मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिबॉ चा अभ्यास करताना एकजात सगळ्यांच्या डोक्यात फॉर्म्युला असावा की स्टँड घ्या स्टँड घ्या, त्यामुळे आल्या आल्या कधी एकदा कुठे तरी स्टँड घेतोय अशी घाई झाल्यासारख्या सगळ्या मुली बिचुकले या इझी टार्गेट वर तुटून पडल्यात स्टँड घेण्यासाठी Lol एकजात सगळ्या मुद्दाम त्याच्या भोवतीच गर्दी करून काहेतरी निमित्त काढून काहीतरी स्टँड घ्यायच्या प्रयत्नात! Happy पण त्यामुळे कोणीच 'स्टँड आउट' होत नाहीये!! उलट तो बिचुकले च या सगळ्या घाई गर्दीत फूटेज खातोय हे त्यांना कळतंय की नाही कोण जाणे! तो कसाही असला तरी चाप्टर असावा, हे वेडे विद्रे उद्योग मुद्दाम करत असावा असे वाटते. शिवानी उगीच भांडत होती. हो मी अग्रेसिव आहे म्हणे. रुपाली पण, हो मला अ‍ॅटिट्युड आहे वगैरे ठ्सवण्याचा प्रयत्न करत होती . तिथे त्यांच्यासारख्याच ४ दिवा असताना असल्या स्ट्रॅटेजीच्चा किती उपयोग होईल शंका आहे. पराग पण खिलाडी वाटतोय. योग्य मूव्ज सुरु केल्यात ! बहुतेक लोक गेम समजून घेऊन आलेत हे दिसले एकूण. पण सध्या तरी सगळेच ओढून ताणून वागत असल्यामुळे ते विनोदी वाटतेय जरा. कॅमेरा फूटेज खायला किचन मधे गर्दी Lol पडतील, हळू हळू मुखवटे गळून पडतील!
त्या मानाने सिनियर्स फार दिसले नाहीत काल.
आता ४ नॉमिनेटेड लोकांमधे बिचुकले फट्टककन कॅप्टन च होऊन जाऊ शकतात! मागच्या वेळी विनित झाला तसे.

बाकी नेहा काल त्या बिचकुलेला बरोबर बोलली, तो स्वयंपाक बायकांनी करायचा असं काहीतरी बडबडला. तिने गप्प केलं त्याला लगेच ते योग्य केलं. >>>>>>> +++++++++११११११११

इनोसंटली जोक मारतोय आणि सगळ्या मोठ्या लोकांमधे मिसळायचा प्रयत्न करतोय पण रोडीज चा कंटेस्टंट असल्यामुळे टफ फाईट देइल याची कल्पना असल्यामुळे सगळे त्याला जाणुनबुजुन बाजुला काढायचा प्रयत्न करतील. >>>>>>> बिच्चारा शिव, काल सगळ्यान्नी कित्ती टारगेट केल त्याला!

माधव, केळकर, किशोरी, सुरेखा, बाप्पा, मैथिली फारसे अ‍ॅक्टिव्ह नव्हते काल.

कोणा कोणाचे ग्रुप बनतात बघणं इंटरेस्टिंग असेल. >>>>>>>> अगदी अगदी

अरे छान चाललेलं ना त्यांचं, अर्थात नाती बदलतात. >>>>>>>>>> हल्लीची लग्ने एक्सपायरी डेट घेऊन येतात अन्जू.
कारण मागे बरेचदा ती नवऱ्याचे खूप गोडवे गायची, त्यांच्यामुळे मी इथंपर्यंत आले, मुलीला पण चांगलं सांभाळतो म्हणून मी करियर करू शकते. >>>>>>>> होना. परवा ती ममाला सान्गत होती की मी जेव्हा कार्यक्रमान्ना जायची तेव्हा मुलीला शेजार्यान्कडे ठेवायची. म्हणजे ती नक्कीच सेपरेट राहत असेल नवर्यापासून.

बिचकुलेमध्ये कधी कमाल खानचे व्हाईब्स जाणवतात.

आज सुद्दा राडा आहे बिचकुले- शिवानीचा.

सगळ्या बिचकुकेला हे काम सांग ते काम सांग, हे तू का नाही करणार वगैरे वाद घालत होत्या.
यावरून एकदम दीपिका आठवली, हिन्दी बिबॉ एपिसोड १, अश्शीच काही कामे वाटून घेऊ, कोणी काय करावं बद्दल सबा-सोमी भगिनी ज्ञान पाजळत होत्या, आल्या आल्या कामे वाटप करत होत्या, यावर दीपिकाने एकच उत्तर दिलं कि तू होती कौन है मुझे काम बतानेवाली, कॅप्टन अभी तक डिसाइड नही हुआ है, मुझे जो काम करना है मै करूंगी, वरना नही.
बिचकुल्याने असेच उत्तर दिलं असतं तरी चालल असतं.

बिचुकले स्टार पर्फोर्मर आहे Happy
शिवानि आणि रूपाली बोअर
केळकरांअचा शेलार करणार बहुतेक
शिव आवडला

बिचुकले इरसाल आहे. बारसं जेवलाय सगळ्या पोरीटोरींचं. उचकवतोय मुद्दाम. फुल येडा बनके पेढा कॅरॅक्टर आहे. पण त्याला फार टारगेट करतायत् सगळे आणि काहीही बोलतात त्याला.

आजच्याच भागात केळकर फँमिली फोटो लॉक करताना दाखवला आणि उद्याच्या भागात वीणाला सेफ करण्यासाठी बरोब्बर त्यालाच तो फोटोच नाहीसा करायचा आहे.
स्रिक्प्टेड नाही वाटत थोड?

कालच्या एपिसोड मध्ये नेहा त्या बिचुकलेंबद्दल एकदम परखडपणे बोलली आणि ती लीड घेऊन घरातले वाद सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न छान करत होती. त्यामुळे ती आवडली. रुपालीनी ज्या प्रकारे बिचूकलेंना समजावलं ते खूपच छान होतं. त्यामुळे काल ती पण आवडली. शिवानीची एक्साक्ट strategy कळत नाहिये अजिबात. ती कोणाशी फार प्रामाणिक राहील असं वाटत नाही. पण काल माधव फारच aggressive झाला होता. एका पॉईंट ला तर तो खरंच चिडलाय का चेष्टा करतोय कळतच नव्हतं.

शिवानीने मागच्या सिझनची चुगलखोर अंटी आस्तादचा किताब हिसकाऊन घेतला आहे ,बिचारा बिचुकले फसला चुगल्यांमधून Proud
बिचुकले ४ महिन्याचा प्रेग्नंट पण कुपोषित नाना पाटेकर दिसतो, आज तो उपासाच्या सफरचन्दाची शपथ घेत होता Rofl
काही असो , बिचुकले आणि शिवानी हेच कॅमेराला लिड अ‍ॅक्टर्स दिसतायेत सध्या !
या दोघांशिवाय नेहा शितोळेलाही शत्रुपक्ष निर्माण होतोय , त्यामुळे ती आणि रुपालीही स्ट्राँग दिसत आहेत.
तो माधव मागच्या सिझनला आस्तादला सपोर्ट करायचा, त्याच्यातही आस्तादचे हायपर होऊन आरडाओरडा करणे गुण उधळणे दिसतायेत, नुसत्या पोकळ धमक्या दम नसलेला अटेन्शन साठी !
अजुन तरी कोणीच फेवरेट काँटेस्टन्ट नाहीये, पण एंटरटेन्मेन्ट चांगली होतेय दुसर्याच दिवशी.

बिचुकले काय एन्टरटेन करतोय ... हा हा हा....
आणि शिवानी ला कळलय की बिचुकले सोबत राहिली तर ती दिसत राहील त्यामुळे चिडचिड करुन पण ती त्याच्याशी सारखी बोलायला जातेय.
शिवानी ची जुई होईल पण असं वाटतय मला Happy
त्यापेक्षा रुपाली आवडली मला. ती शांत पण ठाम वाटतेय.
नेहा मुद्दाम विरोध करुन कॅमेरा समोर रहायचा प्रयत्न करतेय पण मला तिचा मुद्दा पटला. पराग ला किचन चा ताबा मिळु नये ही तिची चाल असु शकते.

शिवानी मला जाम अ‍ॅन्टेशन सिकिन्ग वाटतेय, चर्चेत राहयाच तर बिचकुलेशी वाद उकरुन काढा अस सगळ्यान्च चाललय एकन्दरित...

त्या बिचुकले ना काळ बाप्पा आणि अजून कोणीतरी "बिचुकले " ऐवजी "बिचकुले " म्हणाले .. हसून हसून मेले मी ..
रुपालीनी ज्या प्रकारे बिचूकलेंना समजावलं ते खूपच छान होतं. त्यामुळे काल ती पण आवडली. शिवानीची एक्साक्ट strategy कळत नाहिये अजिबात. ती कोणाशी फार प्रामाणिक राहील असं वाटत नाही.>+११११
मलाही सध्या नेहा रुपाली आवडतायत ..

Just 2 episodes are too early to predict anything about big boss
तरीपण.....
नेहा, रुपाली, वीणा आणि शिवानी आवडल्या
नेहा सुस्पष्ट वाटली विचाराने.... जरा फेमिनीस्ट आहे पण तिचे मुद्दे बरोबर होते आणि हवे तिथे लीड घेतीय
रुपालीने ज्या प्रकारे तो बिचुकलेचा "ठोकीन" वाला चॅप्टर हॅंडल केला त्यामुळे आवडून गेली ती.... मुख्य म्हणजे हलक्या कानाची नाही वाटली.... शांत पण अतिशय स्पष्ट शब्दात तिने त्या बिचुकलेला समज दिली.... त्याशिवाय तिची परागबरोबर केमिस्ट्री जुळली तर ती फार पुढेपर्यंत जाईल.... तिचे आणि परागचे संभाषण पण अतिशय मॅच्युअर आणि सहज वाटले.... सॉर्टेड वाटले दोघेही.
वीणा पण अजुनतरी समंजस आणि मिळुन मिसळुन रहाणारी वाटतेय.... ती कॅरी छान करतेय स्वताला!
शिवानीचे बोलणे मला खुप आवडले.... आल्या आल्या लीड घ्यायला आणि चर्चेत रहायला सुरुवात केलीत तिने.... गेम पण खेळतीय.... काल अभिजीतबरोबरचे प्लॅनिंग, प्लॉटींग अंगाशी येतेय म्हंटल्यावर त्याच्या टीमसमोर सगळे कबूल करुन डाव मस्त उलटवला तिने (याशिवाय आमच्या सातारची सुन होणार त्यातही आमच्या शाहुपुरीतच सासर आहे म्हंटल्यावर एक सॉफ्ट कॉर्नर आहे) पण गंमतीचा भाग सोडला तरी स्पार्क आहे तिच्यामध्ये!
बिचुकले आता जरी एंटरटेनींग वाटत असला तरी काही दिवसात इरीटेटींग होऊ शकतो.... पण एंट्रीला जो एकटा पडेल असे वाटलेले तो सध्यातरी आख्खे घर स्वताभोवती फिरवतोय या गोष्टीबद्दल त्याला फुल्ल मार्क द्यावेच लागतील
तो शिव ठाकरे फारसा आवडला नव्हता एंट्रीला पण आता जरा जरा तो त्याचा क्युट इनोसन्स दाखवायला लागला आहे.... मुख्य म्हणजे त्याला ॲटीट्यूड बिल्कुल नाहीये आणि टास्कसच्या जोरावर तो बराच पुढेपर्यंत जाउ शकतो
माधव मध्ये मला थोडी थोडी पुष्कर ची झाक जाणवत आहे.... अजुन तरी त्याच्याबद्दल फारसे काही बोलता येणार नाही
विद्याधर जोशी मार्मिक आहेत.... आपला एक कंपू बनवून किमान सीझनच्या मध्यापर्यंत तरी जाउ शकतात
किशोरी मला आवडते.... खुपच मेंटेन केलेय तिने स्वताला.... आणि सिनीयर आर्टिस्, सगळ्यांना बरोबर घेउन चालण्याचा स्वभाव यामुळे तीपण सीझनच्या किमान मध्यापर्यंत जाउ शकते

सुरेखा पुणेकर टास्क कितपत करु शकतील शंका वाटतेय आणि जरा insecured वाटल्या मला
मैथिली जावकर, दिगंबर नाईक काही एपिसोडस मध्ये बाहेर पडतील
वैशालीही मिसफीट वाटली मला या शो साठी आणि बाकी सगळ्यांमध्ये ..... She is damm good singer and she should focus more on singing
अभिजीत केळकरला बघून मला सचिन चीच आठवण येते.... तो ही फारसा टिकेल या शो मध्ये असे वाटत नाही

By the way त्या नेहा शितोळे बघून मला सारखी त्या क्षिती जोगची आठवण येतीय.... आवाजही थोडाफार तसाच वाटला
आणि वीणामध्ये कधीकधी मला तेजश्री प्रधानचा हलकासा भास झाला
अजुन कुणाला वाटले का तसे?

कालचा एपी आता बघीतला, या वीकेंडसाठीचा बराचसा मसाला फक्त दोनच दिवसात दिलाय ह्या सगळ्यांनी, पण त्यामुळे मजा येतेय.

बादवे, वूट सोडुन अजुन कुठे बघता येतील एपी, या आधी वूटवर एपिसोड डॉऊनलोड करुन अ‍ॅड फ्री बघता येत होते, पण कालचा एपीसोड डॉऊनलोड नाही करता आला, त्यात ईतक्या सार्या जाहीराती खुप बोअर होते त्यामुळे

By the way त्या नेहा शितोळे बघून मला सारखी त्या क्षिती जोगची आठवण येतीय.... आवाजही थोडाफार तसाच वाटला>>>>>>> हो मला पण

अनसीन अनदेखा बघतंय का कोणी?

....... आज नेहा आणि पराग यांचं वाया घालवणे यावरून जोरात भांडण होणार आहे...
तु नळीवर प्रोमो पाहिला

स्वरुपच्या पुर्ण पोस्टशी सहमत.

माधव सायको सारखा वागेल अस वाटल नव्हत कधी.

वैशाली माडेच गाण आणि सुरेखा पुणे़करची लावणी झकास झाली. एक एन्टरटेनमेण्टचा टास्क असायला हवा शोमध्ये.

सो, उद्द्याच मॉर्निन्ग सॉन्ग असेल ' ऐरणीच्या देवा तुला.........' Lol

काल कुणीतरी ' गुड मॉर्निन्ग बिग बॉस' म्हणत होती, ती मेघाची कॉपी वाटली मला.

बिचकुले खोटं जाम बोलतो पण, बाहेर येतो खोटेपणा.

सगळे त्याला जास्त फुटेज देतायेत.

काल रुपाली आणि नेहा दोघींनी छान हँडल केलं. नेहात पॉझिटीव्ह चेंजेस खूप झाल्यासारखे वाटतायेत, झुंजमधे होती त्यापेक्षा.

काल वीणा योग्य बोलत होती, शिवानीची चुक असून काहीही स्टँड घेते, नेहा तिच्याशी योग्यप्रकारे बोलली आणि सर्व बाहेर आलं. तो खूप बावळटपणा होता बिचकुले शिवानी सीन. सरळ समजत होतं की तो इशारे करुन बोलावतोय वगैरे. असा पकडला जातो बिचकुले, खोटं बोलणं लगेच बाहेर येतं, धुर्तपणा नाही, राजकारणात टीकेल की नाही शंका, नुसतं भाषणबाजीसाठी बोलावणार ह्याला.

अरे किती तो गोंधळ काल, नुसता कलकलाट!!!!!

या बिग बॉसचा लोचा सेम मागच्या हिंदी बिग बॉस सारखा झालाय, सगळ्यांना स्टँड घ्यायचाय, लाईम लाईट मध्ये राहायचंय आणि कॅमेरासमोर सुद्धा! मेबी पब्लिकच मग वेगळा विचार करेन.
बिचुकले मुद्दाम सगळ्या घराला नाचवतोय, आणि हे सगळ्यांना कळतंय, पण तरीही बिचुकले आम्ही तुम्हाला फुटेज देणार नाही म्हणता म्हणता सगळे त्याच्यामागे लागतायेत. हा जोकर आता बॅटमॅनचा जोकर झालाय.
शिवानी फुलोन अग्रेसिव्ह मोड मध्ये आणि निगेटिव्ह होण्याची पर्वा नाहीये करत. बिचुकले जेव्हा म्हणाला ना, आपलं बॉंडिंग व्हायला सुरुवात होतेय आता, जॅम हसू आलं.
रुपाली मला आधीपासूनच खूप स्ट्रॉंग वाटत होती, आणि इतक्या वेळा स्टँड घेऊनसुद्धा ती निगेटिव्ह वाटत नाहीये.
वीणा आणि नेहा, काल नेहाने तरी थोडा स्टँड घेतला, पण या दोन्ही मला आवडतच नाहीयेत.
माधव काल मुद्दाम सायकोसारखं वागला, फुटेज घेण्यासाठी. बाप्पा, किशोरीबाई, सुरेखाबाई आणि दिगंबर मात्र अजूनही गेम खेळत नाहीयेत. सुरेखाबाई बहुतेक नॉमीनेट झाल्यावर चालू करतील.
अभिजित केळकर नाही जास्त टिकणार, आणि त्याची आजची रडारड ओव्हर वाटतेय. फेकही...
कल जेव्हा पराग म्हणाला ना, अजून चार पाच नावे घे ना, क्षणभर जुना पराग दिसून आनंद झाला. जबरदस्त कमेंट केली त्याने... झुंज मध्येही तो असाच होता, कमीत कमी शब्दात अपमान करणारा...आणि स्पष्ट किंबहुना अग्रेसिव्ह सुद्धा. यावेळी प्रचंड मॅच्युर वाटतोय पण. त्याने लवकर सुरुवात करावी.
वैशाली खरंच खूप ओव्हर वाटतेय, आणि फेक सुद्धा. तिचं विनाकारण इंग्लिश फेकण डोक्यात जातं.
शिव टिकून राहिन, एक वेगळं मटेरियल आहे...

कल जेव्हा पराग म्हणाला ना, अजून चार पाच नावे घे ना, >>> फारच आगाउ पणा होता तो. अशी कोमेंट फार वाइट पध्हतीने महागात पडेल त्याला. तो मला फार कच्चा वाटतो. बिचुकले हा एकटाच योग्य गेम खेळतोय आणी बाकिचे त्याच्या फासात अडकत आहेत.

वैशाली इंग्लिश का फाडत। असते???
काल इनोसेन्स बोलायच्या ऐवजी इनोसेंट बोलली कशाला तरी.. ( त्याचा / तिचा इनोसेन्स दिसून येतोय ) की असं च काही म्हणायचं होतं तिला पण ती त्याचा इनोसेंट दिसतोय असं म्हणाली......असं हसायला आलं...
बोल की सरळ मराठीत

शिवांगी डोक्यात जातेय माझ्या. टिपिकल "मीन गर्ल" टाइप बुली. बाकीचे पण बरेच जण कमी अधिक प्रमाणात तसेच वागत आहेत. कदाचित ग्रुप ला धरून रहायचे प्रेशर असेल. शिव काय, बिचुकले काय , ते छोट्या शहरातून आलेत, राहणी स्टायलिश नाही, प्रमाण भाषा बोलत नाहीत , सफाईदार पोलिटिकली करेक्ट बोलता येत नाही. पण म्हणून हे लोक त्यांच्या छोट्या छोट्या बोलण्यातल्या चुका काढून सगळे एकदम गँग ने अंगावर धावून जात आहेत स त त! तो केळकर कम् गरिबांचा स्वजो पण अनॉयिंग वाटला मला. काय वेडपटासारखा नाचत होता बिचुकले चा वाद सुरु झाला की! तो माधव अन त्याचा आरडा ओरडा तर टोटल फेक. उलट बिचुकले कसाही असो, पण कितीही लोक त्याच्यावर चालून आले तरी तो (अजून तरी) आवाज चढवत नाही की चिडत नाही!! हे रिमार्केबल स्किल आहे Happy

अरे ! काय नुसता गिचमिड काला... सगळ्यांची बडबड. उगाच वाद उकरून काढतायेत. बिचुकले सारखा मुख्यमंत्री / राष्ट्रपती मिळाला तर झालाच कल्याण भारताचं.
नेहा, रुपाली आणि शिव आवडले.
शिवानी , बिचुकले जाम डोक्यात जातायेत.
माधव सायको वाटला.
सिनिअर मंडळी शांत आहेत .
मैथिली जावकरची कोणती एक सीरिअल यायची आधी, मला ती कधी आवडलीच नाही . इथेही अजून काही दिसत नाहीये.
मला केळकर पुष्करसारखा वाटला . बायकांविरोधी कोणी बोललं तर स्टॅन्ड घ्यायचा हे ठरलंय त्याचं.

>>उद्याच्या भागात वीणाला सेफ करण्यासाठी बरोब्बर त्यालाच तो फोटोच नाहीसा करायचा आहे.

त्या रुपालीच्या टेडीचा (भिडू) पण नंबर लागणार बहुतेक!
ह्या गोष्टी बहुतेक ह्या टास्कसाठीच घेउन येतात घरात

पोर्टट्रे!!!!
शब्द नोट करून ठेवा रे!!!
Rofl

Pages