मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नेहा आणि पराग दोघांमधे बराच बदल झाल्यासारखे वाटते आहे. झुंज मध्ये दोघंही खूप aggressive होते. अर्थात इथे बिग बॉस च्या पहिल्या एपिसोड वरुन लगेच असे अनुमान नकोच काढायला. टास्क खेळायला लागले की समजेल कोण कसे आहे ते.

सगळे जण एकत्र टास्क खेळतील तेव्हा कोणाची chemistry कुठे जुळते ते पहायला मजा येईल.

2जूनला पहिल एलिमिनेशन आणि ९ला दुसर करतील.16ला मात्र करणार नाहीत बहुधा कारण जगप्रसिध्द अशी भारत पाकिस्तान मँच आहे.त्यामुळे महाराष्ट्रच काय सगळा भारतच ती बघणार.त्या दिवशी नाही होणार एलिमिनेशन.
म्हणजे बिचुकले जून अखेरपर्यंत राहतील.

पराग कान्हेरे स्वभावाने बिलकुल गरीब नाहीये, हा माणूस भांडणही जबरदस्त करेन आणि टास्क सुद्धा त्याच इर्षेने खेळेन!>>एकदम बरोबर बोललात अज्ञा...झुंज मध्ये फाइनल मध्ये होता.. जोडीने तो मुद्दे पण व्यवस्थित मांडतो.. थोडा आगावू वाटू शकतो..पण इथे तेच चालत..
<<<
Really? That sounds is like a perfect candidate then + kitchen king !

चारपैकी मैथिली सेफ.बिचुकले कँप्टन होतील.म्हणजे शिव आणि वैशाली दोघच नॉमिनेशन मध्ये.अस करतात का ?म्हणजे दोघच नॉमिनेट.

पहिल्याच एपिसोड मध्ये बरेचशे अंदाज जुळल्याने आनंद होतोय...
बीचकुले मात्र फुल ऑन जोशात... कितीही निगेटिव्ह असू दे, मी पब्लिसिटी मिळवेलच.
नेहा शितोळेचा आवाज तर ईबाळाला मागे टाकेल...सिरियसली, ही मला बिलकुल आवडत नाहीये, जॅम डोक्यात जातेय. तिला आणि वीणा जगतापला बिलकुल ड्रेसिंग सेन्स नाहीये, इंफॅक्ट दोघींना स्वतःला कॅरी करणं अवघड जातंय की काय इतपत शंका यावी..
सगळ्यांनाच कॅमेऱ्यासमोर रहायचय, स्टँड घ्यायचाय, तर स्ट्रॅटेजी बदलावी लागेल जिंकण्यासाठी.
शिवानीने अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी दंगा सुरू केला.
पराग + रुपाली = नवी फेक लव स्टोरी, आणि दोघांनाही याची गरज नाहीये. Don't waste your potential!!!
वैशाली मुद्दाम शिवकडे खाजवून खरूज काढायला जात होती...
विद्याधर पक्के बनेल दिसतायेत...
सुरेखाताई, तुम्ही गाववाले, ही गाववाली बस करा आताच. खेळायला लागा. आज नॉमीनेट होता होता वाचलात आपण...

@UP - पहिल्या आठवड्यात सहसा कुणाला काढत नाहीत.
त्यामुळे दोन्ही सेफ होण्याचे चान्सेस वाटतायेत...

@UP - पहिल्या आठवड्यात सहसा कुणाला काढत नाहीत.>> अस काहि नाही,मागच्या सिझनला आरती पहिल्या विकेन्डलाच बाहेर होती

तो बिचुकले म्हणाला की त्याला राष्ट्रपती करावे म्हणुन त्याने स्वतः पंतप्रधानांना चिट्ठी लिहिली होती Lol
काय आयटम माणूस आणलाय खरंच!!

मला बोअर झाला पहिला एपिसोड, तरी मी बघणार ती गोष्ट वेगळी.

बिचकुले जाम डोक्यात गेला माझ्या काल. शिवानी पण कृत्रिम वाटली, किती भांडते. नेहा, शिवानी, बिचकुले तिघे इरिटेट करत होते, रुपाली पण एका शॉटला तशीच वाटली. वैशाली माडे खरंच उगाच शिवशी वाद वाढवत होती.

वि जोशी टास्क करतील की नाही शंका वाटतेय.

काहीच कोणाचा अंदाज येत नाहीये, जावकर योग्य बोलली पण अति वाटलं. अजून नीट शब्दात सांगता आलं असतं. सगळे स्वतः कडे अटेंशन घ्यायला जातायेत असे वाटलं, त्यात मुली पुढे, किशोरी आणि सुरेखाताई मागे तशा.

बिचकुले पहिला सतत अटेंशन घेणारा.

वैशालीचा डीव्होर्स झाला माहिती नव्हतं, तिने सांगितलं का, मी नाही बघितलं म्हणून विचारते कारण मागे बरेचदा ती नवऱ्याचे खूप गोडवे गायची, त्यांच्यामुळे मी इथंपर्यंत आले, मुलीला पण चांगलं सांभाळतो म्हणून मी करियर करू शकते. अर्थात तो पर्सनल issue आहे, फक्त तेव्हा दोघांच्यातले छान ट्युनिंग जाणवलेले. नाती बदलतात, फक्त आठवलं.

परागची बायकोपण झुंजच्या वेळी एक वर्ष लग्नाला झालं म्हणून त्याच्या हातून मंगळसूत्र बदलून घ्यायला आली होती, उलट वाट्या सुलट करून घ्यायला, काल तो ही म्हणाला कि त्याचाही डिव्होर्स झाला असं. असो, मलापण काहीही आठवतं उगाच, थोडं वाईट वाटतं, अरे छान चाललेलं ना त्यांचं, अर्थात नाती बदलतात. त्याचं पर्सनल आयुष्य आहे. मला त्याबद्दल टिप्पणी नाही करायची, पण आठवलं ते लिहिलं एवढंच.

रूपाली भोसलेचाही घटस्फोट झाला आहे. बिचुकलेची बायको म्हणाली बीबाॅमध्ये जा आणि चॅनलचीपण तीच ईच्छा होती म्हणून तो ईथे आलाय, नाहीतर त्याला सारेगमपमध्ये रस होता. एवढं चांगलं गातो का तो. हे असं मटेरियल चॅनेल का वाया घालवेल Wink

रूपाली भोसलेचाही घटस्फोट झाला आहे. >>> हो ते वाचलेलं कुठेतरी पण बाकी दोघांबद्दल लिहिलं कारण त्याचं एकमेकांवरचे प्रेम, आदर वगैरे दाखवलं होतं टीव्हीवर. हीला दुर्वा आणि बडी दुरसे आये है मध्ये बघितलं होतं.

Actually मी लिहिलं पराग आणि वैशालीबद्दल ते चुकीचं आहे की काय असं वाटतंय एकीकडे मला. टीव्ही prgms मधेच बघितलेलं म्हणून लिहिलं.

बाकी नेहा काल त्या बिचकुलेला बरोबर बोलली, तो स्वयंपाक बायकांनी करायचा असं काहीतरी बडबडला. तिने गप्प केलं त्याला लगेच ते योग्य केलं.

शिवानी आणि बिचुकले,वैशाली आणि शिव यांच्या भांडणावरच सगळा फोकस होता काल.बोअर झाल
पण एक जाणवल,किशोरी शहाणे गोडबोले काकू वाटत आहेत.अगदी साखरेसारख गोड हसत बोलून समोरच्याचा पत्ता कट करणार बहुतेक.
मागच्यावेळी राडा करणारे आवडले,पण या वेळी राडा करणारे जरा डोक्यात जात आहेत.
उलट गोडबोले काकू,बाप्पा,सुरेखाताई,केळकर,माधव हे अतिवाचाळपणा न करता गनिमी कावा खेळतील बहुधा.

यावेळी बोअर व फेक वाटत आहे.
जोशी आणि केळकर हे मांजरेकरच्या फिल्म्समध्ये असतात त्यावरून वाटतंय की त्यांना मांजरेकरने घुसवले आहे (होस्ट कोटा).

पराग आणि वैशाली च्या बाबतीत पूर्ण सहमत अन्जू च्या मताशी . मलाही हेच सगळ आठवल होत...किती पटापट नाती बदलतात खूप दुर्दैवाची गोष्ट वाटली. टेलीविज़न वर जेव्हा यांचे जोडीदार येतात तेव्हा किती एक दुजे के लिये मामला वाटत असतो..

वैशाली ओढुन ताणुन शिवशी वाद घालत होती, शिवानी शॉर्ट तेपर वाटते, टास्क न्न्तर बिचकुले कॅप्टन झाले तर ???मला असच वाटतय.

बीचुकला कॅप्टन झाला तर खरी मजा येईल.
शिवानी आणि रुपाली इतक्या का रिअँक्ट होत होत्या काय माहिती,

पहिल्याच एपिसोडमधे सगळ्या मुली मेघा बनायचा प्रयत्न करत होत्या, शिवानी तर जरा जास्तच , रुपाली उगीच काढायचे म्हणून मुद्दे काढतेय पण जमत नाहीये कोणाला, फेक वाटत आहेत.
सुरेखाबाई कमी बोलल्या पण सेन्सिबल बोलल्या.
इझी टार्गेट सगळे उगीचच बिचुकलेला करतायेत , तात्पर्य : सगळ्या मुली फार अनॉयिंग दिसतायेत आणि फुटेज सगळं बिचुकले खातोय Biggrin
शेफ पराग आणि रुपालीची जोडी जमेल असं वाटतय.

शेफ पराग आणि रुपालीची जोडी जमेल असं वाटतय. >>> मला नाही वाटत. रुपालीला अ‍ॅटीट्युड खूप आहे. पण तिच्या भावाचं ऐकून वाईट वाटलं, भावासाठी खंबीरपणे उभी राहीली, भाऊ बरा झाला हे मस्त.

इझी टार्गेट सगळे उगीचच बिचुकलेला करतायेत >>> तो करतोच आहे इरीटेट, पण काही पोरी पण करतायेत त्यात शिवानी पहीली, स्वतःला काय समजते काय माहीती. मराठी, हिंदी सिरीयल्स केल्यात पण मराठी पहीलीत मला आवडलेली, गोड दिसायची. पण नंतर बदलली तिला, मग हिंदीत गेली, परत मराठीत आली, पण तिच्या दोन्ही मराठी सिरीयल्स नंतरच्या नाही चालल्या, लवकर ऑफ एअर झाल्या.

मी देशी सिरीयल्स पहात नाही त्यामुळे बर्याच लोकांना ओळखत नाही, सध्या तरी कलाकार म्हणून फक्त सुरेखाबाई,किशोरी, अभिजित केळकर, विद्यधर जोशी, वैशाली यांनाच ओळखते.
वैशाली बहुदा लिगली डिव्होर्स्ड नसावी पण सेपरेटेड आहे.

बिचुकले ला काल उगाचच टारगेट केले गेले. वुमेन कार्ड पहिल्या दिवसापसुनच सुरु झाले आणी शिव आणी बिचुकले विरोधात चालु राहिल असे दिसते. शिव सोडला तर यातील एकालाहि टास्क (हिंदिसारखे असतील तर) जमेल असे वाटत नाहि. फन फेअर टाइप टास्क देइल बिग बौस असे वाटते. जाम बोअर होणार आहे. राजेश आणी सुशांत ची वाट लागलेली पाहुन यावेळेस सर्व अभिनेते घाबरलेले दिसतात

बिचुकले - जेन्युईनली येडपट आहे की वेडाचं सोंग कळेना. पण खरच ईरीटेट करतो कधी कधी. पण कॉन्ट्रोवर्सी तोच करतोय सध्या घरात त्यामुळे त्याला ठेवावच लागेल अजुन काही दिवस. बाकी कोणी जोवर काही कंटेंटे देत नाही तोवर बिचुकले ला पर्याय नाही Wink
शिव - इनोसंटली जोक मारतोय आणि सगळ्या मोठ्या लोकांमधे मिसळायचा प्रयत्न करतोय पण रोडीज चा कंटेस्टंट असल्यामुळे टफ फाईट देइल याची कल्पना असल्यामुळे सगळे त्याला जाणुनबुजुन बाजुला काढायचा प्रयत्न करतील.
काल शिव आणि बिचुकले व्यायाम करताना भारी डायलॉग मारत होते. शिव म्हणाला बिचुकले ला हाय जंप मार तर तो म्हणतो जीन्स मधे कसं करु ? माईक ला काही होणार नाही ना ई ई Happy Happy
माधव - दिसलाच नाही
बाप्पा - बेरकी वाटतात. गोड बोलुन सगळ्यांशी चांगले राहातील.
किशोरी - तेच बाप्पासारखं. ठोस कोणाविरुद्ध बोलणार नाही. सगळ्यांच्या गुड बुक मधे राहायचा प्रयत्न करणार.
शिवानी, नेहा, रुपाली, वैशाली - मेघा ची कॉपी मारायचा प्रयत्न अंगाशी येइल असं दिसतय. सगळ्यांनाच डे वन पासुन कॅमेरा समोर राहायचय.
मैथिली - काही अंदाज आला नाही. काल दिसली नाही विशेष.
सुरेखा पुणेकर - यांची आउ होणार असं वाटलं काल.पण काल मुद्दे नीट मांडत होत्या.
पराग कान्हेरे - न बोलुन शाहाणा आहे. डीसेंटली खेळेल. लंबी रेस का घोडा वाटतोय. रुपाली ला नेलपेंट का लावत होता काल पहिल्याच दिवशी कळलं नाही. बहुतेक यांना अफेअर करायला सांगितलय चॅनेल ने Wink
अभिजित केळकर - कुठे दिसला नाही काल तरी
वीणा - एकदम मुळुमुळु बोलते. आवाज नाही काढता येत.

कोणा कोणाचे ग्रुप बनतात बघणं इंटरेस्टिंग असेल.
बिचुकले, शिव नक्की एका ग्रुप मधे असतील Happy
सुरेखा, किशोरी , बाप्पा एका ग्रुप मधे.एकमेकांना सांभाळत.
बाकी कोण कुठे जातय बघुयात.

Pages