मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो बिचुकले आत्ता हसवतोय,लोकांना जवळ करतोय म्हणुन कदाचित लंबी रेस का घोडा

शेफ पराग कान्हेरे... चला sss... जेवणाचा प्रश्न मिटला... असं वाटलं असेल सर्वांना

पराग पण झुंज मधे होते, बरे वाटायचे. मागच्या बि बि लाच येणार ही चर्चा होती.

मेघाची कॉपी करुन एखादी किचनवर होल्ड ठेवणार असेल तर परागना घुसु नाही देणार.

पराग कान्हेरे म्हणजे नवा आस्ताद काळे असेल...>>> माहीती नाही पण झुंज मधे काही अति वाटले नाहीत.

हया लोकांना soft toys एवढी काय आवडतात काय कळत नाय.उगाच बालिश वाटतं ते.

कीर्तनकारला वाईल्ड कार्ड एन्ट्री देतील.
वैशाली थोडी पुढे पुढे करत आहे अस वाटत आहे.
पण टिपणीस बाईंसारख सध्यातरी कोणी वाटत नाही.

किर्तनकार??? ओह त्या भाकरीईईई करता आलिssssss च पाहिजे वाल्या का? नको !!!! काय पिळ बाइ आहे ती.
एक्स्पर्ट वर आला पण एपिसोड म्हनुन बघायला गेले तर एक्दम कडक चे एपिसोड लावुन ठेवलेत... येडे लोक

माझी आवडती लिस्ट-
शिवानी सुर्वे
पराग कान्हेरे
सुरेखा पुणेकर
किशोरी शहाणे
शिव ठाकरे
रुपाली भोसले
विद्याधर जोशी

आणि
अभिजित बीचकुले... द जोकर कार्ड

पहिल्याच आठवड्यात यातले काहीजण बाहेर पडू शकतात.
बाप्पा जोशी पहिल्या आठवड्यात जातील का,?ममांचे आवडते असूनही
मैथिली जावकर कोण आहे.सेन्सॉरबोर्डात काम केले आहे पण मी हिला पाहिल्याच आठवत नाही.
वीणा जगताप पण जाऊ शकते पहिल्या आठवड्यात.

सध्या काहीच आवड निवड नाही, वागतील तसे बदलत जाईल. मागे आवडलेले नावडते झाले, नावडते आवडीचे झाले. एकच आवडती झालेली कायम राहीली, स्मिता.

काल म मां पण तिचं कौतुक करत होते.

त्यामुळे सध्या नो कमेंटस. रोज त्या त्या दिवशी कोण कसा वागतोय, हे लिहीण्यात मजा.

मैथिली जावकर कोण आहे.सेन्सॉरबोर्डात काम केले आहे पण मी हिला पाहिल्याच आठवत नाही. >>> पुर्वी असायची सह्याद्रीवर सिरीयल बघायचे मी तेव्हा. नंतर मधे गाजली ती भाजपमधे एकाने त्रास दिलेला, तेव्हा तिने तक्रार केलेली आणि मग त्याला पदावरुन दुर केलं होतं. तेव्हा ती टीव्हीवर जे झालं ते सांगायला आली होती. भाजपची कार्यकर्ती आहे ती.

वीणा जगताप पण जाऊ शकते पहिल्या आठवड्यात.>>
कलर्सची हिरॉईन आहे ती. जिंकवतील तिलाच. टॉप 5 मध्ये तरी नक्की जाईल

@अंजू - गणेश पांडे प्रकरणवाली हीच का? >>> नाव आठवत नाही पण पांडे, वर्मा असाच कोणीतरी होता. गाजलेलं ते प्रकरण.

एक बर आहे की सगळे टास्क करु शकतील.मागच्यावेळी थत्ते आणि आऊ नेहमी सुटायचे.
ममा कशाला मागच्या वेळची आठवण करून देत आहेत.माधव आणि रूपाली काय तर म्हणे सई आणि पुष्कर.
बिचुकले एकटे पडणार बहुतेक.

बिचुकलेची या मुली एवढी टिंगल का करत आहेत. शिष्ट वाटते शिवानि मला. बिचुकलेचा व्यवसाय काय आहे. चार्जर म्हणजे दारू का. कोणत्या अर्थाने म्हणाले बाप्पा. शिवानि म्हणे मी अफेअर केलं तर मला चिपळूणला येऊ देणार नाहीत, एवढी कोण आहे ती. रूपाली किती हसत होती ऊगाचच. सईपुष्कीचं प्रकरण गाजलं तसंच यांचंही व्हावं अशी हिंट दिली का ममांनी, रूपालीला काही कळलंच नाही, नुसती हसत होती ती. बारीक झाली आहेे ती खूप, तिच्या भावाचं एेकून वाईट वाटलं.
एकदम कडक आज बघितलं. मेघा आणि आरतीचं भांडण थांबतच नव्हतं, पण म्हणून विनरची डिग्नीटी वगैरे काही बोलायची काही गरज नव्हती. रेशमची लगेच आस्तादला मिठी आणि पळून जाणे हे मेघाला ते घरात कसे वागवायचे अगदी तसेच. आस्तादचा तुच्छ लुक नैसर्गिक आहेे की कमावलेला आहे. सईच्या डोक्यात प्रकाश पडलेलाच नाही का अजून की वेड घेऊन पेडगावला जाते ती. मी वेड घेऊन पेडगावला जाते असे स्मिता म्हणाली पण मला ते खरे वाटले नाही. तिचेे तिलाच माहिती नक्की काय गडबड आहे ते. आऊंची पिरपिर ऐकून कंटाळा आला. आरतीचा ड्रेस आणि नाच छान होता. आऊंनी लोकांच्या डोक्यात भरवलं की रेशम चारित्र्यहिन आहे,ईति रेशम Uhoh लोक बोळ्याने दूध पितात का. जितू म्हणे, आमच्या मुली स्वस्त नाहीत, मग हे सुशांतला का नाही सांगत. जितूही आस्तादचीच भाषा बोलत होता, समोरासमोर या, दाखवून देऊ वगैरे, अरे काय हे. रेशम म्हणे, राजेश गेला तर माझ्यासाठी आस्ताद होता, मग मला राजेशची आठवणही आली नाही, तिला तरी कळलं का ती काय बोलली ते. आरती आता आयुष्यभर रडत राहणार का, पहिल्या आठवड्यात बाहेर पडली म्हणून.

आजचा भाग मिसला मी. उद्या रिपीट टेलिकास्ट होईल का? मला plz टाईम सांगा. >>> उद्या सकाळी दहाला असेल, आत्ता कलर्सवर खाली दाखवतात त्यात चेक केलं.

Pages