मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Smita savadh hoti, ti bajula hot hoti. Ek promo baghitla tyavarun vatale.

एकदम कडक नामक जे काही होतं, एग्झॅक्ट्ली हाऊ सो कॉल्ड स्टार अ‍ॅक्टर्स बिहेव्ड इन बिबॉ हाउस!
त्यात अ‍ॅडीशन म्हणून जीतुही सामील झाला.
तीच दादागिरी/बुलिंग वृत्ति, अतिशय जेलस , स्वतःला उच्च अभिरुचीचे समजणारे सो कॉल्ड सिनियर्स .
मेघाला नंकिने लिहिलेलं ते पत्रं त्याच्याकडून पुन्हा वाचून घेणे तर अतिशय चिप , पर्सनल स्कोअर्स सेट्ल करणे प्रकार होता कलर्स मराठीचा.
आम्ही बिबॉ साठी बनलोच नाही , आम्हाला फेक वागता येत नाही वगैरे अत्यंत अभिमानाने सांगणारे रेशम सारखे इतर लोक कित्ती महान हे सतत हायलाइट् करून बिबॉ नक्की काय प्रमोट करत होते ? आमचा विनर फेक असतो हे कि पब्लिकने आम्हाला नको असलेली चुकीची विनर निवडली हे कि काहीही तयारी करून न आलेले आळशी एम्सीपी गुंड सिनियर्स फार चांगले होते हे ?
यावेळीही असच वातावरण असेल तर शो फ्लॉप जाईल हिन्दी सारखा !

मी हे पाहिले नाही पण असे वाटतेय की मुद्दाम लुटुपुटूची भांडणे केली असावीत. नव्या सीझन चे प्रमोशन म्हणून. सगळेच एक्सपर्ट आहेत त्यात.
मेघा विनर आहेच, कलर्स च्या पसंतीची नसती तर विनर झालीच नसती. ते काही तिला खाली वगैरे खेचतील असे वाटत नाही . आत्ता कलर्स च्या इन्टरेस्ट चे हेच आहे की उगीच वातावरण तापवून सीझन ची हवा निर्माण करणे. इट्स बिन्नेस.

Hmmm असेल, पण गेले २ आठवडे तेच चालु होतं होस्टचं मेन्ली कि मेघा प्लिज कमी बोल,मेघस थोडक्यात बोल, मेघा तू ठरवून वागलीस तिथे वगैरे.
जीतु सुशान्तच्या तर प्रेमातच होता, म्हणे हा टिकला असतस तर कोणाचा निभाव लागला नसता, सगळ्यांना विचारत होता जीतु कि सुशान्त रिटायर्ड हर्ट नसता तर सर्वात मोठी थ्रेट सुशान्तच नव्हता का सगळ्यांचा? कोणी हो म्हणत नवह्तं तरी त्याचं तेच चालु होतं.
सई पुष्कर मेघा ट्रायो एक्स्व्मेकांशी भांडो किंवा काही करोत, या गेम साठी परफेक्ट होते.
स्मिता टास्क मास्तर , आय कँडी वगैरे होती म्हणून टिकली.

हो हो ! सुशान्तच्या महानतेचे किस्से सान्गितले गेले, त्याला मखरात बसवुन पुजा बान्धायचि बाकी होती, तिथे तो सईला काय लेव्हलच बोलला हे आठवत नाही वाटत कुणाला, आजारपणाच नाटक करुन एक्झिट घेतली होती खरतर, त्याला किवा त्याच्या सो कॉल्ड सिनियर्स कन्पुला हा गेम कळलाच नाही हे शेवटपर्यत मान्यच करत नव्हत कुणी, आता तरी ज्याना गेम खेळायचा आहे त्यानाच आणा पेड व्हेकेशन वाल्याना नको. आउ,रेशम्,सुशान्त सगळे नाटकी आणी पेड व्हेकेशन ग्रुप.

जितेंद्र जोशी. म्हणजे काटेकर.
कलर्स मराठीवर बिग बॉस २ चं प्रमोशन सुरु झाले त्याचा तो होस्ट आहे.
मला हिंदी बिग बॉस बोअर होतं पण मराठी फॉलो केलं होतं, आताही करणार आहे. तसंही इलेक्शन नंतर काय टीपी दुसरा.
ओनेस्टली इनसेन वाले विडियो पण बघणार Lol

जितेंद्र जोशी. म्हणजे काटेकर. >>>>>> कोण काटेकर? Uhoh

या सिजनचा होस्ट जिजो आहे का? ममां एकाच सिजनमध्ये थकले? >>>>>>>> नाही. तो एकदम कडकचा होस्ट आहे. ममां दिसतोय की प्रोमोमध्ये.

हर्षदा खानविलकर म्हणत होती की या सिझनमध्ये अन्कुश चौधरी, स्वजो, सई ताम्हणकर, सन्जय जाधव, अमितराज यान्ना बोलावूया. अरे, बिबॉ २ करायचाय की दुनियादारी २ ? का दुनियादारी २ इन बिबॉ २? Biggrin

जितेन्द्र जोशी ची ओळख काटेकर म्हणून करुन देणे हे म्हणजे अशोक सराफची ओळख सिंघम मधला हवालदार म्हणून करुन देण्यासारखे आहे!

जीजोतर फार संवेदनशील वगैरे म्हणून मिरवत असतो. हे सगळं प्रसिद्धीसाठी असं मानलं तरी मेघाचा एवढा अपमान तिने का सहन केला, काय मजबूरी असते या लोकांची अपमान करण्याची आणि करवून घेण्याची.

इतके काय महान तीर मारलेत आजपर्यंत जितेंद्र जोशीने?
>>> +1
उगाचच ग्रामीण भाषेत बोलतो , अत्यंत फालतू ऍक्टर आहे.

सगळं प्रसिद्धीसाठी असं मानलं तरी मेघाचा एवढा अपमान तिने का सहन केला, काय मजबूरी असते या लोकांची अपमान करण्याची आणि करवून घेण्याची>> ती काही एवढी भोळसट नक्कीच नाहिये.. हा सगळा scripted मामला आहे अस मला वाटतं..जितक्या जास्त negative comments तितके जास्त पैसे असं काहिसं असणार.. ती काही स्वताची इमेज/ नाव अशी फुकटात वापरायला नाही देणार... खरं तर सगळेच त्या बिग बॉस प्रकाराला कन्टाळले होते..परत काय एका वर्षा पुर्वीच उकरुन काढा.. पण channel पुढे काही चालत नसणार..

बाकी सगळ्या स्पर्धेकां च काही ना काही काम चालू आहे अस वाचायला मिळत..including उशा नाडकर्णी..सई लोकूर मात्र कुठेच दिसत नाही.. तिच्या इंस्टाग्राम वर तर अजून लोक नेगेटिव कमेंटस देतात.

इतके काय महान तीर मारलेत आजपर्यंत जितेंद्र जोशीने? उगाचच ग्रामीण भाषेत बोलतो , अत्यंत फालतू ऍक्टर आहे.>>>>>>>> सॉरी पण हे जरा पर्सनल होतय.

ममांची मुलाखत होती आज, ममांनाही माहित नाही की कोण कोण आहे Uhoh थोडक्यात उद्या सात वाजता काय ते कळेल.

ट्विटर आणि बिगबॉस इंन्स्टाच्या पेजवर 16 नावे आहेत.
वैशाली माडे,वीणा जग्ताप,किशोरी शहाणे,सुरेखा पुणेकर,अभिजित केळकर,अभिजित बिचुकले,नेहा शितोळे,दिगंबर नाईक,शिवानी सुर्वे,रुपाली भोसले,माधव देवचक्के,मैथिली जावकर,मिलिंद शिंदे,शिव ठाकरे ,कोणी किर्तनकार आहेत (बाई)नाव आठवत नाही.
यातील नक्की कोण आहेत माहित नाही.

एवढे सगळे सेलेब्रिटि एकाच सिजन मध्ये??? Color चा बजेट खूप वाढलं आहे की काय!!??शक्यता कमी वाटते.. काही असो, नेहा शीतोळे बाई खूप भांडखोर आहे..color च्याच झुंज मध्ये होती..तेव्हाच डोक्यात गेलेली

Pages