मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झालंय सुरू!
एक निरीक्षण - लहान पोरं कितीही क्युट, निरागस वगैरे असलीत, तरीही बिग बॉसच्या मंचावर नाही शोभत.
बोर होतंय खूप...

मन्या Lol

पहिली कंटेस्टंट - किशोरी शहाणे!

दिगंबर नाईक, बोरिंग कॉमेडी आणि नेहा शितोळे, एक नंबरची भांडकुदळ!!!!
अभिजित बिचुकले, कपाळावर जोरात हात मारणारा बाहुला!!!

वैशाली माडे!!!
अजूनही सगळं बोरिंगच वाटतय.
वैशाली माडेचा मुलीला भेटण्याचा सिन किती फेक वाटत होता.

ममांला कशाला आणलं पुन्हा?
नवनीत बोंडेला घेणे कमिटीचीच चूक होती हे उमगले ना? आता बिबॉ२ च्या
सुरुवातीलाच त्याच्यावर "चाय से केटली गरम" कॉमेंट भंपकपणाच.

शिवानी सुर्वे.
आता जरा बरी कंटेस्टंट आलीये असं वाटतंय!

सोनी हास्यजत्रा'तले खांडेकर/समीर चौघुले/विशाखा/प्राजक्ता/अरुण कदम पैकी कुणी- थोडा टैमपास झाला असता किंवा ममांचीच शाळा घेतली असती.

शिव ठाकरे आलाय.
एक जबरदस्त कंटेस्टंट!!!

यावेळी प्रस्थापित कलाकारांपैकी किशोरी सोडून बाकी कोणीच नाहीत..कोणी मिळालेच नाही का?

वैशालीची मुलगी तिच्या मागेच ऊभी होती तरी तिला दिसली नाही, किती फेक. शिवानीमुळे ग्लॅम फॅक्टर आला. सुंदर आहे ती दिसायला. शिव ठाकरे अगदी लंपट वाटतो. कसला वल्ली आहे तो.

मी आत्ता बघतेय. शिवानी पण अ‍ॅग्रेसिव्ह मुडमधे दिसतेय. मी आधी ओळखलंच नाही तिला. मला तो पुर्ण तीन तासांचा कार्यक्रम बघायचा नव्हता, सगळे घरात आल्यावर सुरु होतो तेव्हापासून बघायचं होतं म्हणून आत्ता दहानंतर लावला टीव्ही.

वरती कोणीतरी लिहीलं शितोळे भांडखोर आहे ते खरं आहे, झुंज मराठमोळीमधे जाम भांडायची.

विद्याधर जोशी,....मस्त actor आहे.... बिग बॉस factor किती जमतोय बघू.... मजा येईल असे वाटते

अरे अजून येतायेत का, मला वाटलं आले असतील सर्व.

शिव कोण तो शिवानीबद्दल बोलला तो का, तगडा आहे तो.

शिव ठाकरे,सुरेखा पुणेकर,विदयाधर जोशी,बिचकुले,शिवानी
हि टिकणारी लोकं वाटताएत.

Pages