठी खेळ आपले लोक म्हणजे हे दोघे का? आणी दोघेही शिव चा फायदा घेतात आणी त्याला सांगत असतात वीणाला तुझा फायदा घेऊ देऊ नको.
Pages