तुमचे न्यू इयर रिसोल्युशन काय आहे?

Submitted by कटप्पा on 28 December, 2018 - 19:45

माझे असे आहे की फालतू धागे काढणे बंद करेन.
तुमचे काय आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःच्या इतकया पर्सनल गोष्टी चव्हाट्यावर मांडताना काहीच कसे वाटत नाही का?
>>>>

मायबोलीला मी माझे कुटुंब समजतो. तुम्ही चव्हाटा. दृष्टीकोणाचा फरक आहे Happy

माझे 2020 चे कोणतेही संकल्प पाळले गेलेले नाहीयेत Happy>>>
मम्.. Happy
गेल्या वर्षीचेच संकल्प b/d करतीये.. Lol

वजन कमी करायचं असा संकल्प दरवर्षी करते ..पण कधी जमले नाही . मागच्या वर्षी नाही केला म्हणून बहुतेक ५ महिन्यात १५ किलो कमी करण्यात यश आले .. अजून १० किलो कमी करायचे आहे .. त्यामुळे नो संकल्प !!

माझे यंदाचे संकल्पः
१. दर महिन्यात किमान एक पुस्तक वाचणार.
२. आठवड्यात किमान एकदा ब्लॉग पोस्ट लिहिणार.
३. आठवड्यात किमान ३० किमी पळणार.
४. फोनचा वापर दिवसात जास्तीत जास्त २ तास (१ तास सकाळी, १ तास संध्याकाळी). त्यासाठी Pomodoro Technique वापरत आहे.

वर्क डेस्क आणि घर स्वच्छ नीटनेटके ठेवणार
कधीही पाहिले तरी वाटले पाहिजे आजच आवरलंय असं
कोम्बिंग ऑपेरेशन टाळता येईल असा प्रयत्न करणार

Pomodoro technique - वाचून गूगल केले... उपाशी बोका तुम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकवून जाता...धन्यवाद Happy

मी पण केले गूगल Happy . च्रप्स शी सहमत. उपाशी बोका च्या सन्कल्पा मधले, क्रमान्क ३ आणि ४ जमवण्याचा मी प्रयत्न करणार.

Pomodoro technique - वाचून गूगल केले...>>+१
गेल्या अक्टोबरपासून हेच technique वापरते आहे ते कळले. दिवसाला ५ किमी चालणे, घर आवरणे आणि स्वच्छ ठेवणे. अगदी टायमर लाऊन करते त्यामुळे कामे रेंगाळत नाहीत.
अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत पण त्या हळूहळू सुरूवात करणार जेणेकरून आहे त्यात खंड पडायला नको.

Pomodoro technique - वाचून गूगल केले... उपाशी बोका तुम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकवून जाता...धन्यवाद Happy >>> +10000

1. व्यायाम
२. स्मोकिंग सोडणे
३. डाएट
ह्या नेहमीच्या अयशस्वी कलाकारांबरोबर यंदा खालील संकल्प लाँच केलेत.
रोज वॉर ॲंड पिस या कादंबरीचा एक धडा वाचणे.
साखर कमीत कमी खाणे
निदान ५० पुस्तके वाचून काढणे
नियमित चेस खेळणे
जर्मनचे बी२ पर्यंतचे सर्टिफिकेट करणे
१०-१२ लाख सेव्ह होतील असे काही करीअरमध्ये करणे
नियमित ब्लॉग लिहिणे
वेगैरे वेगैरे

किती पूर्ण होतात आणि कितींचा अण्णु गोगट्या होतो ते त्या करोनाकरालाच माहित!!

Pomodoro technique - वाचून गूगल केले... उपाशी बोका तुम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकवून जाता...धन्यवाद Happy >>> मी पण! खरंच धन्यवाद! मी पण हे करून बघणार आहे.

Thanks to YouTube algorithm मी नेमका 31 डिसेंबरला Jim Kwik नावाच्या influencer चा हा व्हिडीओ बघितला (https://youtu.be/kt7wh7HS8uc). यातली एक गोष्ट जी मला पटली ती मी नवीन वर्षात पाळते आहे ती म्हणजे सकाळी उठल्यावर किमान एक तास फोन न बघणे. दोन तीन दिवसात मला हे करून बरं वाटतंय. सकाळी फोन पाहिला नाही तर मग दिवसभरात देखील फोन कमी पाहिला जातो असं लक्षात आलंय. अगदीच सोपी सवय आहे त्यामुळे माझ्याकडून पाळली जाईल असं वाटतंय.

१.रोज केस विंचरणार (सध्या ३-४ दिवसांतून एकदा विंचरणं होतं)
२.कपडे सुकले की लगेचच घड्या घालून कपाटात ठेवणार
३.स्विमिंग शिकणार (हे गेल्या वर्षीच्या संकल्प यादीत होतं)

पुंंबा, स्मोकिंग सोडण्याची खरंच इच्छा असेल तर:
Allen Carr's Easy Way to Stop Smoking: Revised Edition: Read this book and you'll never smoke a cigarette again https://www.amazon.in/dp/1405923318/ref=cm_sw_r_wa_apa_fabc_Pxo2FbHKQV1DR

मीच नव्हे तर माहितीतल्या अनेकांंनी हे पुस्तक वाचून धूम्रपानापासुन कायमची सुटका करून घेतली.

१.पाणी भरपूर पिणे.
२. रात्री कमी खाणे.
३. गोड बोलणे.
४. काही नसेल आवडलं तर न सांगणे. तेच काही आवडलं असेल तर आवर्जून सांगणे.
५. गप्प बसणे.
६.व्यायामात विविधता जपणे नाही तर कंटाळा येतो व आपण सगळंच सोडतो.

>भरपूर पाणी पिणे. ( WFH मुळे खरतरं खूप कमी झालयं)
>रोज morning walk ला जाणं जमणार नाही. आठवड्यात एकदा तरी जाणं.
>साखर आणि मैदा चं consumption कमी करणं
>मोबाईल चा अतिरिक्त वापर कमी करणे.
>केसांची निगा.

सध्या तरी इतकचं

मानव अनेक धन्यवाद. खुप प्रामाणिक इच्छा आहे सोडण्याची. पण आजवर शक्य झाले नाही. पुस्तक नक्की वाचेन आणि आणखी एक प्रयत्न करेन. अपडेट कळवेन.

माझा संकल्प या वर्षी इथून पुढे मायबोलीवर एकही पोस्ट न लिहिणे. बघू जमते का ते. Happy

@पुंबा: या वर्षीची पोस्ट इथून पुढे असल्याने: सिगरेट सोडणे नक्की जमेल. वर मानव यांनी दिलेले पुस्तक बघू शकता. तसेच इंटरनेटवर लिंक्स मिळतील. जगात अनेकांनी यशस्वी रित्या सिगरेट सोडली आहे. मी देखील १२ वर्षांपुर्वी सोडली व आजतागायत प्यायलो नाहिये. मला स्वत:ला कधी वाटले नव्हते की मी सिगरेट सोडेन. पण ते अशक्य नाहीच पण पराकोटीचे अवघडही नाही. आपल्याला उगीचच वाटते की सोडता येणार नाही. चिंता करु नका. व्यवस्थित योजना करून कायमचे टाटा बाय बाय करा धुम्रकांडीला

या वर्षी मिञांसोबत कमी आणि अर्धांगिनी सोबत जास्तीत जास्त फिरण्याचा विचार आहे. तसं पाहिलं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोनेक ठिकाणी जाऊन आलोय. लडाख ला नेण्यासाठी तयारी करतोय तिची. बघुया कितपत जमतंय

मॉर्निंग वॉक.
लॉकडाऊनचे पोट आत घेणे.
काल सुरुवात केली. आज बुडवले. उद्या पुन्हा जाईल असे वाटतेय.
सकाळी साडेसहा वाजता ऊठणे ईज टू मच अर्ली.. आपण माणूस आहोत की सुर्य? असे वाटते अलार्म लावताना..

व्यायाम कराच, तो शरीराला आवश्यक आहेच आहे. पण पोट आत घेण्याचं उद्दिष्ट असेल तर खाण्यावर बंधने आणलीत तरच शक्य आहे. मॉर्निंग वॉक करुन पोट आत जाण्याची आशा बाळगू नका.

माझा मॉर्निंग वॉक लॉकडाउनमुळे बंद पडला. मध्ये एखादं महिना केला होता.
आता पुन्हा सुरू करायचा आहे. पण मुंबैत केसेस झपाट्याने वाढताहेत. ऑफिसेस , इ.पुन्हा बंद केली तर सकाळ संध्याकाळ
वॉकर्सची गर्दी वाढेल
२७ पासून सुरू करेन.

पण पोट आत घेण्याचं उद्दिष्ट असेल तर खाण्यावर बंधने आणलीत तरच शक्य
>>>>
खात पित तर मी लहानपणापासून आहे. पण खाल्लेले अंगाल लागत नाही असा एक फाजील आत्मविश्वास होता मला. जो या लॉकडाऊन काळात तुटला. खाण्यापिण्यात काही बदल झाले असतील म्हणजे पोरांसोबत जंकफूड जास्त जात असेल पोटात जसे पिज्झा बर्गर चीज वगैरे तर ते एक चेक करतो. पण सध्या तरी मॉर्निंग वॉकचे मूळ उद्दीष्ट्य तेच. बाकी जिमची पायरी आयुष्यात चढालो नाही.

रिसोल्युशन करायला मुहूर्त न बघणे. >>> अगदी, मुहुर्त न बघता ठरवले तरच होणार हे माहीत होते. एका मैत्रीणीने एका फोटोला बघून पोटावरून टोमणा मारला आणि अचानक तडकून उसळून काल अलार्म लाऊन उठलो आणि मॉर्निंग वॉकला चालू पडलो. भले आज नाही गेलो तरी उद्या नक्की जाणार. आणि असे अध्येमध्ये दिवस बुडवत का होईना काही काळ तरी हे रुटीन पाळेल असा विश्वास वाटतोय. तुर्तास मुलीची सोबत आहे हे बरे वाटतेय. पण ती यायची बंद झाल्यावर माझी खरी कसोटी लागणार आहे.

ऑफिसेस , इ.पुन्हा बंद केली तर सकाळ संध्याकाळ
वॉकर्सची गर्दी वाढेल
>>>>
मैदान, गार्डन, जॉगिंग पार्क मोठे असेल तर सोशल डिस्टंन्सिंग मास्क न लावताही पाळता येते. त्याउलट बाजारात दुकानात फार चिकटाचिकटी होते.
या मास्कयुगात चालण्यासोबत मोकळी शुद्ध हवाही गरजेची.

Pages