तुमचे न्यू इयर रिसोल्युशन काय आहे?

Submitted by कटप्पा on 28 December, 2018 - 19:45

माझे असे आहे की फालतू धागे काढणे बंद करेन.
तुमचे काय आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारू सुरू करणार !

गत वर्षात माझी दारूबद्दलची मते बदलली आहेत.
दारू वाईट नसते तर तिचा अतिरेक वाईट असतो हे आता मला समजले आहे.

पाणी जास्त प्यायलो तर आपल्याला पाण्याच्याही उलट्या होतात. दारू तर उगाचच बदनाम आहे.

मी दारूच्या माथ्यावरचा हा कलंक मिटवणार...
स्वत:ही पिणार आणि माझ्या आजूबाजुचे लोकंही कसे पिऊन मस्त राहतील हे बघणार...

सुरुवात ३१ तारखेच्या रात्रीपासूनच करणार !
दारूसारखे आनंददायी सुखवर्धक दु:खनिवारक पेय पिण्यास सुरुवात करायला यापेक्षा छान मुहुर्त तो काय...

तर चला सर्वांनीच मिळून ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने करूया...

होऊ दे झिण्ग झिंग झिंग झिगाट..

आता फटाक्यांच्या दारूला नाही म्हणा...
आणि अल्कोहोलच्या दारूला जवळ करा..

दिवाळी असो वा दसरा..
प्या दारू आणि टेंशन विसरा..

शाहरूखवर प्रेम करणे बंद करणार.
शाहरूखच्या नावाचा जप करणे बंद करणार.
माझ्या आयुष्यातील शाहरूखचे स्थान झिरो करणार.
त्याला त्याचे आयुष्य जगू देणार, मी माझे आयुष्य जगणार.

२०१९ मधे एकही शब्द लिहिणार नाही. वाचनाचा अतिरेक होवून झोप तिन तासांवर आलिय. त्यामुळे वाचन पुर्ण बंद करुन किमान सात तास झोपनार.
मराठी शुध्दलेखन सुधारणार.

शाली, काळजी घ्या.
तुम्ही छान लिहीता. मात्र त्यासाठी द्यावा लागणारा वेळ तब्येतीवर बेतू नये ही अपेक्षा !

माझे तर दरवर्षी असतात तेच रेसोल्युशन्स कंटीन्यु Lol
आणि अ‍ॅडीशनल काय खुळ आलं असेल डोक्यात तर ते Happy
एक जाने. पासुन सुरु करायचे ते ४ते ५ जाने. पर्यंत मग पुढच्या १ जाने. ला सुरु करायचं जे काही असेल ते. Lol

किरणुद्दीन,
कभी कभी लगता है आपुनहीच भगवान है असं होत असेल तर मग ठीक आहे नाहीतर आग लागो ला पर्याय नाही. कारण मनुष्य म्हटले म्हणजे अपुर्णता आली अपुर्णता आली म्हणजे परिपुर्णते कडे वाटचाल आली अशी वाटचाल आली म्हणजे भारतीताईंच्या शब्दात सांगायचे झाले तर 'आयुष्य असुंदर करणाऱ्या सर्व आतल्याबाहेरच्या गोष्टींना आग लावणे क्रमप्राप्तच' Happy

अच्छा आग लागो शब्दाला पर्याय विचारणे म्हणजे भगवान होणे होय ? सोप्पा मार्ग सांगितला की Lol
चूक झाली साहेब.

शाली तुम्ही एकही शब्द लिहिणार नाही मग शुद्धलेखन कसे सुधारणार >>
कळफलक बडवून / बदलून Proud

तुमचेही असेच काहीसे झाले असेल ना Wink

चूक झाली साहेब. >>>>> हो बरोबर आहे तुमचे शब्दाला हा शब्द गाळला होतात आपण

माफी दिली.

बालीश आणि आत्मप्रौढीचा प्रकार आहे एकूणच Lol
माफी नको आता Lol
या गोष्टी न सांगता केलेल्या ब-या असतात.

च्रप्स, रोजची अनुदिनी, रोजनिशी तर चुकवता येत नाही. तेथे सुधारता येईल शुध्दलेखन. Happy
संकल्पा इतकी नाजुक गोष्ट दुसरी नाही. कधी तुटेल, का तुटेल, कशाने तुटेल सांगता येत नाही.
एखादा संकल्प ३६५ दिवस तडीस नेणाऱ्या व्यक्तीला भेटायची फार इच्छा आहे. Happy

अमानवीय धाग्यावर प्रत्येक आठवड्याला एक अनुभव टाकणार, पुढील वर्षात माझे किमान ५० अनुभव त्या धाग्यावर येतील.

कथकच्या काही परीक्षा पूर्ण करायच्या वर्षानुवर्षे राहिल्या होत्या. प्रत्येक वर्षी मोह व्हायचा की नवीन वर्षाच्या रिसोल्युशन मध्ये ही इच्छा टाकावी का? पण मग जबाबदाऱ्या, महत्वाकांक्षाच्या लिस्टमध्ये हॉबीचा नंबर लागत नव्हता. पण या वर्षी नंबर 1 वर परीक्षा देणे टाकलं आहे आणि घुंगरू काढून साफ करून ठेवले आहेत.

अमानवीय धाग्यावर प्रत्येक आठवड्याला एक अनुभव टाकणार, पुढील वर्षात माझे किमान ५० अनुभव त्या धाग्यावर येतील. >>>>> शुभेच्छा, Lol

कुणालाही नविन वर्षाचे रिसॉल्युशन काय हे विचारणार नाही.>>>> सही

माझा संकल्प म्हणजे... गेल्या वर्षी म्हतसप्रयत्नणाने मी ३२ किलो वजन कमी केले होते पण मध्यंतरी बिपी अन शुगर कमी झाल्यामुळे डायट बंद केले सो गेल्या दोन महिन्यात परत ५ किलो वाढले , ते पुन्हा कमी करायचे अन परत वाढू नाही द्यायचे.☺️

Pages