मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटा न्यूज़ :
सुरेखा पुणेकर आणि रामदास आठवले यांची नावं चर्चेत आल्यानंतर आता 'बिग बॉस'च्या घरात कोण येणार याची उत्सुकता वाढली असतानाच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये किर्तनकार सहभागी होणार असल्याचे संकेत खुद्द वाहिनेनंच दिले आहेत. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये महेश मांजरेकर किर्तनकाराच्या रुपात दिसत आहेत. त्यावरुनच हे तर्क लढवले जात आहेत.

काल "एकदम कडक" मधे सगळे आधिचे स्पर्धक आले होते. जीतु ने सगळ्यांची मुलाखत घेतली.
आज आणि उद्या पण असेल.

एकेक रविवार पुढे जातंय, आधी १२ मग १९ आणि आता २६. निवडणूक निकाल लागल्यावर आत पाठवणार की काय सर्वांना.

They all were horribly dressed for dance performances!!

अपर्णाताईन्ना घ्यायला हवे होते. >>>>>>> कोण ह्या अपर्णाताई?

काल "एकदम कडक" मधे सगळे आधिचे स्पर्धक आले होते. जीतु ने सगळ्यांची मुलाखत घेतली.>>>>>> सोमवारी बघितल नव्हत. कालचा भाग बघितला. नेहमीचे फटके राडे चालू होते. Biggrin

पुष्कर बदलला नाही. तो अजूनही गोन्धळल्यासारखाच बोलतो.

आज मेघा आणि आरतीमध्ये राडा होणार आहे.

मी प्रोमो बघितला युट्युबवर कलर्स वर जितेंद्र घेतोय त्याचा, सई जास्तच नाचतेय, खुश आहे सॉलीड, बाकीचे नॉर्मल वाटले. तिच्या अजूनही लक्षात आलं नाहीये का की आपण स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावली, पॅरेंटसना कमीपणा आणला. ज्या स्मिताला सतत खड्ड्यात ढकलायला गेलो, त्यात आपणंच पडून स्मिता पुढे गेली. ह्याचा सर्व फायदा पुष्करने घेतला तो पुढे गेला.

लोल अपर्णा रामतीर्थकर आल्या तर मज्जाच येईल. सगळ्या स्त्री स्पर्धकांना भा क री क र ता आ ली पा हि जे असं म्हणून सळो की पळो करतील Lol पण त्या कीर्तन करतात का? त्या प्रोमोत कोणीतरी कीर्तन करणार्‍या बाई दिसत आहेत.

अपर्णा रामतीर्थकर की काय?>>> आणायला पाहिजे राव त्यांना आणि २-३ भांडकुदळ बायका, मज्जा येईल बघायला Happy

मागच्याच सिझनला आठवण काढली होती अपर्णाताईंना वाइल्डकार्ड पाठवा म्हणून , मज्जा आली असती.. सई वर्सेस अपर्णाताई.
त्या ‘एकदम कडक’ दोन्ही एपिसोड मधेही मेघाच शायनिंग होती फॉलोड बाय नंदकिशोर अँड आउ ! नंकिने मजा आणली आउंची फिरकी घेऊन.
बाकी ते हे मागच्या सिझनचे मठ्ठोबे अजुन सुधारत नाहीत, त्यांना अजुनही समजलं नाहीये बिबॉ म्हणजे नक्की काय , you know nothing सुशान्त अस्ताद अँड कंपनी Biggrin
अजुनही त्यांचं गाडं तिथेच आडलय, कचरा टाकणं कसं डिग्निफाइड नव्हतं, आम्ही उच्च अभिरुचीवाले, आम्ही प्रसिध्दीसाठी कॅमेरात दिसायचा प्रयत्न करत नाही,वाद घालत नाही, ते (तिघं) कसे अ‍ॅग्रेसिव इ. They still don’t get it !
रेशम तर सरळ म्हणे, मी सिंगल मदर आहे, मी फक्त पैसे मिळवायला गेले होते, त्यात टास्क करायला लागतील असं वाटल नव्हतं , थोडक्यात तिला काय वाटलं , पेड व्हेकेशन अँड फ्रेंड राजेश विथ बेनिफिट Happy
सई बिंधास्त म्हंटली कि स्मिता टॉप ३ मधे गेलीच कशी, मी जास्तं चांगली खेळले Proud
पुष्की सैड्या मेघा एकत्र बसले होते खरे पण पुष्कि अजुनही जेलसच दिसत होता.
जाउद्या पण मागचा सिझन होता भारी स्फोटक, यावेळी कदाचित इमेज कॉन्शस होतील लोक पहिल्या सिझनचे परिणाम सगळ्यांनी पाहिल्यामुळे !

सई बिंधास्त म्हंटली कि स्मिता टॉप ३ मधे गेलीच कशी, मी जास्तं चांगली खेळले >>> त्यावर स्मिता काही बोलली नाही का. स्मिताला स्वतःलाच ती फायनलपर्यंत जाईल वाटलं नसेल.

सईच्या आईबाबांनी चांगली कानउघाडणी केली असणार खरं म्हणजे, पण ती स्वकोषात असेल अजूनही. काही टास्कस चांगले केलेन पण सतत आळशीपणा, आजारी नाटकं, मेघावर जळणं हे महागात पडलं.

रेशम तर सरळ म्हणे, मी सिंगल मदर आहे, मी फक्त पैसे मिळवायला गेले होते, त्यात टास्क करायला लागतील असं वाटल नव्हतं >>> वा धन्य आहेत बाईसाहेब Lol

हाय्ला अपर्णाताई रामतिर्थकर असल्या तर मग मी नक्की बघणार! Rofl वरच्या लिंक बघितल्या नाहीत. कोण आहे ते त्यात आहे का?

बापरे काय तो राडा आज, अस्ताद म्हणे आऊंच्या जागी कोणी मुलगा असता तर मनगट तोडलं असतं Uhoh
मेघा आणि आरतीचाही किती तो दंगा, आरती पर्सनल स्कोअर्स काढत होती काहीतरी, मेघा अर्थात तिचा मुद्दा सोडत नव्हती आणि सई पुष्कि अ‍ॅज ऑल्वेज मेघा कशी ओरडतेय पाहून हसत होते.
स्मित अ‍ॅज ऑल्वेज अगदीच डंब , मेकप, ड्रेसही भयानक Uhoh
हे लोक अजुन बिबॉ घरासारखेच वागत होते आणि अजुनही मेघाला टार्गेट करणे कलर्स टिम सकट कोणीही सोडत नव्हतं.

ते कलर्स बिग बॉस शो नाही बघितला जितुचा. पण एक शॉट बघितला त्यात मे स पु का होते सेपरेट. मे स्मि पु हवे होते ना. स्मिता आलीना तिसरी, सईला का बसवलं. पुष्करकडे बघवत नव्हतं. फार विचित्र वाटत होता. लंडनला लग्न इमॅजिन करायचं होतं दोघांचं स पु चं, ते स्मिताला कळलंच नाही, तिच्या खरंच लक्षात आलं नाही की डंब आहे का ते स्क्रीप्टेड होतं काय माहीती, ती लग्नाला जाणार नाही असं म्हणाली मात्र, तेवढाच शॉट बघितला. पण स्मिताला मेन ठिकाणी बसवायला हवं होतं. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर भांडून तिथे बसली असती. आफ्टरऑल तिने मिळवला आहे तिसरा नंबर, सईने गमावला आहे. मला नाही आवडलं ते. मेघा जास्त छान दिसत होती.

अच्छा त्या अपर्णाताई होय.

किर्तनकार इन्दुरीकर महाराजांना घ्यायला हवे होते. >>>>>>>>> अपर्णा रामतीर्थकर असोत का इन्दुरीकर महाराज , दोन्हीही नकोत. दोघ डोक्यात जातात माझ्या. Angry

बापरे काय तो राडा आज, अस्ताद म्हणे आऊंच्या जागी कोणी मुलगा असता तर मनगट तोडलं असतं Uhoh
मेघा आणि आरतीचाही किती तो दंगा, आरती पर्सनल स्कोअर्स काढत होती काहीतरी, मेघा अर्थात तिचा मुद्दा सोडत नव्हती आणि सई पुष्कि अ‍ॅज ऑल्वेज मेघा कशी ओरडतेय पाहून हसत होते. हे लोक अजुन बिबॉ घरासारखेच वागत होते >>>>>>> अगदी अगदी. बिबॉ २.० सुरु केला होता त्यान्नी.

बादवे ऋतुजा स्लिम दिसतेय. Happy

Pages