मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जु
अगं स्मिताचा गृप वेगळा होता ना , ती कशी बसेल मेघा पुष्कर बरोबर? तिथे सईच बसणार, त्यांचं त्रिकुट एकेकाळी फेमस होतं म्हणून!
रँक वाइज कोणीच बसल नव्हतं, रेशम -अस्ताद , सुशान्त- स्मिता असे आले होते स्टेजवर छोट्या गृप्स मधे.
स्मिताला मुळात ना बोलता येत ना हजरजवाबीपणा आहे, तिला फारसा स्कोप नवह्ताच मिळणार!
शराही तशीच बावळट वाटत होती , तिलाही अजिबात नाही जमत एन्टर्टेनिंग /स्पायसी बोलायला, तिचं फक्त युनिक हस्स्णं एन्टरटेनिंग होतं.
त्यामानाने नन्द्किशोर , आउ, आरती, आस्ताद आणि अर्थात रेशमने भरपूर दंगा करून घेतला.
रेशम खरं तर हिन्दी बिबॉ मटेरिअल आहे, इमेजची परवा मुळीच करत नाही , बिंधास्त बोलते, भरपूर ड्रामा आणि बोल्डनेस आहेच वर एखाद्याच्या लेव्हलला जाऊन लाउड होऊन त्या व्यक्तीला घाबरवायची कुवत आहे तिच्यात, उगीच आळस करण्यात घालवले तिने बरेच दिवस!
जितुला बिंधास्त म्हंटली रेशम कि मेघाला हिन्दी मधे कोणी भाव नाय दिला रे, तिथे कोण ओळखत नाही तिला आणि ओळख करून दिल्यावर उलट टवाळी केली तिची तिथली विनर इथे कशाला आली म्हणून Happy
Btw ऋतुजा स्लिम अजिबात नव्हती दिसत, ती उभी राहिली तेंव्हा पोटांवरच्या वळकट्या भयंकय हायलाइट होत होत्या , असे का ड्रेसेस देतात यांना Uhoh

रँक वाइज कोणीच बसल नव्हतं >>> असं होय, मला वाटलं पहीले तीन.

स्मिताला मुळात ना बोलता येत ना हजरजवाबीपणा आहे, तिला फारसा स्कोप नवह्ताच मिळणार! >>> वो तो है.

जितुला बिंधास्त म्हंटली रेशम कि मेघाला हिन्दी मधे कोणी भाव नाय दिला रे, तिथे कोण ओळखत नाही तिला आणि ओळख करून दिल्यावर उलट टवाळी केली तिची तिथली विनर इथे कशाला आली म्हणून >>> त्यावर मेघा काही म्हणाली नाही का.

मेघासाठी रेशम स्मिताने वोट अपिल केलेलं मात्र हिंदी बिबि वेळी. तेव्हा ज्यांना मेघा आवडत नाही असे स्मिताचे फॅन उखडलेले तिच्यावर. मला मेघा स्मिता दोन्ही आवडतात म्हणून मला काही वाटलं नाही, मी असंही मेघाला वोटींग केलं हिंदी बिबित. मी तशी फॅन कॅटेगरीत येत नाही, मला आवडतात मात्र दोघी.

पुष्करने स्वतःचं काय केलंय नक्की मिन्स काय बदल केलाय, फार विचित्र दिसत होता.

डीजे thank u, सविस्तर उतर दिलंस त्याबद्दल.

आरती च बोलण चालु होत तेव्ह शेवटी सई तिला " गप्प बस , आणखी काही रिव्हिल करु नको अशा खुणा करत होती मग कट टु शराच बोलायला लागली तिथे बहुधा एडीट केल असाव
बहुधा ते सगळ स्मिताविषयी होत अर्थात तिथे ते बोलल गेलच असेल पण निदान ऑडियन्स मधे जायला नको अस काही असेल...( का मलाच एडिटेड दिसल)

हो, एडीट केलं, जेंव्हा त्यांचं भांडण पर्सनल लेव्हलला गेलं, स्मिता बद्दल आरती काय बोलली ते केलच एडीट पण मेघा काहीतरी आरतीने केलेल्या प्रायव्हेट मेसेजेसविषयी बोलायला लागली,मग आरती मेघानी तिला सक्सेस पार्टीला बोलावल नाही , मिडीयाला मात्रं आरती आली नाही वगैरे सांगत होती वगैरे बोलायला लागली तेंव्हा जितुनी थांबवलं, आरतीला फार सौम्य शब्दात पण मेघाला कडक शब्दात सांगितल जितुनी कि तू विनर आहेस, स्वतःची डिग्निटी मेन्टेन करायची तर कर किंवा हे भांडण कंटिन्यु कर !

मिडीयाला मात्रं आरती आली नाही वगैरे सांगत होती वगैरे बोलायला लागली तेंव्हा जितुनी थांबवलं, आरतीला फार सौम्य शब्दात पण मेघाला कडक शब्दात सांगितल जितुनी कि तू विनर आहेस, स्वतःची डिग्निटी मेन्टेन करायची तर कर किंवा हे भांडण कंटिन्यु कर !>>>> हो का? मला हे काहिच दिसल नाहि मी gillytv वर बघीतला एपिसोड
वर्ष झाल तरी सगळे अजुन बीबॉच्या घरात असल्या सारखेच वागत होते,
रेशम अजुनही मी जिन्कायला आली नव्हती वैगरे गाण गात होती, माझे इन्डस्ट्रित मित्र आहेत, मी बिनधास्त आहे वैगरे बडबडली पण राजेशच्या प्रश्नावर एक्दम घुम्जाव गोलमाल उत्तर दिल.
मेघाचा हॅन्गओव्हर उतरेल तेव्हा बीबॉचा शेवटचा सिझन चालु असेल बहुधा.

नविन बीबाॅॅसाठी प्रसिद्धीतंत्र आहे, बाकी काही नाही. रेशम महाआळशी आहे, तिथे गेम खेळावे लागतात हे माहित नव्हतं वगैरे थोतांड आहे, तिच्या मुलांनाही माहित नव्हतं का,काहीही बोलते.

पुष्करने स्वतःचं काय केलंय नक्की मिन्स काय बदल केलाय, फार विचित्र दिसत होता. >> बायकोनं धू धू धुतला असेल त्याला वर्षभर. ब्लीच मध्ये घालून, धोक्यानं धोपटून, पाण्यातून पिळून काढून मग उन्हात दोरीवर खडखडीत वाळवून ठेवल्यासारखा दिसत होता.

मामी Lol Lol

भूषण प्रधान आणि मनवा नाईक यांची नाव संभाव्य यादीमध्ये जरी असली तरी दोघही हँम्लेट नाटकात काम करत असून त्याचे २५,२६ तारखेला आणि १जूनलाही प्रयोग आहेत.
त्यामुळे ते दोघ असण्याची शक्यता कमी दिसत आहे,पण असते तर आवडल असत.

Specially मेघाचा insult करायला अन् रेशम, पुष्करला मोठेपणा द्यायला colours मराठीने एकदम कडक चे episodes बनवलेत अस वाटले कालचा एपिसोड बघून... आता show संपल्यावर नंदकिशोरनी मेघाला लिहिलेल पत्र वाचून दाखवायची काय गरज होती?

तो सगळा सिझन २ च्या प्रमोशनचा भाग आहे; डर्टि लाँड्री जगासमोर आणुन टिआरपी वाढवण्याचा. राहिला प्रश्न अपमानाचा, तर माझ्या मते मराठी बिबॉ विनरने हिंदी बिबॉमधे भाग घेउन तिथे करुन घेतलेली मानहानी जास्त अपमानास्पद आहे...

Specially मेघाचा insult करायला अन् रेशम, पुष्करला मोठेपणा द्यायला colours मराठीने एकदम कडक चे episodes बनवलेत अस वाटले कालचा एपिसोड बघून...>>> सगळ्या सो कॉल सेलेब्रिटि मधुन मेघा सारखी अगदिच नॉन सेलेब जिन्कली हे तेव्हा सगळ्यानाच पचल नाही अगदी मान्जरेकराना सुद्धा पण पब्लिकनेच मेघाला उचलुन धरल तेव्हा चॅनेलसहित सगळ्यान्चाच नाइलाज झाला.
मेघाने हिन्दीत जायचा आगाउपणा करायलाच नको होता हे मात्र नक्कि

बी बॉ मराठी सीजन 2 अजून सुरू व्हायच्या आधीच धागा जोरात सुपर फास्ट धावतोय... सुरू झाल्यानंतर खूप मजा येणार आहे..

धन्स सुलू_८२, अगदी राइट टाईम धागा निर्मिती बद्दल..

शीर्षक गीत (रॅप) फारसं भावत नाहीये

@ अजब - खरं बघायला गेलं तर तो ओवर कॉन्फिडन्स नव्हता. शोच्या कॉन्ट्रॅक्टनुसार मेघा तिथे जायला बांधील होती.
मात्र हिंदी बिग बॉस वाल्यांनी तिचा व्यवस्थित गेम केला.
१. सगळ्यात आधी तर तिला वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून घरात एन्ट्री देण्यात आली. हिंदी बिग बॉस चा इतिहास असा आहे की वाइल्ड कार्ड एंट्री आजपर्यंत कधीच शो जिंकलेली नाही. इथेच मेघाचे जिंकायचे चान्सेस खूप कमी झाले.
२. घरात तिची एंट्रीच मराठी बिग बॉस ची विजेती म्हणून करण्यात आली. त्यामुळे बाकीच्या स्पर्धकांना ती अतिशय मजबूत थ्रेट वाटू लागली, आणि तिला एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले.
३. मेघाला मराठीच्या घरात पूर्णपणे मोकळं रान होतं, तिला सिरीयस थ्रेट एकच उरला होता ती म्हणजे सई. राजेश आणि रेशम आधीच बदनाम झाले होते. आस्ताद काळे त्यांच्या ग्रुपमध्ये राहूनही बदनाम झाला होता. सुशांत शेलार कायम गुंड मवाली म्हणूनच वावरत राहिला, आणि स्मिता मात्र कायम कन्फ्युज वाटत राहिली. पुष्करसुद्धा मेघा आणि सईचा साथीदार म्हणून प्रसिद्ध होता, आणि नंतर शर्मिष्ठाही. ऋतुजा शो सोडून गेली होती, आणि आऊ स्ट्रॉंग वाटण्याऐवजी वीक वाटत होत्या.
जोपर्यंत मेघा आणि सई स्वतः प्लॅनिंग प्लॉटिंग करत होत्या, तोपर्यंत सही मेघाला ओव्हरटेक करत होती, पण पुष्करच्या नादात ती मेघा पासून बाजूला झाली, आणि सई नीगेटिव्ह वाटायला लागली.
४. हिंदीत मात्र सगळे फासे मेघाच्या उलट होते. दीपिका आधीच कलरची सून म्हणून हिंदी भाषिक पट्ट्यात प्रचंड प्रसिद्ध होती. हिंदी भाषिक म्हणून हीच केस रोमिल आणि दीपक बरोबर सुद्धा होती. श्रीशांतला बेधडक वागण्यामुळे वोट मिळत होते. किचन सांभाळण्यासाठी आधीपासूनच अनेक दावेदार होते. करणविर त्याची इमेज क्लीन बॉय म्हणून राखून होता, आणि जसलीन आणि सृष्टीच्या प्लॅनिंग पुढे तिचं काहीच चालत नव्हतं.
जो कायम पडद्यावर दिसण्याचा अट्टाहास तिला मराठी बिग बॉस विनरपदाकडे घेऊन गेला, तोच अट्टाहास तिला हिंदी बिग बॉस मध्ये प्रचंड निगेटिव्ह इमेज देऊन गेला...
आणि मेघा बाहेर पडली...

मेघा जिंकली आहे पहिला सिझन प्रेक्षकांच्या votingने, हे channel च्या अजिबात पचनी पडलं नाहीये का, तिला बोलाऊन अशी treatment का दिली. बघितला नाही मी अजिबात पण इथे वाचून समजतंय.

अज्ञातवासी छान विवेचन.

सई निगेटिव्ह वाटायला अजूनही कारणे आहेत. अति पुष्की पुष्की आहेच वरून कॅप्टन झाली की छान मिरवायची. एरवी प्रचंड आळशी, सारखे आजारपण पुढे करणे, लोळत बसणे. हे ही अति सर्वांच्या डोळ्यात येईपर्यंत झालं.

स्मिता confused असुदे dumb असुदे किंवा दाखवुदे पण सतत कामात, सर्वांना मदत, आजारपण कधीच नाही, क्वचित दुसऱ्यांना नावे ठेवणे. यामुळे जनसामान्यांना ती आवडायला लागली सईपेक्षा.

>>शोच्या कॉन्ट्रॅक्टनुसार मेघा तिथे जायला बांधील होती.<<
हे आपलं मनघडन कि काहि ठोस माहिती आहे तुमच्याकडे. चॅनल फारफार तर विनंती करु शकते, जबरदस्ती नाहि. अन्यथा, साउथ मधले बिबॉ विनर दिसले असते हिंदी बिबॉ मध्ये आतापर्यंत...

>>२. घरात तिची एंट्रीच मराठी बिग बॉस ची विजेती म्हणून करण्यात आली. त्यामुळे बाकीच्या स्पर्धकांना ती अतिशय मजबूत थ्रेट वाटू लागली, आणि तिला एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले.<<
डिड यु इवन वॉच हिंदि बिबॉ? सुरुवातीपासुनच मेधाला कोणिहि अजिबात भाव दिला नाहि, सतत खिल्ली उडवुन तिला सळो कि पळो करुन सोडलं होतं. काहिंनी उघड कुतुहुल हि व्यक्त केलं कि हि मराठी बिबॉ जिंकली कशी? अँड दॅट इज ए टाइट स्लॅप ऑन मराठी बिबॉ...
>>४. हिंदीत मात्र सगळे फासे मेघाच्या उलट होते. <<
हे सारं माहित असुनहि या बाई फाजील आत्मविश्वासाने हिंदि बिबॉ मध्ये गेल्या आणि लाफिंग स्टॉक झाल्या...

डिड यु इवन वॉच हिंदि बिबॉ? सुरुवातीपासुनच मेधाला कोणिहि अजिबात भाव दिला नाहि,>>
हिन्दी बीबॉ चे आत्ताचे काही सिझन फार लेव्हल सोडून आहेत त्यातही आम पब्लिक आणि सेलेब अस मिक्स होत पण आम जनतेतेले स्पर्धक अगदिच काहितरी होते...त्यामुळे मेघाने त्या दलदलित जायलाच नको होतो.

किशोरच पत्रवाचन आत्ता का केल ते माहित नाही पण हे पत्र त्याने आधि पण वाचल होत, तेव्हाही मेघाला वरचढ दिसु न देणे असा उद्देश होता अस वाटत होत पण आता सिझन सन्पल्यावर कशाला परत तेच तेच

सतत खिल्ली उडवुन तिला सळो कि पळो करुन सोडलं होतं. काहिंनी उघड कुतुहुल हि व्यक्त केलं कि हि मराठी बिबॉ जिंकली कशी? अँड दॅट इज ए टाइट स्लॅप ऑन मराठी बिबॉ...>>>>>>
यालाच मी एकटं पाडण्याचे प्रयत्न म्हणालो.
'दीपिका आधीच कलरची सून म्हणून हिंदी भाषिक पट्ट्यात प्रचंड प्रसिद्ध होती. हिंदी भाषिक म्हणून हीच केस रोमिल आणि दीपक बरोबर सुद्धा होती. श्रीशांतला बेधडक वागण्यामुळे वोट मिळत होते. किचन सांभाळण्यासाठी आधीपासूनच अनेक दावेदार होते. करणविर त्याची इमेज क्लीन बॉय म्हणून राखून होता, आणि जसलीन आणि सृष्टीच्या प्लॅनिंग पुढे तिचं काहीच चालत नव्हतं.'
यावरही लक्ष द्यावं ही विनंती, न बघणारा माणूस असं लिहू शकतो का?

हे आपलं मनघडन कि काहि ठोस माहिती आहे तुमच्याकडे. चॅनल फारफार तर विनंती करु शकते, जबरदस्ती नाहि. अन्यथा, साउथ मधले बिबॉ विनर दिसले असते हिंदी बिबॉ मध्ये आतापर्यंत..
>>>
चॅनल फार फार विनंती? चॅनल्सचे कॉन्ट्रॅक्ट कसे असतात बघितलेत ना, तर घेरी येऊन पडाल.
मणघडन्ट काही नाही, वायकोमच्या एका सिनीयर माणसाशी गप्पा मारताना त्याने सांगितलं होतं.

एक्स्दम कडक या आठवड्यातही काय ते कंटीन्युअस मेघाला टार्गेट करणे, जास्तं बोलु नकोस टोमणे, किती पर्स्नल स्कोअर सेट्ल करत होतं कलर्स मराठी Uhoh
दोन्ही आठवडे चॅनल , स्पर्धक आणि तो बंडल जीतु सगळ्यांना मेघचा इन्सल्ट करायचा टास्क नक्की मिळाला होता, त्याच्यामुळे टी आर पी मिळतो असं अजुनही वाटत आहे चॅनलला.
जीतु फार अनॉयिंग होता, एक तर त्याचा इरिटेटींग आवाज आणि कित्ते ते कंटिन्युअस मेघाचा इन्सल्ट करणे आणि इतर ठोंब्यांचं कौतुक, त्या गुंड सुशान्तचा तर सत्कार करायचा बाकी होता फक्तं ! बहुदा डॅमेज झालेल्या इमेजेस सुधारण्याचा फालतु प्रयत्नं !
चॅनल मूर्ख दिसत होतं यात, स्वतःच्या विनरचा रिस्पेक्ट नाही.

कित्ते ते कंटिन्युअस मेघाचा इन्सल्ट करणे आणि इतर ठोंब्यांचं कौतुक, त्या गुंड सुशान्तचा तर सत्कार करायचा बाकी होता फक्तं ! बहुदा डॅमेज झालेल्या इमेजेस सुधारण्याचा फालतु प्रयत्नं !
चॅनल मूर्ख दिसत होतं यात, स्वतःच्या विनरचा रिस्पेक्ट नाही.>>>+1111 अगदी माझ्या मनातलं लिहिलंत

बघायला हवेत एकदम कडकचे एपी

मला मेघा कधीच आवडली नव्हती, फक्त मराठी आहे म्हणुन हिंदी बिबॉमधे तिला वोट करायचे ठरविले होते पण तीथेही लाज घालवली तिने. त्यात तिचे वागणे एखाद्या विनरला शोभणारे नक्कीच नव्हते.

मला वाटते ती हिंदी बिबॉ जिंकली ती वासरात लंगडी गाय शहाणी या ऊक्तीनुसार. टास्क करायची चांगले पण नाटकी जास्त वाटत होती

धन्स सुलू_८२, अगदी राइट टाईम धागा निर्मिती बद्दल.. >>>>>>> तुमचे स्वागत आहे,सुषमाताई Happy

पण तीथेही लाज घालवली तिने. त्यात तिचे वागणे एखाद्या विनरला शोभणारे नक्कीच नव्हते. >>>>>>>>> +++++++++११११११११ मी ' मराठी बिबॉ विनर आहे, मी मराठी बिबॉ विनर आहे असा सतत धोशा लावायला नको होता तिने हिन्दी बिबॉत.

सुशान्त विनितची नक्कल करण्यासाठी काल का परवा कॉटवर झोपला होता. बाजूला स्मिता बसली होती. मला वाटल हा आता तिच्या मान्डीवरच झोपतो की काय.

Pages